[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

scanned फेरफार पोस्ट करा

१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी

history file भेटू शकणार नाही .

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे

2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात

जुने अभिलेख मिळत नसतील तर आपण पुराभिलेख विभागात मिळते का पहा ?
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्षात ते मिळते का पहा ?

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमचे गावचे घरावर अ आणि ब अशी घरपट्टी आहे , अ मध्ये आम्ही चार कुटुंब आहेत ,आजीच्या निधनानंतर अ मध्ये आम्ही चार कुटूंबाची घरपट्टी वेगळी करून घेतली आहे पण आम्ही सर्व घराच्या अ मध्ये आहोत
त्यापैकी २ कुटुंब आम्हा दोन कुटुंबाना घरावर हक्क सोड देणार आहेत , तर हे हक्क सोड करण्यासाठी कोठल्या कागपत्राची गरज आहे आणि हे कोठे रजिस्टर करावे लागते ।

तसेच उरलेले आम्ही दोन कुटुंब पैकी एक कुटुंब आम्हाला अ विभागातले घर बांधण्याविषयी रिप्लाय करत नाही तर आम्ही अ मध्ये घराची फोड करता येईल का आणि आम्ही आमचे घर बंधू शकतो का , तसेच घर बांधताना कोणत्या सरकारी विभागाची परवानगी घ्यावी लागते ।

अ घरामध्ये आपण चार कुटुंब राहत आहात. आपणास या घराचे हि दोन भाग करायचे आहेत
ग्राम पंचायतीकडे अर्ज करा

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमच्या ३४२ हा फेरफार वर्ष १९२२ चा आहे ,हा फेरफार खूप पुसट आहे आणि या विषयी तलाठी ऑफिस मध्ये कुठलीहि माहिती उपलब्ध नाही ,आम्हाला जर या फेरफार विषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर कुठे निवेदन द्यावं

१९२२ चा फेरफार मिळणे कठीण

नमस्कार सर

आमची जमीन सामायिक आहे आणि या सामायिक जमिनीमध्ये आमचे घर आहे , घरपट्टी आमच्या नावाची आहे तसेच आमची वहिवाट आमची आहे , पूर्वीपासून जमीन आम्हीच कसत आहोत , जमिनीचा दस्त आम्हीच भरत आहोत आणि या सामायिक जमिनीमध्ये काही लोकांनी बेकायदेशीर नावे नोंद केली आहेत सदर गोष्टीला 5० वर्षे झाली आहेत , या लोकांची नावे इतर हक्कांमधून निघून गेली आहेत आणि तसा सरकारमान्य फेरफार आमच्या कडे जुने कागदपत्र काढल्यावर मिळाला त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत पण हे करताना आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे ही विनंती

1) या अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत कमीत कमी समजा दोन वर्ष गेली आणि या दरमयान आमचे पडीक घर जर पडले तर त्या घरावर किंवा घर ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीवर प्रतिवादी अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत स्टे आणू शकतात का

2) अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत पडीक घर जर पडले तर आम्ही परत बंधू शकतो का


3) प्रतिवादी याच्या मुंबईमध्ये राहत असल्याला लोकांचे पत्ते आम्हाला माहित नसतील तर त्यांचे गावचे घराचा पत्ता दिला तर चालेल का

१. नवीन सुधारणेनुसार , अपील दाखल झाल्यानंतर , त्याचा निकाल १ वर्षात देण्याचे बंधन , अपिलाय अधिकारी यांचेवर आहे .
२. आपले नाव ७/१२ सदरी दाखल आहे काय ? आपले नाव ७/१२ सादरी असल्यास , घर जरी पडले तरी आपण ते बांधू शकता .
३. प्रतिवादी यांचे पट्टे उपलब्ध नसल्यास , त्यांना द्यावयाची नोटीस , म.ज .म .अ. च्या कलम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , जागेवर नोटीस बजावणी करण्याची तरतूद आहे . तसेच जमीन ज्या भागात आहे , तेथील जास्त circulation असलेल्या वृत्तपत्रात नतीस प्रसिद्ध करू शकता

