सर माझा प्रश्न आहे कि
सर
सर्वे ११२ पैकी ९ हिस्सा अरविंद व इतर व्यक्तीच्या नावे आहे परंतु सचिन नावाच्या व्यक्तीच्या कबज्या आहे सचिन याने २००९ साली ग्रामपंचायत अर्ज करून झोपडी आहे असे दाखवून घरपट्टी लावून घेतली तरी जमीन नावे नसताना ग्रामपंचायत घरपट्टी लागू करू शकते का
Quicquid plantatur solo, solo cedit-- Whatever is affixed to the soil belongs to the soil.
मात्र सदरचे तत्व हे भारतात लागू नाही . आपणाकडे , Dual -Ownership संकल्पना आहे . त्यामुळे जमीन एकाची व त्यावरील सौरांचना ( बांधकाम ) दुसर्याचे असू शकते .
ग्रामपंचायत अश्या घरावर घरपट्टी बसवू शकते
Grampanchayt haditil 1995 sala pasun navin gharpatti babat GR Kay ahe tyachi mahiti krupaya dyavi
सर
माझ्या मालकीच्या ७/१२ उतारा असलेल्या जमिनीवर २०१० साली दुसर्याने घर बांधले आहे ग्रामपंचायत कार्यालयाने त्यास घरपट्टी दिली असून
माझा प्रश्न असा आहे कि घरपट्टी बाबत मालकी जमिनीबाबत शासनाचा शासन निर्णय काय आहे त्याबद्दल माहिती द्यावी
सर
सर्वे ७०१/१ क्षेत्र १२० गुंठे असून सदर जमिनीस दोन कुले गोपाल व राजाराम आहेत त्यापैकी गोपालने मालकाकडून त्यचा हिस्साची १८ गुंठे जागा खरेदी खताने खरेदी केली व नंतर गोपालने १८ गुंठे जागा जनार्दनला विकली आज ७/१२ उतार्यावर मुल मालक व जनार्दन यांचे नवे असून कुल म्हणून राजाराम याचे नाव आहे माझा प्रश्न असा आहे कि सदर ७/१२ उतर्यातून जनार्दन च्या हिस्साची १८ गुंठे चा विभक्त ७/१२ करता येईल का कारण धारा कुल राजाराम भरतो आहे व जमीन मोजणी कुल करू शकत नसल्याने काय करावे
सर
जमिनीस दोन कुले कमला व राघो आहेत मालक पुशोत्तम कडून कुळ राघोने १९५६ साली खारेदिखाताने जमिनीपैकी १७ गुंठे जमीन खरेदी केली व सदर जमीन कुळ राघोने दुसर्या व्यक्ती जनार्दन ला विकली आता सातबारा उतार्यावर मालक म्हणून मुल मालक पुरषोत्तम व जनादन आहेत व कुल म्हणून कमला आहे एकूण जमीन ९३ गुंठे आहे सदर जमीन कुल कमला सर्वे करू शकत नाही परतू सदर मालक जनार्दन च्या हिस्सा १७ गुंठे चा आकार फोड करू शकतो काय कारण जनार्दन जमीन मोजणीसाठी परवानगी देत नाही व मुल मालक मयत असून ते बाहेगावी राहतात सदर जमिनीचा धारा कुल भरतो तेव्हाजनार्दन च्या खरेदी खताच्या आधारे आकार फोड करू शकतो काय व आकार फोडाच्या आधारे सातबारा विभक्त करू शकतो काय मार्गदर्शन करावे
सर
श्री बेंडू यास जमीन मालक श्री बाजी यांनी १८९२ साली एकूण २० सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्यांचा १/२ हिस्सा फारोखात खताने विकला परंतु फरोक्त खातात तुम्ही सांगाल तेव्हा स्व खर्चाने नावी करून देवू असा उल्लेख केला बेंडू हे अशिक्षित होते सदर खरेदी खात करणारे बेंडू व बाजी मयत झाले १९४५ साली बेंडू चा मुलगा राम हा बाजीचा मुलगा पुरषोत्तम कडे गेल्यावर त्यांनी सदर खरेदी खताचे पुन्हा साठे पत्र तयार करून राम कडून ३००० रुपये पुन्हा घेतले