[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

रयत इनाम जमीन असून ती जमीन बिनशेती करणे बाबत तरतूद अथवा नियम या बाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे

इनाम जमीन आपणास पुनर्प्रदान करण्यात आली असेल . पुनर्प्रदान आदेशात जमिनीचा वापर फक्त शेती करण्यासाठीच करणेच आहे अशी शर्थ आहे का ?

अधिकारी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागत यांनी द्यावयाची चिट्ठी हि शासन निर्णय दि ७-५-१९३० अथवा इतर शासन निर्णय असेल तर त्याची प्रत उपलब्ध होणेस विनंती

एका गावाचे अ नांव असून तेथील गावांकऱ्यानी त्या गावाचे नांव बदल्याबाबत ग्रामपंचायत प्रस्ताव सादर केला आहे? तर सदर गावाचे नांव कोणत्या अधिनियम किंवा शासन तरतूदीन्वये बदल करण्याची कार्यपध्दती चा अवलंब करुन करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे

केंद्र गृह विभागाचे परिपत्रक आहे त्या वर्णावं बदल्याणाचा प्रस्ताव , जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य शासन व केंद्र शासनाकडे जातो

नैसर्गिक आपत्ती मध्ये एक व्यक्ती पुरात वाहून मयत होतो. परंतु त्या भागात किंवा गावात पाऊस पडलाच नाही तर त्या मयत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक सहाय्य्य नैसर्गिक आपत्ती मधून देता येईल का

एखाद्या ७/१२ उताऱ्यामध्ये काही महिला वारसांची नांवे इतर अधिकार मध्ये नोंदविण्यात आलेली आहे. त्यांची इतर अधिकारातील नांवे कब्जेदार सदरी दाखल करण्याकरीता कोणता शासन निर्णय अगर परिपत्रक अथवा अन्य काही तरतुदी आहेत काय?

महिला वारसदार आहेत . त्यांचे नाव कब्जेदार सदरी असणे आवश्यक . त्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही . लेखन प्रमाद चूक दुरुस्ती कलाम 155 खाली तहसीलदार यांनी आदेश काढून करणे आवश्यक आहे

एका खालासा जमिन च्या 7/12 उताऱ्यात वडीलांचे नांव असून ते आजरोजी हयात आहेत. ती जमिन वडीलांनी व एका मुलगा यांनी दुसऱ्या मुलाकरीता रजिष्टर हक्कसोडपत्राने हक्क सोडला आहे. तर सदरचे हक्कसोडपत्राने दुसऱ्याच मुलाचे 7/12 उताऱ्यात नांव दाखल करावे अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणे विनंती आहे.

हक्कसोडपत्र घेणार व देणार यांचे उताऱ्यात नाव असणे आवश्यक आहे ...हक्कसोड पत्राने नवीन नाव उताऱ्यात दाखल करता येत नाही

सर, मा.तहसिलदार महाेदयांना एखादया कोतवालास गैरकृत्य केल्याने बडतर्फ करावयाचे असल्यास कोणत्या अधिनियमान्वये बडतर्फ करता येईल. या बाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती.

एखादी जमिन ही कुळ कायदयाने श्री.राम मिळलेली आहे. त्या जमिनीमध्ये राम यांचे इतर भावांचे नांव मा.दिवाणी न्यायालयाने सहमालकी असल्याचा आदेश दिला आहे. तर निसप्र जमिनीला दिवाणी न्यायालयाचे आदेशानुसार इतर भावांचे नांव दाखल करणे योग्य राहिल अगर नि.स.प्र. असल्याने सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहिल. याबाबत मार्गदर्शन करावे.

