जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vishal Eknath khairnar
Tuesday, June 28, 2022
vkhairnar9284@gmail.com
मी धुळे येथे एक प्लॉट विकत घेतलेला आहे सदर प्लॉटवर खरेदीने नाव लावायचे आहे त्याकामी नगर भूमापन अधिकारी, धुळे कार्यालयाने अर्ज व अफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) ची मागणी केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे कि मी नाशिक येथे राहण्यास आहे तर नाशिक तहसील कार्यालय येथे केलेले अफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) दिले तर चालेल का? का धुळे तहसील कार्यालय येथे केलेलेच अफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) दयावे लागेल कृपया याबाबत माहिती दयावी याबाबत काही नियम असल्यास त्याबाबत हि माहिती दयावी
धुळे तहसील कार्यालय येथे केलेलेच अफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) दयावे लागेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by बालाजी सोळणर
Monday, June 27, 2022
pappuss4288@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांच्या नावे वर्ग 2 ची 2 हेक्टर जमीन आहे , त्याचा ७/१२ आणि 8 अ आहे , परंतु सदरील सर्व्ह नंबरची अद्याप मोजणी झालेली नाही त्यामुळे त्या सर्व नंबर मधील अन्य 15 शेतकरी त्यांच्या 7/12 वरील नमूद क्षेत्रा पेक्षा जास्त क्षेत्रावर कब्जा केलेलं आहे आणि आमची जमीन कोणता ठिकाणी आहे हे आम्हाला माहिती नाही वडील निरक्षर आहेत आणि मी आता मा. तहसील दार यांचाकडे जमीन मोजणी साठी अर्ज केला होता आणि मा . तहसील दार यांनी भूमी अभिलेख यांना मोजणी करून रीतसर अहवाल सादर करावा असे पत्र पाठविले आहे तरीपण भूमी अभिलेख अधीक्षक म्हणत आहेत की ही शासकीय जमीन असल्यामुळे आम्हाला मोजता येणार नाही आणि ते म्हणत आहेत की सदरील सर्वे नंबर मधील सर्व शेतकऱ्यांची संमती असेल तरच जमीन मोजणीसाठी जिल्हा अधिकारी यांना अर्ज कर आणि सदरील सर्वे नंबर मधील शेतकरी जमीन मोजणी साठी संमती देत नाहीत तर आम्हाला आमच्या हिसस्याची जमीन कशी भेटेल सर plz plz मार्गदर्शन करा सर ही नम्र विनंती
आपण माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगणे उचित
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
Sunday, June 26, 2022
kdgedam721@gmail.com
सर, माझे वडील आदिवासी आहे, त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही बहीण, भाऊ वारस 7/12 वरती आहे तर बहिणीचे हक्कसोड पत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते काय? याबाबत मार्गदर्शन करावे.
होय, हक्कसोड पत्र करणे म्हणजे स्वतःच्या हक्काचे दुसऱ्याच्या लाभात हस्तांतरण करणे होय. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by NIlesh Laxman Kardile
Saturday, June 25, 2022
kardilenilesh19@gmail.com
माझे शेतजमिनीलगत महाराष्ट्र सरकार अंतर्गत कृषी विभागाची जमिन आहे. सदर जमिन डोंगराळ स्वरुपाची असुन ती गेल्या 50 वर्षापासुन पडीक आहे व त्यामध्ये एकही झाड नसुन ओसाड माळराण जमिन आहे. सदर जमिन मला शासनाकडुन 99 वर्षाच्या भाडेतत्वातवर मिळेल काय, जेणेकरुन शासनालाही महसुल मिळेल व मलाही फायदा होईल. याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे.
आपण संबंधित कृषी अधिकाऱ्यास भेटून आपला प्रस्ताव त्यांना द्यावा. ते योग्य तो निर्णय घेतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by shreeniwas vinayak lele
Thursday, June 23, 2022
lele.shreeniwas@gmail.com
whether fees for certified copy of document of map or inspection of document or map as per section 327 of maharashtra land revenue code can be made by money order or postal order or neft , as i am resident of pune and can not afford to visit frequently to panvel dist raigad to upadhikshak bhumi abhilek office at panvel ?
