[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

महोदय,
नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार शासनाचे दि १२ मे २०१५ चे आपसी वाटाघाटीने थेट खरेदीचे परिपत्रकानुसार संपादन संस्थेने जमीन खरेदी केल्यास भूसंपादन अधिकाऱ्यास दि १९ मार्च २०१४ चे राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क सदर संपादन संस्थेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

थेट खरेदीसाठी ३ % आस्थापना व ३ % सेवासुविधा अनुज्ञेय नाही

महोदय,
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ या अधिनियमानुसार जमिनीचे भूसंपादन केल्यास दि १९.०३.२०१४ चे शासन राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क घ्यावयाचे आहे.परंतु शासनाचे दि.१२.०५.२०१५ चे आपसी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने जमीन घ्यावयाचे परिपत्रकानुसार जमीन असल्यास घ्यावयाचे असल्यास ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क संपादन यंत्रणेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

१२.०५ २०१५ चे परिपत्रकानुसार सेवाशुल्क व आस्थापना शुल्क घेण्याची तरतूद नाही . तशी तरतूद करून घेणे आवश्यक

महोदय,
१.एका व्यक्तीचे जातीचे प्रमाण पत्र साठी जोडलेले आवश्यक कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीला माहिती अधिकारात देता येईल काय ?
२. पोलीस पाटील पदाचे भरतीसाठी झालेल्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एका उमेदवारांची दुसऱ्या उमेदवारास माहिती अधिकारात देता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,एका शेतकऱ्याने अनोंदणीकृत आपसी वाटणीपत्राने शेतजमीन दोन मुलाचे नावे करून दिली.ज्या तारखेस अनोंदणीकृतआपसी वाटणीपात्र तयार करून दिले त्या तारखेस त्याचा सदर शेतजमीन वरील मालकी हक्क संपुष्टात येईल काय? किंवा मुले त्या तारखेस सदर शेतजमिनीचे मालक झाले असे समजण्यात येईल काय? यास कायदेशीर आधार आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.

वाटप पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक . अनोंदणीकृत असल्यामुळे , वडिलांचे मालकी हक्क संपुष्टात येणार नाहीत .

Section 17 (b ) of Indian Registration Act *
non-testamentary instruments which purport or operate to create, declare, assign, limit or extinguish, whether in present or in future, any right, title or interest, whether vested or contingent, of the value of one hundred rupees and upwards, to or in immovable property;

पती व पत्नींमध्ये उपनिबंधक ह्याच्याकडे आपसी घटस्फोट झालेला आहे.दोघांना एक मुलगा आहे.मुलगा आईकडे राहतो.आईच मुलाचे पालनपोषण व शिक्षण करते.मुलाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( कास्ट,डोमिसाईल,इनकम, नॉन्क्रीमीलेयर,व इतर दाखले ) काढावयाचे आहे.पत्नीचे नावाने वरील कागदपत्रे तयार करता येईल काय ?याबाबत कायदेशीर तरतूद आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,भूमिहीन व्यक्तीला जमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीर काय तरतूद आहे? कृपया मार्गदर्शन करावे.

भूमिहीन व्यक्ती , शेती कारणासाठी प्रचलित कुळकायदा तरतुदी नुसार , जमीन खरेदी करू शकत नाही .
शेत जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात परंतु अश्या व्यक्तीचे इतर मार्गाचे उत्त्पन्न १२००० -वार्षिक पेक्षा जादा असता कामा नये . सध्याचे परीस्थित १२००० पेक्षा कमी वार्षिक उत्त्पन्न असणे दुरापास्त

महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये संपादन केलेली जमीन,जर जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनासाठी होत नसल्यास,मूळ जमीन मालकास जमीन परत देण्याची तरतूद आहे काय?कृपया मार्गदर्शन करावे.

जमिनीचा औद्योगीक प्रयोजनासाठी वापर केला नसल्यास , अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करून , जर आवश्यक असेल तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जाडा दिली जाते . अन्यथा जाहीर लिलावाने जागा विक्री केली जाते . मूळ मालक लिलावात सहभागी होऊ शकतात . मूळ मेकांना परत देण्याची तरतूद नव्या भू संपादन कायद्यात आहे

महोदय,
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक २०१७ मध्ये पोस्टल बॅलेट साठी पी बी १ नमुन्यात प्राप्त झालेले अर्जाची यादी उमेदवारास अर्ज केल्यास देता येईल काय ?त्याची फी किती घ्यायची आहे.कृपया मार्गदर्शन करावे.