दिवाणी न्यायालयाने अन्य भावांची मालकी The Specific Relief Act खाली जाहीर केलेली आहे . या मध्ये जमिनीचे हस्तांतरण झालेले नाही . त्या मुले परवानगीची आवश्यकता नाही

गुरचरण जमिन अतिक्रमण नियमानुकूल होऊन एका व्यक्तीला नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली आहे. त्या व्यक्तीने मुलीच्या मुलाचे नांवे या जमिनीचे मृत्युपत्र दिले आहे.
तसेच मृत्युपत्र लिहणाऱ्या व्यक्तीला दोन मुली आहेत.
तर सदर जमिन न.अ.शर्ती च्या जमिनीमध्ये मृत्युपत्रानुसार नांव दाखल करावे अगर सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे काय?

श्री. पी.एम. गड्डम सर, आपण कळविले आहे की, लक्ष्मी योजने अन्वये पत्नीचे नांव दाखल करता येते. त्याबाबतचे शा.परिपत्रक क्र.१४/२१६/१६/प्र.क्र.४५८/ल६ सन १९९२ चे परिपत्रक माझ्या ईमेल वर मिळू शकेल का? कृपया सदर परिपत्रक पाठवावे ही ‍व‍िनंती.

भुधारणा पध्दती वर्ग २ च्या (नि.स.प्र.) शेरा असलेल्या जमिनीमध्ये हक्कसोडपत्रान्वये इतरांची नांवे दाखल / कमी करता येतील का?

हक्क जर , ७/१२ वरील , इतर नातेवायिक असतील तर त्यांचे लाभत सोडता येयील
नातेवायिक - भाऊ , बहिण , आई , वडील , मुलगा /मुलगी

जर एखाद्याला एका सर्व्हे नंबरची जमिन ही कुळ कायदान्वये मिळलेली असून, नि.स.प्र. आहे. सदर जमिनीमध्ये सन १९८० सालामध्ये कब्जेदाराने अर्ज दिल्यावरुन भाऊ व चुलत भाऊ यांचे सामाईक नाव लावणेबाबत फेरफार गावी मंजुर आहे. पंरतु त्याचा अमंल ७/१२ ला दिलेला नाही. तर नि.स.प्र जमिनीमध्ये सदर फेरफारान्वये नावे दाखल करता येतील का?

नाही

एखाद्या खाजगी मालकीच्या जमिनीमध्ये ७/१२ उताऱ्याच्या इतर अधिकारामध्ये महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदीस अधिन राहून असा शेरा आहे. सदर जमिन मालकाला विक्री करावयाची असल्यास हस्तांतरणास वन विभागाकडून परवानगीची आवश्यकता आहे काय?

परवानगीची आवश्यकता नाही
तथापि सदर जमीन या कायद्या खालील कलम २२ अ चे तर्तुदिद अधीन आहे
कदाचित जमीन शाशानाकडे वन म्हणून हि जायील
वनेतर काम या जमिनीवर करता येत नाही

जर एखद्या बिन आकारी पड जमिनीतून पुर्वी टेम्पररी घराकरीता ०-२-५३ जागा एका व्यक्तीला दिलेली आहे. सदर क्षेत्राची नोंद गाव नमुना नं.२ मध्ये दिसून येत आहे. पंरतु दप्तरी ७/१२ उतारा तयार करण्यात आलेला नाही. तर ७/१२ उतारा तयार करता येईल का? सदर ७/१२ तयार करण्याचे आदेश देण्याबाबत अधिकार कोणाला आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीमध्ये मृत्युपत्रान्वये नांवे दाखल करण्याकरीता मा.जिल्हाधिकारी यांची परवानगीची आवश्यकता आहे काय?

एका गट नंबरच्या जमिनीमध्ये कब्जेदार सदरी नाव असलेल्या व्यक्तीने त्याच्या पत्नी चे नांव सहहिस्सेदार (पती जिवंत आहे) म्हणून दाखल करण्याबाबत नमुद केले आहे.तरी पत्नीचे नांव सहहिस्सेदार म्हणून दाखल करता येईल का? जर करता येईल तर, त्याबाबत शासन निर्णय कळवावा ही विनंती.