I think such provision is not yet available at least for fees of certified copy. You can still enquire on phone with the concern office.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by ram
Tuesday, June 21, 2022
rkbhole@gmail.com
agreement register by 4 partners,2 original farmer and 2 ancestor partner,but still land is not on our name due to farmer certificate,as per my knowledge if among 4 one is farmer then all the three can joined him and farm the land.
pl help me out from this situation or guide me.thx.
आपल्या प्रश्नावरून चार खरीदार पैकी नक्की किती शेतकरी आहेत याचा बोध होत नाही. या चारी लोक शेतकरी असणे आवश्यक आहे आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AMIT ASHOK LULE
Tuesday, June 21, 2022
amitlule88@gmail.com
BMC MUMBAI च्या डीपी रिमार्क मध्ये एक जागा रुग्णालयाकरिता आरक्षित असल्याने त्या जागेचा आगाऊ ताबा जिल्हाधिकारी यांनी बीएमसी यांना द्यावयाचा आहे. सदर ताबा देण्यापूर्वी जमिनीचे भोगवटा मूल्य आकारताना किती आकारावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
याबाबत शासनाने एक परिपत्रक पारित केले आहे आपण संबंधित विभागास विचारणा केल्यास ते आपणास निश्चित किंमत सांगू शकतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Vinod Shankarrao Warkad
Monday, June 20, 2022
vinodwarkad99@gmail.com
न्यायलयीन प्रकरण प्रंलबीत असल्याने मंडळ अधिकारी यांना तात्पुरते निवृत्ती वेतन प्रदान करण्यात आले परंतू दरम्यान कोरोना कालावधीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला त्यामुळे न्यायालयाने प्रकरणात आरोपी म्हणून वगळलेले आहे. त्यामुळे त्यांचे कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजूरी घ्यावी लागेल किंवा कसे?
Question by संजय पिराप्पा कोळी
Friday, June 17, 2022
sanjaypkoli1996@gmail.com
गायरान जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने 11 महिने करार करून दिलेली आहे.हे जमीन देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस आहे का?सदरची जमीन 11 महिने करारावर दिलेली जमीनिवरील कबजेदार यांना कोणत्या कायद्या अन्वेय काढावी व याबाबत कोणाकडे अर्ज करावी.
गायरान किंवा गुरूचरन जमीन ही शासनाच्या मालकीची असते. ती केवळ गावातील गुरांना चरण्यासाठी ग्रामपंचायतीला दिलेली असते. मात्र ती जमीन ग्रामपंचायतीकडे निहित होत नाही. (vest)
आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे याबाबत तक्रार करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul
Monday, June 13, 2022
jadhav.rahul111@yahoo.com
माझ्या चुलत काकांची व आमची जमीन एकाच गटात आहे. सन 2004 साली माझ्या चुलत आजोबांचे निधन झाले त्यानंतर काकाने केवळ स्वतःच्याच नावाची वारस नोंद केली यावर त्याच्या 4 सावत्र बहिणींनी हरकत घेतली व प्रांतांकडे अपील केले. प्रांतांनी असा निकाल दिला की बहिणींचीपण वारसांमधे नोंद करावी या आदेशाविरोधात त्याने अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील केले ते फेटाळले गेले व प्रांतांचा आदेश कायम ठेवला, त्याने यावरही नाराज होउन अपर आयुक्तांकडे अपील केले त्यांनीही अपील फेटाळून आदेश कायम ठेवला. यावर त्याने महसुल मंत्रलायाकडे फेरतपासणी करीता अपील केले आहे व त्यासोबतच मा. आयुक्तांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळावी असा अर्ज केला. या अर्जावर मा. महसुल मंत्री यांचा स्थिगीती आदेश (स्टे ऑर्डर) झाला आहे. सदर आदेश वरिल केस मधे देण्यात आला आहे.
