[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

सर माझा प्रश्न असा आहे की, बोरवेल खोदण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.

बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .

बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .

सर माझा प्रश्न असा आहे की, नवीन प्लॉट वर घराचे बांधकाम करावयाचे असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.

जागा ज्या नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते त्या नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे .
नियोजन प्राधिकरण
महानगर पालिका - महानगर पालिका क्षेत्र
नगर पालिका - अ, ब व क वर्ग नगर पालिका
ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्र - संबंधित ग्राम पंचायत
ग्रामीण भाग ( सर्वे नुंबर क्षेत्र ) - जिल्हाधिकारी
या शिवाय विशेष प्राधिकरणे - सिडको - नवी मुंबई क्षेत्र , MSRDC
काही ठिकाणी - जिल्हा परिषद
आपली जागा कोणत्या क्षेत्रात येते त्यावरून आपण ठरवा

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी सिनियर आहे. दोघेही दुय्यम सेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा उतीर्ण आहेत आणि A कर्मचारी यांचे CR खराब आहेत A कर्मचारी मागासवर्गीय आहे. A कर्मचारी यांची जेष्ठता डावलून B कर्मचार्यास पदोन्नती देण्यात येईल का सर असे नियमात बसते का सर कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

सर एखादा कर्मचारी 7 ते 8 वर्षांपासून कार्यालयीन कामे खूपच हळूवारपणे करत आहे म्हणजे 1 पत्र टाईप करायला सांगितले तर 3 तास लावतो एवढ हळुवारपणे काम करतो मग सदर कर्मचारी यांच्यावर कामामध्ये वारंवार हलगर्जीपणा करीत आहे म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकता येते का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

त्याला टपाल स्वीकारायला बसवा .
काम सुधारणेची संधी द्या . सुरवातीस करणे दाखवा नोटीस काढा

आंतरजिल्‍हा बदलीने कर्मचारी रुजु झालेले आहेत त्‍यांनी दुय्यमसेवा व महसूल अर्हता परीक्षा बदली होण्‍याच्‍या आधी म्‍हणजे प्रथम नियुक्‍ती झालेल्‍या जिल्‍हामध्‍ये उत्‍तीर्ण केलेली होती, त्‍यांना पदोन्‍नती द्यावयाची असल्‍यास बदली झालेल्‍या जिल्‍हामध्‍ये किती वर्षाची सेवा पुर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना पदोन्‍नती देता येईल.

सर एखादा कर्मचारी विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा शासन निर्णयामध्‍ये विहीत केलेल्‍या मुदतीत व संधीत परीक्षा उत्‍तीर्ण झालेले आहे. आणी सदर कर्मचारी यांची फक्‍त ३ वर्षे ७ महिण्‍याची सेवा पुर्ण झालेली आहे व सदर कर्मचारी सेवा जेष्‍ठतेनुसार पदोन्‍नत्‍तीसही पात्र आहेत. मग त्‍यांना पदोन्‍नत्‍ती देता येईल का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

सर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथून आंतर जिल्हा बदलीने एक कनिष्ठ लिपिक जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे रूजू झाले आहे. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे असतांना महसूल अहर्ता परीक्षेतील 3 विषयांत सूट मिळालेली होती म्हणून त्यांनी फक्त 4 विषयांची परीक्षा दिली तर चालेल का सर. की महसूल विभाग बदलल्यामुळे संपूर्ण विषयाची पुन्हा परीक्षा द्यावी लागले. याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली संधी वापरुन दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळाले व तो कर्मचारी परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी सदर परीक्षा उत्‍तीर्ण होईल का सर? याबाबत मार्गदर्शन करावे सर खूप मोठी मदत होईल सर.

अ ब क ड यादी चौथी आवृत्‍ती याबाबत थोडक्‍यात मार्गदर्शन करावे व सदर पुस्‍तक PDF स्‍वरुपात उपलब्‍ध असल्‍यास कृपया माझे इ-मेल आयडीवर पाठविण्‍याची कृपा करावी.

