[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

एका व्‍यक्‍तीच्‍या 7/12 वर अडनाव नाही. अडनाव दाखल करण्‍यासाठी काय प्रक्रिया आहे

म. ज. म. अ १९६६ च्या कलाम १५५ प्रमाणे दुरुस्तीसाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

सर
पटटे वाटप करुन दिलेल्‍या गायराण जमीनीची मा.न्‍यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे, पटटे वाटप गायरान जमीनीचे फक्‍त वारसा फेरफार घेता येते परंतु एक भावाच्‍या नावाने वाटप झालेल्‍या जमीनीची वाटणी मा.न्‍यायालयाने भावाभावात वाटणी केली आहे.
तरी खालील प्रमाणे मार्गदर्शन करावे.

1) सदर न्‍यायालयीन आदेशान्‍वये फेरफार घेता येतो का
2) त्‍यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्‍यक आहे का
3) सदर आदेशाचे पालन न करता सक्षम अधिकारी यांची परवानगी घेण्‍यास कळविल्‍यास न्‍यायालयाचे आदेशाचा अवमान केल्‍यासारखे होईल का

म ज म ८५ प्रमाणे तहसीलदार यांचे आदेशानंतर फेरफार घेत yeyil

नमस्‍कार सर

तहसिल कार्यालयात 7/12 वरील इतर अधिकारातील कुळ, साधा कुळ, स.कुळ, सं कुळ अशा नोंदी असलेल्‍या उडवण्‍यासाठी अर्ज येत आहेत. अशा असलेल्‍या नोंदी उडवण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का

महाराष्ट्र कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ , १५ व ३१ अन्वये कुलाची वहिवाट संपुष्ट करण्याचे अधिकार मामालेतदार यांना आहेत .
तथापि , कलम १४ खाली मालकाने तीन महिन्याची आगाऊ सूचना कुलास देणे आवश्यक आहे . या कालावधीत जर , ज्या तृती साठी सूचना देण्यात आली आहे , त्याची दुरुस्ती कुळाने केली नाही तर , कुल्वहिवत संपुष्टात अंत येते .
कलम १५ अन्वये , कलम ३१ चे अधीन , मालक कुलाची वहिवाट
१. स्वतः स कसण्यासाठी
२. बिनशेती उपयोगासाठी
संपुष्टात अनु शकतो . तथापि मालकाने अशी सूचना , ३१ डिसेंबर १९५७ पूर्वी दिलेली असली पाहिजे

सविस्तर चौकशी नंतर

सर, वाटणी म्‍हणजे काय ? महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्‍वये वाटणी करीत असतांना आई-वडील व त्‍यांची सर्व अपत्‍ये यांना समान वाटप होणे आवश्‍यक आहे का ?
दूस-या एका प्रकरणात भावाच्‍या नाववर असलेली जमीन भावाभावात वाटणी करुन देण्‍यासाठी अर्ज आलेला आहे तर वाटणी करण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?

कलम ८५(२) खाली , वाटप म्हणजे निच्छित असलेल्या क्षेत्र प्रमाणे , सह धारकत जमिनीची विभागणी करणे

मिळकतीत प्रत्याकाचा हिस्सा किती आहे , हे दिवाणी न्यायालय मार्फत निच्छित केले जाते

सर, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख हे एकच आहेत का ?
जर कार्यालय प्रमुख हे तहसिलदार असतील तर विभाग प्रमुख तहसिलदार यांना म्‍हणता येईल का ?

नाही

सर, साधारण बारा वर्षापुर्वी खरेदीखत झालेले आहे, आज पर्यंत फेरफार झालेला नाही पण आज खरेदी घेणार मयत झालेला आहे अशावेळी मयताच्‍या वारसांच्‍या नावे फेरफार करणे योग्‍य राहील का ? विक्री करणार जिवंत आहे व तो फेरफार करुन देण्‍यास तयार आहे काय करावे मार्गदर्शन करा.

खरेदी देणार जरी मयत असला तरी , घेनाराचे नाव ७ /१२ सादरी लावता येयील

सर, माझा लॉगीन आयडी mahadiwalek.v2009@gmail.com हा आहे पण पासवर्ड टाकला असता तो ओपन होत नाही तरी कृपया नविन पासवर्ड रिसेट करुन देण्‍यात यावा. तसेच कर्मचारी व्‍यासपीठ मध्‍ये समाविष्‍ठ होण्‍यासाठी काय करावे लागेल याची माहिती दया.