संतोष जवरेजी आपण लक्ष्मि मुक्ती शा. परिपत्रक क्र.१४/२१६/१६/प्र.क्र.४५८/ल६ सन १९९२ अन्वये पतीचे नावाखाली सह हिस्सेदार म्हणून नाव दर्ज करण्या करिता अर्ज करू शकता.

गृह लक्ष्मी योजने अंतर्गत पतीचे नावासोबत पत्नीचे नाव दर्ज करता येते. तसा अर्ज तालुक्याला करावा. जी आर लवकरच कळविण्यात येईल .

नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीमध्ये मृत्युपत्रान्वये नांवे दाखल करता येतील का?

होय. गोत्रजा वेतिरिक्त मूत्यूपत्र केले असेल तर. हस्तांतरण होईल.

एका कुटुंबामध्ये आपसी वाटणीने जमिनी तीन भाऊ व आई यांचे नांवे वाटणी फेरफाराने जमिन नावे झाल्या आहेत. त्यापैकी एक भाऊ मयत झाल्याने त्याच्या वाटणीच्या जमिनीमध्ये आई व पत्नी असे वारस दाखल झाले आहे. पंरतु आजरोजी आई मयत झाली आहे. तर मुलाच्या वाटणीच्या जमिनीत आई चे नांव कमी करुन आईचे वारस दाखल करावे अगर फक्त आईचेच नांव कमी करावे लागेल काय? अगर कसे व कोणत्या कायदयाने. कृपया मार्गदर्शन करावे.

सर, पिक पाहणी चा आदेश देताना जर जमीन नि.स.प्र. / trust ची जमीन / संस्था ची जमीन / कुळ असलेले / न्याय प्रविष्ट / सरकारी जमीन / वन खात्याचा शेरा असलेल्या ७/१२ च्या जमिनी मध्ये इतर व्यक्ती चे नाव दाखल करण्या बाबत आदेश देता येतो का? जर नाही, तर त्या बाबत शासन निर्णय अथवा कुठे तरतुत नमूद आहे का?

महा . जमीन महसूल ( अधिकार अभिलेख ) नियम ३१ अन्वये , चौकशी प्रक्रिया पार पडून , व प्रकरण निकषात बसत असेल तर लावता येयील
मात्र , जमीन नि.स.प्र. असल्यास , कुल झालेले मालक स्वत कसत नाही , या कारणावरून , कुलवहिवाट कायद्या खाली , ३२ र अन्वये, कार्यवाही / कारवाई सुरु करणे अपेक्षित

सरकारी जमिनीवर पिक पाहणी आदेश देत येणार नाही, अतिक्रमण समजून , काढून टाकावे लागणार

न्याय प्रविष्ट प्रकरणात - न्यायालयाचा जैसे थे ठेवण्याचा आदेश असल्यास , पिकपाहणीआदेश देतयेणार नाही
वन खात्याचे जागे वर , शेती करता येत नाही, ते अतिक्रमण होए . काढून टाकणे आवश्यक ( वन विभागामार्फत )

एका ७/१२ उताऱ्यावर एकाच व्यक्तीचे नांव असून त्या व्यक्तीने त्यांच्या काका, चुलत भावांचे नावे हक्कसोड पत्र तयार करुन काही प्रत्येकी काही क्षेत्र दिले त्यानुसार नावे ७/१२ उताऱ्यावर दाखल करता येतील का?

होय

सूची क्र. २ मध्ये शेरा मध्ये नोंदणी कालावधीत कबुली जबाबासाठी उपस्थित न झाल्याने त्यांच्या पुरता दस्त नोंदणीस नाकारला असा श्‍ोरा नोंदणीकृत दस्तावर आहे. तर सदर दस्तानुसार फेरफार मंजुर करावा अगर कसे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.

सर, MLRC च्या कलम १५७ चा अन्वेय वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?