महोदय माझा प्रश्‍न असा आहे महाराष्‍ट्र जमीन महसूल नियमपुस्‍तीका खंड - ३ मध्‍ये विहीत केलेले नोंदहवीचे नमुने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीकाशी मिळतेजुळते आहेत पण त्‍यामध्‍ये प्रकरणाचा प्रकरण क्रमांक व परीच्‍छेद क्रमांक वेगळा दिलेला आहे. मग कार्यालयीन कामे करतांना वापरण्‍यात येणारी नोंदवही MLRC खंड - ३ प्रमाणे ठेवावी क‍ि जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीका मध्‍ये विहित केलेल्‍या नमुन्‍यानुसार ठेवावी. याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे.

आपणास ज्या कार्यालयाचे नमुने ठेवायचे आहेत त्या कार्यालयाचे नमुने खंड ३ प्रमाणे ठेवणे आवश्यक

महोदय माझा फक्‍त एकच प्रश्‍न आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा लिपीक संवर्ग ही परीक्षा सुट मीळालेल्‍या विषयाचा लाभ घेवून (दुसरी संधी) जर परीक्षा दिली तर ज्‍या ज्‍या विषयाची परीक्षा दिली त्‍या त्‍या विषयामध्‍ये ६० टक्‍के च्‍या वरच गुण घ्‍यावे लागतील म्‍हणजे सुटच घ्‍यावी लागेल तरच संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण करता येते का सर. योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे.

शासकिय कर्मचारी आपले सरकार या पोर्टल वर आपली कार्यालयीन बाबींशी संबंधीत तक्रार दाखल करु शकतो का सर ?

आपल्या कार्यालयाचे प्रमुखांना आपला प्रश्न /अडचण सांगा ना .
आपले सरकार पोर्टल सर्व नागरिंकासाठी आहे . आपण हि नागरिक आहात . मात्र सेवा विषयक बाबी संदर्भात तक्रार असेल तर कार्यलय प्रमुखांचे निदर्शनास आणणे उचित

हक्कसोड पत्र आणि मृत्युपत्र या दोन्ही दस्तऐवजांची नोंदणी कोणत्या कार्यालयात केली जाते सर ?

हक्क सोड पत्रकाची व मृत्य पत्राची नोंदणी , दुय्यम निबंधक कार्यकाळात केली जाते
मृत्य पात्राची नोंदणी ऐच्छिक आहे .

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, A नावाच्‍या व्‍यक्‍तीच्‍या जमीनीच्‍या ७/१२ वर फक्‍त A चे नाव आहे, त्‍याचा B नावाचा लहान भाऊ याने हक्‍कसोड पत्र लिहून दिलेले होते म्‍हणून त्‍याचे नाव ७/१२ वर नाही. मग आता त्‍या व्‍यक्‍तीचा लहान भाऊ त्‍या जमीनीच्‍या ७/१२ वारस म्‍हणून माझे नाव नोंदव‍िण्‍यात यावे म्‍हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर नाव नोंदविण्‍यात येईल काय ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

हक्क सोडून दिल्यावर , वारस म्हणूंनव नाव कसे लागेल

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, एखाद्या व्‍यक्‍तीने आपल्‍या वडीलोपार्जीत मिळकतीवरील आपला हक्‍क हक्‍कसोड पत्राव्‍दारे जर सोडून दिला तर सदर व्‍यक्‍ती त्‍या मिळकतीवर आपला हक्‍क पुन्‍हा दाखवू शकतो का सर ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

हक्क सोड पात्र नोंदणीकृत असेल तर नाही

नमस्कार सर माझा प्रश्न विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपीक संवर्ग ) या संदर्भात आहे.

