जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय महोदय,

मा. तहसीलदार, उस्मानाबाद यांनी दि.१३/०४/१९९२ व दि.२९/०६/१९९६ रोजी शहरातील दोन वेगवेगळ्या सर्व्हे नंबर करिता इंग्रजीमध्ये मजकूर असलेल्या ५-६ पानी बिनशेती आदेश पारित केलेला आहे. तसेच त्यामधील एका आदेशासोबत असणा-या ले-आऊट प्लॅनवर देखील तहसीलदार यांची स्वाक्षरी आहे. सध्या महाराष्ट्र मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय तसेच शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी पर्यंतचे प्लॉटस् गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करणेत येत आहेत. तेंव्हा मला उस्मानाबाद शहरातील दोन वेगवेगळ्या सर्व्हे नंबर मधील प्लॉटचे जुने बिनशेती आदेश असताना देखील गुंठेवारी कायाद्यानुसार उस्मानाबाद नगरपरिषदेकडून प्लॉटस् नियमित करुन घ्यावेत किंवा कसे याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे, ही नम्र विनंती.
मेहेरबान तहसीलदार महोदय यांनी आपणास विकास परवानगी ( प्लोतिंग ) दिलेली आहे . आपण या प्लॉट वर बांधकाम केले असेल . त्यास पुन्हा नगरपालिकेकडून परवानगी घेण्याची गरज नाही . जर ते प्लॉट अनियमित असते तर , नगर पालिकेने आपणास नगर रचना कायदा व नगर पालिका कायदा अन्वये पुढील कारवाही /कारवाई सुरु केली असती .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उस्मानाबाद नगरपरिषदेकडे चौकशी करणे उचित

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by मनोज
Thursday, April 21, 2022
sagarkandekar1990@gmail.com

सर ,
आम्ही चार भाऊ असून आमची सामाईक मालकीचा 130 गुंठे असलेले शेत जमीन आहे तसेंच आपसात कटुता असल्याने वाटप झालेले नाही.माझे तिन्ही भाऊ नौकरी आणि व्यवसाय निमित्त शहरात राहता व सर्व शेती मीच कसतो.शेजारील शेतकऱ्यांच्या अतिक्रमण ना मुळे सदर जमिनीची मला हद कायम मोजणी करायची आहे तर मला इतर सर्व भावाची संमति लागेल का ? तसेच शेत जमीन हद कायम मोजणी साठी कुठला कायदा किंवा कलम लागू पडते?
मोजणी फी आपण भरण्यास तयार असल्यास , अन्य बंधूंची परवानगी आहे किंवा त्यांची अर्जावर सही आहे कि नाही याची मोजणी खात्याला आवश्यकता नाही . प्रत्यक्ष मोजणीची नोटीस आपल्या अन्य तीन भावांना व लगतच्या खातेदारांना मोजणी खात्याकडून येणारच आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण संबंधित भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधल्या‍स आपणास सविस्‍तर माहिती मिळेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by गोविंद
Wednesday, April 20, 2022
selfhood.agency@gmail.com

भोगवटादार वर्ग 2 मधील जमिनीचे कुटुंब अंतगर्त हक्कसोड करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणती फी जमा करावी लागते? प्रांत कार्यालयातील कर्मचारी रेकनरप्रमाणे ५०% फी भरावी लागेल असे सांगत असल्यास काय करावे लागेल?
हस्तांतरण फी भरण्याची तयारी असल्यास , पैसे जमा करणे आवश्यक आहे . अन्यथा आपणास हक्क सोड परवानगी मिळणे असंभव

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमिनीवरील स्‍वत:चा हक्‍क साोडणे म्‍हणजे स्‍वत:च्‍या हक्‍काचे हस्‍तांतरण करणे हाोय. यासाठी सक्षम अधिकार्‍याची परवानगी व नजराणा अदा करणे आवश्‍यक

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by omkar s
Wednesday, April 20, 2022
sawanton44@gmail.com