नमस्कार सर

वर्ष १९२२ फेरफार क्रमांक ३४२ ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये कॉलम मध्ये होते , या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , या प्रकरणावर मला खालील दोन प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती

१) जर ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये आहे मग तो इतर हक्कामध्ये कसा गेले आणि या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , तर या वेक्तीचे नाव परत फेरफार क्रमांक ३४२ प्रमाणे १९५८ नंतर परत भोगवटाच्या कॉलम मध्ये कसे येऊ शकते .

२) ''अ '' या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले तर या वेक्तीचे नाव परत मालकी हक्का मध्ये येऊ शकते का .

आपण ७/१२ वर नमूद सर्व फेरफार पहा . त्यावरून आपणास कळून येईल

आमच्या फेरफारामध्ये गहाणखताचा उल्लेख आहे , तर हे गहाणखत मिळण्यासाठी माहितीच्या अधिकारांमध्ये आम्ही दुय्यम निबंधक ( नोंदणी ) कार्यालयात अर्ज केला होता , पण या कार्यालयाने गहाणखताचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक मागितला आहे , पण आमच्याकडे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक उपलब्ध नाही ,

आपणास विनंती आहे कि गहाणखताची नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक मला कुठे मिळेल या वर थोडे मार्गदर्शन करावे

लाखो दस्तांमधून नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक न कळवता दस्त‍ शोधता येणार नाही. फेरफार वरून किंवा फेरफारवर गहाण घेणार्याचे नाव असल्यास त्याच्या्कडे चौकशी करून गहाणखताचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक यांचा शोध घ्यावा.

आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

2) तसेच गहाणदार घेणारा म्हणजे काय

आमच्या फेरफारामध्ये गहाणखताचा उल्लेख आहे , तर हे गहाणखत कुठे मिळेल आणि ते मिळण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाला भेटावे

गहाणखत नोंदणीकृत असेल तर , दुय्यम निबंधक ( नोंदणी ) कार्यालयात मिळेल . प्रमाणित प्रत घ्या

नमस्कार सर ,

आमच्या सामाईक जमिनीमध्ये चार खातेक्रमांक आहेत , पण प्रत्यक्षात मात्र आम्हीच जमीन कसून पीक घेतो . पण सातबारा च्या मागे मात्र खुद्ध असे लिहिलेले आहे . तर फक्त आमचेच खातेक्रमांकाला फक्त पीक पाहणीवर नोंद कशी येईल , या साठी कोणाला भेटावे किंवा कोणती कागतपत्रे लागतील किंवा पीक पाहणीचा स्वतंत्र दाखला मिळतो काआपले प्रश्नावरून सामायिक जमीन , आपण कसत आहेत . मात्र पीक पाहणी सदरी आपले एकट्याचेच नाव दाखल नाही . आपणास केवळ आपले नाव पीक पाहणी/पाणी सादरी लावण्याचे आहे .
पीक पाणी सादरी नाव लावणे बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे ) नियम १९७१ च्या नियम ३० व ३१ मध्ये कार्यपद्धती दिली आहे .
नियम ३१ प्रमाणे , अधिकार अभिलेख या परिमाणे ज्या व्यक्तीने जमीन कसणे आवश्यक आहे , त्या व्यक्ती शिवाय अन्य व्यक्ती जमीन कसत असल्यास त्याचे नाव पीक पाहणी सादरी लावण्याची कार्यपद्धती दिली आहे . मात्र अश्या अन्य व्यक्तीने दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या कसण्यासाठी घेतलेली असावी .
कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , भाडेपट्ट्याने जमीन दिलेली असणे / कसण्याबाबत बाबत लेखी संमती असणे , अथवा आपण जमीन कसत आहेत , हे जमीन मालक यांना माहित आहे व ए आपण कडून कासवणुकीबाबत , जमिनीतील उत्पन्नाचा हिस्सा दरवर्षी मोबदला म्हणून घेत आहेत .
आपण जर अनाधिकारे जमीन कसत असाल तर , केवळ आपले एकट्याचे नाव पीक पाणी सदरी लागू शकणार नाही

आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती

1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,

2) तसेच गहाणदार घेणारा म्हणजे काय

आपली जमीन आपल्याकडे कशी आली किंवा जमिनीचे खरेदीखत कसे काढावे , तसेच खरेदीखत काढण्यासाठी कोणत्या कागतपत्राची पूर्तता करावी लागते आणि खरेदीखत काढण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाला संपर्क करावा .

आपले दुय्यम निबंधक( मुन्द्रानक व नोंदणी ) कार्यालयाकडे आपणास जमिनीचे दस्त मिळेल . अर्ज करा .हे कार्यालय तहसील कार्यलया परिसरात असते .

नमस्कार सर

महाराष्ट्र सिविल सर्विस या संकेतस्थळवर आपण दिलेल्या माहिती बद्दल आम्ही आपली मनपूर्वक धन्यवाद .

आमचे खालील नमूद केलेले प्रकरणावर थोडे मार्गदर्शन हवे आहे

1) आमची जमीन सामाईक आहे त्या मध्ये पूर्वीपासून चार खातेक्रमांक दिसत आहे त्या मध्ये प्रत्यक्ष जमिनीचा ताबा हा आमच्याकडे आहे त्या मध्ये दोन असे खातेक्रमांक आहेत ज्यांची पूर्वजांची नवे आमच्या जमिनीमधून निघून गेलेली आहे आणि तसा मंजूर फेरफार 1958 रोजी चा आहे . जुने सातबारा 1956 रोजी चे काढले असता असे दिसते मंजूर फेरफार चा आदेश पारित केलेला दिसत नाही आणि आत्ता या दोन्ही खातेक्रमांकांनी यांच्या पुढील पीडीची नावे आमच्या सातबाराच्या नोंद केली आहेत .

2) दुसरा मुद्धा असा कि 20.06.1958 या एकाच दिवशी आमच्या पूर्वजांची नावे वरील दोन्ही खातेक्रमांकयाच्या जमिनीमधून निघून गेली आहेत आणि त्यांची पूर्वजांची नावे आमच्या जमिनीमधून निघून गेली आहेत . तसे मंजूर फेरफार त्यांच्याकडे पण आहे तरी देखील आज रोजी हि नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत .

3) पुर्विपार जमिनीचा ताबा , तसेच राहते घर हे आमच्या कब्ज्यामध्ये आहे , पुर्विपार वरील दोन्ही खातेक्रमांक कुठलेही जमीन कसत नाही फक्त नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत , आम्हीच जमिनीचे दस्त भरत आहोत तसेच राहते घराची घरपट्टी भरत आहोत .

4) आम्ही माहितीच्या अधिकारांमध्ये या लोकांची नावे कशी नमूद करण्यात आली याचे समाधान कारक उत्तर आम्हाला दिले नाही तसेच त्याची त्यांची कुठल्या कागतपत्राची पूर्तता केली या चे हि उत्तर नाही

वरील प्रकरणे 50 वर्षापूर्वेची आहे दुसरे आमच्या घरामध्ये कोणीही शिकलेले नव्हते पण आत्ता आम्ही हे पूर्वीचे कागतपत्रे काढली तेव्हा हि नावे बेकायदेशीरपणे नमूद केलेली आहेत असे समजते

आत्ता आम्ही या दोन्ही खातेक्रमांकावर कोणती कारवाही करू शकतो किंवा कोणता अपिलीय अर्ज करून हरकत घेऊ शकतो का या वर थोडे मार्गदर्शन करावे हि विनंती

तुमच्‍या पूर्वजांची नावे ज्या 1958 च्या मंजूर फेरफारने काढून टाकण्यात आली आहेत तो जोडून तहसिलदारकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्वये चूक दुरूस्तींचा अर्ज सादर करा. कलम १५५ अन्वये अर्ज सादर करण्यासाठी मुदतीचे बंधन नसते.

