जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Ashok
Sunday, September 04, 2022
sanvid2515@gmail.com
नमस्कार सर,
माझे खापरपणजोबा वारल्यानंतर मोठा मुलगा ए.कु.क म्हणून माझ्या चुलत पणजोबा बाबू यांच्या नावे सर्व जमिन आली. 1950 साली बाबू यांनी सदर जमिन इतर 3 भावंड सुखदेव, गुलाब , भागचंद समवेत वाटून घेतली. वाटपपत्रानुसार माझे पणजोबा सुखदेव व बाबू यांच्या नावे 52 आर चा एक पोटहिस्सा अनुक्रमे 26-26 आर प्रमाणे दर्शवला होता तसेच वाटपाच्या फेरफारवर सदर वाटण्यामुळे तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो वाटण्या मंजूर करता येत नाही असा शेरा आहे. माझे पणजोबा सुखदेव 1955 साली वारल्यांनतर वारसहक्काने माझे आजोबा संपत यांचे समवेत अ.पा.क म्हणून आईचे नाव लागले. 1965 सालापर्यंत सदर पोटहिस्सा संपत व बाबू यांचे नावे 26-26 आर प्रमाणे होता. 1965 नंतर सदर पोटहिस्सा वहिवाटीनुसार संपूर्न 52 आर माझे आजोबा संपत यांच्या नावे दर्शवला आहे. स्कीम उतारानुसार सदर पोटहिस्सा एकत्रिकरना अगोदर व नंतर पूर्ण 52आर संपत यांचे नावे दर्शवतात. 1984 साली आजोबा संपत यांनी त्यांच्या 4 मुलांची नावे आणेवारी लावून वडीलोपार्जीत मिळकतीत समाविष्ट केली. आता सदर पोटहिस्सा 52आर संपत यांच्या मालकीच्या गटाचा 5 एकर 10 आर क्षेत्राचा हिस्सा आहे, यापैकी माझे आजोबा संपत व त्यांच्या एका अपत्याने त्यांचा हिस्सा 2009 साली विकला. 2018 साली माझे आजोबा संपत वारल्यानंतर बाबू यांचे वारस मुले, नातू, पणतू यांनी सदर पोटहिस्सा 52आर क्षेत्रापैकी 26 गुंठ्यांची मागणी केली व दांडगाईने सदर क्षेत्र 52आर कसण्यास संपत यांच्या इतर वारसांना अडथळा करत आहेत. भविष्यकाळात संपत याच्या इतर वारसांच्या ताब्यास अडथळा संभवतो काय? किंवा बाबू यांच्या वारसांच्या विरोधात काय उचित कारवाई करता येईल? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
केवळ तोंडी वाटप व प्रत्यक्षात ( by metes and bounds ) वाटप न झाल्याने हा गोंधळ झाला आहे . वर्षानु वर्षे ७/१२ वरील क्षेत्र व वहिवाट या मध्ये विसंगती आल्याने , या चुका झाल्या आहेत . आर्थिक क्षमता व इच्छा असल्यास , आपण दिवाणी न्यायालयात हिस्शे निश्चतीकरन करण्यासाठी दिवाणी साहिन्ता अधिनियम कलम ५४ अन्वये दावा दाखल करावा .
दिवाणी न्यायालय यांनी हिस्शे निच्चीत केले नंतर , मा जिल्हाधिकारी यांचे मार्फत मिळकतीचे सरस निरस वाटप होईल व त्याप्रमाणे जमिनीचा ताबा सह हिस्सेदार यांना मिळेल . या मध्ये तुक्देबंदी या मुले जे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्याचेही निराकरण होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
Friday, September 02, 2022
vishalrajeshinde143@gmail.com
*साल 1971-72 या वर्षी एकत्रीकरण योजना गावात राबवण्यात आली आहे, एकत्रीकरण योजने मध्ये सर्व्हे चे गट नंबरचे क्षेत्र कमी झाले आहे.
*चालू स्थिती 7/12
सर्व्हे नं 118/1 यांस गट नंबर 503 यांस क्षेत्र 3 हेक्टर 55 आर तर
सर्व्हे नं 118/2 यांस गट नंबर 502 यांस क्षेत्र 1 हेक्टर 02 आर
असे नोंद आहे.