अधिकार अभिलेख ( ७/१२ इ ) व फेरफार अभिलेख , यामधील नोंदी सत्य आहेत असे मानणे , अशी तरतूद आहे

यात कोणतेही अधिकार दिलेले नाहीत

एखद्या स.नं. च्या ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात निसप्र व ३६ व ३६अ ला पात्र अशी नोंद आहे. सदर जमिनीचा जुना नोंदविलेला फेरफार मंजुर आहे पंरतु ७/१२ ला अमंल दिलेला नाही. तर सदरच्या फेरफारानुसार ७/१२ ला आज अमंल देता येतो का?

फेरफार काय आहे

फेरफार अंमल देण्यास हर्क्स्त nahi

एका खोतदाऱ्याच्या ७/१२ उताऱ्याचे इतर हक्क सदरी ४०००रु. ता.ग.घे. व भाडेपट्टयाने बॅकेंकडून घेतली असा शेरा फेरफारान्‍वये दाखल आहे. ज्या बॅकेकडून कर्ज घेतले ती बँक बरखास्त झाली आहे. तर सदरचा शेरा कोणत्या आदेशानवये कमी करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

खातेदाराने बँकेकडून भाडेपट्ट्याने घेतली आहे त्यामुळे हि जमीन खातेदाराचे मालकीची नाही
बँक जरी बरखास्त झाली असली तरी , तशी उद्घोसःना होणे अव्शुअक असते
हि जमीन बँकेची असल्याने , बँकेची इतर गेनी देण्यासाठी हि जमीन , विकली जाणार आहे
हा शेर आस कमी करता येणार नाही
company act , च्या तरतुदी नुसार व Banking Regulation Act नुसार , निर्णय घेणे उचित आहे

एका खातेदाराची 0-००-२ हे.आर. जमिनीचा स्वतंत्र ७/१२ उतारा असून इतर हक्कात तुकडा नोंद आहे. ती जमीन त्याने रजिस्टर दस्ताने दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली आहे. तर असा वेळी खरेदीखतानुसार फेरफार मंजूर करता येईल का?

कायदा अंमलबजावणी सुरवातीपासून सदर जमिनीचे क्षेत्र तुकडा म्हणून नोंद असेल तर फेरफार मंजूर करण्यास हरकत नाही

एक खातेदार मयत झाल्याने वारस म्हणून पत्नीचे नाव ७/१२ सदरी दाखल झाल्याने तीने संपूर्ण क्षेत्राची रजिस्टर दस्ताने विक्री दुसऱ्याला केली. पंरतु मयत खातेदाऱ्याचे आईने वारस फेरफार विरुध्द हरकत / अपिल दाखल केल्याने आईचे नाव सहहिस्सेदार म्हणून ७/१२ सदरी उपविअ यांचे आदेशाने दाखल झाले आहे. सदर जमिनीचे खरेदीखता विरुध्द तक्रार रजिस्टर दाखल झाले आहे तर खरेदीखत हे संपुर्ण क्षेत्राचे आहे. तर काय करणे अपेक्षित आहे.

प्रांत अधिकारी यांचे निकालाची अंमलबजावणी करणे अपेक्षित
निकाल वैधतेबाबत आपणास हरकत घेण्याचा प्रश्न नाही
निम्म्या क्षेत्रास आई चे नाव लावणे
प्रश्न दिवाणी स्वरूपाचा आहे
वास्तविक खरेदी झालेनंतर , आई चे नाव लावणे बाबत , निकाल देत येणार
मालमत्ता हस्तातरण कायदा कलम ४२ प्रमाणे , खरेदी करणारा याने दिवाणी न्यायाय्लाय्त Bonafide purchaser संपूर्ण क्षेत्रास तो मालक असले बाबत जाहीत करून मिळणे बाबत दावा दाखल करणे आवशयक
तुमचे स्तरावर प्रांत अधिकारी यांचे निकालाची अंमल बजावणी करणे आवश्यक

पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन असून त्या जमिनीचा फेरफार मध्ये इनाम वर्ग ६ब ची जमिन रिग्रेट करुन वरीष्ठ कार्यालयानी शर्ती व अटी चे अधिन राहुून सरकार नोंद कमी करुन कब्जेदार यांचे नाव दाखल केले आहे. तर पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन बाजार भावाच्या ५० टक्के नजराणा भरुन भोगवटदार १ करता येईल का?