महोदय ,
गवात आमची वादिलौत्परजीत जमीन आसून ति वर्ग 1 आहे एकून जमीन 1 एकर आहे त्यापैकी 24 गुंठे माधे सार्वजानिक बांधकाम विभाग चे विश्राम गृह आहे व इतर जगेत घर आहेत . आजोबा च्या नंतर वडील व चूलते यांची नावे 7/12 लागली आहेत. या जमिनिचा शेतफाळा आज रोजी पर्यंत आम्ही भरत आहे , सदर च्या जामिनी संधर्भात सा. बा . विभागाकडे महिती आधिकार अंतार्गत जगेच्या मालकी ची कागद पात्रे मगितली असता त्याच्याकडे कोणतेच कागद अढाळ होत नाही , असे सांगितले .
तसेच या विभागा कडे खालील बाबी मगितल्या असता कोणतेच कागद उप्लभ्धा नाहीत
1.विश्राम गृहाच्या जागेचा बिगर शेती परवाना.
( शासकीय इमारती बाढ्न्यासाठी जमीन बिगर शेती लागतो का ?)
2.विश्राम गृहाच्या बंधाकामाचा नकाशा अधिकृत साही शीक्क्या सहित.
3.महसुल विभागाने सुपूरद केलेल्या हस्तंतर्नाचे दस्ताएवज व जामिनी चा नकाश्या.
4.महसुलक विभागाकडून भूसंपादानसाठी जमिनिच्या विनियोजनसाठी
केलेली कार्यवाही.
वरीलकोणतेच कागद विभागाकडे नाहीत , तसेच 1962 पसन चे 7/12 व फेरफार तपासले असता त्यात या विभागाचा कोठेच उल्लेख नाही .सादर विभागाचे या जगेवर अतिक्रमण म्हंता येइल का ?
तसेच पिक-पाणी साठी 5 गुंटे माधे नाव या विभागाचे नाव आहे.
कृपया मार्गदर्शन कारवे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद 300 A अन्वये ,
कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय त्याच्या जमिनीपासून वंचित करता येणार नाही.
No person shall be deprived of his property save by authority of law.
त्यामुळे आपली जमीन संपादन केली आहे का याचा जर तपशील सार्वजनिक बांधकाम विभाग कडे नसेल तर आपण नुकसान भरपाईची रक्कम जमिनीचा ताबा घेतल्यापासून स- व्याजासह मागणी करण्याची नोटीस वकिलामार्फत देऊ शकता. तसेच जर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल विहित वेळेत घेतली नाही तर आपण न्यायालयाचाही मार्ग अवलंबू शकता.
मात्र त्यापूर्वी आपले आजोबा आठवा पंजोबा यांनी उपरोक्त जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला बक्षीस पत्राने दिली आहे का याचीही पडताळणी करा अथवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 55 अन्वय जमिनीवरील हक्क आपल्या पूर्वजांनी शासनाच्या ला भात सोडून दिलेला आहे का याचीही खात्री करा. यासाठी जुने फेरफार काढून ते तपासून पहा. जर यापैकी कोणतीही बाब अस्तित्वात नसेल अथवा त्याबाबतच्या अभिलेख नसतील तर आपण उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे वकिलामार्फत नोटीस देऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सा. बा . विभागामार्फत भूसंपादन झाले असावे असे वाटते. भूमी अभिलेख विभागाकडे चाौकशी करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by सुभाष मेहेंदळे
Wednesday, April 20, 2022
charu_11@yahoo.com

