महोदय माहीतीचा अधिकार कायदा२००५ अन्वये तहसील कार्यालयातुन( मी ज्या ठिकाणी राहतो )जी माहीती मिळते (ऊदा जुने ७/१२ अभिलेख फेरफार )कींवा ईतर माहीती देतात यावर सहाय्यक जनमाहीती अधिकारी यांचा कींवा जनमाहीती अधिकारी यांचा शिकका कींवा सही न करता माहीती पुरवली जाते तसेच महसुल विभागाचा राजमुद्रा असलेला शिक्का तरी मारा अशी विचारणा केली तर असा शिक्का माहीती अधिकार २००५ अन्वये देण्यात येणार्या माहीतीवर मारता येत नाही असा कोनताही नियम कायद्यात नाही याबाबत तहसिलदार यांना भेटल्यानंतरही हेच ऊत्तर मिळाले (राजमुद्रा असलेला शिकका मारण्याचे कोणतेही आदेश या कार्यालयाला मिळाले नाहीत फार तर जनमाहीती अधिकारी सही देतील )माञ शिकका मिळनार नाही तेव्हा याबाबत सविस्तर माहीती असलेले यशदा मार्फत मिळालेले पुस्तकातही आपन वाचा याबात माहीती नाही असेही सांनणयात आले आहे तेव्हा आपण याबात सविस्तर मार्गदर्शन करावे व शासन निर्णय असलयास तो द्यावा
महोदय सन १९१९ साली गहाण खत झालेले आहे ते नजर गहाण खत आहे रजिस्टर करत असताना पैसे न दीलयास कोर्टामार्फत विक्री करून किमंत व्याजासहीत घ्यावी असा दस्त आहे गहाण वारस नोंद सुध्दा ७/१२ एकञिकरण योजनेस आजही आहे तर पुन्हा वारस नोंद होऊ शकते का (कलम ५९ )नुसार व ह्या जमिनीची विक्री करुन रक्कम घेऊ शकतो का कारण आजपर्यत गहाण खताचे पैसे दिलेले नाहीत व त्यावेळेची रक्कम आजच्या रक्कमेत कशी ठरवलि जाते मार्गदर्शन करा
महोदय रजिस्टर दस्त नोंदणी केलेल्या दस्तात जर चुकीच्या चतुसिमा आहेत व वहीवाट माझी आहे असे सांगुन दस्त केला असेल व प्रत्यक्षात ७/१२ अभिलेखात ती जमिन पड आहे मग असे असताना एकञित जमिनीतील वहीवाट नसताना व ७/१२ त आणेवारी नसताना आणेवारी घालुन दस्त करून दि्लेले आहेत याबाबत कायदेशीर कोनती कारवाई होऊ शकते का दस्त नोंद होऊन बराच कालावधि गेला आहे मार्गदर्शन करा(विना सुचि २ दस्त झेराँक्स प्रतीवर नोंद केला आहे )
महोदय शासनाच्या आदेशान्वये ७/१२ अभिलेख आँनलाईन तयार करण्याचे काम सुरू आहे परंतु यात अनेक चुका झाल्या आहेत विशेषता आणेवारीत असणारी जी क्षेञ आहेत याबाबत कारण संबंधित गटाची आणेवारी १६ आणे जर भरली नाही कींवा जास्त झाली तर ७/१२ आँनलाईन होत नाही परंतु आमच्या गावातील दप्तर नुकतेच नुतन करणयात आले आहे यामध्य जे खातेऊतारे तयार केले आहेत यात आणि पुर्वीचे ऊतारे यात बरीच तफावत झाली आहे ती एकञित गटातील क्षेञाबाब कारण सामान्य लोकांना आणेवारी काढता येत नाही तरीही पुर्वी जे खाते ऊतारे दिले यावरूनच माझ्या आजोबांनी मृत्युपञ केले आहे याची नोदं ७/१२ अभिलेखात होऊन २ वर्ष होऊन गेली आहेत पण आता तलाठ्याने जे नविन खाते ऊतारे केलेले आहेत यात जमिन कमी केलेली आह याचे कारण पुर्वीचे खाते ऊतारे आणेवारी नुसार नव्हते असे कारण तलाठी देत आहे माञ पुर्वीचे खाते ऊतारे सन १९६५ पासुन २०१६ पर्यत तेच होते यात बदल झाला व क्षेञ जास्त झाले त्यामुळे आंनलाईनला अडचन येत आहे मृत्युपञातील दुरूस्ती १५५ खाली दुरूस्त करता येईल यात तलाठी आम्हाला दोष देत आहे मार्गदर्शन करा
आपला प्रश्न/सूचना... महोदय जमिन खरेदी (दस्त) प्रक्रीया पुर्ण झालेनंतर १ महीन्यानंतर विकणारा ईसम मयत झाला त्यामुळे नोंद घेत नाहीत अशा वेळी वारस नोंद करून घ्यावी लागेल का?आनि वारसांनी नकार दिला तर कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल तलाठी वारस नोंद करावी लागेल हे कारन देत आहे यासाठी MLRC मध्ये काय तरतुद आहे कींवा कसे मार्गदर्शन करा
आपला प्रश्न/सूचना... महीला सरपंचावर अविश्वास ठराव मंजुर झाल्यानंतर त्याला स्थगिती देता येते का आणि नविन सरपंच निवडीचा कालावधी कीती आहे
अप्पर जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम आहे . त्याविरुद्ध अपील तरतूद कायद्यात नाही . मात्र त्या विरुद्ध writ याचिका दाखल करता येऊ शकते .