जर एखाद्या व्यक्तीला कोळंबी प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमिन दिली असेल व तो व्यक्ती मयत झाला असल्यास त्याच्या वारसाची नोंद ७/१२ सदरी करता येईल का ? तसेच बॅकेचा बोजा सदर जमिनीस नोंद करता येईल का ?

वारसांची नवे लावता येतील
Government leased land cannot be mortgaged to financial institution without permission
See permission was taken

एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येत नाही. परंतु खातेदारास लेखी उत्तर की द्यावे?

उत्तर देऊन टाका. त्यांना कळवा , शाश्नाकडून जमीन प्रदान करून घ्या. मग dambarikaran kara

एखाद्या खातेदाराने शासकीय जमिनीतून ( महसुल खाते) उपलब्ध कच्चा रस्ता डांबरीकरण करणे करिता मागणी केली आहे. आशा वेळी रस्ता परवानगी देता येतो का?

No

कोर्ट वाटप प्रकरणी दिवाणी न्यायालयाचा आदेश्नुसार राहत्या घर च्या खोली वाटणी बाबत आदेश असेल तर त्याची कारवाई करता कोणाकडे पाठविणे योग्य राहील. कृपया मार्गदर्शन करावे.

gat vikas adhikari

७/१२ विभक्त करण्या करिता कोणाच्या परवानगी असणे गरजे आहे. तसेच कोणते अहवाल अपेक्षित आहेत.

तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्या नुसार , विभाक्तीकारनामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र तयार होता कामा नये
जर मिळकत वारसा हक्काने असल्यास , प्रत्येकाचा हक्क निच्छित करणे आवश्यक
जर प्रत्येकाचा hissa निच्छित kelela असल्यास , TILR yanche kade आकार्फोड करून मिळण्यासाठी अर्ज करा
akatphod zalenantar talathinyanchekadun 7/12 vibhakata kela jael.

एका प्रकरणी महसुल मंत्री यांचा निर्णय प्राप्त झाला परंतु विरुद्ध पक्षकाराने सदर निर्णयास योग्य त्या न्यायालयात अपील दाखल न करता, लेखी पत्र ने हरकत घेतली आहे तर फेरफार नोंद करावे किंवा कसे? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. तसेच सदर निर्णयास अपील कुठे करता येते?

म. महसूल मंत्री यांचा निर्णय म.ज.म अ १९६६ प्रमाणे अंतिम आहे. त्या विरुद्ध अपील नाही . केवळ writ याचिकेद्वारे उच्च न्यालयात त्यास आव्हान देत येयील .
लेखी हर्कतीस अर्थ नाही .म. मंत्री महोदय यांचे निर्णय नुसार नोंद घालणे आवश्यक

मृत्यू पत्र अमेरिकाचे असेल तर त्यनुसार फेरफार नोंदविता येईल का? तसेच वारस तपास करणे गरजेचे आहे का?

मृत्यापत्रामध्ये वारस दिलेले नसणार. वारसतपास करावा लागेल.
मात्र मृत्य पत्र भारतीय दुतावासाने अधिप्रमाणित केलेले असावे.

रु १००/- चे प्रतिज्ञापत्र वर जर आजोबांनी नातवाना बक्षीस पत्र नोंदणी कृत नसलेले दिले तर अधिकार अभिलेख नुसार फेरफार नोंदून वारस दाखल करता येईल का?

बक्षीस पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक.

