[Ctrl+G for Marathi/English]

मी व माझी पत्नी सध्या निवृत्तीमुळे मुक्काम नाशिक ह्यांचा भुसावळ तालुक्यात साकेगाव शिवारात स नं ३०७/३ मध्ये प्लॉट २१ आहे. मला असे कळले आहे कि तेथील कोणी दलाल संगनमताने आमचा प्लॉट खोट्या साह्य कागदपत्रे करून विकण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक भुसावळ ह्यांच्याकडे तक्रार अर्जही पाठविला आहे. ह्याबाबत अजून कोणत्या अधिकाऱ्यांकडे ह्याची तक्रार करावी ह्याचे मार्गदर्शन करावे. तसेच महसूल खाते आमच्या पासपोर्ट व आधार कार्ड ची नोंद ७/१२ ला जोडू शकेल का जेणेकरून अपप्रकार टाळू शकेल. आपला इमेल मिळाल्यास संबंधित कागदपत्रे पाठवता येतील. तसेच प्लॉट ची पुनर्मोजणी कोण करून देईल ??
कृपया मार्गदर्शन करावे

आपल्या भू खंडाची अशी कोणी विक्री करू शकत नाही . विक्री दस्त करताना विक्रेत्याचे ओळख पात्र पहिले जाते .
आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे

वारसाहक्काने आलेल्या वर्ग २ (वन ) जमिनीचे हक्कसोडपत्र होते का ?

वन जमीन क्झाजगी व्यक्तीस प्रदान केली जात नाही
आपल्या कडे कोणती जमीन वर्ग २ म्हणून आहे . विस्ताराने प्रश्न मांडा

माझ्या जन्मा नंतर जन्मदाते वडील सोडुन गेल्याने आईने दुसरे लग्न केले त्यामुळे माझ्या शाळेच्या दाखल्यावर दुसऱ्या वडिलांची जात टाकली आहे परंतु मी माझ्या मुलाच्या दाखल्यावर माझी मूळ जात नोंदविली आहे.मुलाचा दाखला काढताना माझ्या जन्मदात्या वडिलांच्या शाळेचा दाखला एका भावाचा शाळेचा दाखला ज्याच्या वर आमची जन्म जात आहे ती व जात प्रमाणपत्र तसेच माझ्या नावाचे gazZaet व माझा आताचा दाखला लावला होता परंतु आता माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट काढताना अडचण येत आहे अप्लिकेशन रिजेक्त करण्यात आले आहे काय करू उत्तर द्यावे प्लीज

आपल्या biological वडिलांची जी जात आहे त्याचे अन्य पुरावे सक्षम अधिकारी ( प्रांत साहेब ) यांचे कडे सादर करा .अथवा Rejection order अहवाणीत करा

माझे गावाकड़े घर आहे, घर बांधताना घराची भिंत 03 फुट ग्रामपंचायतच्या जागे मधे गेली आहे.
यामुळे काही आडचंण निर्माण होईल का.
जर झाली तर उपाय सांगा please.
आणि ती जागा नावावर करता येईल का?

निश्चित
३ फूट जागेचे क्षेत्र ग्राम पंचायतीकडे मागणी करा . जर ग्राम पंचायतीने जागा दिली तर काही अडचण येणार नाही . मात्र पंचायतीने जागा दिली नाही तर , आपणास अतिक्रमण काढून टाकावे लागेल

नमस्कार सर
1943 साली माझ्या आजोबांनी त्यांच्या सख्या भावाला 98 रुपये दिले त्याबदल्यात त्यांच्या भावाने आजोबांना 82 आर क्षेत्रामधील दक्षिणेकडील 50 आर क्षेत्र 6 वर्ष मुदतीसाठी नगद गहन खत द्वारे लिहून दिले . झालेला दस्त बिगर रजिस्टर आहे . यांना त्याचे वडील साक्षीदार आहेत हे 3 घे म्हणजेच माझे आजोबा त्यांचे भाऊ आणि 2 घांचे वडील यांनी तलाठी साहेबांसमोर तो दस्त हजर केल्याने त्याचा फेरफार तलाठी साहेबांनी नोंदविला तो आज तागायत 7/12 सादरी आहे . परंतु आजोबाच्या भावाने त्याचा मोबदला आज तागायत आम्हाला दिलेला नाही .तर या संदर्भात आमची कलेक्टर साहेबाकडे दावा चालू आहे . आमचे नाव 7/12 सादरी इतर हक्कात आहे तर ते नाव मूळ मालक म्हणून 7/12 सादरी येण्यासाठी आम्ही काय करावे याचे योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

१९४३ साली आपले आजोबांनी त्यांचे भावाची जमीन गहाण घेतली होती . कालावधी ६ वर्षाचा होता . सदरचा कालावधी संपला . जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून अथवा दावा करून , आपल्याला relief मिळेल असे वाटत नाही . आपणास The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा .
अश्या प्रकरणात , आपले नाव ७/१२ सादरी लावावे या बाबतचे अधिकार क्षेत्र , जिल्ह्जाधिकारी न्यायालयास नाही .
मात्र आपले नाव ७/१२ सदरी लावणे या शिवाय , आपणास ९८ रुपये व त्यावरील आजपर्यंतचे व्याज मिळू शकते आपले आजोबांचे भाऊ अथवा त्यांचे वारस यांनी हि रक्कम दिली नाही तरच आपले नाव ७/१२ सदरी लागू शकते .

सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन विभाग मधील लेखा लिपिक व वरिष्ठ लेखापाल या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या हव्या आहेत.तसेच तंत्र शिक्षण संचनालय येथील वरिष्ठ लिपिक तथा लेखापाल या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या हव्या आहेत

साहेब आमची वडिलोपार्जित जमीन माझया चुलत काकीच्या नांवावर आहे , माझे आजोबा व काकीचे सासरे सक्के भाऊ होते आणि माझ्या आजोबांचे नाव ७/१२ वरती सहाहिषेदार म्हणून आहे , परंतु माझे आजोबा मयत झाले आहेत, तर आम्हाला १/१२ वरती आमची सर्वांची नावे लावायची आहेत तर त्यासाठी माझ्या चुलत काकीची सहीची गरज आहे का , तसेच जमिनीचे वाटप करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद .

काकीचे संमतीची आवश्यकता नाही . आपण अधिकार अभिलेख दावा प्रांत अधिकारी यांचेकडे दाखल करा

नमस्कार. मला O. B. C. महामंडळाकडून थेट कर्ज योजनेअंतर्गत रुपये 25000 मंजूर झालेले आहेत. त्यानुसार जामीनदाराच्या 7/12 उताऱ्यावर रुपये 25000 चा बोजा नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र मा. तलाठी साहेब असे म्हणतात की रुपये 25000 चा बोजा नोंद करता येत नाही. त्यासाठी किमान 1 लाख रुपये रक्क्म असावी लागते असे शासकिय परिपत्रक आहे. तरी याविषयी खुलासा व्हावा.

तलाठी यांचे म्हणणे बरोबर आहे

निलंबन कालावधी कर्तव्यकाल करणेबाबत(न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून) बाबत काही gr, परिपत्रक असेल तर कृपया share करावे

महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेत सामील होणे ,परदेशी सेवा , व निलंबन , बडतफी व सेवेतून काढणे कालावधीत वेतन ) नियम १९८१ वाचा

सर,
माझे पणजोबा यांचे निधन हे १९७२ साली झाले आहे. परंतु
ह्याची नोंद कुठेही केली नाही. परंतु आता जमीन ला वारीस होण्यासाठी त्यांचा आता मुत्यू दाखला लागत आहे परंतु त्यांचा कुठेही नोंद नसल्यामुळे जमीन हि माझ्या आजोबांच्या नावावर होत नाही तर आता यासाठी काय आणि असे करणे सोयीचे होईल.
कोर्टातून असा दाखला मिळेल का?? जर हो तर कसा मिळेल

कृपया मार्गदर्शन करावे

The Registration of Births and Deaths Act 1969 , च्या कलम १३ (३) नुसार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करून त्यांचा मृत्यू दिनांक जाहीर करून घ्या . त्या आधारे जन्म मृत्य नोंदणी अधिकारी , आजोबांचे मृत्यूची नोंद करतील व आपणास मृत्यू दाखला मिळेल

नमस्कार साहेब,
माझ्या क्षेत्रातून हायवे गेला आहे त्यात माझी ९० गुंठे क्षेत्र माझ्या७/१२ वरून कमी झाले आहे. पण प्रत्येक्षात माझी 35 आणि शेजारील गटातील 55 गुंठे गेली आहे. आम्ही बाहेर आपआपसात तडजोड पत्र करून मोबदला वाटुन घेतला होता. पण आता पुर्ण 90 गुंठे क्षेत्र माझ्या 7/12 वरती नोंद झाली आहे व त्यामुळे माझे क्षेत्र कमी झाले आहे. तरी आता 7/12 बरोबर करून घेणे साठी काय करावे लागेल क्रुपया मार्गदर्शण करावे.

आपली जमीन संपादित झाली त्या वेळेस निवडा जाहीर झाला . निवडा जाहीर झाल्यावर वाजवी कालावधीत ( ६ महिने ) लेखन प्रमाद चूक दुरुस्त करता येते . निवडा रक्कम स्वीकारताना आपण हि बाब भू संपादन अधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
ज्या वेळेस संपादन मूळ आधी सूचना काढण्यापूर्वी , संयुक्त मोजणी झाली , त्या नंतर अधिसूचना काढण्यात आली , त्या वेळेस आपण हरकत घेणे आवश्यक होते .
आपणास हि दुरुस्ती करावयाची असल्यास आपणास , जाहीर निवड , writ याचिके द्वारे , उच्च न्यायालयात आव्हानीत करावा लागेल

आदरणीय सर, माझ्या आईची अमरावती जिल्ह्यात ५ एकर भोगवाटदार २ जमिन आहे. आईच्या मृत्युनंतर आम्ही तलाठ्याकडे वारसनोंदी साठी सर्व कागदपत्र (मृत्यू दाखला, प्रतिज्ञापत्र, सर्व वारसांचे नाव पत्ता आधार कार्ड पुरावा इत्यादी) दिले. सर्व वारसदार रक्ताच्या नात्यातील असून एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. जमिनी बाबय कोणताही वाद नाही.असे असून ही दोन महिने झाले तरी तलाठी वारस नोंद करण्यास टाळाटाळ करत आहे.त्यांनी आम्हांला Legal Heir Certificate कोर्टाकडून आणण्यास सांगितले.आमचे जमिनी बाबत कोणतेही वाद नसताना हे Certificate देणे गरजेचे आहे का? आमच्या आईची सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिन होती त्यावर आमची वारस नोंद होऊन ७/१२ वर नावे सुद्धा लागली त्यासाठी आम्ही कोणतेही Legal Heir Certificate दिले नव्हते फक्त वर उल्लेख केलेले कागदपत्र दिले.मग इथे अमरावती ला का Legal Heir Certificate ची मागणी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचे एकच नियम असताना तलाठी महाशय जाणिवपूर्वक दिरंगाई करत आहे. Legal Heir Certificate हे खूप खर्चिक व वेळखाऊ procedure हे निरदर्श नास आणून दिल्यावर ही ते आपला हेका सोडायला तयार नाही.कृपया मार्गदर्शन करावे.