नमस्कार सर ,

आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत , त्यावर वरील वरील अधिनियम आणि कलम अर्जावर नमूद करावे का तसेच सदर फेरफार सुमारे 58 वर्षापूर्वीचे आहेत . तर अर्ज सोबत विलंब माफी चा अर्ज करावा लागतो का .तसेच विलंब माफी चा नमुना कसा असावा ,या वर थोडे मार्गदर्शन करावे

कलाम 155 खालील लेखन प्रमादचूक दुरुस्त करण्यासाठी , काळ मर्यादा नाही. त्यामुळे विलम्बमाफीचा अर्ज देण्याची गरज नाही.

नमस्कार सर ,

आमच्या सातबारा मध्ये 1980 वर्षी एक नाव पोकळ नोंद केले गेले , पण ज्या वेक्तीचे नाव नोंद केले त्यांच्या वडिलांचे नाव 30 वर्षांपूर्वी कायमचे निघून गेले आहे तसा मंजूर फेरफार आमच्याकडे आहे , या बद्दल आम्हाला कुठलीही नोटीस आली नाही , मला असे विचाराचे आहे कि जेव्हा एखादा नवीन फेरफार मजूर होण्यापूर्वी त्याची नोटीस मूळ कब्जेदार किंवा वहिवाटदार येत नाही का

सदरचा मंजूर फेरफार तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाला दाखवला तर ते आम्हाला 50 वर्षे तुम्ही कुठे होतात असे तलाठी आणि तहसीलदार कार्यालाकडून विचारण्यात येत , या वर आम्ही काय करावे या वर मार्गदर्शन करावे हि विनंती

आपण 155 खाली लेखन प्रमाद दुरुस्त करण्याचा अर्ज दया. या अर्जाला काळ मर्यादा नाही

एखाद्याचे नाव भोगवटा आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी येऊ शकते का

सर्वसाधारणपणे एखाद्याचे नाव कब्जेहक्कात आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी नसते. तथापि कागदपत्रे न बघता याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही. आपण तहसिलदार कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे.

सर्वसाधारणपणे एखाद्याचे नाव कब्जेहक्कात आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी नसते. तथापि कागदपत्रे न बघता याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही. आपण तहसिलदार कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे.

नमस्कार सर ,

आमच्या फेरफारामध्ये वर्षे 1934 या मध्ये खरेदीखत केल्याची नोंद आहे . हे खरेदीखत मिळण्यासाठी कुठे अर्ज केला पाहिजे


संबंधित दुय्‍यम निबंधक कार्यालय.

नमस्कार सर

जमिनीचा महसूल कोणत्या वर्षांपासून चालू झाला , तसेच हा महसूल भरलेल्या काही पावत्या हरवल्या आहेत तर तलाठी मागील वर्षी भरलेल्या पावती आणा असे सांगत आहे . परंतु मागील वर्षी आम्ही महसूल भरला नाही , तर आत्ता आम्ही भरायला तयार आहोत पण तलाठी मागील मागील पावती पाहिजेच असे सांगत आहे तसेच महसूल रजिस्टर वही मध्ये तुमची नोंद नाही असे सांगत आहे , या पूर्वी आम्ही अनेकवेळा जमीन महसूल भरला आहे तसेच 2003 तसेच 2009 या काही वर्षाचे पावती आमच्या कडे आहेत ते आम्ही तलाठी ला दाखवले आहे , तरी हि ते मागील पावती पाहिजेच असे सांगत आहे

आत्ता महसूल कर भरण्यासाठी आत्ता आम्ही काय करावे तसेच मागील भरलेल्या पावत्यांची डुप्लिकेट प्रत आम्हाला मिळेल का , आणि जर मिळत असेल तर किती वर्षाचे पावत्याचे रेकॉर्ड आपण मागू शकतो

महसूल भरल्‍याची नाोंद तलाठीकडे असणे अपेक्षित आहे. आपण तहसिलदारांची भेट घेऊन मार्गदर्शन घ्‍यावे. परंतु दरवर्षी मुदतीत महसूल भरणे व त्‍याची याोग्‍य ती नाोंद ठेवणे ही आपलीही जबाबदारी आहे.