माननीय महोदय
दिनांक १५ /०४ /२२ ला वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार महसूल व वन विभागाचे सह सचीव श्री. रमेश चव्हाण ह्यांनी पारीत केलेल्या आदेशानुसार गावठाण पासून २०० मिटरचे अंत असलेल्या जमिनी अकृषिक करण्यासाठी अर्ज देण्याची गरज नाही माननीय तहसीलदार साहेब ह्यांना अशा जमीनिंची यादी तयार करून सभधीताना सूचना दिली जाईल असे म्हटले आहे ह्या आदेशाची प्रत मला मिळावी ही विनंती
आपला नम्र
सुभाष मेहेंदळे म-९८५०८७०७२७
सोबत बातमी जोडत आहे
15th April 2022:
After changes in the Maharashtra Land Revenue Rules 1966, there is no need to apply for a non-agriculture (NA) certificate for land within 200 metres of Gaothan (old village areas) As per a circular issued by the revenue department’s joint secretary Ramesh Chavan, the rule has come into immediate effect across the state. The local authorities (Tehsildar) have been asked to prepare survey numbers for residential, commercial and industrial zones of the land (except those which have been already converted to NA). The landowners will be sent NA tax and conversion charges notices.
आपण ज्या वृत्तपत्राच्या बातमीचा आधार दिलेला आहे त्याच बातमीमध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. या बातमीनुसार निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत असलेल्या सर्व जमीन धारकांना मेहरबान तहसीलदार महोदय यांचेमार्फत या जमिनीवर असलेल्या बिनशेती महसूल धाऱ्या ची नोटीस देण्यात येणार आहेत व नोटीस प्राप्त झाल्यानंतर अशा धारकाने जमीन महसूल जमा केल्यानंतर, अशी जमीन मानव बिनशेती झालेली आहे याबाबतचे आदेश मेहरबान तहसीलदार महोदय यांचेमार्फत काढण्यात येतात व त्याप्रमाणे सातबारा सदरी ही मानीव बिनशेती अथवा बिनशेती असा तपशील नमूद करण्यात येऊन गाव नमुना नंबर दोन मध्येही अशा जमिनीचा उल्लेख करण्यात येणार आहे.
आपल्या प्रकरणात प्राथम्याने कारवाई होण्याची आपली इच्छा असल्यास आपण आपल्या तालुक्याचे मेहरबान तहसीलदार महोदय अथवा आपल्या तालुक्याचे मेहेरबान निवासी नायब तहसीलदार अथवा मेहेरबान नायब तहसीलदार महसूल यांच्याशी संपर्क साधावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सदर सुधारणा म.ज.म.अ. कलम ४२-ड मध्‍ये केली गेली आहे. शासनाच्‍या संकेत स्‍थळावर किंवा तहसिलदार कायार्यालयात हे सदरचे परिपत्रक उपलब्‍ध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sandesh Suresh Nangare
Tuesday, April 19, 2022
Sandesh.Nangare@Gmail.com

माझी वडिलोपार्जित जमीन ही सातबारा उतारा व खरेदी खत तसेच सर्वे नंबर पर्यंत मला माहिती आहे परंतु जर मी सर्वे नंबर मध्ये ती जमीन कुठे आहे हे कसे शोधू शकतो याकरता काही शासकीय मार्ग उपलब्ध आहे का?
भूमी अभिलेख विभागाशी संपर्क करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sandesh Suresh Nangare
Tuesday, April 19, 2022
Sandesh.Nangare@Gmail.com

पुणे शहरामध्ये सर्वे नंबर चा नकाशा वरील मॅप मध्ये ज्या जमिनीला सर्वे नंबर नाहीये अशा जमिनीचा मालकी हक्क हा कुणाकडे असू शकतो
जी जमीन काोणाच्‍याही मालकीची नसते ती शासनाच्‍या मालकीची असते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Jayesh Kadam
Monday, April 11, 2022
jykadam1985@rediffmail.com

सर,
आमची रत्नागिरी मध्ये गावठाण मध्ये १० गुंठे जमीन आहे, आणि त्याचे आम्ही १९०२ पासून चे उतारे काढले आहे आणि ते आमच्या वडिलोपार्जित नावावर होती १९७६ पर्यन्त आणि तिकडे आमचा अजून सुद्धा घर आहे त्या जमिनी वर.
पण आजोबांच्या नातेवाईकांनी ते जमीन १/०४/७६ ला वहिवाटीने कब्जेदार केली आहे आणि आमच्या आजोबांचं नाव काढून टाकला आहे फेरफर चा उतारावरून. त्या जमिनीवर आमचा जून आणि नवीन घर सुद्धा आहे १९७५ पासून आणि ते जमीन आम्हीच राखतो. मला फक्त एकाच विचारायचं होता कि त्यांचं उताऱ्यावरून नाव कस काढू शकतो आणि आजोबांचं आमचा नाव टाकू शकतो जे नाव खोटी वहिवाट लावून जमीन नावावर केली.
सर खरंच तुमचा सल्ला पाहिजे आहे खूप अडचणी मध्ये आहोत आम्ही समोरची व्यक्ती खूप मानसिक त्रास देत आहे.
ज्‍या फेरफारान्‍वये आजाोबांचे नाव कमी करण्‍यात आले आहे त्‍या फेरफारविरूध्‍द अपील दाखल करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vishal kakde
Friday, April 08, 2022
b9604876863@gmail.com