संबंधीत निवडणूक निर्णय अधिकार्याशी संपर्क करावा

महोदय,
गाव नमुना ७ (अधिकार अभिलेख ) मध्ये सामायिक खातेदार यांचे नावापुढे त्यांचे हिश्याची जमिनीचे क्षेत्राची नोंद करण्याची महसूल अधिनियमात तरतूद आहे काय ? कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,
भूमिहीन व्यक्तीला शेतजमीन खरेदी करावयाची असल्यास त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागेल.परवानगी मिळण्याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,
एका व्यक्तीला एका गावामध्ये १.६२ हे आर सिलिंगची जमीन मिळाली.ती व्यक्ती मयत झाली.तिला वारस दोन मुले असून त्याचे नावे ७/१२ ला लागली आहे.त्या मुलांना आपसी वाटणी करून जमीन स्वतंत्र पणे आपले नावे करून जमिनीची स्वतंत्रपणे वहिवाट करावयाची आहे.जमीन स्वतंत्रपणे वेगळी करता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे.

महाराष्ट्र शेतजमीन ( कमाल मर्यादा धारणा )कायदा १९६१ च्या कलम २९ ब प्रमाणे अतिरिक्त झालेली जमीन वाटप केली असल्यास ,अश्या जमिनीची विभाजन , जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही

जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यात यावी

महोदय,अ या व्यक्तीला बक्षीस पत्राने शेत जमीन प्राप्त झाली.अ ला अपत्य नाही.अ ला ३ पुतणे आहेत.त्या पैकी एका पुतण्याला अ ने हि शेतजमीन रजिस्टर बक्षीस पत्राने दिली.फेरफार होण्यापूर्वी अ हा मयत झाला.तलाठी ह्यांचेकडे बक्षीस पत्र व वारस असे २ अर्ज प्राप्त झाले.तलाठी ह्यांनी कोणत्या अर्जाप्रमाणे नोंद घ्यावी.कृपया मार्गदर्शन करावे.

बक्षीस पत्राप्रमाणे

महोदय,महा ज मह.अधिनियम 1966 चे कलम 85 खाली शेतजमिनीचे वाटप करताना सरस निरस जमीन ठरविण्याचे अधिकार कोणास आहे.कृपया शासनाचे निर्णय /परिपत्रक असल्यास माहिती द्यावी.

महोदय,वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ने 100 हेक्टर जमीन खाजगी शेतकऱ्याकडून खरेदी केली.सदर शेतजमीन वहिवाट करण्यासाठी पांधणरस्ते होते.ती जमीन शिल्लक आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ला त्या शिल्लक जमिनीचा कायदेशीर ताबा घेता येईल काय ? किंवा शासनाकडे त्या शिल्लक जमिनीचा मोबदला भरून जमिनीची मागणी करता येईल काय ? कृपया मार्गदर्शन करावे.याबाबत जी आर असल्यास सांगावे.

पांधण रस्ते जमीन विल्लेवाट नियम अंतर्गत शासनाकडे मागणी करता येईल

महोदय,झुडूपी जंगलाचे निर्वनीकरण म्हणजे काय ? कलम 4 ची अधिसूचना बाबत माहिती द्यावी.

निर्वनीकरण याचा dictionary अर्थ -to cut down and clear away the trees or forests from.
निर्वनीकरण म्हणजे जमिनीचा वन हा दर्जा बदलणे .

महोदय,
श्याम या शेतकऱ्याचे शेतामधून जाण्यासाठी राम या शेतकऱ्यास नायब तहसीलदार ह्यांचे कोर्टातून रस्त्याचा आदेश पारित करण्यात आला. श्याम ह्यांचे 7/12 मध्ये रस्त्याचे आदेशाची नोंद घेता येईल काय ?कृपया मार्गदर्शन करावे.

कलाम 148 मध्ये अधिकार अभिलेख म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे . या मध्ये ज्या बाबी नमूद आहेत त्याची 7/12 सादरी नोंद करता येते .
रस्त्याची नोंद करता येणार नाही .

महोदय,
एका व्यक्तीने दि 01.01.2016 रोजी शेतजमीन खरेदी केली.परंतु फेरफार केला नाही त्यामुळे 7/12 आज त्याचे नावावर नाही.आज त्या व्यक्तीला जमीनधारक म्हणता येईल काय ? कोणत्या कलमानुसार.कृपया मार्गदर्शन करावे.