जमिनीचा सर्वे कसा केला जातो . आणि तो करण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल . आणि त्या साठी लागणारी कागतपत्रे कोणती

माेजणी विभागाशी संपर्क साधावा.

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) आमची जमीन सामायिक आहे आणि अनेक खाते क्रमांक जमिनीत आहेत आणि जमीन प्रत्यक्ष आमचे खातेक्रमांक कसत आहे तर पीक पाहणी सादरी आमचे खातेक्रमांक लागण्यासाठी काय करावे लागते किंवा सध्या आमच्या जमिनीत पीक पाहणी सादरी कोणाचे नाव किंवा खातेक्रमांक लागले आहे हे कसे पाहावे .

2) जर पीक पाहणीला सर्व खातेक्रमांक चे नाव लागले असेल तर जमीन आम्ही कसत असल्याचा कोणता पुरावा दिल्याने फक्त आमचेच नाव पीक पाहणी सादरी लागेल . कारण इतर खातेक्रमांक आज रोजी जमीन कसतच नाही .

जमीन सामाईक असेल तर त्‍यात वेगवेगळी खाते असता कामा नये......व जर खाते वेगवेगळी असेल तर जमिन सामाईक होणार नाही. एकाच स.नं मध्‍ये जर वेगवेगळे खाते नुसार खातेदार असेल तर त्‍यांची पिक पाहणी ही वेगवेगळी लागेल आणी जर एकाच स.नं मध्‍ये सामाईक एकच खातेे असेल तर सामाईक पिक पाहणी लागेल वयक्‍तीक पिकपाहणी लागणार नाही.

प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आणि ते मिळण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा आणि त्यासाठी लागणारी कोणकोणती कागतपत्रे दिली तर आपल्याला ते मिळते

भुमी अभिलेख कार्यालयातील कार्यक्षेत्रात (शहरी किंवा नागरी)असलेले भुखंड/प्‍लाॅॅट संबंधी संंपुर्ण माहीती दर्शविणारी'आखीव पत्रीका'म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तालुकाभुमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .

1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे

2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात

नमस्कार ,

सर्व अधिकारी साहेबांचे मनापासून धन्यवाद ज्या प्रमाणे आपण आमच्या विचारलेल्या प्रश्नवर माहिती देऊन मार्गदर्शन करता या बद्दल आम्ही सर्व मनापासून पासून आभारी आहोत .

महोदय,
खरोखरीच महसूल अधिकारी त्यांच्या कडील कामाच्या व्यापातून वेळ काढून जण सामान्यांच्या समस्या सोडविण्याचा स्वतः होऊन प्रयत्न करीत आहेत आणि त्या विषयी आम्हाला मिळणाऱ्या चांगल्या व प्रेरणादायी प्रतिक्रिया व अभिप्राय आम्हाला उत्साह देत असतात. आमच्या अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा या निमित्ताने आपला सहभाग वाढविण्याविषयी विनंती आहे. धन्यवाद.

नमस्कार सर ,

एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा जुना फेरफार असेल तरीही आज रोजी त्यांच्या पुढील पीडीनी नावे आमच्या सातबाराच्या भोगवटामध्ये नोंद केली आहेत . पण आत्ता खूप विलंब झाला असेल तरी ही जर हा फेरफार आदेश न पाहताच नावे कशी काय मंजूर होतात या वर थोडे मार्गदर्शन करावे , तसेच 56 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या फेरफार आधारे आम्ही या लोकांवर आत्ता हरकत घेऊ शकतो का आणि त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल आणि कोणाला भेटावे लागेल .

आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्‍वये तहसिलदारकडे अर्ज करू शकाल.