आपण सदरची बाब , जिल्हाधिकारी यांचे निदशंनास अनु शकता
१. आपले सरकार - online Platform
2. लोकशाही दिन
३. प्रत्यक्ष भेट घेऊन आपले तक्रार जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे

Sir,
Mi tal- walawa, dist- sangli madun aahe.
Aamchya gavi ek devasthan trust aahe ti 1952 pasun registered aahe tasech trust la inam 3 agriculture land aahe.
1952 pasun sadar trust la 3 trustees hote, 1984 madhye J.C.C. Pune yani new scheme keli tyapramane 3 trustees na remove karun new 5 trustees nemale.
Tya order la last chya trustees ni District Court, Sangli yethe challenge kele, D.C. sangli yani 1991 la matter remanded karun fresh enquiry chi order keli tasech "defecto manager or temporary panchas mhanun 5 paiki 2 trustees chi niyukti keli". Tyapaiki ek maze vadil (father) aahet.
2013 madhye dusarya trustee chi death zalya nantar aamhi B.P.T. Act 50 A(3) nusar scheme madhye durusti sathi Charity commissioner, sangli yanchyakade application kele parantu 2017 madhye Charity commissioner yani " District court ne remanded kelele matter ajun suru zale nahi tasech to matter sapadat nahi, asha condition madhye sadar application chalu shakat nahi" ashi order karun matter close kela aahe. Tasech sadar inam 3 agriculture land ha 1991 pasun mazya vadilanchya vahivatit aahe. Sir maze question ase aahet,
1) ya condition madhye aamhi kay karu shakto? Karan aata maze vadil pn aged aahet.
2) gavatil kahi lok aamhala vaglun new scheme sathi try karat aahet, asha condition madhye charity commissioner other lokani dakhal kelela scheme application manjur karu shaktat ka?
3) jo agriculture land aamhi kasat aahe tasech tyachya income cha audit report aajparyant aamhi charity commissioner office madhye dakhal kela aahe. To land aamchya kadun kadhun ghetla jau shakto ka?

१. आपण काही करू शकत नाही
२. जी चौकशी चालू आहे . ती पूर्ण होणे आवश्यक आहे
३. देवस्थान जमीन विश्वस्त यांचे नावे होऊ शकत नाही . आपणास देवस्थान जमीन कसण्याचा अधिकार नाही . आपणाकडून हि जमीन काढून घेतली जाऊ शकते

1. सहकारी पतसंस्थेचे गहाणखत कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख दिली जाते की पतसंस्थेचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचा चेक दिला जातो ?
2. पतसंस्था 6 लाख कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख देऊ शकते का ?

हा प्रश्न संभंधित पतसंस्था योग्य रीतीने देऊ शकेल आपण त्यांना विचारा , त्यासाठी हा फोरम योग्य नाही

ग्राम पंचायत निवडणूक प्रशिक्षण पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन मिळेल का? तहसील कार्यालय सिल्लोड जी औरंगाबाद

आपण तयार करा . आपला अभ्यास होईल

सर,
मी एक na प्लॉट विकत घेत आहे.agreement of sale मध्ये मालकाने नावापुढे huf असे लिहिलेले आहे.सादर मालकाचे पॅन कार्ड पब huf चे आहे.परंतु सातबारा उतारा वर मालकाच्या नावापुढे huf(कर्ता)अशी नोंद नाहीये. सादर प्लॉट वर कर्ज मिळणे साठी मी बँकेकडे अर्ज केला आहे परंतु बँकेने

"जर मूळ मालक हा प्लॉट huf च्या कपॅसिटी मध्ये विकत असेल तर सातबारा वर सुद्धा नावापुढे huf अशी नोंद करून आणा किंवा अग्रीमेंट of sale मधून huf काढून correction deed करून आना असे सांगत आहे."

सादर जमीन हि त्यास वंशपरंपरेने आलेली आहे.

बँक सांगते ते बरोबरच आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद सर,

आपला विश्वासू,

अमोल गवांदे
संगमनेर

कायदेशीर बाबीपेक्षा व्यावहारिक बाब महत्वाची
बँक आपणास कर्ज देत आहे त्यामुळे , बँक जे सांगत आहे त्याप्रमाणे करणे आवश्यक

आदरणीय सर,
वडीलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 वर वारसाहक्काने ' मोठ्या भावाचे नाव ( कुटुंब प्रमुख) आणि इतर 6 ' अशी नोंद आहे. मोठय़ा भावाने मनमानी पद्धतीने ढोबळ वाटप केले असले तरी कागदोपत्री वाटणीपत्र्क करून दिले नाही. सदर प्रकरण तालुका दिवाणी न्यायालयात मागील 7 वर्षांपासून प्रलंबित आहे.
दरम्यानच्या काळात शासनाकडून मिळणारे विविध स्वरूपातील अनुदानाची रक्कम मात्र फक्त मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते. तहसीलदाराकडे हरकतीचा अर्ज देऊनही कार्यवाही झाली नाही.
प्राप्त अनुदान सर्व वारसदारांना समप्रमाणात वाटप व्हायला हवे अथवा अनुदान रक्कम शासनाला परत करण्यात यावी असे आम्हाला वाटते.
मार्गदर्शन करावे ही विनंती.

जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब
लोकशाही दिन , आपले सरकार अथवा आपण प्रत्यक्ष भेटून आणून द्या

30-40 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी गाव-शिवारातील एक शेतजमीन गहानखत करुन ताब्यात घेतली. दरवर्षी पिक-पाहणी अहवालात तशी नोंद होत राहीली. त्या नंतर काही वर्षांनी मुळ मालकाने ती जमीन परत घेतली. मात्र आजही सदर जमिनी च्या 7/12 वर ( वडिलांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने) आमच्या वडीलबंधू चे नाव आहे. विशेष बाब अशी की आजही त्या शेतजमिनीच्या 7 /12 वर पिक-पाहणी अहवालात आमच्या मोठ्या भावाच्या नावाची नोंद घेतली जाते.
तसेच शासनाकडून विविध योजनांद्वारे मिळणारे अनुदानाची रक्कम ही आमच्या मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते.
यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.

मूळ मालकाने हि बाब संभंधित अनुदान वितरित करणाऱ्या विभागाचे निदर्शनास आणून दिल्यास भावास , अनुदान व्याजासह परत करावी लागेल .

Sir,
माझ्या वडिलांच्या नावावर २५आर एवढी जमीन आहे. संबंधित जमीन गट एकत्रीकरण योजनेमध्ये २९३ गट न. नुसार ७/१२ वर ८ अ वर वडिलांच्याच नावावर आहे. गट एकत्रीकरण योजना ही आजोबांच्या काळामध्ये झाली. या योजनेनुसार संबंधित गट नंबर ची जमीन आजोबांच्या नावावर झाली. त्यावेळच्या जबाबाच्या नकले नुसार संबंधित गटाची मालकी आमची दाखवली जाते. परंतु संबंधित जमिनीचा ताबा दुसऱ्याच व्यक्तींकडे आहे. या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी काय करावे?

जमीन एकत्रीकरण योजना झाल्यावर , जमीचा ताबा एकत्रीकरण अधिकारी ( Settlement Officer ) यांनी ताबा आपणास दिला असेल ? त्याची तबे पावती आपणाकडे आहे का ? नसेल तर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून तांबे पावती घ्या . जमीचा ताबा आपणाकडे इतके दिवस नसताना आपण शांत काय बसला ?
असोत The Specific Relief Act खाली , जमिनीचा ताबा परत मिळण्यासाठी दावा दाखल करा

मा.सर

माझ्या वडिलांनी १ हे ५२ गुंठे जमीन १९८१ साली निबंधक कार्यालाय नोंद करुन खरेदी केलि होति. आजतगायत जमिन अाम्हिच कसतोय पण जमिन घेतल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले व कागदपत्रे गहाळ झालि होति त्या कारणाने ७/१२ ला नोंद करणे राहुन गेले होते. कागदपत्रे मिळाल्यानंतर मी गेले २ वर्षापासुन जमीनिची ७/१२ला नोंद व्हावी म्हणुन तलाठि याच्याकडे अर्ज व लागणरी कागदपत्रे खरेदिखत, प्रत दस्त प्रत सादर केलि परंतु त्यावर कुठलिहि कार्यवाहि झालि नाहि. या परिस्थितिचा गैरफायदा घेत मुळ मालकाने वरिल जमिनिचि फेरविक्री केलि. सदर जमिन विक्री होताना केलेल्या पेपरनोटिशिला मी वकिलामार्फत नोटिस पाठवुन हरकत घेतलि होति. सदर व्यवहाराचा तलाठि कार्यालायात फेरफारिस अर्ज आल्यानंतर त्यालाहि मी हरकत घेतलि परंतु हे प्रकरण नायब तहसिलदार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी इतके वर्ष ७/१२ नोंद का नाहि केलि? असे विचारले. मी आणि वडिलांनी त्याच्या आजारपणाचीहि माहिती दिलि. परंतु आता सदर फेरफारास मंजुरि देण्यात आलि आहे.

अशा प्रकारे काहि सरकारी अधिकारि पैशासाठि काहिहि करतात अशा परिस्थितित मी काय करावे कारण कोर्टात जाण्याइतकि परिस्थितिहि नाहि.

आपले खरेदी खत अगोदरचे आहे . आपण काळजी करण्याचे कारण नाहीं . आपण मंजूर फेरफार विरुद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . निर्णय आपल्या बाजूने लागेल .

सर माझ्या आजोबांची वडिलोपार्जित
शेती काही कारणास्तव महाजनको ने नवीन पॉवर प्लांट साठी अधिग्रहित केली आहे. माझा असा प्रश्न आहे कि
माझ्या आजोबांचे निधन १९९४ या साली झाले आहे आणि इतर वारस सुद्धा लागलेले आहे जेव्हा जमीन संपादित झाली तेंव्हा सर्वे मिळून ५ वारस लागलेले होते. माझे वडील आणि त्यांचे दोन भाऊ आणि २ बहिणी
१) माझ्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट हवे आहे जॉब साठी, तर मला असे विचारायचे आहे कि मला इतर जे वारसदार आहे त्यांचे संमतीपत्र घ्यावे लागेल का प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळवण्या यासाठी ,किंवा इतर दुसरा पर्याय आहे का प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी.