पण साठे पत्र तील जमीन हि बाजी किवा पुर्शोतामच्या नावी नोवती तेवा त्यांनी त्यांच्या नवे असलेल्या २० जागा नावी करण्याचा कागद तयार केला पण त्या पैकी १० जागा नावी करून देण्यात आल्या व १८९२ च्या खरेदी खतावर १९४६ साली सदर जागा देण्या आली असा शेर मारून पुरषोत्तम याने सही केली आहे राम हा अशीषित असल्याने १८९२ च्या खरेदी खात काय लिहिल्याच माहित नोव्हात अश्या वेळी १८९२ च्या खरेदी खातात दिलेल्या जमिनी बाजीच्या नावी नसतानाही त्यांनी खरेदीखत करून दिले व त्यांच्या मुलाने स्व खर्चाने नावी करून द्यावयाचे असतानाही राम कडून १९४६ साली ३००० घेतले व जमीनही दिली नाही व जमीन दिल्याचा शेर लिहिला आहे सदर व्यवहारात रामची फसवणूक झाली अशावेळी जमीन मालकावर दावा करू शकतो काय
सर
जमिनीस १९३२ सालापासून सावर्क्षित कुल असल्यास परतू ३२ग ते ३२ आर लागू नसल्यास त्या जमिनीवर कुलाचा काही हक्क राहतो का तसेच सदर जमीन कुलाच्या ताब्यात आहे अशावेळी कुल सदर जमीन मालक कडून कश्या प्रकारे नावे करता येईल याचे मार्गदर्शन करावे
सर
मूळ जमीन मालक हा सर्वे २७१अ व २७१ ब चा मालक असून सन १९७३ रोजी त्याने मधुकर यास सर्वे २७१अ पैकी ४ एकर जागा विकली परंतु दस्त मध्येसर्वे २७१अ पैकी ४ एकर लिहिली असून चतुर सीमा या सर्वे २७१ब च्या असून कब्जे वहिवाट व ताबा हि सर्वे २७१ब चा जागेचा दिला मधुकरने १९९९ पर्यंत सर्वे २७१ ब ची जागा कसली व नंतर मधुकरने १९९९ साली ती जागा वासुदेवला विकली सदर जागेवर वासुदेवने घर बांधले परंतु आज जमिनीचे मूळ मालकाची मुले सदर सर्वे २७१ब जागा विकली नसल्याचे सांगतात सादर विक्रीत मालक हा अशिक्षित होता दस्त मध्ये सर्वे २७१ अ व ब जागा मधुकरला माहित नोवती अशा वेळी वासुदेव काही दोष नसताना दस्त तील चुकीचा दुरुस्ती साठी की कायदेशीर मार्गदर्शन करावे
सर
एखादी व्यक्ती कुल म्हणून असल्यास त्या व्यक्तीस वारस नसल्यास ती व्यक्ती हक्क सोड पत्राने भावाच्या मुलास कुळाचे हक्क देवू शकते का
हयातीत व्यक्तीस कुल- हक्क, भावाचे मुलाचे नावें सोडून देत येणार नाही . कुल्काय्द्यात कुळाने स्वत जमीने कसणे आवश्यक अन्यथा मिळकत कलम ३२ र अन्वये , शासन जमा होईल
सर प्रश्न १ १९३२ साला पूर्वीचा ७/१२ उतारा किंवा महसुली रेकॉर्ड कोणता होता व कोठे मिळेल
प्रश्न २ फेरफार पुस्तक हरवल्यास त्याचा दुसर्या ठिकाणी म्हणजे तहसील प्रांत कार्यालयात रेकॉर्ड असतो काय
प्रश्न ३ गावठाण जमिनीचा १९३२ साला अगोदर रेकॉर्ड होता काय
सर धन्यवाद
सावर्क्षित कुल म्हणून १९३२ ते १९५४ पर्यंतच्या ७/१२ नाव असताना परतू सदर कुलाचा फेरफार नोड नाही व १९३२ पासून खंड भरल्या नंतरही जमीन मालक १९४८ साली दुसर्या व्यक्तीस जमीन विकू शकतो काय
सर एखाद्या जमिनीचा खंड १९३२ साला पासून राम देत असल्यास जमीन मालक १९४८ साली सदर जमीन दुसर्या व्यक्तीला विकू शकतो काय
तथापि मिल्कातीस सौरीक्षित कुल म्हणून नाव लावणे बाबत आपण दावा दाखल करू शकता.