माझ्या काकाने आम्हाला नोटीस पाठवली व आपल्या गटाच्या वहिवाटीवर महसुल मंत्र्यांनी स्टे दिला असून कुणीही जमीन वहिवाटायची नाही असे त्यामधे नमुद केल परंतू आम्हाला स्टे ऑर्डर ची प्रत दिली नाही. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीसारखी आमची आमच्या क्षेत्रात वहिवाट चालू ठेवली. तर काकाने पोलिसात आमचे विरुध्द तक्रार केली की, महसुल मंत्र्यांचा स्टे असताना वहिवाट करतात. पोलीसांनी आम्हाला बोलावले व तक्रार अर्ज व सोबतची स्टे ऑर्डर दाखवली. ती वाचल्यावर आमच्या लक्षात आले की, त्याच्या वारसाहक्काच्या बाबतीत चाललेल्या अपीलाच्या संदर्भातील ती स्टे ऑर्डर असून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही तसा जबाब लिहून दिला.
माझा प्रश्न असा आहे की, पोलीसांची दिशाभूल करुन खोटी तक्रार केली असेल तर त्याविरोधात गुन्हा दाखल करता येईल का ? तसेच मा. महसुल मंत्र्यांच्या आदेशाचा आम्हाला त्रास देण्यासाठी जाणिवपुर्वक गैरवापर केला गेला असेल त्याची तक्रार करता करता येईल का ? आणि ती कोणाकडे करावी.
भारतीय दंड संहितेच्या कलम 182 अन्वये, लोकसेवकला खोटी माहिती देणे व त्याप्रमाणे लोकसेवकला खोट्या माहितीच्या आधारे त्याच्या अधिकाराचा वापर करण्यास लावून त्रयस्थ व्यक्तीला नुकसान पोहोचवणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी सहा महिने कारावासाची शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raghoji atmaram Shinde
Friday, June 10, 2022
raghoji464@gmail.com
A चे वारस
अ आणि ब
त्यांची वारस नोंद झालेली आहे.
पण मालमत्ता पत्रकावर फक्त अ
चे नाव नोंदवले आहे. हे दोघे अडाणी होते. त्यांना ह्याबद्दल काहीच माहीत नाही . त्यानंतर अ आणि ब वारले . त्यांच्या मृत्यू होऊन अंदाजे ३० वर्ष झाले. मालमत्ता पत्रकावर अ चे नाव अजून धारणधिकार अ म्हणुन आहे. तर आता ब च्या वारसांनी मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठी काय करावे कृपया महिती द्यावी.
अ व ब याच्या दोन्ही वारसांना मिळून एकत्रित शपथपत्र द्वारे,A चे सर्व वारसदार असल्याबाबत कथन करावे. व शपथ पत्र व अर्ज नगर भूमापन अधिकारी यांना द्यावा. जर वारस अशाप्रकारे शपथपत्र करण्यास तयार नसतील तर Bombay Regulation अंतर्गत दिवाणी न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र द्यावे व नगर भूमापन अधिकारी यांना सादर करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Priya
Wednesday, June 08, 2022
mailme.priya_pawar@rediffmail.com
सर, माझ्या काकांनी 25 वर्षापूर्वी 2 गुंठे जागा त्यांच्या मित्राकडून खरेदी केली त्याची दुय्यम निबंधक यांच्या कार्यालात नोंद केली आहे त्याचा दस्त आमच्याकडे आहे, परंतू त्याची नोंद तलाठी कार्यालयात करणे राहून गेले. दरम्यान माझ्या काकांचे मित्र वारले व त्यांच्या वारसांचे नाव जमीनीला लागले. गेल्या वर्षी माझे काकांचेही निधन झाले. त्यांचे निधनानंतर माझी काकू व चुलत भाउ वारस आहेत त्यांनी इतर जमीनीची व घराची वारसनोंद केली. परंतू वर उल्लेख केलेल्या 2 गुंठे जागेची नोंद करायला गेले असता काकांच्या मित्राच्या वारसांनी हरकत घेतली आहे की, आमच्या वडीलांनी जागा विकलेली नाही व सदर दस्त खोटा आहे व खोट्या सह्या करुन दस्त नोंदणी केली आहे.