जर अप्पर जिल्हाधिकारी यांचे निर्णयाविरुद्ध writ याचिका दाखल करण्यात आली नसेल अथवा writ याचिका फेटाळली असेल तर सरपंच निवडणूक लावता येईल .
writ याचिका दाखल आहे मात्र न्यायालयाने स्थगिती आदेश दिला नसेल तरीही निवडणूक लावता येऊ शकते मात्र असे केल्यास जर उच्च न्यायायालयाने अविश्वास ठराव रद्द बदल ठरवलं तर , नाव नियुक्त सरपंच यांची नियुक्ती रद्द करणे या बाबी निर्माण होतात .
आपला प्रश्न/सूचना... महोदय कृषी विभागाकडून जे बंधारे बांधले जातात त्यासाठी जी वाळु लागते त्यासाठी गौन खनिज ऊत्खनन परवाना लागतो का कींवा आवश्यक आहे का
आपला प्रश्न/सूचना... महोदय सन १९७० ते १९७२ च्या दुष्काळात माझ्या गावात पाझर तलाव झाले त्यांची नोंद ७/१२ अभिलेख वर आजपर्यत नाही तसेच सदर पाझर तलावासाठी जी जमिन संपादीत झाली ती कोनी केली ते ही माहीत नाही आणि नोंदही ऊपलब्ध नाही ती फक्त ल पा विभागात आहे परंतु जलयुक्त शिवार मध्ये ४० लक्ष रु खर्च केला आहे मग ७/१२ सदरी नोंद कशी करता येईल यासाठी मी ९ महीन्यापासुन आपले सरकार व लोकशाही दीनातही अर्ज केले परंतु कोणीही अधिकारी लक्ष घालत नाही तयासाठी चा शासन आदेश ही दीला आहे मार्गदर्शन करा
महोदय सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणारी व्यक्ती मयत असेल आणि वारस नोंद केलेली नसेल तर अशा वारसांनी जर स्थानिक स्वराज संस्थेसाठी ऊमेदवारी अर्ज दाखल केला तर तो वैध ठरतो का तसेच जिवंत व्यक्तींनी अतिक्रमण केले तर त्याच्या वारसांना ऊमेदवार म्हणुन वैध ठरवता येते का
अतिक्रमण केले म्हणून , उमेदवारीसाठी अपात्रता नाही
आपला प्रश्न/सूचना... महोदय या सरकारचा सिलींग अँकट विषयी वर्तमानपत्र व सोशल मिडीयात जोरदार प्रचार सुरू आहे यात कितपत सत्य आहे कीती जमिन सिलींग खाली येणार व आगामी येणार्या सिलींग अँक्ट विषयी माहीती दया
महाराष्ट्र नागरी जमीन कमाल मर्यादा धारण कायदा रद्द झालेला आहे . मात्र शेतजमीन कमाल मर्यादा धरण कायदा रद्द झालेला नाही
कायदा बनवण्याची एक पद्धत असते . कायदा बनव्य्नयापूर्वी त्याचे प्रारूप प्रसिद्ध केले जाते .लोकांच्या हरकारी , मते मागवली जातायत.