माननीय महोदय.
सर कुळकायदा 38 ई declaration म्हणजे काय असते.
हैद्राबाद कुळ कायदा अन्‍वये कुळ जमिनीचा मालक झाल्‍याचे प्रमाणपत्र आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by YOGESH
Tuesday, April 05, 2022
YOGESHGARKAL@YAHOO.COM

सर माझा प्रश्न असा आहे कि,
मी 2010 साली मा.विभागीय आयुक्त साहेब यांच्या परवानगीने वर्ग 2 आकारी पडीत जमीन पन्नास टक्के बाजार मुल्ल्य भरुन विकत घेतली आहे तरी 2019 च्या GR नुसार मला पन्नास टक्के बाजार मुल्ल्य भरावे लागेल का?
हाोय. तथापि, आता तीन वर्षाची मुदत संपली असल्‍याने ५०%पेक्षा जास्‍त रक्‍कम भरावी लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Ratnadip Ramesh Gadade
Tuesday, April 05, 2022
ratnadipgadade14@gmail.com

1950साली खातेदार मयत झाल्यानंतर त्याने खरेदी केलेल्या जमीनीला वारस म्हणून नातवाचे (वय 4) नाव आहे पण 6क ला नातवाच्या नावासोबत अ.पा.क नातवाच्या आईचे नाव आहे त्याचबरोबर ए.कु.म्हणून वर्ग 2चे मयताच्या 3भावांची पण नावे आहेत पण फेरफार ला फक्त एकट्या नातवाचे नाव आहे व एकत्र कुटुंब पुढारी म्हणून कुठेही उल्लेख नाही तर मयताच्या भावांची त्या जमिनीवर नाव लागु शकतील का?
आपण संबंधित कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी यांना संपर्क करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट विधी ( सुधारणा ) अधिनियम १९७४ कृपया पाठवणे.

Question by Aditya
Sunday, April 03, 2022
itsadi9696@gmail.com

नमस्कार सर/मॅडम,
आमच्या शेतात जाण्यासाठी सर्वे नं.१ व सर्वे नं.९९ मधून ५० वर्षांपासूनचा रस्ता आहे. पण आत्ता या रस्त्यावर सर्वे नं.९९ मधील लोक त्यांचा पूर्ण हक्क दाखवत आहेत व अडवणूक करत आहेत. हा वाद मिटावा म्हणून दोन्ही सर्वे नं. मधील लोकांनी अर्धे अर्धे पैसे भरून संपूर्ण सर्वे नं.९९ ची सरकारी मोजणी व्हावी म्हणून अर्ज केला होता. दोन दिवसांपूर्वी सरकारी अधिकारी येऊन सर्वे नं.१ मधील लोकांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता फक्त रस्त्याची मोजणी केली व संपूर्ण रस्ता सर्वे नं.९९ मध्ये आहे असे सांगितले आहे असे सर्वे नं.९९ मधील लोकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणी त्यांनी बांध दाखवण्यासाठी देखील कोणतीही रेषा आखलेली नाही. तरीही ते लोक रस्ता पूर्ण बंद करण्याच्या तयारीत आहेत.
कृपया सरकारी मोजणीचे नियम काय असतात व या मोजनीवर आम्ही आक्षेप घेऊ शकतो का यावर मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
माोजणी असमाधानकारक असेल तर त्यावर आक्षेप घेता येईल. आपण अधिक्षक भूमी अभिलेख यांना संपर्क करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय मोहदय,