सर जमिनीस १९३२ सालापासून राम हा खंड भरत असल्यास व दिनांक २०/५/१९५७ रोजी कुल म्हणून नोद असल्याल्स जमीन मालक सदर कुल नोद दिनांक २२/६/१९६२ रोजी कमी करून जमीन मालक दिनांक ०९/०८/१९६२ रोजी दुसर्या व्यक्तीस विकतो तर सदर कुल सदर जमिनीचा दावा करू शकते का
नाव कमी केकेले बाबत अपील करणे हितावह.
मात्र झालेला विलंब याबाबत न्यायालयास समाधानकारक उत्तर देणे आवश्यक
सर
फेरफार मध्ये १९५५ साली माझ्या आजोबांनी हरी या व्यक्तीस जमीन विकल्याचा उलेख आहे परतू सदर जमीन आजतागायत माझ्या ताब्यात आहे व त्या जमिनीपैकी एकावर सोसायटीचा बोजा आहे व दुसर्या जमिनीवर तागैतीचा बोजा असताना सदर फेरफार मंजूर केला आहे
सर बोजा असताना फेरफार मंजूर करता काय
नसल्यास मी सदर फेरफार विरुद्ध दावा करू शकतो काय
घेणार्यावर बोजा कर्ज फेडण्याची जबाबदारी राहते.
सर ,
माझ्या कडे १८९१ चे खरेदी खत असून त्या नुसार मालकाने त्याच्या हिश्या पैकी अर्धा हिस्सा माझ्या पणजोबांच्या नवे करून देण्याचे मान्य केले आहे परंतु सदर हिस्स्या ची जमीन आजमिती आम्हाच्या नवे झाली नाही तरी सदर जमीन नवे करण्या साठी कोणाकडे अपील करावा लागेल
2)परंतु सर्वात सोपे म्हणजे तुमचं ताबा असेल व समोरची पार्टी राजी असेल तर आज खरेदीखत मारा व नोंद घ्या..............(सर्वात सोपा मार्ग)
3)त्यातही अडचणी येत असतील तर सिविल कोर्ट मध्ये प्रकरण दाखल करा ...........(वेळखाऊ मार्ग )
सर
प्रश्नाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद
सदर जमिनीच्या पिक पाहणीवर कुल म्हणून माझ्या आजोबांची नोंद नाही परंतु १९३० सालीच्या आकारफोड नुसार कब्जेदार माझे आजोबा आहेत व आज पर्यंत धारा देखील आम्ही देत आहोत तर अम्या आजोबांची कुल म्हणून नोंद करण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे
सर
मी जमीन मालकाची जमीन कसत असून माझ्याकडे १९३० मुल आकार फोड पत्रक नुसार त्या जमिनीचे कब्जेदार माझे आजोबा आहेत परंतु कुल म्हणून माझी नोंद नाही मुल मालकाने कधीही धारा भरलेला नाही धारा मी दिला आहे सदर जमिनीवर कुल नोंद करण्यासाठी काय करावे लागेल
सर
जमिनीस सामान्य कुल म्हणून माझी नोंद आहे परंतु सदर जमिनीत पिक हे केळी असल्यामुळे कलम ३२ ते ३२ र लागू नाही-
तेव्हा सदर जमीन मला खरेदी करावयाची असल्यास कोणत्या कायद्या खाली खरेदी करता येयील याचे मार्गदर्शन करावे
सर
जमिनीस सामान्य कुल म्हणून माझी नोंद आहे परंतु सदर जमिनीत पिक हे केली असल्यामुळे कलम ३२ ते ३२ आर लागू नाही
सदर जमीन कुळाने खरेदी करावयाची असल्यास कोणत्या कायद्या नुसार खरेदी करता येयील याचे मार्गदर्शन करावे ?
सर
कलम ७० ब नुसार माझ्या मामाचे मुलीचे नाव सामान्य कुल म्हणून सन १९८८ कमी करून अन्य व्यक्तीचे नाव कुल म्हणून नोंद करण्यात आली व १९९१ साली ३२ ग नुसार सदर जमीन त्या व्यक्तीने नवी केली
माझ्या मामाचे मुली अशीषित असून सदर बाब तिला माहित नाही तरी सदर ७० ब प्रकरण बाबत ती अपील करू शकते काय ?