3 विषयात या पूर्वीच्या परीक्षेत सूट मिळाली होती म्हणून फक्त 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली. प्रश्न खालील प्रमाणे : -

प्रश्न - सदर परीक्षा सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेवून जर परीक्षा दिली तर राहीलेल्या प्रत्येक विषयात कमीतकमी 60 % गुण प्राप्त केले तरच संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण केली जाते का सर ? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

mohsin7-12.blogspot.in या संकेत स्थळावर विभागीय दुय्यम सेवा परीक्षा लेख दिला आहे तो वाचावा

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, A नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण नाही. B नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण आहे. पण जेष्‍ठते मध्‍ये A कर्मचारी सिनीयर आहे व B कर्मचारी ज्‍युनीयर आहे. A कर्मचारी यांची जेष्‍ठता कायम आहे कारण त्‍यांच्‍या तीन संधी झाल्‍या नाही व 9 वर्षाची सेवा पण झाली नाही. मग आता B कर्मचारी ज्‍युनीयर असला तरी परीक्षा लवकर पास झाला म्‍हणून त्‍यांना लगेच पदोन्‍नती देण्‍यात येते का सर, याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे. हि नम्र विनंती

पदे जशी रिक्त होतात , तसे पद्दोनीतीची बैठक होते . बैठकीमध्ये आपण पदोन्नतीसाठी पात्र यादीमध्ये येत याल, तर आपणास पदोन्नती मिळेल

सर विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) या परीक्षेच्‍या शासन निर्णयातील नियम क्र. ८ नुसार सदर परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी प्रत्‍येक वि‍षयात कमीत-कमी ४० टक्‍के गुण व संपुर्ण परीक्षेत एकूण गुणाच्‍या ५० टक्‍के गुण (म्‍हणजे १००० पैकी ५०० च्‍या वर गुण ) मि‍ळाले तर सदर परीक्षा उत्‍तीर्ण झाल्‍याचे जाहिर केले जाते. तसेच नियम क्र. १० नुसार जर परीक्षार्थी परीक्षा नापास झाला तर त्‍याने कोणत्‍याही व‍िषयात किंवा व‍िषयांमध्‍ये त्‍याने ६० टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण मिळविले तर त्‍याला त्‍या विषयाला पुन्‍हा बसण्‍यापासुन सुट देण्‍यात येते.

प्रश्‍न खालील प्रमाणे-
(१) तीन व‍िषयाला यापुर्वीच्‍या परीक्षेत सुट म‍िळाली होती. म्‍हणून फक्‍त ३ विषयाची पुन्‍हा परीक्षा दिली तर संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी तीन्‍ाही विषयात प्रत्‍येकी ६० टक्‍के गुण मिळवावे लागतील कि ४० टक्‍के गुण मिळवावे लागतील सर.
कृपया करुन मार्गदर्शन करावे. खुप मोठी मदत होईल सर.

आदरणीय महोदय माझा प्रश्‍न असा आहे की, माझे आजीचे नावावर २ एकर जमीन होती, त्‍यांचे निधन सन २००० मध्‍ये झाले पण माझे आजीने कोणत्‍याही मुलाच्‍या नावाने मृत्‍युपत्र लिहून दिलेल नाही.
मग आजीचे निधन झाल्‍यानंतर त्‍या जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून फक्‍त माझे वडीलांचे नाव आजच्‍या तारखेपर्यंत आहे. माझे वडीलांचे दोन भाऊ सदर जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून आमचे नाव नोंदविण्‍यात यावे म्‍हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर तलाठी साहेब त्‍यांचे नाव वारस म्‍हणून ७/१२ वर नोंदवतील का सर ?
कृपया करुन याेेग्‍य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

आपले कथनानुसार , आपले आज्जीस तीन मुले आहेत . त्यामुळे साहजिकच अन्य दोन वारसांची नावे लागणे आवश्यक

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाची तत्‍वे, अभिलेखाचे वर्गीकरण करण्‍याची पध्‍दत, अभिलेख ज‍तन करण्‍याचा कालावधी किती, ड वर्ग अभिलेख नष्‍ट करण्‍याची कार्यपध्‍दती, अ,ब,क,ड यादी या सर्व बाबींची माहिती मला घ्‍यावयाची आहे. त्‍यासाठी मला कोणत्‍या कायद्याचे किंवा शासन निर्णयाचे वाचन करावे लागेल याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन करावे. आणि याबाबत आदरणीय महोदय आपल्‍याकडे PDF स्‍वरुपात माहिती उपलब्‍ध असल्‍यास कृपया करुन मला ई-मेल व्‍दारे सदर माहिती पुरवीण्‍याची कृपा करावी. ही नम्र विनंती.