अर्जदार यांचे नोंदणी खरेदी खात सन २००० चे असून त्यानुसार आज फेरफार नोंदणी करून नावे करता येईल का ?

हरकत नाही.

तलाठी हे क्षेत्रीय स्तरावर माहिती अधिकारी आहेत ओ मंडळ अधिकारी हे प्रथम अपिलीय अधिकारी आहेत का? असल्यास कृपया परिपत्रक कोणते

होय, आहेत. याबाबत कार्यालयीन प्रमुखांनी जाहीर करावयाचे आहे.

सेवा पुस्तिकेतील मंजूर नोंद रद्द करता येईल काय? असल्यास, कोणत्या सेवा नियमांनी करता येईल.

जी नोंद रद्द करावयाची आहे त्याबद्दल सुधारित नोंद घेता येते. तथापि पूर्वीची नोंद कट करण्याची आवशकता नाही.

जी नोंद रद्द करावयाची आहे त्याबद्दल सुधारित नोंद घेता येते. तथापि पूर्वीची नोंद कट करण्याची आवशकता नाही.

जी नोंद रद्द करावयाची आहे त्याबद्दल सुधारित नोंद घेता येते. तथापि पूर्वीची नोंद कट करण्याची आवशकता नाही.

जी नोंद रद्द करावयाची आहे त्याबद्दल सुधारित नोंद घेता येते. तथापि पूर्वीची नोंद कट करण्याची आवशकता नाही.

जी नोंद रद्द करावयाची आहे त्याबद्दल सुधारित नोंद घेता येते. तथापि पूर्वीची नोंद कट करण्याची आवशकता नाही.

मंडळ अधिकारी याचे कडून अहवाल आला असता, महारष्ट्र सरकार गुरचरण जमिनीच्या ७/१२ इतर हक्क सदरी तलाठी सजा ०-०५-० व पोलिस स्टेशन ०-०३-१ राखीव शेरा देनेस विनंती केली आहे. तर तहसीलदार यांना तसा आदेश तलाठी यांना देत येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.

nahi

७/१२ च्या इतर हक्क सदरी मा. दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्याने लीज पेंदासी शेरा नमूद आहे . परंतु सदर जमिनि चे नोदनिकृत खरेदी खत फेरफार टाकणे करिता आलेले आहे. तर लीज पेंदासी शेरा आसताना फेरफार टाकता येईल अगर कसे? कृपया मार्गदशन करावे.

lis pendens म्हणजे मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. जमीन खरेदी करणार्यासाठी हि notice आहे. असा शेरा आहे म्हणून फेरफार टाकण्यास मनाई नाही.
मात्र दिवाणी न्यायालयाचा निर्णय विकनाराचे विरुद्ध गेल्यास , खरेदीदारास अश्या परिणामांना बांधील असतो.

कोर्टाचा निर्णय नुसार फेरफार टाकणे योग्य आहे . परंतु मुद्रांक शुल्क भरने आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे

न्यायालयाचा निर्णय काय आहे त्यावर अवलंबून आहे. न्यायालय कायदेशीर प्रक्रिया पार पडूनच पुढील कार्यवाही करणे बाबत निर्देश देते.
कृपया न्यायालय निर्णय वाचा.

एका ७/१२ मध्ये दोन व्यक्ती ची नावे आहेत त्यांची दोन महसुली गावामध्ये मिळकत आहे. त्यांच्या दाव्याचा कोर्ट तून निर्णय दिला कि एका व्यक्तीला एका गावाची व दुसर्या व्यक्तीला दुसर्या गावाची मिळकत दिली. तर त्यानुसार फेरफार टाकणे योग्य राहील का?

कोर्टाच्या निर्णयानुसार फेरफार घेण्यास काहीच हरकत वाटत नाही. फक्त अपील कालावधीची मर्यादा पहा आणि निर्णयानुसारच तपशील फेरफारात ठेवा.