मी राधिका मोरे बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की
1) माझे काका शेतकरी नाहीत.त्यांनी 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत
भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन खरेदी केली होती त्यांचा व्यवहार सन २०१६
चा अधिनियम क्रमांक 20 प्रमाणे दंड आकारून नियमित होऊ शकतो का ? सध्या जमीन नगरपंचायत हद्दीत आहे.परंतु नगरपंचायतीचा विकास आराखडा अजून तयार झाला नाही.
2) सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीला शेतकरी दाखला मिळू शकतो का ? सरकारी नोकरी करणार्या व्यक्तीचे वडील यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून ते शेती करतात.
3) संभाव्य बिनशेती म्हणून एका शेतकरयाकडून रस्त्याच्या हक्कासहीत शेतजमीन खरेदी केली असल्यास ती जमीन आता अधिकृत निवासी बिनशेती होऊ शकते काय ?
4) संभाव्य बिनशेती खरेदी म्हणजे काय ?
कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.
२. होय
३. जर जमीन गावठाण हद्दी पासून ५०० मीटर हद्दीत असेल तर , जमीन मानीव बिन शेती आहे .