*सदर एकत्रीकरणी योजनेची कागदपत्र काढली असता असे लक्षात येते की, एकत्रीकरण पत्रक 9(3) व 9(4) यांस
सर्व्हे नंबर 118/1 यांस 3 हेक्टर 55 आर व
सर्व्हे नंबर 118/2 यांस 1 हेक्टर 02 आर नोंद दाखवण्यात आली आहे,
*मुळात पूर्वीचे सर्व्हे नंबर चे 7/12 पाहिले असता त्यावर
सर्व्हे नंबर 118/1 यांस क्षेत्र हे 3 हेक्टर 77 आर व
सर्व्हे नंबर 118/2 यांस 0 हेक्टर 80 आर असे नोंद आहे.
*योजनेत एकत्रीकरण पूर्वीची नोंद च कमी दाखवली आहे, 22 आर क्षेत्र हे सर्व्हे 118/1 मध्ये कमी दाखवले आहे तर सर्व्हे 118/2 मध्ये जास्त .
*एकत्रीकरण पत्रक मध्ये कमी जास्त शेरा नोंद नाही.
Question
1)एकत्रीकरण योजनेची चूक दुरुस्ती होईल का?
2)वेळ चे बंधन चुकदुरुस्ती साठी आहे का? सध्या परिस्थितीत 50 वर्षी उलटले आहेत?
3)दुरुस्ती कुठे होईल?
सल्ला मिळावा
संपूर्ण एकत्रीकरण योजना हि चुकीची असेल तरच ती दुरुस्त करण्याचे /पूर्णता रद्द करण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त यांना आहेत . केवळ जमिनीच्या एका parcel बाबत दुरुस्त करण्याचे कायद्यात तरतूद नाही . तद्वतच अशी चूक दुरुस्त करता येणार नाही .
एकत्रीकरण योज्नेन्बाबत , महसूल अधिकारी ( तहसीलदार , प्रांताधिकारी ) यांना कोणतेही अधिकार नाहीत .
आपणास या बाबत आर्थिक क्षमता , धैर्य व इच्छा असल्यास , रीट याचिका दाखल करावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
Friday, September 02, 2022
vishalrajeshinde143@gmail.com
*शिवरस्त्याला सर्व्हे नंबर 118/ब हा लागून असून सर्व्हे नंबर 118/ब च्या उत्तरेस 118/अ लागून आहे.
( 118/अ
118/ब
शिवरस्ता ).
*शिवरस्ता वरून सर्व्हे नं 118/अ मध्ये जाण्यास सर्व्हे नं 118/ब मधून जावे लागते, दुसरी सोय नाही, सदर चे मालक जाण्या येण्यास अडचण देत आहे.
*( 118/अ मूळ मालक यांचाकडून विक्री होऊन पोटहिस्सा 118/ब पडला आहे )
सदर सर्व्हे नं 118/अ मध्ये जाण्यास सरबांधावरून किंवा गाडीरस्ता मार्ग यांची नोंद कोणत्या कागदपत्रात मिळेल???
व तशी सदर नोंद नसेल तर काय करावे लागेल??
सर्वे नंबर ११८/ब हा सर्वे नंबर ११८ च्या काही क्षेत्राची विक्री झाल्यामुळे तयार झाला आहे त्यामुळे नवीन सर्वे नंबरला परंपरागत वहिवाटीचा रस्ता असण्याचा प्रश्न उद्भवत नाही . त्यामुळे माम्लेतदार अधिनिअयम १९०५ अंतर्गत कोणतही न्याय मिळण्याचा मार्ग नाही .
मात्र आपण महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अंतर्गत बांधावरून जाण्यासाठी मार्ग मिळवा याकरिता तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
Friday, September 02, 2022
vishalrajeshinde143@gmail.com
मा. तहसीलदार साहेबांनी 143 अंतर्गत रस्ता दिला तर त्याचा फेरफार नोंदीला जातो का? व 712 वर नोंद काय म्हणून होती?(इतर अधिकारात किंवा रस्त्याचा अधिकार)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 148 अन्वये प्रत्येक गावांमध्ये अधिकार अभिलेख ठेवण्याबाबत तरतूद आहे.