आपली सदस्य नोंदणी झालेली नाही . कृपया नव्याने फॉर्म भरा आपल्याला पासवर्ड पाठविण्यात येयील . तसेच कोणताही कर्मचारी , कर्मचारीव्यासपीठ मध्ये लोग इन होवून समाविष्ट होऊ शकतो . धन्यवाद .

सर, दिवाणी प्रक्रीया संहितेचे कलम 54 नुसार सरसनिरस वाटणी करीता प्रकरण जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडुन तहसिल कार्यालयात आले असता उपअधिक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी करुन दिलेली आहे. अशावेळी वादी प्रतिवादी यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी शुल्‍क व मुद्रांक शुल्‍क भरण्‍यास पत्र देणे योग्‍य राहील का ? महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक 27 मार्च 1995 मधील तरतुदीनुसार न्‍यायालयीन डिक्रीव्‍दारे झालेल्‍या हस्‍तांतरणावर नोंदणी व मुद्रांक शुल्‍क जमा करणे आवश्‍यक आहे तरी कृपया दिवाणी प्रकी्या संहितेच्‍या कलम 54 नुसार आलेल्‍या डिक्रीवर नोंदणी व मुद्रांक शुल्‍क भरण्‍यास वादी यांना कळवणे आवश्‍यक आहे का ?

सर, एका व्‍यक्‍तीला 2001 नंतर जन्‍माला आलेली तिन अपत्‍ये आहेत. पण त्‍यातील एक अपत्‍य त्‍या व्‍यक्‍तीने आपल्‍या बहिणीला कायदेशिर बाबी पुर्ण करुन दत्‍तक दिलेले आहे अशावेळी त्‍या व्‍यक्‍तीस ग्रामपंचात किंवा इतर कोणत्‍याही निवडणुकीस फॉर्म भरुन निवडणुक लढवता येईल का ?

नाही........... त्या मुलाचे नैसर्गिक पालकत्व त्याच व्यक्तीकडे राहते

सर, राशन दुकानदार यांना जनमाहिती अधिकारी म्‍हणता येईल का ? किंवा तसे आदेश तहसिलदार यांना काढता येतील का ?

नाही

गावात एखादया समाजासाठी स्‍मशानभूमी उपलब्‍ध नसल्‍यामुळे स्‍मशानभूमी करीता जागा उपलब्‍ध करुन देण्‍या बाबत तहसिल कार्यालयात अर्ज आलेला आहे तरी आपण पुढील कार्यवाही बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सदर करा .

महा जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम५ अन्वये , स्मशान भूमीसाठी , शासन ग्राम पंचायात्साठी जमीन प्रदान करते

नमस्‍कार सर
पतीच्‍या नावाने 4 एकर व पत्‍नीच्‍या नावाने 4 एकर जमीन असल्‍यास पती (अर्जदार) यांना अप्‍लभूधारक प्रमाणपत्र देता येईल का ?

नवीन भू संपादन कायद्यानुसार
१. अल्पभूधारक - ज्याचे नावे / कुटुंबाचे नावे, जिरायत ५ एकर जिरायत अथवा २.५एकर बागायत आहे
२ . अत्यल्पभूधारक म्हणजे - ज्याचे/ कुटुंबाचे नावे १.२५ एकर बागायत शेती अथवा २.५ एकर शेती जिरायत आहे

शेती स्वरूपावरून ठरवा .

सर
एक प्रकरणात 7/12 वर अ, ब, क,ड, इ यांच्या नावे समाईक क्षेत्र आहे

प्रकरणात तहसिल कार्यालयात समान हिस्याने वाटणी करीता अर्ज आलेला आहे.

अ ही आई असुन इतर भावंडे आहेत

अशा प्रकरणात समान हिस्सा देण्याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत का ?

तुकडे बंदिचा भंग होत असल्यास काय करावे.?

जमिनीचे मालकी हक्क बाबत वाद नसल्यास , तहसीलदार म.ज.म.अ १९६६ चे कलम ८५ , म.ज मअ नियम अन्वये वाटप करू शकतात
मात्र तुकडे बंदीचा भंग होत असल्यास , तुक्देबंदी कायदा कलम८ अअ प्रमाणे , अश्या वाटपावर निर्बंध आहेत

सर
एका प्रकरणात अ या महाराष्ट्रातील युवकाचे कर्नाटकातील स्वजातीय युवतीशी विवाह झाला त्याची नोंद ग्रा प येथे झाली पतीच्या नावाने मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, तहसिल चे रहिवाशी , मिळाले आहे

प्रकरणात वरील पुराव्याधारे तहसिलदार मार्फत एसडीओ कडे सासरच्या नावाने जात प्रमानपत्राची मागणी केली असता एसडीओने अर्जदार कर्नाटकातील असल्यामुळे जात प्रमाणपत्र देता येत नाही असे कळवले आहे .