सन १९३६-३७ साली कसत असलेल्या जमिनीवर पणजोबा हे संरक्षित कुळ होते. नंतर त्यांचा मोठा मुलगा (चुलत आजोबा) यांचे नाव साधे कुळ म्हणून लागले. माझे आजोबा हे मुंबई ला एकत्र कुटुंबातील दुकान संभाळत होते. तर चुलत आजोबा हे गावी शेती संभाळत होते. पणजोबा चें निधन (१९५० ला) झाल्यावर शेतीचे चे सर्व अधिकार हे चुलत आजोबा (ए कु म्या) यांचा कडे होते. पुढे १९६४ साली चुलत आजोबा यांनी वर्दी देऊन माझ्या आजोबांना कुळ हक्का ने कसत असलेली जमीन सोडून बाकीच्या जमिनीचे वाटप करून दिले. (पणजोबा पासून कुळ हक्काने कसत असलेली जमिनीची केस चालू होती म्हणून ती जमीन चुलत आजोबा यांनी वाटप करून नाही दिली) पुढे सन १९७१ साली चुलत आजोबा यांनी पणजोबा पासून कुळ हक्का ने कसत असलेली जमिनीचे खुश खरेदी करून जमीन मालक यांच्याकडून जमीन खरेदी केली व ७/१२ सदरी त्यांचे नाव लागले. माझे आजोबा यांचे १९७७ साली निधन झाले. तरी पुढे हि गावी असलेल्या जमिनीचे सर्व अधिकार हे चुलत आजोबा यांच्या कडे होते व त्यांच्या बरोबर माझे काका हे त्यांना जमिनी कसण्यासाठी मदत करत होते. पुढे चुलत आजोबा यांनी कुळ हहक्काने खरेदी केलेली जमिनीचे त्यांच्या पुतण्यां ना (माझ्या वडिलांना) त्या जमिनीचे आर्धी वाटप करून दिले पण ७/१२ वर नोंद नाही केली. सन १९९७ साली चुलत आजोबा यांचे निधन झाले व त्या नंतर आज रोजी त्यांच्या नातवांचे नाव ७/१२ आहे.

माझे प्रश्न: असे आहेत

१) पणजोबा पासून कुळ हक्काने कसलेली जमीन त्यांच्या नंतर मोठा मुलगा (चुलत आजोबा) खरेदी करतात तर त्यावर पणजोबा चा लहान मुलगा (माझे आजोबा) यांचा हक्का आहे का ?
२) चुलत आजोबा यांचे नातू आज कुळ हक्कातील जमीन नवा वर करून देण्यास तयार नाहीत व सांगत आहे तुमचा हक्का नाही आहे हे बरोबर आहे का ?
३) चुलत आजोबा यांनी हयात असताना स्वतः माझ्या वडिलांना कुळ हक्कातील खरेदी केलेल्या जमिनीचे प्रत्येक्षात अर्धे वाटप करून दिले पण ७/१२ नोंद केली नाही. तर ७/१२ सदरी नाव नोंद करण्या साठी काय करावे लागेल ?

सर कृपया मार्गदर्शन करावे.
कुळ दाखल असलेल्‍या जमिनीची परस्‍पर खरेदी, विक्री , वाटप करता येत नाही. त्‍यासाठी तहसिलदार सक्षम आहेत. आपण तहसिलदारांची भेट घ्‍यावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मदत व पुनर्वसन विभाग ३/५/२०१० शासन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जात नाही. ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र २०१० पूर्वी संपादीत प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यात यावे.

Question by निलेश पाटील
Friday, April 01, 2022
nileshpatil23683@gmail.com

नमस्ते सर सर माझा प्रश्न असा आहे की क्षेत्र सामाईक आहे व सामाईक क्षेत्रात 2 सखे भाऊ व एक इतर त्रयस्थ व्यक्ती आहे तर व पैशाची नोटीस समिकात आली तर भूसंपादन मोबदला कश्या प्रकारे वाटप करावा
जिथे हिस्‍सा ठरविलेला नसताो तिथे प्रत्‍येकाचा समान हिस्‍सा आहे असे कायदा मानताो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar patil
Sunday, March 27, 2022
sagarpatil3696@gmail.com