आपला प्रश्न/सूचना... महोदय ७/१२ च्या इतर हक्कात गेली १९३७ वर्षापासुन आजपर्यत संरक्षित कुळाची नोंद आहे तर ते नाव कमी कींवा काढुन टाकता येते का तसे अधिकार कोणाला आहेत कार्यपध्दती सांगा़
आपला प्रश्न/सूचना... महोदय माझ्या शेतातुन
१९९० साली रस्ता तयार करण्यात आला
त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आजपर्यंत
भुसंपादन झाले नाही तो नकाशातही नाही
कींवा ७/१२ वरही नाही सदर रस्त्याचे अंदाजे २एकर
क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे तसेच PWD
विभाग सदर रस्ता आमचा नाही असे लेखी दिले
आह तसेच तहसिलदारांकडे रस्त्यासाठी कोणीही अर्ज केलेला नाही तेव्हा या रस्त्यावर माझा मालकी हक्क आहे त्याबाबत मला कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा आता सदर रस्त्याचे भुसंपादन होऊ शकते का कींवा मी न्यायालयाकडुन मी नुकसान भरपाइसाठी दावा लाउ शकतो
का? कींवा मी न्यायालयाकडुन रस्ता बंद करू शकतो का मार्गदर्शन करा
आपणास नुकसान भरपाई दिल्याशिवाय आपली जागा अशी संपादित करता येणार नाही.
घटनेच्या अनुच्छेद 31 अन्वये
No person shall be deprived of his property without following due procedure of law.
आपला प्रश्न/सूचना... ७/१२ इतर हक्कातील संरक्षित कुळाची वारस नोंद आता होऊ शकते का कार्यपध्दती सांगा
नेहमीच्या वारस तपासाप्रमाणे प्रमाणे कुल वारस नोंद कार्तनेचे आहे
महोदय सिटी स न ची
मालमत्ता ९९ वर्षाच्या रजिस्टर भाडेपट्टयाने
१९८३ ला घेतला पट्टेदार म्हणुन नोंद आहे धारक
म्हणुन मुळ मालकाची नोंद आहे तर धारक म्हणुन
नोंद लावण्यासाठी काय करावे लागेल
आपला प्रश्न/सूचना... .. महोदय माझ्या शेतातुन १९९० साली रस्ता तयार करण्यात आला त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे भुसंपादन आजपर्यत झालेले नाही सदर रस्ता नकाशातही नाही कींवा याची नोंद ७/१२ अभिलेखावरही नाही सदर रस्त्यासाठी वापरलेले एकुण २ एकर क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे सदर रस्त्या बाब त PWD विभागाशी संपर्क केला असता हा रस्ता आमच्या मालकीचा नाही असे लेखी कळविलेले आहे तर हया रस्त्यावर माझाच मालकी हक्क आहे का ?
आपला प्रश्न/सूचना... महोदय माझ्या शेतातुन १९९० साली रस्ता तयार करण्यात आला त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आजपर्यंत भुसंपादन झाले नाही तो नकाशातही नाही कींवा ७/१२ वरही नाही सदर रस्त्याचे अंदाजे २एकर क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे तसेच PWD विभाग सदर रस्ता आमचा नाही असे लेखी दिले आहे तेव्हा या रस्त्यावर माझा मालकी हक्क आहे का? मी रस्ता बंद करू शकतो का मार्गदर्शन करा
महोदय जमिन एकञिकरणावेळी स़ऩ़ चे गटात रूपांतर होताना नकाशात हस्तदोष होऊन तो दोन भागात विभागला अाहे त्यापैकी एकास नं आहे तर उर्वरित भागास नंबर नाही ही बाब दुरूस्तीसाठी ऊपसंचालक कार्यालयाकडे पाठवली असता तो अर्ज चौकशीसाठी TLR कडे आला आहे परंतु tlr कार्यालय १९४० पूर्वीची कागपञाची मागणी करत आहे ती TLR व तहसिल रेकाँर्डला ऊपलब्ध नाहीत त्या मुळे अर्ज निकाली काढला जात आहे मी १९५० पर्यतची कागदपञे जमा केली आहेत हस्तदोषासाठी कलम १५५ याठीकाणी लागु पडू शकते का मार्गदर्शन करा
आपला प्रश्न/सूचना... महोदय सामाईक विहीरीतील पाणी(पाट पाणी ) वापरण्याचे काही विशीष्ट नियम आहेत का? ऊदा_जेवढी जमिन रहहिस्सेदार भिजवतो तेवढीच आपणही भिजवावी़ तसेच याच विहरीवर नविन जमिन खरेदी करून त्यासाठी याच विहीरीतले पाणी वापरता विनासंमती वापरता येऊ शकते का? मार्गदर्शन करा
आपला प्रश्न/सूचना... महोदय अतिक्रमण म्हणजे काय याची MLRC नुसार व्याख्या कोणती अतिक्रमण झाले किंवा नाही हे तपासण्याचा किंवा घोषीत करण्याचा अधिकार कोणाला अाहे
अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याचे मालिकेच्या जागेवर कब्जा करणे असा व्यावहारिक अर्थ आहे .