प्रकरणात असा निर्णय देता येतो का ?
नागरीकाच्या मुलभुत हक्काचे भंग होते का ?
याविरूध्द अपिल कोठे करावे ?

१. होय.
२. नाही
३. वैधता समितीकडे

अ या युवकाचे पत्नीने , तिच्या वडिलांना , आजोबाना अथवा नातेवाईकांना दिलेले कर्नाटक राज्यातील प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक . अश्या प्रमाणपत्राचे आधारे , प्रांताधिकारी नमुना ६ अथवा १० मध्ये जात प्रमाणपत्र देतील

सर, एक प्रकरणात अर्जदार यांनी तहसिल कार्यालयात अर्ज सादर करून मालकी भोग वर्ग 1 वरील जमीनीचे अतिक्रमण काढुन देण्याची विनंती केली असता मंडळ अधिकारी व्दारे चौकशी केली असता म.अ यांनी बांधाचा वाद नसुन सदर जमीनीवर त्रयस्थ व्यक्तीचे अतिक्रमण आहे असा अहवाल दिला आहे
त्यानुसार अर्जदार यांना म ज म अ १९६६ चे कलम ५०, ५९ व परीपत्रक दि.२३/८/८२ अन्वये मालकी जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार महसुली अधिका-यास नसल्याचे कळवले आहे.
यावर अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देऊन तहसिलदार अतिक्रमण काढत नसल्याचे तक्रार केली यावर जि का ने कलम १३८ खाली प्रकरण निकाली काढा असे पत्र दिले
यावर पुन्हा अर्जदार यांना बांधाचा वाद नसल्याने आपण न्यायालयात दाद मागण्यास कळवले आहे यावर अर्जदाराने पुन्हा जिल्हाधिकारी कार्या कडे जाऊन अर्ज दिला आहे त्यावर जि का ने नियमानुसार कार्यवाही करण्यास पत्र दिले आहे

प्रकरणात अतिक्रमण काढणे नियमात बसत नाही आता काय करणे आवश्यक आहे

जिल्हाधिकारी यांचे नियमानुसार कारवाई करा या आदेशाचे अनुषगाने , आपण अर्जदारास कालवून दया का , खाजगी मालकीचे जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार तहसीलदार यांना नाहीत . त्यांना दिवाणी न्यायालाय्त जाणेस सल्ला दया .
पत्राची प्रत जिल्हा कार्य्लायास दया

सर,
अ, ब, क हे तिन भाऊ आहेत.
प्रकरणात
अ चा 7/12 गट क्र 45 आहे
ब चा 7/12 गट क्र 46 आहे
क चा 7/12 गट क्र 47 आहे.

प्रकरणात
अ चा प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 47 वर आहे
ब चा प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 45 वर आहे
क प्रत्‍यक्ष ताबा गट क्र 46 वर आहे

असे असतांना आपापसातील वाद असल्‍यामुळे सदर ताबा नुसार किंवा नवीन वाटणी करुन देण्‍यात ब हा भाऊ तयार नाही

प्रकरणात ब ने कोर्टात दिवाणी प्रक्रिया संहिता चे कलम 54 नुसार 7/12 नुसार कोर्ट डिक्री अधारे गट क्र 45 ची विभागणी करुन मागीतली आहे तशी कोर्टाने ऑर्डर ही केली आहे

आता अ ताबा असलेल्‍या जमीनीचा मा.न्‍यायालयाने आदेश केला आहे
अशा वेळी अ ला न्‍याय मिळण्‍यासाठी काय करावे लागेल.

अपील

सर, अंदाजे 20 वर्षापुर्वी 7/12 पुर्नलेखन मध्‍ये झालेल्‍या चुका दुरूस्‍त करण्‍याचे अधिकार कोणाला असतात या बाबत कोठे अर्ज करणे अपेक्षीत आहे. कृपया तात्‍काळ माहिती दयावी हि विनंती

म. ज. म. अधिनियम कलम १५५ खाली तहसीलदार कडे अर्ज करा. ''चुक होऊन २० वर्षे झाली आहेत त्यामुळे विलंब माफ करण्यास प्रांत सक्षम आहेत, त्यांचेकडे अपील करावे'' असे उत्तर घ्या. नंतर प्रांताकडे अपील करा.