पूर्वी वर्दी अर्जावरून सातबार्यावर झालेली नोंद सध्या ती नोंद काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल
केवळ वर्दी वरती वरून सातबारा सदरी नोंद झालेली आहे ती काढून टाकण्यासाठी आपणाला तो संबंधित फेरफार उपविभागीय अधिकारी/ प्रांत यांचेकडे अपील दाखल करावे लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar patil
Sunday, March 27, 2022
sagarpatil3696@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे माझ्या गटाच्या शेजारील गटातील दोन्ही भावांची मिळून 30 गुंणटया पेकी 15 गुंणटे जमीन आम्ही घेतली आहे घेत आसताना नोंदणीकृत दस्ताने घेतली आहे व वकिलामार्फत जाहीर नोटीस काढून घेतली आहे तर सातबारा सदरी नोंद करत दुसरा भाऊ अडचण आणत आहे तरी काय करावे
दोन्ही भावांची मिळून एकत्रित तीस गुंठे क्षेत्राचा सातबारा असावा. जमीन खरेदी करताना त्यापैकी 15 गुंठे जमीन आपण खरेदी केलेली आहे. व त्या खरेदीला भाऊ या कारणासाठी हरकत निर्माण करत असे की नक्की कोणती 15 गुंठे जमीन आपण खरेदी केलेली आहे. खरेदीखत करताना आपण ुसर्‍या भावाची स्वाक्षरी खरेदी खतावर घेणे जरुरीचे होते. त्यामुळे ज्याच्या कडून आपण खरेदी केली त्याची नेमकी वहिवाट कोणती याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याने दुसरा भाऊ आडकाठी निर्माण करत आहे.
या नोंदीच्या अनुषंगाने जी काही हरकत दुसऱ्या भावाने घेतलेली असेल त्याबाबतची तक्रार नोंद संबंधित मंडळ अधिकारी यांनी मेहरबान तहसीलदार यांच्याकडे पुढील निर्णयासाठी वर्ग केलेली असेल. मात्र त्यामुळे नोंद मंजूर होण्यासाठी कोणतेही हरकत असण्याचे कारण नाही.
मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जर दोन्ही भावांना ती मिळकत त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली असेल, तर दुसऱ्या भावाला ती जमीन घेण्याचा प्राधान्याने हक्का असतो. याही कारणासाठी लगेच शेजारी भाऊ त्यावर आडकाठी निर्माण करत आहे. मात्र आपली खरेदी ही नोंदणीकृत दस्ताने झाली असल्याने मंडळ अधिकारी अथवा तलाठी अथवा तहसीलदार यांनी या हरकत इकडे कोणतेही लक्ष देण्याचा अथवा विचारात घेण्याचा कारण नाही. खरेदी खताचे वैधतेबाबत दिवाणी न्यायालय निर्णय घेण्यास सक्षम आहे. लगेच भावाला दिवाणी न्यायालयात जाऊन आपल्याला लाभात झालेली खरेदी खत प्रथम रद्द करून घ्यावे लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय मोहदय

आधी विचारलेल्या प्रश्नास अनुसरुन:

कुळ कायदा ३२ ग नुसार "८८ क" चे सर्टिफिकेट काय असते ? १९६४ - ६५ मध्ये कुळ असलेल्या जमिनीवर जमीन मालक यांनी कुळ कायदा कलाम ८८ क चे सर्टिफिकेट मिळवले असा फेरफार आहे व तसे ७/१२ वर देखील नमूद आहे. १९३६-३७ पासून पणजोबा (संरक्षित कुळ होते) कसत असलेल्या जमिनीवर त्यांचे निधन झाल्यावर मोठा मुलगा यांचे नाव साधे कुळ म्हणून लागले. कुळ असलेल्या जमिनीचे पुढे ३२ ग ची किंमत झाली नाही. व जमीन मालक यांनी कुळ कायदा कलाम ८८ क चे सर्टिफिकेट मिळवले आसा शेरा आहे. सन १९३६ पासून जमीन कुळा च्याच ताब्यात आहे व पुढे त्याच जमिनींचे १९७१ मध्ये पंजोबांचा मोठा मुलगा यांनी जमीन मालकाकडून त्या जमिनीचे खुश खरेदी खत करून जमीन ४०० रुपये ने खरेदी केली. खरेदी पात्रातील काही मजकूर : " खरेदी पत्रापूर्वी तुमच्या कब्जात आहे. तो कबजा कुळ हक्काचा असलेली या खरेदी पत्राने मालकी हक्काचा कायम केली आहे" १९३६ पणजोबा पासून कुळ हक्काने कब्जात असलेली जमीन त्यांचा मोठा मुलगा (साधे कुळ) हे ३२ ग ची किंमत न करता ती जमीन १९७१ ला खुश खरेदी घेतली. तर त्या जमिनीवर पंजोबांचा लहान मुलगा यांचा हक्क आहे का?
भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्र, जिराईत जमिनीच्या बाबतीत सोळा एकर, एक माही पाणी मिळत असलेल्या जमीनीच्या बाबतीत आठ एकर व बागायत जमीनीच्या बाबतीत चार एकर व या जमिनीतून मिळणारे उत्पन्न , कुलाकडून मिळणाऱ्या खंडा सह १५०० प्रतीवार्षापेक्षा जास्त नसेल, अशा जमिनीची विक्री किंमत कुळवहिवाट कायदा 1948 च्या कलम 32 अन्वय गुळाच्या लाभात निश्चित होत नाही. म्हणजे जमिनीची कसवणूक करत असून सुद्धा कुळ मालक होत नाही.
मात्र याच कायद्याच्या कलम 88 अन्वय, जमिनीत पासून मिळणारे प्रतिवर्ष उत्पन्न रुपये 1500 पेक्षा ज्यादा झाल्यास अथवा मालकाची क्षेत्र उपरोक्त नमूद क्षेत्र मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, कलम 32 च्या तरतुदी लागू होतात म्हणजे कुलाच्या लाभात जमिनीची विक्री किंमत निश्चित होऊ शकते.
तसेच जर जमीन मालकाने जमीन परत मिळणे बाबत नोटीस दिलेली नसेल व कुळ जमीन कसं असेल तर अशा जमिनीची विक्री किंमत कुळाच्या लाभात झाल्याचे कलम 33 क अन्वये मानण्यात येते .
आपल्या प्रकरणात, आपल्या आजोबांनी जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे त्या मिळकतीवर आपल्या आजोबांचा हक्क आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SANKET MHATRE
Friday, March 25, 2022
sanketmhatre55@gmail.com