होय
खरेदी खत हे title Deed आहे.
7/12 वरील नाव केवळ , जमीन महसूल गोळा करण्यासाठी/देण्यासाठी जबाबदार कोण या साठी आहे .

महोदय,
पोलीस पाटील या पदासाठी खुल्या प्रवर्गातील जागा आहे.परीक्षा फी 300/- आहे.मागासवर्गीय उमेदवारासाठी फी 150/-आहे.एस टी प्रवर्गातील उमेदवारास अर्ज भरावयाचे असल्यास परीक्षा फी किती भरावी लागेल.कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,
महाराष्ट्र ग्राम पोलीस (सेवा,भरती,वेतन,भत्ते,आणि इतर सेवाशर्ती )आदेश 1968 ह्या बाबत कृपया माहिती द्यावी.किंवा हि प्रत कोठे उपलब्ध होईल..

महोदय,
महाराष्ट्र राज्यात शेतजमीन नाही.मध्य प्रदेश या राज्यात शेतजमीन आहे.महाराष्ट्र राज्यात शेतजमीन घेता येईल काय?कृपया मार्गदर्शन करावे.

होय

महोदय,
कुळाची नोंद घेणे ची पद्धत आजही सुरु आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम चे कलम 2(18) व 4 - मानीव कुल या मधील निकष पूर्ण होत असतील , तर आज हि कुळांची नोंद होऊ शकते /होते

कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात.

कुळ कायदा कलम '३२ ओ' चा अशावेळी संबंध येऊ शकतो का असा प्रश्न निर्माण होतो. कारण कुळकायदा कलम '३२ ओ' नुसार , जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो. कुळकायद्याने कुळास दिलेला हा हक्क बजावण्याची ज्या ची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे. परंतु अशा वेळी वर उल्लेखल्याप्रमाणे कुळ व मालक असे नाते सिध्द होणे आवश्यक असते हे लक्षात घ्यावे.

महोदय,
कुळाची नोंद 7/12 वरून कमी करण्याचे अधिकार कोणाला आहे ? कोणत्या कलमान्वये ? कृपया मार्गदर्शन करावे .

शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) . कुळाचे नाव कमी करण्‍यासाठी विविध कलमे आहेत जी प्रकरण निहाय वापरली जातात. कुळाचे नाव कमी करतांना सखाोल चाौकशी हाोणे आवश्‍यक असते.

महोदय,
भूमी संपादन अधिनियम 2013 अंतर्गत कलम 4 5 6 7 नुसार सामाजिक आघात निर्धारण अभ्यास (SIA) हे संपादन संस्थेने करावयाचे आहे कि भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालया ने करावयाचे आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

सामाजिक आघात निर्धारण अभ्यास करण्यासाठी जिल्हानिहाय , पॅनल तयार कराचे आहे . या पॅनल ने हा अभ्यास करावयाचा आहे.
भू संपादन प्रस्ताव प्राप्त झालेवर , संपादन अधिकारी/ जिल्हा कार्यालय समन्वयक कार्यलयाने , या पॅनल कडे प्रस्ताव वर्ग करावा

महोदय,उंच भागातील शेताचे पावसाळ्यातील पाणी पाण्याच्या वाहण्याचे ओघाप्रमाणे सखल भागातील शेतातून वाहते.परंतु सखल भागातील शेतकऱ्याने पावसाचे पाणी अडविले तर ह्याबाबत आदेश करण्याचे अधिकार कोणास आहे व कोणत्या कलमानुसार.कृपया मार्गदर्शन करावे.

पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवता येत नाही. मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार कारवाई होऊ शकते . तथापि आपण तहसीलदारशी संपर्क साधावा

महोदय,महसूल अभिलेखात असलेल्या नोंदी खऱ्या आहेत हे कधीपर्यंत कोणत्या कलमाचे आधारे समजण्यात येते.कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.

म.ज म. आ. 1966 चे कलाम 157 वाचा

महोदय,भुमी संपादन अधिनियम 2013 अंतर्गत सामाजिक आघात निर्धारण अहवाल व मूल्यमापन करण्यासाठी प्रस्ताव संपादन यंत्रणेने सादर करावयाचे की भूसंपादन अधिकाऱ्याने सादर करावयाचे आहे.कृपया मार्गदर्शन करावे.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदार दारिद्र्यरेषेखाली नसल्यास १०/-रु चे अर्ज शुल्क भरले नाही तर माहिती चा अर्ज या कारणास्तव अपात्र ठरू शकतो काय ?