सर, गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.

प्रश्न कळत नाही. गायरान जमीन शासनाच्या मालकीची असते

सर, पट्टा मंजुर झालेल्या गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.

१. गुरचरण जमीन शासने भाडेपट्ट्याने दिली आहे का ?
२. शासनाने भादेपात्याने दिलिअस्ल्यस , त्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय /तहसील कार्य्लायाने , आदेश काढले असतील . त्यामुळे पुन्हा परवानगीची गरज नाही

३. मात्र एक घोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक , म. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार , खूप अपवादात्मक परस्स्थितीत , गुरचरण/गिरण जमीन दिली जाते .

ग्रामसभा मान्यता , मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संमती , भाडेपट्टा देण्यापूर्वी घेतली जाते .

सर, गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याची पध्दत काय आहे.

गुरचरण जमीन ग्रामपंचायत कडे व ग्रामपंचायतीचे ताब्यात असते .

त्यामुळे तीस वारस नोंद लावण्याचे प्रयोजन काय ?

गुरचरण जमीन , कब्जे हक्काने अथवा भाडे पत्त्याने खाजगी व्यक्तीस दिली असल्यास , वारस लावण्याचा प्रश्न उद्भवेल

पुर्विपासुन वहीवाट असलेल्या स्मशानभूमीची नोंद 7/12 वर कशी घ्यावी ?

७/१२ वरती फक्त पिकन संदर्भात नोंद होते
स्मशान भूमीची नोंद घेता येत नाही

सर, पाणी पुरवठयाच्‍या साधनासाठी,विहिरीसाठी...इत्‍यादी करीता एक, दोन ...दहा गुंठे जमीन विक्री करीता परवानगी मागण्‍यासाठी अर्ज प्राप्‍त होत आहेत .सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत, नसल्‍यास कोणत्‍या अधिनियमान्‍वये / शासन निर्णयान्‍वये आहेत या बाबत कृपया लवकरात लवकर माहिती दयावी ही विनंती.

सदर परवानगी देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना नाही. सदर विहारीच्या पाण्याचा उपयोग सार्वजनिक लोकांना होत असेल तर जिल्हाधिकारी तुकडे जोड तुकडे बंदी क्याद्याखालील नियम १९५९ मधील नियम ६ ला अधीन राहून परवानगी देण्यास सक्षम आहे.

महसुल विभागातील नायब तहसिलदार (म १) व नायब तहसिलदार (म२) च्‍या कामाची विभागणी बाबत कोणता शासन निर्णय आहे त्‍याबाबत माहीती दयावी.

महसूल व वन विभागाचे आदेश क्र संकीर्ण2006/प्रक्र275/ई-9 दिनांक 20 सप्‍टेंबर 2010 अन्‍वये निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार महसूल यांचे कामांची विभागणी केलेली आहे

नायब तहसिलदार सावर्गाच्या कामाची विभागणी बाबत शासकीय आदेश नाही. तहसील स्तरावर नायब तहसिलदार यांनी त्यांचे कडे सोपविलेल्या सर्कलचे काम काज पाहणे अपेक्षित आहे.

सर, कालब्‍ध्‍द पदोन्‍नतीचा लाभ मिळण्‍याकरीता विभागीय दुय्यम सेवा परीक्षा उत्‍तीर्ण असणे आवश्‍यक आहे काय या बाबत माहिती दयावी ही विनंती.

नियमीत पदोन्‍नतीसाठीचे सर्व अटी/शर्ती कालबध्‍द पदोन्‍नतीसाठी लागू आहेत.

महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५(२) अन्‍वये उपअधिक्षक भूमी अभिलेख यांना जमीन मोजणी आदेश देण्‍याचे अधिकार तहसिलदार यांना आहेत काय असल्‍यास त्‍याचा शासन निर्णय कोणता आहे / नसल्‍यास त्‍याचा शासन निर्णय दिनांक दयावा हि विनंती.

कृपया कायद्या खालील नियम पहा.

शा.क.प.पा.हो.वि.प्रति.अधिनियन २००५ हा अधिनियम कुठे मिळेल आपणाकडे असल्‍यास अपलोड करा किंवा ईमेल करावा. ही विनंती

E. MAIL ID SEND 94030808520