तलाठ्याकडे नोंद करणेसाठी काय करावे
सदर व्यवहारांमध्ये तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याचा भंग होतोय होत आहे. दुसरे म्हणजे आपण ज्या फेरफार अन्वय मयत व्यक्तीच्या वारसांची नावे अभिलेखात दाखल झाली आहेत त्या फेरफार विरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Eknath khairnar
Tuesday, June 07, 2022
vkhairnar9284@gmail.com
कोर्टाने दिलेले आदेश, महसूल अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक आहे का? आवश्यकता असल्यास त्याबाबतच्या नियम / परिपत्रक /शासन निर्णयाची माहिती देण्यात यावी तसेच आवश्यकता नसल्यास त्याबाबतच्या नियम / परिपत्रक / शासन निर्णयाची माहिती देण्यात यावी
भारतीय नोंदणी कायद्याच्या कलम 17 अन्वये, ज्या दस्तांची नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे त्याचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार आपल्या समोर असलेला दस्त नोंदवणे बंधनकारक आहे का हे तपासून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by gajnana subhashrao chavan
Tuesday, June 07, 2022
gajananchavan373@gmail.com
Namskar sir majhy आजोबा ची जमीन होती आणि ती ektrikaran मधे त्यांचं नाव वगळण्यात आले but nantr tyni apil krun चुकीची दुरुस्ती या योजने मार्फत tyni आपली नावावर फेरफार करून घेतला आणि 100 बांड पेपर वर समती पत्रक घेतल आणि ताबा करून घेतला आणि आज ty goshti la 20 vrsh hot ahe tr je ty gatamdhe सामाईक हिस्सेदार आहेत tyni अपील केली की माझे आजोबाची नावाने जमीन च न्हिय आणि अमी असच करून घतली म्हणून टीनी sdo la apil keli ani tyncha vilamb maff kel but jy sarve number ch ektrikaran jhal tyt majhy आजोबाची जमीन आहे आणि त्यातील काही हिसादर नी आम्हला विकली आम्ही घेतली आणि त्याचं 100च stamp paper vr ahe with notari tr tynchy vilamb maf houne ani ferfar tyna radd krata yeil ka yavr konakde dada मागावी आणि यांबद्दल कागदत्रांची पुरवणी कोणी करत nhi amchy kde nhiy mante तहसील कार्यालय भूमी अभलेख mdhe pn tr yavr ksa marg kadhav margdarshan kra sir please
नोटरी समोर केलेल्या कोणत्याही खरेदी विक्री दस्ताला पुरावा म्हणून महत्त्व नाही
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
Sunday, June 05, 2022
kdgedam721@gmail.com
प्रलंबित फेरफार, मंडळअधिकारी यांना किती दिवसात प्रमाणित करण्याचे अधिकार असतो.