या कलमान्वये 'लेखन-प्रमादांची दुरुस्ती' ची तरतुद आहे. त्यानुसार,
"कोणताही लेखन प्रमाद किंवा अधिकार अभिलेखात किंवा या प्रकरणान्वये ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत ज्या चुका झाल्या असल्याचे हितसंबंधित पक्षकारांनी कबूल केले असेल किंवा ज्या चुका एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही चुका जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करवून घेता येतील.
परंतु, जेव्हा एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना, कोणतीही चूक आढळून आली असेल, तेव्हा पक्षकारांना नोटीस देण्यात आल्याशिवाय व वादग्रस्त नोंदींसंबंधीच्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही हरकती असल्यास त्या हरकती अंतिमरित्या निकालात काढल्याशिवाय अशी कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नाही."

अधिकार अभिलेखात किंवा एखाद्या महसूल नोंदवहीत जर काही चूक झाली असेल किंवा एखादा लेखन प्रमाद झाला असेल तर या कलमान्वये अशी चूक किंवा लेखन प्रमाद दुरुस्त करण्यासाठी तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.
अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका किंवा लेखन प्रमाद झाल्याचे संबंधीत पक्षकारांनी कबुल केले पाहीजे.

आमची जमीन सामायिक आहे आणि जमिनीमध्ये चार खातेक्रमांक आहेत त्या पैकी 1 खातेक्रमांक आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत , तर हक्क सोड हे कोणाच्या नावाने घ्यावे तसेच हक्क सोड हे नोंदणीकृत असेल पाहिजे काय , आणि नोंदणीकृत करण्यासाठी काय करावे लागेल , तसेच हक्क सोड हे 100 रु च्या स्टॅम्प पेपर वर घेतले तर चालेल का

हक्कसोडपत्र
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्याबातचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याकच्या किंवा सहदायकाच्या, लाभात, स्वेच्छे्ने आणि कायमस्वरुपी सोडून दिल्यासबाबत नोंदणीकृत दस्त.

हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेदार हक्कसोडपत्र करु शकतो.

हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या‍ किंवा मिळू शकणार्या, एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या‍ हिस्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.

हक्कसोडपत्र कोणाच्या् लाभात करता येते ?
फक्त त्या्च एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या‍ एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीेच्या लाभात झालेला दस्त हक्क सोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा दस्त म्ह्णून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्व्ये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.

हक्कसोडपत्राचा मोबदला
सर्वसाधारणपणे हक्क्सोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्क‍सोडपत्र नोंदणीकृत असते त्यांमुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.

हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?
होय, हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यूक आहे अन्यंथा त्यांची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही.

हक्कसोडपत्र कसे करावे ?
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो.
असा दस्त‍ रक्क्म रु. २००/- च्या‍ (अद्ययावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
 हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
 हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
 एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
 एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
 दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वााक्षरी.
 दस्ताचे निष्पाषदन व नोंदणी.

हक्क सोडपत्राची मुदत
हक्क सोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्य इतपत पुरावा असावा.

••••••••••••

1) जमिनीचा ताबा तसेच वहिवाट पूर्वीपासून आमच्याकडे आहे , पण हे सिद्ध होण्यासाठी कुठले कागदपत्र जवळ ठेवावी .

2) तसेच जमीन सामायिक असेल आणि अनेक खाते क्रमांक जमिनीत असतील तर एकाच खातेक्रमांक शेतसारा भरतं असेल तर त्याची मालकी हक्क त्याचा होते का

1. वहिवाट आले तर , पीक पाहणी सादरी नाव असणे आवश्यक
2. जमिनीत विहीर , घर असेल व त्या साठी विद्युत जोडणो आपले नावावर घेतली असेल तर तो ही एक पुरावा आहे.
3. लगतचे शेतकऱ्याचे प्रतिज्ञा पत्र
4. घर असल्यास कर पावती ,
5. जमिनीचा धारा भारत असल्यास , पावती

आपले दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर -नाही

आपल्या जमिनी मध्ये कोण कोण शेतसारा भरतोय हे पाहण्यासाठी कुठले उतारा पाहावा किंवा पावती पाहावी

आपण तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी करा माहिती मिळेल

नमस्कार सर ,

मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती

1) एखादा फेरफार मंजूर होणासाठी कुठल्या कागदपात्रांची पूर्तता करावी लागते .