नाही. परंतु माहिती अधिकार्याने त्याबाबत कळविल्यास ते शुल्क भरावे लागेल.

महोदय,
एका शेतजमिनीचे वारस नोंद करणेबाबत हरकत आहे.यामध्ये वारस ठरविण्याचे अधिकार महसूल विभागास आहे काय ? किंवा वारस नोंद करणेबाबत काय कार्यवाही करावी ? कृपया मार्गदर्शन करावे.हि विनंती.

वारस नोंद करताना तलाठी व मंडळअधिकारी हे चौकशी अधिकारी असून ते स्थानिक चौकशी करून वारस ठरवतात.यासाठी तलाठी दप्तरातील गाव नमुना ६ क वारस प्रकरणांची नोंदवही हा नमुना आहे.काही प्रसंगी वारस बाबत तपास लागत नसलेस मंडळ अधिकारी दिवाणी न्यायालायातून वारस प्रमाणपत्र मागणी करू शकतात.वारस नोंदी बाबत महसूल मित्र मोहसिन शेख ब्लोग वरील ७-१२ वरील वारस नोंदी हे डॉ.संजय कुंडेटकर सर लिखित पुस्तक वाचावे अधिक संकल्पना स्पष्ट होतील.

महोदय, कृपया आरहन व संवितरण अधिकारी (DDO) यांची अधिकार व कर्त्यव्य याबाबत माहिती चे पुस्तकाचे नाव सांगावे किंवा वेब साईट चे नाव सांगावे.

शासकीय कोषागारात चौकशी करावी

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती स्वतः नेणार असे अर्जात नमूद केल्यानुसार अर्जदारास उपलब्ध असलेली माहिती फीचा भरणा करून माहिती घेवून जाण्याबाबत पत्राने कळविण्यात आले.परंतु अर्जदाराने अद्याप फीचा भरणा केलेला नाही व माहिती नेलेली नाही.ह्याला महिन्याचे वर कालावधी झालेला आहे अश्या वेळी अर्ज निकाली काढण्या साठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे.

माहिती करिता लागणारे शुल्क भरण्य बाबत अर्जदाराला पत्राने कळवितो त्या पत्रातच वाजवी मुदत द्यावी अन्यथा मागितलेल्या माहितीत स्वारस्य नसल्याचे समजून अर्ज निकाली काढण्यात येयील असे नमूद करता येयील

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९(1) अंतर्गत प्राप्त झालेली अपिल आपल्या प्राधिकरणाशी संबधित नसेल तर संबधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करता येईल काय ? कृपया कलम सांगावे.

याच site वर अपलोड केलेला R T I संबंधित G R वाचवा

नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मध्ये दिनांक १२ मे २०१५ चे शासन निर्णय नुसार प्रकल्पासाठी शेतजमीन आपसी वाताघातीने थेट खरेदी ची तरतूद आहे.यामध्ये जे शेतकरी भूमिहीन होतात त्यांना भूमिहीन होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ची गरज आहे काय ?

प्रश्न समजलेला नाही

महसूल विभागातील कार्यरत कर्मचारी/ अधिकारी ह्यांना ते ज्या ठिकाणी काम करीत आहे.तेथील आपले नाव पद व कार्यालयाचे नावाचा भेटकार्ड (Visiting Card) तयार करण्याची नियमात तरतूद आहे काय ?

असा नियम नाही

सर्व प्रश्नाची उत्तरे दिली जात नाही काय ?

अधिकारी त्यांचे दैनदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात ...प्रतिसाद वाढेल तसे वेळेत व सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. धन्यवाद .

तलाठ्याकडे अर्जदार/शेतकरी फेरफार नोंदीसाठी अर्ज, वारस/बोजा/विक्री/वाटणीपत्र/मृत्रुपत्राचा लेख व इतर कागद पत्र जोडून सादर करतात.त्यावर तलाठी कार्यवाही करतात जसे फेरफार नोंद घेणे;नमुना ९ व १२ ची नोटीस काढतात.त्या सर्व कागदपत्राची एक संचिका तयार होते.सदर संचिका फेरफार मंजूर झाल्यापासून तलाठी दफ्तरी किंवा अभिलेखागारात किती कालावधीसाठी जतन करावयाचा असतो.कृपया माहिती द्यावी.विशेषता नमुना ९ व १२ ची नोटीस. .

