देवस्थान इनाम वर्ग 3 असलेली जमीन ज्यासाठी
जिल्हाधिका-यांनी 1963 मध्ये "जमीन देवस्थान इनाम आहे, त्यांच्या कार्यालयाची परवानगीची जरुरी नाही, जमीनीचा बिनशेती साठी उपयोग करु शकता " असे पत्र दिलेले आहे, व या जमीनीत नंतर प्लॉट पडलेले आहेत व त्याचा ले-आऊट संक्षम प्राधिकारी म्हणजेच नगरपरिषदेने मंजूर केलेला आहे प नागरिकांना बांधकाम परवानग्या सुध्दा दिलेल्या आहेत, अशा जमीनीच्या 7 X12 उता-यांमध्ये अनधिकृत बिनशेती वापर असा तलाठी रिमार्क लिहितात. तसेच याचे सर्व्हे मधील 01 प्लॉट ला जिल्हाधिका-यांनी एनए परवानगी दिलेली आहे, तर उर्वरित जमीनीला म्हणजेच प्लॉटस.ला आता एनए परवानगी कोण देईल व त्यासाठी काही शासकिय शुल्क लागेल काय. ही जमीन एनए अकृषिक कशी करावाी याविषयी कृपया संविस्तर माहिती द्ययावी ही नम्र विनंती. अशी परवानगी देणे कोणाच्या अधिकारक्षेत्रात येईल जसे कि जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार किंवा विभागीय आयुक्त इ. याविषयी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
As the Exemption to Land Revenue Act 1863 ,
देवस्थान इनाम जमीन हि मुख्तवे , शेती कारणासाठीच दिलेल्या आहेत . या कायद्याचे Preamble पहिले तर , हा कायदा जमीन महसूल पूर्ण माफी अथवा अंशतः माफी देण्याचे , जे दावे आहेत ते निश्चित करण्यासंदर्भातील आहे . जमीन महसूलम्हणजे शेत जमिनीचा आकार . महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या मध्ये , जमीन महसूल व बिन शेती आकार या दोन्ही संकल्पनांची व्याख्या दिलेल्या आहेत . या दोन्ही याख्या यांचा विचार करता , देवस्थान जमीन या शेती कारणासाठीच दिलेल्या आहेत . या कायद्यात बिन शेती कारणासाठी जमीन देण्याबाबत उल्लेख नाही . त्यामुळे आपले प्रकरणात ज्या बिनशेती परवानगी दिलेल्या आहेत त्या कश्या दिल्या आहेत ?
मला वाटत नाही अश्या जमिनीला बिन शेती परवानगी देता येईल का ? मला वाटत नाही बिन शेती परवानगी देता येईल