2) जमिनीत खालसा या शब्दाचे काय अर्थ आहे.

2) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती काढली तर धारण जमिनीची माहिती मिळू शकेल काय .

3) एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा फेरफार ही आमच्याकडे आहे , तरी ही आज रोजी त्यांच्या पुढील पीडीनी नावे आमच्या सातबाराच्या भोगवटामध्ये नोंद केली आहेत . तर 56 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या फेरफार आधारे आम्ही या लोकांवर हरकत घेऊ शकतो का आणि त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल आणि कोणाला भेटावे लागेल

हक्क ज्या दास्ताने आपण संपादित केले असतील तो दस्त .
अर्ज
ज्यांच्याकडून हक्क संपादित. करण्यात. आला आहे त्यांचे पोस्टल ऍड्रेस

नमस्कार सर

अ आणि ब या लोकांची सामाइक जमीन असून त्या जमिनीमध्ये दोघांचे एकच घर असून त्यावर दोन घरपट्टी आहे आणि आज रोजी जमीन आणि घराचा ताबा हा दोघांकडे आहे . पण क हि वेक्तीचा इतर हक्क मधून नाव निघून गेले आहे आणि तसा फेरफार आहे तरी आज रोजी क या वेक्तीचा पुढील पिडीची नावे आज रोजी सातबारात भोगवटा मध्ये आहेत . आज रोजी अ आणि ब हे लोक हि जमीन कसत आहेत आणि दस्त हि भरत आहेत . क या वेक्तीचा कुठलाहि संबंध नसताना ते अ आणि ब या लोकांशी भांडत आहे

या प्रकरणावर थोडे मार्गेदर्शन करावे हि विनंती

फेरफार झाला आहे असे म्हणता ,याचा अर्थ त्याचा अंमल घेतलेला नाही ,त्या मुळे ७/१२ दुरुस्त झाला नाहीय . आणि क च्या मृत्यू नंतर वारस चढलेले वाटतात . फेरफाराचा अंमल घेण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करा .प्रांत कार्यालयात अपील करा . क हि बहिण / मुलगी असेल आणि फेरफार हा चुकीच्या पद्धतीने घेतला असेल तर विषय बदलतो . नंतर ची बाब हि तुमची व्यक्तीक आहे .

नमस्कार सर ,

जर आमच्याकडे १९२२ पर्यंत जुने फेरफार आहेत पण जुने सातबारा १९५६ च्या नंतरचे आहेत . पण १९५६ च्या आधीचे सातबारा
बद्दल आम्ही तहसील आणि तलाठी कार्यालयात विचारणा केली तर आम्हाला १९५६ आधीचे सातबारा नाही आहेत , १९५६ पासूनच सातबारा आहेत असे सागितले .

तर जुने सातबारा कसे शोधावे किवा जमिनीचा मुळ मालकीहक्क कसा शोधावा या बद्दल मार्गदर्शन करावे

जमिनीच्या हक्का संबंधी सर्वे नंबर चे हक्क नोंदणी उतारा संबंधीत तहसिल मधिल अभिलेखागारातुन प्राप्त करता येईल....

नमस्कार सर ,

दारिद्र रेषेखाली विहीर आणि घर बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळते का आणि मिळत असेल तर त्याची काय कार्यपद्धती आहे या बद्दल मार्गदर्शन करावे .