MLRC मध्ये अभिप्रायट अतिक्रमण म्हणजे , सरकारी जागेवर खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमण असा आहे
मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 58,59बाबत सविस्तर माहीती मिळावी
आपला प्रश्न/सूचना... महोदय शासकीय सेवेत असणारा कर्मचारी जर आपल्या आई वङीलांचा सांभाळ करीत नसेल तर त्यांना मुलाच्या वेतनावर हक्क सांगण्यासाठी काही शासन निर्णय कींवा न्यायालयीन तरतुद आहे का?
महोदय,
इनाम वतन जमीन नोंदवही ११८७ नुसार माझ्या गावात देवस्थान इनाम एकूण १११ एकर होता. आता तो ६० एकरच आहे. याबाबतीत बेकायदेशीररित्या जमिनींचे हस्तांतरण झाल्याचे दिसून येते. एकूण २५ एकर जमिनीस कुळ लागले आहे. तसेच कुळानेही जमिनी विकल्या आहेत. काही जमिनींचे ७-१२ खालसा केलेले आहेत. तर ती जमीन मुळ देवस्थानचे नाव करण्यासाठी शासन निर्णय किंवा न्यायालयीन निर्णय आहेत काय? त्याची कार्यपद्धती सांगा
कुळाचे नवे विक्री किंमत कसी निच्छित करण्यात आली ? याचा शोध घेऊन या सर्व घटना विरुद्ध अपील दाखल करा
आपला प्रश्न/सूचना... आपला प्रश्न/सूचना... महोदय रजिस्टर मृत्युपत्र तयार करत असताना माझ्या आजोबांनी त्यांचा ४० वर्षापासुन व ते हयात असेपर्यतच्या ८अ चा उतार्यावरील सर्व क्षेत्राचे वाटप केले त्याची रितसर नोंद झाली त्याला १ वर्ष पुर्ण झालेले आहे परंतु गावकामगार तलाठी यांनी आजोबांचा तत्कालीन उतारा सर्व रेकाॅड बरोबर नवीन तयार केलेले आहे त्या मध्ये क्षेत्र कमी जास्त भरत आहे तर तलाठी रेकाॅड दुरूस्त करून घ्या असे सांगत आहे परंतू रजिस्टर मृत्यु पत्राप्रमाने झालेली नोंद बदलता येते का आणि ते अधिकार कोणाला आहेत .