महसूल कार्यालयीन पत्रे/चौकशी अहवाल यांचा जतन करण्याचा कालावधी किती असतो.कृपया माहिती द्यावी.

संबंधीत प्रकरणावर अवलंबुन आहे....उदा. अकृषक प्रकरणातील चौकशी अहवाल ब अभिलेख आहे

इतर मागासवर्ग व एस बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्याना जातीचे प्रमाणपत्र देतांना,त्यांचे वडिल किंवा आजोबा हे त्या गावचे मानिव दिनांक १९६७ पूर्वीपासूनचे रहिवासी असावयास पाहिजे असा नियम आहे(जी आर) आहे.तेव्हा हाच नियम नाॅनक्रिमिलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी सुध्दा आहे काय ? असल्यास कृपया जी आर तारीख सांगावी ही विनंती.

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दाखल्यास हा नियम लागू नाही

'अ' ह्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत.त्याचे मृत्यु नंतर शेतजमिनीमध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार त्याचे वारस दोन पत्नी,मुले व मुली होतील काय ?

दुसरी पत्नी वारस होणार नाही

मा.महोदय, मुस्लिम शेतकरी मयत झाला.त्याचे वारसान नोंद मुस्लिम वारस कायदानुसार करावी असा अर्ज तलाठ्याला प्राप्त झाला. मुस्लिम वारस कायदानुसार नोंद मजूर करता येईल काय ? तसेच मयत शेतकरी ह्याचे वारस कोणते होईल.कृपया माहिती द्यावी.

वारस नोंद व्यक्तीचे व्यक्तीक कायद्याप्रमाणे करणे आवश्यक .
प्रशांधीन वारस नोंद मुस्लिम वारस कायद्याप्रमाणे करणे आवश्यक
मुस्लिम कायद्यात , शिया व सुन्नी असे दोन शाखा आहेत . त्या प्रंमाणे वारस नोंद करणे आवश्यक

सन २०११ ची जनगणना मधील तालुका तसेच गावनिहाय लोकसंख्या,पुरुष,स्त्री,अ जा,अ ज व इतर ची माहिती पहावयाची आहे.कृपया वेब साईट ची माहिती द्यावी.

http://www.censusindia.gov.in/pca/Searchdata.aspx

अ ह्या व्यक्तीला ब ह्यांनी सब रजिस्ट्रार ह्यांचे कडे दत्तकविधान नोंदणी करून दि २७.१०.१९७७ ला दत्तक घेतले.अ चे नाव दत्तक विधाननंतर क झाले.दत्तकविधान पूर्वी अ ह्यांचे नावे शेती होती.आजही अ चे नावे शेती आहे अ म्हणजेच दत्तकविधान नंतर क दि १९.०४.२०१० ला मयत झाले.क चे पत्नीने उ वि अ ह्यांचेकडे वारस नोंदीसाठी अर्ज केला.तो अर्ज उ वि अ ह्यांनी तलाठी ह्यांचे कडे पाठविला.तलाठी व मंडळ अधिकारी ह्यांनी ह्या अर्जावर नियमानुसार कोणती कारवाई करावी ? कृपया मार्गदर्शन करावे ?

Hindu Adoption and Maintenance Act 1956 च्या कलम १२(ब) अन्वये दत्तक घेण्यापूर्वी क चे नावे जी मिळकत होती ती दत्तक गेल्यानंतर हि त्याचे नावे राहते. त्यामुळे हिंदू वारसा कायदा प्रमाणे जे वारस असतील त्यांचे नाव मिल्कातील लावणे आवश्यक.
पत्नी
मुलगा
मुलगी
आई ( दत्तक ज्या कुटुंबात गेला आहे त्या कुटुंबातील)
....

Talathi have recieved one application for Muatation -memorandum of oral gift / HIBA from muslim khatedar which is notarised document.My question is that what procedure should be done by Talathi & Circle Officer because it is unregister document.What is G.R.under which mutation takes place?

Even muslim gifts which are oral in nature and if they are reduced in writting , are exempt from registration.

Under section 123 of Transfer of Property Act , gift of immovable property is made by a instrument of registered deed , signed by donor and attested by two witness.
Even under section 17(1) (a) of registration act, instrument of gift is compulsorily registrable.
However under muslim law , there is an exception , gift i.e. hiba if it fulfills following requires no registration .
1. It is declaration of donor- offer
2. Acceptance by donee
2. Delivery of property
Under muslim law , there is no requirement of registration.
There are several judgements on this.