या पूर्वी A , B, C, D list अभिलेखांचे जतनाबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत . तथपि या लिस्ट सध्या स्थितीत , तेवढ्या उपयोगात येऊ शकत नाहीत . काही प्रमाणात काळ बाह्य झाल्या आहेत .
शास्नानाने , Maharashtra Public Records Acts संमत केलेला आहे . या कायदयानुसार प्रत्येक विभागाने , retention schedules बनवण्याचे आहेत व त्यास संचालक पुराभिलेख महाराष्ट्र शासन यांची मान्यता घेण्याची आहे .

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, नस्तीबद्ध झालेल्या प्रकरनांचा त्रिअक्षरी क्रमांक खाली दिलेला आहे.
LND-२०
TRS-१६
NAP-३४
LND-४१
LEN-३९
NAA-४६
या सर्व प्रकरणांना अभिलेख कक्षात जतन करून ठेवान्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भूसंपादन अधिनियम 1894 नुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे कडून भूसंपादनाचा निवाडा घोषीत करण्याची कार्यवाही कशाप्रकारे केली जाते? या बाबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायद्यातील तरतुदीसह योग्य मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.

पंकजजी एखादा जुना निवाडा वाचा .
भू संपादन प्रकरण नसती वाचा

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा एखादा कर्मचारी उत्‍तीर्ण नसेल तर त्‍या कर्मचा-याला कालबध्‍द पदोन्‍नती देता येते का ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नाही

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, जिल्‍हातील एखादा तलाठी ज्‍या उपविभागामध्‍ये कार्यरत असेल त्‍या ठिकाणाहून त्‍याने दुस-या उपविभागात बदली व्‍हावी म्‍हणून विनंती अर्ज केला व त्‍याची विनंती मान्‍य झाली व त्‍याला जिल्‍हातील दुस-या उपविभागात पदस्‍थापना दिली तर जिल्‍हातील जेष्‍ठतेमध्‍ये त्‍याचे नाव सर्वात खाली टाकले जाते का? तलाठी संवर्गाची जेष्‍ठता फक्‍त उपविभागा पुरती मर्यादीत असते का?
कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा सुट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर कर्मचार्याने राहीलेल्या विषयात त्याने किती गुण मिळविणे आवश्यक आहे ? या बाबत माननीय न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत काय ? याबाबत सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, मुखत्यारपत्र म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

एखादा काम स्वतः करण्या ऐयवैजी दुसर्याने करण्याकरता त्यास प्राधीकृत करणे .
कृपया भारतीय करा कायदा १८८२ चे प्रकरण १० , कलाम १८२ ते २३८ वाचा .

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भोगवटदार वर्ग-१ जमीन म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

जमीनहस्तांतरांवर निर्बंध नसलेली जमीन म्हणजे , भोगवटादार वर्ग १ जमीन

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी B चे पुढे आहे. दोघांनीही पहिली संधी वापरून महसूल अहर्ता परीक्षा दिली आणि A कर्मचारी नापास झाला व B कर्मचारी परीक्षा पास झाला तर बी कर्मचाऱ्यास लगेचच पदोन्नती देण्यात येते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली वेळ दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळविले व तो परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होईल का ? कृपया याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, वाजीब-उल-अर्ज म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग) ही परीक्षा दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर परीक्षेत राहीलेल्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेत 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले तर संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे घोषित केले जाते काय ? ( 3 विषयात सूट मिळाली व 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली आहे. ) कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, स्थायी आदेश नस्ती म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, महसूल अपील प्रकरणामध्ये रीतसर चौकशी कशाप्रकारे केली जाते? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. खूप मोठी मदत होईल सर.