आपला प्रश्न/सूचना... महोदय सिटी स न ची मालमत्ता ९९ वर्षाच्या रजिस्टर भाडेपट्टयाने १९८३ ला घेतला पट्टेदार म्हणुन नोंद आहे धारक म्हणुन मुळ मालकाची नोंद आहे तर धारक म्हणुन नोंद लावण्यासाठी काय करावे लागेल
आपला प्रश्न/सूचना... महोदय सं नं 470 व 471 मिळुन नवीन गट नं 1182
तयार झालेला आहे परंतु सं
नं 471 ला 1930 पासुन संरक्षित कुळ कलम 4अ
(1)नुसार आजही आहे सदर जमिनी
ईनाम वर्ग 6(ब) च्या होत्या एकञिकरणावेळी
संनं 470 मधील सर्व नावे व
आणेवारी नवीन गटात हस्तांतरीत झाली पण
471 मधील नावे व आणेवारी
हस्तांतरीत न होता फक्त कुळाचे नाव व एकुण
क्षेञ (20एकर ) हस्तांतरीत
झालेची नोंद एकञिकरण योजनेत आहे याचा
नेमका अर्थ काय? यामुळे
एकञिकरणानंतर गट नं 1182 च्या संपुर्ण गटाच्या
ईतर हक्कात कुळाची नोंद
आजही आहे त्यामुळे कुळाचे नावे स्वतंञ 7/12
करता येणार नाही का? त्याची
कार्यपध्दती सविस्तर सांगुन मार्गदर्शन करावे
ही विनंती
Reply
आपला प्रश्न/सूचना... 1930 ते 1970 या काळातील इनाम वर्ग 6ब(पाटील) या जमीनींना कुळ कायदा 1948 लागू होता का? कारण कब्जेदार सदरी सरकार असे नाव होते तदनंतर 1970 साली ईनाम खालसा झाले त्यामुळे ईतर जमीनीवर ज्या प्रमाणे महसुल विभागाने कार्यवाही केली त्याप्रमाणे या जमीनीवर का करण्यात आली नाही
आपला प्रश्न/सूचना... महोदय
7/12 एकञित आनेवारीत आहे,एकूण 84 लोक आहेत, इतर हक्कात संरक्षित कुळाची नोंद आहे, सदर क्षेञ 25 वर्ष पडीक आहे, तर नवीन पिक पाण्याची नोंद स्वताच्या हिस्सा पुरती होऊ शकते
B.N.D.CASE म्हणजे काय त्यासाठी Advocate ची गरज असतेच का
nahi
nahi
महोदय,
माझ्या मालकीच्या असणार्या जमिनीतून १९८५ साली पुढील गावासाठी जाण्यासाठी तात्त्पुरत्या स्वरुपात रस्ता गेला. त्यानंतर तो डांबरी झाला.परंतू हा रस्ता जुन्या सर्व्हे नंबरच्या नकाशात व नवीन गट नंबरच्या नकाशातही नाही. कोणत्याही प्रकारचे भुसंपादनही झालेले नाही किंवा ७/१२ च्या इतर हक्कातही तशी नोंद नाही. तर या रस्त्याच्या जमिनीवर कायदेशीर मालक म्हणून माझा हक्क आहे का? आणि रस्त्यासाठी गेलेली जमीन परत मिळविण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल? मार्गदर्शन व्हावे.
माझ्या मालकीच्या जमिनीतून नवीन कालवा (सन २०१० साली) गेला आहे. प्रत्यक्षात तो २०१४ ला पूर्ण झाला व २०१५ साली पाणी आले.परंतू कलम ४(१) नोटीस भुसंपादन विभागाकडून व्यपगत झालेली आहे. तर या भुसंपादनाला नवीन भुसंपादन कायदा लागू होऊ शकतो का? तसेच याच जमीनीतीतून आधीच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्ताही गेलेला आहे. तर कायद्यानुसार वेगळ्या दोन प्रकल्पांसाठी एकाच शेतकर्याची जमीन भुसंपादित करता येते का? येत असेल तर तो माझ्यावर अन्याय नाही का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
जमिनीची शासकीय मोजणी पूर्ण होऊन त्यानूसार मिळालेल्या क प्रतीस एक वर्ष पूर्ण झालेले आहे. तर मिळालेली क प्रत तक्रारीवरून रद्द करता येते का? असल्यास तसे अधिकार कोणाला आहेत?
एकत्रित आणेवारीत असणार्या गटातील ७/१२ वरील सर्व लोकांची मिळून आणेवारी १९२ पै ऐवजी ११० पै भरत आहे. एकत्रितकरणापुर्वी ती १९२ पै होती. परंतू एकत्रिकरणानंतर काही लोकांची नावे विनाफेरफार नवीन ७/१२ वरून काढून टाकण्यात आली व काही नावीन घालण्यात आली. काही लोकांच्या नावांना कंस करण्यात आलेला आहे. परंतू आजपर्यंत कोणाच्याही ते लक्षात आलेले नाही व त्याच्याबद्दल तक्रारही नाही. ७/१२ वरील बर्याच लोकांचा अथवा त्यांच्या वारसांचा आजतागायत तपास नाही. वहीवाट फक्त आमचीच आहे. बाकी जमीन पड आहे. पण आणेवारीपेक्षा जास्त क्षेत्र गेली ५० वर्षे आमच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. तर भविष्यात त्याची नोंद ७/१२ सदरी लावण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन व्हावे.