तक्रार नसेल तर 25 दिवसात फेरफार नोंद प्रमाणित करता येईल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Manoj
Friday, June 03, 2022
dhamanoj20@gmail.com
नमस्कार मी जालना जिल्ह्यातील असून मला सन 2020 चा फेरफार हवा आहे परंतु ऑनलाइन वर जालना जिल्हा दिसत नाही तरी मला माहिती अधिकारात फेरफार ची नक्कल मिळू शकेल का त्यासाठी कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज दाखल करावा लागेल कृपया माहिती द्या तसेच हे प्रकरण वादग्रस्त असून तलाठी याच्यात फेरफार देत नाही कृपया मार्गदर्शन करावे
संबंधित फेरफार हा जुना असल्यामुळे तलाठी यांच्याकडे नव्हे तर तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात उपलब्ध असेल. आपण संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण पाटभाजे
Monday, May 30, 2022
pravinpatbhaje12@gmail.com
माझ्या शेताची मोजणी 2018 ला झाली असून आंबा झाड मोजणी नुसार माझे हद्दीत आहे व नंतर दोन मीटरवर बांध आहे परंतु माझे अनुपस्थितीत संबंधित शेजारी शेतकर्याने आंब्याच्या झाडा पासुन 3 फुट खोल ल नाली काढली व झाडाच्या मुळे तोडुन टाकली याच झाडाखालुन माझ्या शेतात येण्यासाठी स्थायी पायवाट आहे याबाबत कोणाकडे दाद मागावी
Question by Sweta sameer nikam
Sunday, May 29, 2022
swetamukadam@gmail.com
महोदय..*
मी वरील अर्ज dharchi मुलगी, माझे वडील माहित मसणापू कदम मुंबईतील येथे नोकरीसाठी व छोटा व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथे राहण्यास असताना ते सन 1995 व सन 1993 साली मौजे फगरे वाडी. मढुर पोस्ट सोनार. येथील गट नंबर .६०१/ब . क्षेत्र 70.8 आकार रू.8.44 पैसे ची जमीन खरेदी केलेले आहे सदर जमीन करार पत्राने आम्हास येथील . वसंत रामचंद्र राणे. दिनकर भुजंगा राणे. (सध्या मयत)याचे कडून खरेदी केलेली आहे . सदर जमिन त्यावेळी जमीन वर्ग दोन असल्याकारणाने खरेदी पूर्व करार पत्र आम्ही केले होते जमिनीचे वर्ग 2 चे वर्ग 1 झाल्यानंतर मूळ मालकाने आम्हास खरेदी पूर्ण करून देण्याचे ठरलेले होते. सदर ठरले कराराप्रमाणे आम्ही यांना सर्व पैसे दिलेले आहेत. यातील काही हिस्सेदार यांनी आम्हास त्यांच्या हिष्याचे खरेदीपत्र पूर्ण करून दिले आहे . परंतु काही व्यक्तींनी दिलेले नाही त्यापैकी. अशोक दिनकर राणे .एकनाथ दिनकर राणे. नामदेव दिनकर राने. पांडुरंग शंकर राणे .शिवाजी दिनकर राणे. वसंतराव रामचंद्र राणे. निर्मला पांडुरंग राणे . लक्ष्मीबाई दत्तू राणे. इत्यादी लोक आम्हास खरेदिपत्र करून देणार यांचे मयत वारस आहेत सदर व्यक्ती यांनी करार पत्रात केलेल्या अटींची व शर्तींचे पालन केलेले नाही तसेच सध्या जमीन वर्ग १ झाल्यानंतर त्यांच्या नावावर झाल्यानंतर ते आम्हास खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास आज काल वेळोवेळी टाळाटाळ करत आलेले आहेत सदर जमिनीची परवानगी आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने काढलेले आहेत परवानगी निघाल्यानंतर आम्ही त्यांना खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास वेळोवेळी बोलवत आहे तरी ही लोक जाणून-बुजून आमची फसवणूक करून सध्या जमिनीत आमचे गेली ३० वर्ष असलेले कब्जा वहिवाटीत हरकत अडथळा करून जमिनीत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे व आम्हास जमिनीत आला तर तुम्हाला जिवंत मारिन असे बोलून.sir please provide which law can be apply to make sale deed registered.