२) कोण कोणते डोकमेण्ट लागतात प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी .
३) इतर वारसदार काही हरकत घेऊ शकतात का जर त्यांच्यी संमती जर नाही घेतली तर
४) आणि मला प्रकल्पग्रस्त दाखला कुठे मिळू शकेल कृपया माहिती द्या
५) सर्वे नंबर एकाच असल्यामुळे एकाच सर्टिफिकेट मिळेल कि सर्वाना सर्टिफिकेट मिळेल
मला असे सांगण्यात आले आहे कि आता कायदा बदल्या मुले आता इतर वारस दारांचे संमती पात्र लागत नाही असे सांगण्यात आले आहे . ते खरंच आहे का ???
आणि असेल तर मला प्रकल्पग्रस्त चा दाखला मिळू शकतो का
६) माझ्या वडिलांच्या बहिणीचे निधन झालेले आहे तर त्यांचा मुलांचे संमती मला घ्यावी लागेल का कि फक्त मृत्यू दाखला दिला तरी चालेल का ?
सर कुपया लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे

नवीन काही नियम आला आहे का या विषयी

आपले एकूण किती क्षेत्र संपादित झाले आहे ?
प्रत्येकाचे नावे ( वारस प्रत्येकी ) किती क्षेत्र आहे .
प्रकल्प ग्रस्त दाखला मिळण्यासाठी कमीत कमी २० गुंठे क्षेत्र संपादित झालेले असणे आवश्यक आहे . तसेच ज्या प्रकल्पसाठी जमीन संपादित झालेली आहे त्या प्रकल्पासाठी , १९९९ चा प्रकल्प बाधित कायदा अधिसूचने द्वारे लागू केलेला असणे आवश्यक आहे

सर
आम्ही 10 भावंडे आहोत.आमची17.35 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात वाद चालू आहे. कारण ती गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये जास्त दिसत आहे. म्हणजे जुन्या रेकॉर्ड मध्ये तलाठी कढून चूक अशी झाली कि एकर चे हेक्टर मध्ये करताना चुकीने ने वाडिव झालीय.. म्हणजे 17.35 एकर ची हेक्टर मध्ये 6.94 हेक्टर होतय तर तलाठी ने ती 7.94 हेक्टर रेकॉर्ड ला नोंद करून टाकली होती तरी ती शेतजमीन आता कमी करून पोट वाटप करायचं पण तयासाठी आम्ही 10 भावंडांपैकी 8 चा सहमतीने आम्ही सर्कल कडे मागिल 2 वर्षा पासून प्रकरण पाठवलाय पण ती process अजून पुढे गेलेली नाही . त्यासाठी मी सर्कल कडे वारंवार गेलो पण काही झालेलं नाही . वा त्यांनी आता 2 वर्षा नंतर ते प्रकरण तहसीलदार कडे पाठवले 2 वर्षा चा दिरंगाई नंतर. वा process अजून अडकून पडलीय तयासाठी काय करता येईल सर. वा त्याची पूर्ण process काय आहे सर.

तहसीलदार यांना स्मरण करून द्या . अथवा जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . सादर बाब त्यांचे निदर्शनास आणून द्या . वास्तविक तहसीलदार यांनी हि लेखन प्रमाद चूक कलम १५५ खाली दुरुस्त करणे आवश्यक आहे . मंडळ अधिकारी यांना दिरंगाई बद्दल जबाबदार धरता येणार नाही .

माझ्या आईच्या माहेरील जागेवरील काही सातबारा उताऱ्यावर मामाकडे आजोबांचे निधन झाल्यावर कुटुंब प्रमुख म्हणून मामाच्या नावाची नोंद झाली. नंतर मामाच्या मृत्यूनंतर चुकीने माझ्या आईचे व आजीचे नाव कमी होऊन फक्त मामाच्या वारसाची नोंद झाली. नजरचुकीने राहून गेलेली नावे गावनमूना ७/१२ वर घेणे बाबत मी तहसीलदारांना अर्ज दिला आहे व तलाठी कार्यलयाने रिपोर्ट दिला आहे. परंतु तलाठी कार्यलयाने अर्ज तहसीलदारांकडे न करता प्रांत कार्यलयात द्यायचा सल्ला दिला आहे.

मला तहसीलदारकडून आदेश मिळू शाळतो का कि प्रांत कार्यलयात अर्ज करणे कायदेशीर योग्य ठरेल? कृपया मार्गदर्शन करावे.

ज्या फेरफारानें केवळ मामी व मामाचे वारसांची नावे दाखल आहेत तो फेरफार प्रांताधिकारी यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे .

१९२७ साली २३ एकर जमिन खरेदीने घेतली परंतु खरेदी तारखेला त्यातील ५०% जमिन परस्पर विक्रीने गावातील प्रतिष्ठित व्यक्तिच्या नावे झाली त्यानंतर उर्वरित ५०% जमीनीमधील २५% जमीन १९२८ साली गावातील देवस्थानास गावकर्यान्नी घेतली परंतु तहसील मधे देवस्थान नोंद नाही उर्वरित २५ % जमीन नावे राहिली या संदर्भात दावा दाखल करता येइल का?

होय

नमस्कार सर
सर्वे नंबर अ चे क्षेत्र 25 एकर 5 गुठे आहे?
सर्वे नंबर ब चे क्षेत्र 6 एकर 22गुठे आहे?
दोनी सर्वे नंबरच एकत्रित टिपण पक्का बुक मध्ये 29 एकर 31 गुठे नोंद आहे ,
दोनी तफावत 73 गुठे आहे,
सर्वे नंबर अ चे पहिले 24एकर 5 गुठे खोडून 25एकर 5 गुठे केले, खासरा प्रत्र मध्ये अशी खाडा खोड कली आहे
माझे क्षेत्र ब आहे
मोजणी मध्ये मला माझे क्षेत्र 6एकर २२गुठे हद्द कायम करूण देत नाही
कुपया सही स्तर माही ती कळवा

अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.