योजना आहेत .घरांच्या योजनासाठी आपण ग्रामीण साठी ग्राम पंचायत व शहरी भागासाठी नगर परिषद कडे संपर्क साधावा . विहिरी ग्रामीण भागात narega ,jawahar vihiri,jalyukt shivar ya sathi gram panchyat aani B D O KARYALAYAT ,krishi sahayak yancheshi sampark sadhava . gavatil gram rojgar sevakachi madat ghyavi . arakhada vishisht velet tyar hoto , aapli vihir arakhadyat manjur pahije .

१) सातबारा मध्ये असणारा भोगवटादार या कॉलम मध्ये एखाद्याचे नाव ५० ते ८० वर्षापूर्वी कसे आले ते चेक कसे करावे किवा ते कोणत्या कागदपत्राची पूर्तता केल्यावर येते .

२) ८० वर्षापूर्वीचा एखादा फेरफार जर बरोबर दिसत नसेल आणि एखाद्याचे नाव याच फेरफार च्या आधारे चढले असेल तर फेरफार सोडून दुसरे कुठले कागदपत्रा चेक करू शकतो जेणेकरून सातबारात चढलेले नाव बरोबर आहे याची शाहनिशा करता येईल .

३) एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा फेरफार ही आमच्याकडे आहे तर ते नाव सातबारा मधून कायमचे निगुन गेले पाहिजे कि नाही . पण आज रोजी ते नाव आमच्या भोगवटादार आणि इतर हक्क या कॉलम मध्ये कसे दिसते या वर कृपया मार्गदर्शन करावे .

४) इतर हक्क याचा अर्थ काय आहे

जुने चाक्बंदी ,जमाबंदी ,री सर्व्हे असे रेकॉर्ड तपासावे .

१.जुने ७/१२ व फेरफार नोंदवही पहा.
२.फेरफार नोंदवही तील नोंदी वरून खात्री करता येयील
३.मुद्दा क्रमांक तीन चे बाबतीत कागदपत्रे पहिल्या नंतर अभिप्राय देणे योग्य आहे
४.इतर हक्क मध्ये कुल,कर्जाचा बोजा,किंवा संबंधित भूमापन क्रमांकावर इतर कुणाचा हक्क असल्यास त्याबाबर नोंद केली जाते.

नमस्कार सर ,

१) ८ अ आणि आपले खाते क्रमांक हे कोणत्या आधारे निर्माण होते .

२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती कशी मिळवावी .

३) वारस हक्क गाव नमुना ६ क कोणत्या आधारे बनविला जातो

१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १६८ (१) अन्वये महसूलाचे प्रदान करण्याासाठी प्रथमत: जबाबदार असणार्या प्रत्येक व्यक्तीने राज्य शासनाला जमीन महसूल आणि उपकर म्हणून देय असणार्या रकमेचा हिशोब करण्या्साठी हा नमुना उपयोगी आहे. यालाच 'खातेनोंदवही' असेही म्हणतात.
गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्ये्क शेतकर्याची, त्या गावात विविध ठिकाणी जी शेतजमीन आहे त्याची नोंद असते. गाव नमुना सात-बारा आणि आठ-अ च्या् सहाय्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५१ अन्वये खातेपुस्तिका तयार करणे व विहित फी भरल्यानंतर त्याची प्रत देणे तलाठी यांना शक्य होते.

२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती अभिलेख कक्षात अर्ज करून घ्यावी

३) वारस हक्क गाव नमुना ६ क ही एक दुय्यम नोंदवही आहे. खातेदार मरण पावल्यावर, मयत खातेदाराच्या मालमत्तेचा उत्तराधिकार प्राप्त होणार्या सर्व वारसांच्या नावाची हिंदु उत्तराधिकार अधिनियम उपबंधान्वये वारसाहक्क नोंदवहीत नोंद करावी लागते. एखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस तलाठी यांचेकडे, मयत व्यक्तीाच्या नावाऐवजी वारसहक्काने वारसांची नावे दाखल करण्यासाठी अर्ज देतात. त्या‍नुसार काही ठिकाणी तलाठी वारसांची नोंद प्रथम गाव नमुना सहा-क मध्ये करतात.