Sweta sameer nikam
आपले प्रश्नावरून मिळतही कोकणातली असावी असे प्रथमदर्शनी दिसून येते. असोत. मिळकती संदर्भात जो करार करण्यात आलेला होता त्यावर योग्य मुद्रांक शुल्क जर भरलेले असेल तर तो आपणास पुरावा म्हणून वापरता येईल कोणत्या आधारे ज्या गावांमध्ये आपली जमीन आहे त्या गावाच्या तालुक्याचे ठिकाणी असलेल्या दिवाणी न्यायालयामध्ये, संबंधित व्यक्तींनी खरेदी पूर्व कराराच्या अनुषंगाने, जमिनीची विक्री आपल्याला भात करून देण्याबाबत निर्देशीत करणे बाबत न्यायालयाने हुकूम द्यावा असा दावा दाखल करा.
दिवाणी दावा ही ही वेळखाऊ प्रक्रिया आहे याशिवाय आपले कष्ट व पैसेही त्यामध्ये खर्च होणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून दावा दाखल करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा.
प्रकरणांमध्ये गुणवत्ता आहे व न्यायालयाकडून आपल्या लाभा मध्ये निर्णय होण्याची शक्यताही आहे.
You can file a suit under the Specific Relief Act in the Civil Court. However following prerequisites needs to be e complied.
The agreement to sale should have been executed or registered or are properly stamped.
the payment of money should have been by way of cheque or some other evidence.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण नमूद केलेले करारपत्र जर नोंदणीकृत नसेल तर त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही तथापि आपण याबाबत दिवाणी न्यायालयात दाद मागणे उचित राहील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Anil Kotwal
Sunday, May 29, 2022
sandipkotwal7474@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की माझ्या पंजोबा ना एक भाऊ होता . माझ्या पंजोबा यांनी कूळ कायद्या मध्ये 1957 सालि कसत असलेली 30 एकर शेजमीन ठरलेल्या रकमे प्रमाणे पैसे सरकारी कार्यालयात भरून 32ग certificate प्राप्त केलं सदर certificate 1970 सली प्राप्त केलं आहे . सर्व पैसे पजोबा यांनी व काही पैसे आजोबा यांनी भरले .. 32ग certificate वरती कुठेही एकत्र कुटुंब मॅनेजर असा कुठेही उल्लेख नाही .. पूर्णपने पंजोबा यांनी खरेदी घेतली असा उलेक आहे .तर आता 2022 आली पंजोबा यांच्या भावाचे वारस एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद का नाही झाली व नोंद करून द्यावी व अर्ध्या शेत जमिनी साठी कोर्ट केस करणार आहेत तर आम्ही काय केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे.
त्यांनी केलेल्या अर्जावर सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील आपणास सदर प्रकरणी नोटीस प्राप्त झाल्यास आपण आपले म्हणणे सक्षम अधिकार्याकडे सादर करावे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Anil Kotwal
Sunday, May 29, 2022
sandipkotwal7474@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की माझ्या पंजोबा ना एक भाऊ होता . माझ्या पंजोबा यांनी कूळ कायद्या मध्ये 1957 सालि कसत असलेली 30 एकर शेजमीन ठरलेल्या रकमे प्रमाणे पैसे सरकारी कार्यालयात भरून 32ग certificate प्राप्त केलं सदर certificate 1970 सली प्राप्त केलं आहे . सर्व पैसे पजोबा यांनी व काही पैसे आजोबा यांनी भरले .. 32ग certificate वरती कुठेही एकत्र कुटुंब मॅनेजर असा कुठेही उल्लेख नाही .. पूर्णपने पंजोबा यांनी खरेदी घेतली असा उलेक आहे .तर आता 2022 आली पंजोबा यांच्या भावाचे वारस एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद का नाही झाली व नोंद करून द्यावी व अर्ध्या शेत जमिनी साठी कोर्ट केस करणार आहेत तर आम्ही काय केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे.
त्यांनी केलेल्या अर्जावर सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील आपणास सदर प्रकरणी नोटीस प्राप्त झाल्यास आपण आपले म्हणणे सक्षम अधिकार्याकडे सादर करावे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3021 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
राजेश जे वझीरे | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
अजित नथू शेलार | 3 |