कृपया मार्गदर्शन करावे

आजोबांची १० एकर २० गुंठे जमिनीची वाटणी २००५ पूर्वी म्हणजे १९९६ साली झाली आहे . त्यामुळे वाटणी झाल्यानंतर ती जमीन वडिलोपार्जित स्वरूपाची राहत नाही . तसेच ३ एकर २० गुंठे जमीन आपले वडील व चुलत्यांनी विकत घेतली आहे . ती जमीन वडील व चुलत्यांची स्व कष्टर्जित जमीन होते . त्यामुळे या जमिनीवर आजी /आत्या यांचा कोणताही अधिकार नाही .

जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.

कुळाने खंड दिला नाही म्हणून, खुलासा कधी नोटीस दिली होती का ? नोटीस दिल्यानंतर कुळाने , खंड दिला होता का ? त्याने काही उत्तर दिले होते का ?
नसल्यास आपण , कुळवहिवाट संपुष्ठात आणण्यासाठी मामलतदार यांचेकडे दावा दाखल करा

जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.

महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये
कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास ३ महिने कालावधीची नोटीस देण्यात यावी . त्यामध्ये त्याने खंडाची रक्कम उक्त कालावधीत द्यावी याबाबत नमूद करणे आवश्यक . जर त्याने रक्कम दिली नाही तरच , कुल वहिवाट संपुष्टात आणता येते . खंड रक्कम दिल्यास कुल वहिवाट संपुष्टात आणता येत नाही

श्री. पानबुडे सर,
मि आणि माझे सख्खे चुलत भाऊ दोघांनी मिळून एक सामाईक प्लाट 5वर्ष पुर्वी विकत घेतला होता. दोघांपैकी एकाला घ्यायचा आहे, तर हक्क सोडपत्र पूरेसे होईल का?
की रितसर खरेदी करून घ्यावा लागेल. गृहकर्ज करण्यासाठी कोणती गोष्ट करणे योग्य ठरेल.
कृपया मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.

दोनीही चालेल . मात्र दोनीही दस्तास सारखेच मुन्द्रानक शुल्क लागेल

माझे वडील यांच्या नावे गट नं.147 मध्ये शेतजमीन असुन ती आंबेचिंचोली ते पुळूज या रस्त्या लगत आहे. माझे वडील अशिक्षित असल्याने यारस्त्याचे अतिक्रमण माझे शेतावर झाले आहे. सध्या हा रस्त्या साव॔जनिक बांधकाम विभाग पंढरपुर (M. D.R ) अंतर्गत मंजूर होउन काम सुरू आहे परंतु हा रस्ता माझे शेतावर अतिक्रमण होत आहे. हा रस्ता गाव नकाशा मध्ये माझे जमीनीवर नसुन तो माझे क्षेत्र सोडून आहे. सदर जमिनीचे भूसंपादन झालेले नाही , कोणताही मोबदला दिलेला नाही, असे असताना सुध्दा सदर रस्ता जबरदस्तीने, माझ्या जमीनीवर करण्यात येत आहे. तरी कृपया रस्ता गाव नकाशाप्रमाने करण्यात यावा yasathi kay karave?. मी याबाबत तहसीलदार पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागा पंढरपूर यांना लेखी तक्रार दाखल केली होती तरीही याची कोणतीही दखल घेतली नाही ? nakasha pramane rarta karnyasathi kay karave?

आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे , नुकसान भरपाई मिल्ने बाबत नोटीस द्या . नुकसान भरपाई न दिल्यास , आपण दिवाणी दावा दाखल करा

मी crpf मध्ये सेवारत असून मला कसण्यासाठी शासकीय जमीन मिळण्यासाठी आवश्यक बाबी बाबत मार्गदर्शन करावे

महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्लेवाट लावणे ) नियम १९६९ नुसार , व्यक्तीच्या नावे जमीन नसल्यास ( असल्यास २ हे पेक्षा कमी आहे तर , देण्यात येणारी जमीन २ हे पर्यंत त्याचे धारण क्षेत्र होईल त्या मर्यादेत ) जमीन देता येते . आपल्या वास्तवाच्या ठिकाणापासून ८ किलोमीटर परिसरात आपणास जमीनदेण्यात येते
आपण आपले क्षेत्राच्याबी जिल्हाधिकरी यांचेकडे अर्ज करा . तत्पूर्वी तहसील कार्यालयात जाऊन लँड बँक मधून , उपलब्ध व निर्बद्ध रित्या वाटपास उपलब्ध जमिनीची माहिती घ्या

नमस्कार सर
माझ्या आजोबांना सन १९४३ साली त्यांच्या भावाने नजर गहाण खताद्वारे आम्हास 50 आर क्षेत्र लिहून दिले होते सदरचा दस्त विना रजिस्टर आहे तलाठी साहेबांनी त्या गहाण खताचा फेरफार मंजूर केला ७/१२ सदरी सण १९४३ साली आमच्या आजोबांचे नाव इतर अधिकारात लागले असून आज तागायत आहे ... ते नाव अधिकारात येईल का ? ते इतर अधिकारातील नाव अधिकारात आणण्यासाठी काय करावे , किंवा ७/१२ सदरी अधिकारात नाव येण्यासाठी काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

आजोबांचे भावाने आजोबांना काही क्षेत्र गहाण खताने दिले . मात्र त्या बदल्यात आपल्या आजोबांनी काही पैसे त्यांच्या भावांना दिले असतील .आपले चुलत आजोबांनी त्यांना दिलेले पैसे परत केले आहेत का ?
आपणास आपले आजोबांनी , चुलत आजोबांना दिलेले पैसे परत मिळण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल . जर चुलत आजोबा अथवा त्यांचे वर्षांनी पैसे परत केले नाहीत तर , आपले नावे जमीन होईल अन्यथा आपले नावे जमीन होणार नाही .