देवस्थान इनाम जमिनीस कुळ कायदा लागु शकतो का?
नविन शर्तीने कुळ कायदा कलम ४३ अन्वये हस्तांतरीत होऊ शकते का?
मात्र कलम ८८ k अ नुसार , किंमत निच्छित होऊ शकत नाही
महोदय ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये संरक्षीत कुळ असा उल्लेख सन १९३२ ते २०१५ पर्यंत आहे. संरक्षित कुळ १९४८ कुळ कायद्याच्या कलम ४ अ(१) या नियमाप्रमाणे आहे. कुळ म्हणून आजपर्यंत पणजोबांचे नाव आहे.१९३२ ते १९५२ चा ७/१२ उपल्ब्ध आहे. त्यात रित ३ असा उल्लेख असून हा गट पुर्वी पासून सामाईक आहे. ही जमीन टेकडीवजा माळपड आहे. १९४४ मध्ये वहिवाट सदरातून कोणतीही सुचना किंवा फेरफार न करता नाव कमी करण्यात आले आहे. परंतू गेली ३० ४० वर्षे टेकडीपड आहे. परंतू कसण्याजोगा भाग आपल्याकडेच १९३२ पासून कसण्यास आहे. यावर नियमाप्रमाणे आमचा हक्क सांगता येईल काय?
प्रतिसाद :
आपले नाव सौरक्शित कुल म्हणून दाखल असल्यास , आपले नवे किंमत होणे अवश्यक
श्री. किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी
यातील नवे किंमत होणे आअश्यक म्हणजे काय? सविस्तर मार्ग्दर्शन व्हावे.
सौरीक्षित कुल अश्या पद्धतीने मालक होतो
आपला मालकी हक्क निर्माण होणे
महोदय ७/१२ च्या इतर अधिकार मध्ये संरक्षीत कुळ असा उल्लेख सन १९३२ ते २०१५ पर्यंत आहे. संरक्षित कुळ १९४८ कुळ कायद्याच्या कलम ४ अ(१) या नियमाप्रमाणे आहे. कुळ म्हणून आजपर्यंत पणजोबांचे नाव आहे.१९३२ ते १९५२ चा ७/१२ उपल्ब्ध आहे. त्यात रित ३ असा उल्लेख असून हा गट पुर्वी पासून सामाईक आहे. ही जमीन टेकडीवजा माळपड आहे. १९४४ मध्ये वहिवाट सदरातून कोणतीही सुचना किंवा फेरफार न करता नाव कमी करण्यात आले आहे. परंतू गेली ३० ४० वर्षे टेकडीपड आहे. परंतू कसण्याजोगा भाग आपल्याकडेच १९३२ पासून कसण्यास आहे. यावर नियमाप्रमाणे आमचा हक्क सांगता येईल काय?
७/१२ इतर हक्कात गहाण वारस अशी नोंद १९३५ पासून आजपर्यंत आहे. आजोबानंतर गहाण वारस नोंद झालेली नाही. जमिन मुळ मालकाकडेच आहे. परंतू गहाण तारण बोजा आजपर्यंत कमी केलेला नाही. वारस नोंद करता येईल काय? किंवा मालकी हक्क सांगता येईल का?
कर्ज घेतलेली रक्कम मुदतीत परत न केल्यास , गहान ठेवलेली मिळकत हस्तांतरित करून मिळणे बाबत तुम्हास / पूर्वजास हक्क होता .
परंतु मुदतीचे बंधनामुळे तो हक्क संपुष्टात आलेला आहे
आपणास आता काही करता येणार नाही , मालकी हक्क सांगता येणार नाही
मृत्युपत्र मुत्युनंतर वारसांना कोर्टाकडून शाबित करुनच आणावे लागते काय? की ते डायरेक्ट तहसिलदार कार्यालयात पुढील नोंदीसाठी सादर केले जाते?
अन्य ठिकाणी आवश्यकता नाही
स्वतःच्या हिश्श्याच्या (वाटपानंतर मिळालेल्या) वडीलोपार्जित मालमत्तेचे मत्युपत्राद्वारे वाटप करता येते का?
मृत्यापात्राद्वारे वाटप करू शकता