व अपील कोणाकडे करावा ?
न्यायाधीश उदार असेल तर आपला विलंब माफ होऊ शकतो
सर
सर्वे न- ४२३ हिस्सा ३ ची जमीन कुळाने १७ / ११ / १९५६ रोजी मालकाकडून खरेदी करून त्याच दिवशी १७/११/१९५६ रोजी दुसर्या व्यक्तीला विकली आहे तर व त्या नंतर दिनांक १/४/१९५७ रोजी त्या कुलाची सातबार्यावर सामान्य म्हणून कुलाची नोद झाली तर कुलाची मुलगी आता अपील करू शकते काय ? व किव्हा सदर खरेदी मध्ये कुल कायद्याचे उलघन आहे काय ?
सर
सर्वे ११० ची हिस्सा १ च्या एकूण शेत्र च्या १/३ जागे कुळाने दिनांक १५/६/१९५६ रोजी मूळ मालक कडून घेतली व त्याच दिवशी दिनांक १५/६/१९५६ रोजी कुळाने दुसर्या व्यक्तीस विकली आहे सदर खरेदीबाबत सदर कुलाची मुलगी अपील करू शकते का ?
सर
सर्वे १५४ हिस्सा २ शेत्र ५२.१ हे .आ .चौ व खराब शेत्र ३ .० हे .आ .चौ आहे
सदर जमिनीपैकी मालकाकडून खरेदी करून कुळाने १/३म्हणजे १७.८ हे .आ .चौ व खराब १ हे .आ .चौ जमीन दुसर्या व्यक्तीस सन १९५६ साली विकली
उर्वरित २/३ जमिनीस मालक व कुल म्हणून माझे नाव आहे माझ्या हिस्सास ३४.३ हे .आ .चौ व खराब ३.० हे .आ .चौ जमीन आहे सदर जमिनीचा धारा मला भरवायला लागतो तेव्हा
सदर जमिनीची विभागणी करावयाची आहे माझ्याकडल दुसर्या व्यक्तीचे खरेदीखताच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून आकार फोड करता येईल का ? व जमिनीची विभागणी करून सर्वे न अ व ब करता येईल का ?
सर
सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र ९३.२ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे परंतु त्या हे.आर.चे आकारबंद कागदोपत्री क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे ओ व तहसील कार्यालायातील सातबारा वरील क्षेत्र ५२ .१ हे.आर.चे व खराब ३ हे.आर.चे आहे मुल सातबारात एकूण ४० हे.आर.चे अतिरिक्त दाखविण्यात येते तरी
प्रश्न १ तरी सदर सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल
प्रश्न २सर्वे न ११२ चा हिस्सा २ ची सातबारा १/३ क्षेत्र क्षेत्र १७ .८ हे.आर.चे व खराब १ हे.आर.चे मुल मालकांनी सन १९५६ साली कुळ राघो यांना विकून नंतर सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली परंतु १९५७ साली सदर जमिनीस कुल म्हणून राघो व गोविंद यांचे कुल म्हणून नोंद झाली
सन १९५६ साली कुळ राघो यांनी सुरेश व अन्य व्यक्तीला विकली असल्यामुळे सातबारा मध्ये मुल मालक २/३ व सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ असे येते व कुल म्हणून गोविंद यांचे नाव आहे त्यामुळे सदर जमिनीचा सातबारा ची विभागणी करावयाची आहे
व सातबारा अ सुरेश व अन्य व्यक्तीला १/३ आणि सातबारा ब
मुल मालक व कुल गोविंद २/३ करता येणे शक्य आहे का व अर्ज कोणाकडे करावा लागेल व कोणती कागदपत्र जोडावी लागतील
१. फेरफार न २४४६ नुसार तारीख ०१/०९/१९४० रोजी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या नावे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व अन्य जमीन रिलीज घेतली
२. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते
३. फेरफार न ५४२१ नुसार तारीख ३१/१२/१९५६ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील यांचे नाव कमी करून प्रत्यक्श्य वहिवाट म्हणून श्री पांडू माधव यांचे नाव दाखल
४. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हनुन्ब नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६
५. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार रद्द करण्यात आला आहे
६. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३
७. फेरफार न ३२४ नुसार तारीख १२/१२/२००९ रोजी श्री कमल्या खंडू पाटील हे ४० वर्षापूर्वी मयत असून त्यांचे वारस म्हणून श्री पद्माकर कमल्या पाटील व अन्य १० नावे दाखल
महोदय
वरील
फेरफार न ५४२१ नुसार माझे आई चे वडील श्री पांडू माधव हे सर्वे न ६७७ हिस्सा न ८ संरक्षित कुल म्हणून दाखल होते परंतु
१. फेरफार न ४५३६ नुसार तारीख १६/०१/१९५१ रोजी संरक्षित कुल श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्या बाजूस श्री कमल्या खंडू पाटील हे संरक्षित कुल सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ४ दाखल होते त्याचा सर्वे न ६७७ हिस्सा न ८ या जमिनीशी कोणताही संबंध नाही
२. फेरफार न ११६३६ नुसार तारीख ११/०८/१९६७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत आहेत म्हणून नाव दाखल आहे ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ परंतु सदर ता हु न ए एल टी १६९२- १३-०९-१९६६ तहसील कार्यालयात उपलब्ध नाही व तालुका हुकुम नुसार सर्वे न ची जनीन श्री कमल्या खंडू पाटील हे लावीत त्याचा उलेख नाही व फेरफार न ५४२१ नुसार संरक्षित कुल श्री पांडू माधव यांचे नाव कमी करण्याचा उल्लेख नाही
३. फेरफार न ११६६७ नुसार तारीख १६/०८/१९६७ रोजी फारोख्त खताने श्री कमल्या खंडू पाटील यांनी श्री पुरुषोत्तम जनार्दन गालवणकर व अन्य ५ यांच्यापासून सर्वे न ६७७ हिस्सा न ६ व ६७७ हिस्सा न ८ खरेदी केली परंतु सदर फेरफार खोट्या फारोख्त खतामुळे रद्द करण्यात आला आहे
४. फेरफार न ११६३६ व फेरफार न ११६६७ हे अनुक्रमे तारीख ११/०८/१९६७ व तारीख १६/०८/१९६७ रोजी ५ दिवसांच्या अंतराने झाले असून दोन्ही फेर्फारात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न होत आहे
५. फेरफार न १२८५९ नुसार तारीख ११/०१/१९७७ रोजी तालुका हुकुम नुसार सर्वे न ६७७ हिस्सा न ८ व ६७६ हिस्सा न २ व ६७६ हिस्सा न ६ यांना कुल कायदा कलम ३२ ग ते ३२ र लागू नाही ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ सदर ता हु न ४३२/ ०४-०१-१९६३ हि तहसील कार्यालयात उपलब्ध नाही सदर न ता हु न फेरफार दिनांक पासू १४ वर्ष पूर्वीचा आहे तसेच सर्वे न ६७६ हिस्सा न ६ अस्तिवात नाही व सर्वे न ६७७ हिस्सा न ८ वर १९५४ च्या पिकपाहणी नुसार २०१३ पर्यंत वांगी हे पिक दाखल आहे
तरी फेरफार ११६३६ रद्द होऊ शकतो काय व होत असल्यास कोणाकडे अर्ज करावा लागेल
व फेरफार १२८५९ रद्द करण्या साठी कोणाकडे अर्ज करावा लागेल
फेरफार ११६३६ १९६६ अन्वये कमला खान्दूचे नाव कुल म्हणून नाव दाखल झालेवर , आपण/ वडिलांनी अपील का दाखल केले नाही.
सध्या जमीन कोण कसत आहे?
सातबारावरील फेरफार नुसार कलम ४३ नुसार कलम ३२ ते ३२ र लागू नाही सदर नियम केव्हा लागू होतो
माझ्या आजोबाच्या मामाचे सामान्य कुल म्हणून १९८८ पर्यंत होते परंतु कलम ७० ब नुसार त्यांचे नाव कमी करण्यात आले आहे तरी कलम ७० ब नुसार कुळाचे नाव कमी करिता येते काय
केळी व वांगी ह्या पिकांना कलम ३२ ग का लागू होत नाही