सर माझ्या वडिलांनी गावठाण मधील एक जागा खरेदी केली त्याची खरेदी नोंदणी रजिस्टर कार्यालयात झालेली आहे जागा खरेदी करुन 20 वर्षे झाले परंतु खरेदी करतेवेळी त्या खरेदीदस्तावर सिटी सर्व्हे नंबर टाकण्यात आला नसल्यामुळे आजही सिटी सर्व्हे ला मुळ मालकाच्या नावे नोंद आहे मी त्या सिटी सर्व्हे कार्यालयात वडिलांच्या नावाने नोंद लावण्यासाठी गेलो असता मला त्यांनी डबल नविन खरेदीदस्त बनवण्यास सांगितले आहे वडिलांच्या नावे नोंद करण्यासाठी काय करावे

गावठाणाचा सिटी सर्वे झाला असेल तरच , गावठाणातील जमिनींना , CTS नंबर असतो . अन्यथा गावठाणातील जमिनीला CTS नंबर नसतो .
सल्ला दिल्या प्रमाणे , दुरुस्त खरेदी खत करावे लागेल . म्हणजे नवीनच खरेदी खत करावे लागेल

नमस्कार सर,
नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.

कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर दिले आहे

आदरनीय सर, माझ्या जमिनी च्या बांधालगत च्या शेजार्‍याने अवैध रित्या माती उचलली व तिची विक्री केली आहे व माझा बांध फोडला आहे .तरी यावर काय कारवे लागेल.

अवैध्य रित्या माती उचली आहे म्हणजे माती चा वापर कोठे केला आहे ?
त्याचेच शेतात केला असल्यास , तो दंडनीय कारवाईस पात्र होत नाही .
आपला बांध फोडला आहे , त्याचेकडून नुकसान भरपाई मागा .

Sir, date 10-05-2019 The Bombay High Court granted probate on 09/01/2019 with reference to will. In said will executor was appointed. Can executor, on the basis of probate order, submit the application to the concerned Tahsildar/Talathi for adding the name of legal hairs as mentioned in will ? if so, a] in this case can you specify the list of other documents required ? b] specific time limit prescribed to add the names in 7/12 for concerned Talathi ? c] if the said time limit is not followed by the Talathi then who is the higher authority to take up the matter ? Sir, will you like to reply by mail to my mail id i.e. djt07@rediffmail.com Thanking in anticipation regards Deepak

Executor has to apply to Talathi / Tahsildar to mutate the 7/12 in the name of beneficiary. 15 days is the mandatory period for mutation . You can take up this matter to Tahsildar or District Collector .

सर मला शिवरस्ते विषयी माहिती हवी आहे
1) सर शिव रस्ते हे सर बांधावरून असतात का
2) शिव रस्त्या वर 3 डेपनी आहेत त्या डेपनी (मातीच्या मोठे बांध )मध्ये काही अंतर आहे ते अंतर किती असते
3)शिवरस्ते सर बांधावरून4 फूट -4फूट असा देता येतो का पण डेपनी असताना
4) पूर्वी ब्रिटीश काळात डेपनी मधून शिव रस्ते होते का
5) काही जन म्हणतात कि डेपनी मधून8 फूट रास्ता असतो ते बरोबर आहे का

आदरणीय सर/मॅडम
बक्षीसपत्र/दानपत्र केलेली शेती ची नोंद 7/12 मध्ये होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे

दस्त नोंदणीकृत असल्यास , नोंद होऊ शकते

आमच्या वडीलांची स्वतंत्र मिळकत आहे. सदर मिळकत एकूण क्षेत्र 3.29.0 हे.आर एवढी आहे. मिळकत अजूनही वडीलांच्या नावावर नाही
या मिळकतीची वारसाना वाटणीसाठी काही नियम आहे का?

मिळकत वडिलांची स्वकष्टर्जित असेल तर , वडिलांचे इच्छेनुसार , त्याची विक्री / विल्हेवाट ते लावू शकतात . वडील मयत झाल्यावर , व्ययक्तिक वारसा कायद्यानुसार वारसांची नावे दाखल होतील
मिळकत वडिलोपार्जित असेल व वडिलांचे हयातीत वाटप करायचे असल्यास , वडील व इतर वारस , अश्या सर्व वारसांना प्रत्येकी एक हिस्सा या प्रमाणे वाटप होईल
उदा
वडील व त्याना २ मुले व एक मुलगी आहे तर प्रत्येकी १/४ हिस्सा या प्रमाणे वाटप होईल . मात्र वडील मयत झाले तर , २ मुले , १ मुलगी व आई हयात असेल तर आईस या प्रमे प्रत्येकी १/४ हिस्सा मिळेल

आदरणीय सर, बिनशेती मोजणी करून कजाप.प्लॉट नुसार विभागणी करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त.झाला आहे.जमिनीचे विनिश्चीतीकरण झाले असून त्यानुसार बिनशेती चलन भरले आहे.सदर ठिकाणी अंशतः विकास परवानगी मिळाली आहे.त्यामुळे बिनशेतीची इतर हक्कात नोंद घेता येत नाही असे मा.तलाठी यांचे म्हणणे आहे.तर ७/१२ सदरी कजाप.नुसार प्लॉटिंग नुसार वेगळे ७/१२ तयार करता येतील का?आकारणी केव्हा करता येईल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.बिनशेती नोंद करण्या अगोदर कजाप.ची नोंद घेता येऊ शकेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....