मा. महोदय लिलाव प्रक्रियेमध्ये जमीन विकत घेतली 1946 ला तेव्हाचे 1946-47 पीकपाहणी सदरी कुळाचे नाव आहे आहे, कुळानी कृषकदिनी संरक्षित कुळ नोंद करून घेतली , लिलाव प्रक्रिये झाल्यानंतर कुळाने त्यांचा ताबा सोडलाच नाही , आता आमची कोर्टाने फसवणूक केली असे समजावे का? जमीन मिळू शकेल का कुळ बाजूला करून, योग्य ते मार्गदर्शन करावे ,
संकेत राव म्हात्रे मला वाटतं या प्रश्नाचे उत्तर मी यापूर्वी दिलेला आहे. मात्र परत एकदा आपण आला याबाबत सांगतो.
ज्यावेळेस जमिनीची विक्री लिलाव पद्धतीने होत असते त्यामध्ये
१. जमीन ज्या स्थितीत आहे त्या स्थितीची लिलावाद्वारे विक्री करणे
\२. किंवा जमिनीवरती असलेले सर्व अधिभार, बोजा विरहित करून जमिनीची लिलावाद्वारे विक्री करणे
अभिप्रेत आहे.
लिलावाद्वारे विक्री करताना ,कुळाचा हक्क खरं तर नष्ट करता येणार नाही किंवा अशा जमिनीची लिलावाद्वारे विक्री करणे अभिप्रेत नव्हते. आपण लिलावाच्या ज्या काही अटी व शर्ती होत्या त्याचे वाचन करणे आवश्यक होते. तसेच त्या जमिनीचा सातबारा पाहणेही आवश्यक होते. जेणेकरून त्या मिळकतीमध्ये कुळ आहे याचा बोध आपल्याला झाला असता. कुळाचे नाव जर ०१.०४.१९५७ पूर्वी लागलेले असेल तर असा कूळ या जमिनीचा मानव खरीददार झालेला आहे.
तसेच लिलाव करतेवेळी या मिळकतीमध्ये कोणतेही कूळ हक्क नव्हते मात्र लिलावाद्वारे खरेदी केल्यानंतर व सातबारा सदरी आपले नाव लागल्यानंतर जर या मिळकतीमध्ये कूळ हक्क निर्माण झाले असतील तरीसुद्धा या जमिनीची विक्री किंमत कुळाचे नावे निश्चित होऊ शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.10 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3021
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
श्री.पी.एम. गड्डम 10
राजेश जे वझीरे 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3