आपणास आकार फोड पत्रक म्हणायचे आहे , कजाप नाही . जो पर्यंत आकारफोड पत्रक येत नाही तो तोपर्यंत बिनशेती नोंद व आकारणी ७/१२ वर करता येणार नाही

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?

१. ज्या आदेशाने आपल्या आजोबांना भू खंड मिळाला , त्या आदेशामध्ये भूखंड विक्री बाबत काही निर्बंध आहेत का ? जर निर्भेड असतील तरच , जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
२. खरेदी खत नोंदणीकृत नाही , त्या वर सिटी सय्र्वेय नंबर नाही , तर त्याचा अंमल मिळकत पत्रिकेवर उप अधीक्षक तसेच ग्राम पंच्यात यांनाही घेता येणार नाही
३. ग्राम पंचायतचे आदेश विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?

कोकणे साहेब
आपले आजोबांना भूखंड मिळाला होता त्याप्रमाणे त्यांनी तो आपल्या भावकीतील एका इसमास विक्री केला . ग्राम पंचायत अभिलेख सदरी घेणारच नाव लागले . तथपि अद्याप मिळकत पत्रीकेस नाव लागले नही . ताबा मात्र घेनारचेकडे आहे . ज्या आदेशाने भू खंड प्रदान करण्यात आला त्या मध्ये , हस्तांतर करण्यापूर्वी , जिल्हाधि यांची परवानगी आवश्यक आहे असा अट होती का ? जर अशी अट असेल तर , खरेदी खत रद्द होणार नाही मात्र , त्याचे नाव मिळकत पत्रीकेस लागणार नाही . मात्र जर अट नसेल , तर त्याचे नाव लागण्यास काही अडचण नसावी

सर माझे शेत दोन गावच्या शिववर आहे शिवरस्त्याची मागणी आहे शिववर 3 डेपनी(मोठे मातीचे बांध)तिन्ही बाजूस आहेत 3डेपनी मध्ये अंतर आहे
1)डेपनी मध्ये किती अंतर असते त्यातुन रस्ता असतो का
2)डेपनी असताना शिववरुन रस्ता कुठून देता येतो
3)शिववरच्या बांधाला सरबांध म्हणतात का
4)डेपनी कस्यासाठी असतात त्याचे महत्व काय
5)शिववरुन 4-4 असा सरबंधाने डेपनी असताना रस्ता देता येतो का
6)प्रत्येक शिववरुन रस्ता पूर्वी पासून असतोच का
7)काही माणसे म्हणतात ब्रिटिश काळापासून डेपनी मधून शिव रस्ते असतात /मग प्रत्येक शिववर रस्ता असतो का व् तो किती असतो
8)तहसीलदार याना शिवरुन कसा रस्ता देता येतो

सर,
1980-82 साली खरेदी केलेली जमीन च खरेदी खत पुणे जिह्यातील कोणत्या कार्यलयात काढता येतील.

दुसरा प्रश्न

सातबारा मध्ये नावात बदल झाला असेल(म्हणजे आधी शेषराव होते की ते बरोबर आहे पण आता ऑनलाइन ते शेष असे झाले आहे.)आधी ऑनलाइन तसेच हस्तलिखित उतारा यावर शेषराव असे बरोबर लिहिलेले दोन्ही उतारे आहेत. यात दूरुस्ती कशी करायची

धन्यवाद!

१. एवढे जुने खरेदी खत मिळणे अवघड आहे . आपण संबंधित दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात अर्ज करा
२. तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

नमस्कार सर,
वडिलांच्या मृत्यूनंतर आई, मी व भावंडांची वारसनोंद केल्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून कोणकोणती कागदपत्रे, दाखले व उतारे घ्यावेत व त्यामधून कोणकोणत्या बाबींची खातरजमा करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद.
... अरुण जायकर.

७/१२ व ८ अ घ्या

नमस्कार सर ३२ ग चे सर्टिफिकेट आमच्याकडे नाही ७/१२ वर इतर हक्कात जमीन मालक यांना जमिनीची रक्कम ३३७८ तारीख १/१०/१९६३ पासून वार्षिक १० हप्त्यात मिळाली आहे असा शेरा इतर हककात आहे सदर त्याबाबतच्या पावत्या आहे तरी सदर भोगवटा वर्ग२ व इतर हक्कातील शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल

आपले तहसील / शेत जमीन न्यायाधिकरण कार्यालयात जाऊन ३२ मी प्रमाणपत्र ( जमिनीचे हप्ते भरले बाबत ) घ्या . त्या आधारे तलाठी इतर हक्कातील हि नोंद कमी करतील

११ आर जागा २००६ मध्ये ११ जणांच्या नावे घेतली आहे सादर व्यवहार तुकडेबंदी विरुद्ध असा शेरा इतर अधिकारात आहे नवीन सुधारणेनुसार किमतीच्या २५ % रक्कम भरण्याबाबत काही परिपत्रक अथवा जि आर आहे का ते मिळावे हि विनंती

कायद्यात सुधारणा झाली आहे . महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर सुधारणा कायदा प्रत आहे

खुल्या प्रवर्गातील लग्न झालेल्या महिलांसाठी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी तिच्या आई वडील कि नवरा यापैकी कोणाचे उत्पन्न धरण्यात येते? तसेच महिला स्वत: नोकरी करत असेल तर तिचे पगारापासून मिळणारे उत्पन्न कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशील मध्ये पकडण्यात येते का ? कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशीलामध्ये कशाकशाचा समावेश होतो याबद्दल मार्गदर्शन करावे,

१. आई व वडील
२. आई -वडील यांचे वेतन व शेती पोंसून मिळणारे उत्पन्न सोडून , सर्व बाबी उत्पन्नात येतात