आहे या तरतुदीनुसार भोगवटादार, मालक, ज्याच्याकडे जमीन गहाण ठेवली आहे अशी व्यक्ती, कुळ कायदा अंतर्गत असलेली कुळे, सरकारी जमिनीच्या बाबतीतील भाडेपट्टी धारक
कुळ व सरकारी भाडेपट्टा धारक यांनी जमीन मालकाला द्यावयाचा खंड किंवा भाड्याची रक्कम
कूळ व मालक यांच्यातील परस्पर हितसंबंध
शासन व सरकारी भाडेपट्टा धारक यांच्यातील परस्परांच्या अटी व शर्ती
या बाबींचा तपशील अधिकार अभिलेख आम मध्ये नमूद करण्याची तरतूद आहे.
राज्य शासन कलम 148 च्या उपकलम इ अन्वय, नियमाद्वारे काही बाबींचा अधिकार अभिलेखा मध्ये उल्लेख करावयाची आहे, याबाबत तरतूद करू शकते.
राज्य शासनाने उपकलम इ द्वारे अद्यापही रस्त्याची नोंद ठेवण्याबाबत नियम तयार केले आहेत अशी बाब वाचनात नाही.
एकूणच कलम 148 व अधिकार अभिलेख तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 यांचा विचार करता, तहसीलदार यांनी कलम 143 अन्वये दिलेल्या रस्त्याची नोंद अधिकार अभिलेख सदरील म्हणजे फेरफार अथवा सातबारा द्वारे ठेवण्याची तरतूद नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
Friday, September 02, 2022
vishalrajeshinde143@gmail.com
1980 वर्षी गट नंबर 111 यास क्षेत्र 1 हेक्टर होते,
पुनर्वसन अंतर्गत 111अ यांस क्षेत्र 0.80आर (खातेदार मुळमालक) तर
111ब यांस क्षेत्र 0.20 आर ( जिल्हाधिकारी )
असे दोन 712 पत्रक तयार झाले.
पण आज तागायत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांचाच नावे आहे
सदर क्षेत्र पुनर्वसनाचा अंतर्गत कोणाचे ही पुनर्वसन नवीन खातेदार कडे वर्ग झाले नाही.
तर हे क्षेत्र मुळमालकास परत मिळवता येईल का? योग्य सल्ला मिळावा.
पुनर्वसनासाठी राखीव असलेली जमीन , भू संपादन कायदा १८९४ च्या कायद्याखाली संपादन झालेली आहे . जुन्या भू संपादन कायद्यात , जमिन जर ज्या कारणाकरिता /वापराकरिता भू संपादन झाली होती त्यासाठी झाला नसेल तर , ती परत मुल मालकास करण्याची तरतूद नाही . मात्र अन्य सार्वजनिक वापरासाठी अश्या विना वापर पडून राहिलेल्या जमिनीची अंश्याक्ता नसल्यास , त्याचा लिलाव करण्याची तरतूद आहे . मुल मालक लिलावात सहभागी होऊन , जमीन उच्च बोली लाऊन खरेदी करू शकतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रेयस रा. जोशी
Friday, September 02, 2022
shreyasrjoshi26@gmail.com
अ शेतकरी आहे त्यांच्या नावे २२ गुंठे शेतजमीन आहे यामधील २ गुंठे जमीन ब यांना रजिस्टर बक्षीसपत्राद्वारे द्यायची आहे तर सदर बक्षीसपत्र रजिस्टर होईल का ? सातबारा मध्ये ब यांचे नाव दाखल होऊन त्याच्या समोर त्याचे २ गुंठे क्षेत्र असा उल्लेख येईल का? किंवा त्या संदर्भात माहिती मिळावी हि विनंती.
शिल्लक राहणारे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र राहत असल्याने , अश्या जमिनीचे हस्तांतरण (महाराष्ट्र तुक्देबंदी व तुकडे जोड कायदा च्या तरतुदी विरुद्ध असल्याने ) होऊ शकत नाही . पर्यायाने अश्या हस्तांतरण दस्ताचे /बक्षीस पत्राचे नोंदणीकरण होणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रताप शामराव चौगुले
Thursday, September 01, 2022
pratapchougule@gmail.com
मा.सर वडिलांना रजिस्टर मृत्यू पत्र केलेले आहे पण ते मृत्यूपत्र हे तलाठ्यांना नोंदणीसाठी दिले होते परंतु त्यावर भाऊ आई यांनी हरकत घेतली त्यावर मंडलाधिकारी तक्रार केली परंतु निकाला आमच्या बाजूने लागला त्यावरआईने प्रांताकडे अपिल केली तिथं ही आमच्या बाजूने निकाल दिला आहे आता आईने जिल्ह्याअधिकार कडे अपिल केले आहे. माझ प्रश्न असा आहे की रजिस्टर केलेले जमीन चे कागदावर महसूल कोर्टाला दावा चालवण्याचा अधिकार आहे काय?
तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे . मात्र
मंडळ अधिकारी यांचेकडे , नोंदणीकृत मृत्य पत्राबाबत /मृत्य पत्राचे वैधतेबाबत हरकत घेतली असेल , मंडळ अधिकारी मृत्य पत्र probate करण्यास सांगू शक्तात्त . मात्र मुंबई सोडून अन्य ठिकाणी केलेल्या मृत्य पत्रास , probate ची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SACHIN BOKAD
Thursday, September 01, 2022
s.bokad007@gmail.com
सर माझ्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे काकांना मुलबाळ नाही व पत्नी पण हयात नाही, काकांची एक बहीण आहे म्हणजे माझी आत्या हयात आहे ,माझ्या वडिलांचे पण पूर्वी निधन झाले आहे . माझ्या वडील व काकांना वारसा हक्काने जमीन व घर वाट्याला आले आहे ,शेतजमिनीत आत्याचे नाव नाही , फक्त घरावर आत्याचे नाव लागले आहे .वारस म्हणून माझे काकांच्या मालमत्तेवर नाव लागेल का ? आत्याचा पण जमिनीवर हक्क दाखवेल का , वारस नोंद करताना कोणाची नोंद होईल?
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 88 अन्वये, हिंदू पुरुष मयत झाल्यावर त्याची मिळकत वारसाहक्काने अनुसूचीमध्ये नमूद
वर्ग-1 च्या नातेवाईकांना जाते
वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना जाते
वर्ग दोन च्या नातेवाईकांमध्ये, बहिण व भाऊ यांचा समावेश आहे.
त्यामुळे जसा आपल्या वडिलांचे नाव शेती मिळकती सह घराला लागले, तसेच आत्याची ही नाव शेती मिळकतीला लागणे आवश्यक आहे तद्वतच तिचा शेती मिळकतीमध्ये हिंदू वारसा कायदा कलम 8 व कलम 9 प्रमाणे तिचा हक्क आहे. आत्याचा हक्क डावलून जरी मिळकतीची विक्री केली, तरी भविष्यात आत्या ने जर न्यायालयात दावा दाखल केला, तर त्या मिळकतीच्या विक्री पासून प्राप्त होणारी रक्कम व्याजासह आपणाला आत्याला द्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रणव देशमुख
Wednesday, August 31, 2022
pdesh08@gmail.com
मी "अ" या व्यक्ती कडून मालमत्ता खरेदी करून घ्यायचा आहे. प्रॉपर्टी कार्ड हे "अ" नावे 1994 ला झाले आहे. "अ"ला 4 बहिणी आहेत पण त्यांचे नाव प्रॉपर्टी कार्ड मध्ये नाही.1987 त्यांचे हक्कसोड घेतले होते पण ते नोंदणकृत नाहीत.फेरफार मध्ये "अ" चा उलेख उत्तराधिकारी म्हणून केला आहे. मला भेटलेल्या माहिती नुसार त्या बहिणी काही कायदेशीर कारवाही करू शकतात.
प्रश्न असा आहे की
१)"अ" कडून मालमत्ता खरेदी करण्यात त्याच्या बहिणी कोणती अडचणी निर्माण करू शकतात का?
2) त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची चाचपणी करावी.?
३)या परिस्तीत खरेदी केल्यास फेरफार मध्ये अडचण येऊ शकते का?
योग्य मार्ग सांगा व पुढील मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
प्रणव राव,
हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 8 अन्वये, अनुसूचित नमूद प्रथम वर्ग-1 च्या नातेवाईकांना ही मिळकत जाते. वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना मिळकत जाते.
वर्ग १ नातेवाईकांमध्ये , मुलींचा म्हणजे पर्यायाने बहिनांचा समावेश आहे . प्रस्तुत प्रश्नातील बहिणींनी हक्क सोडला आहे असे आपण नमूद केले आहे तथापि , सदरचे हक्कसोड पत्र हे नोंदणीकृत नाही . त्यामुळे भविष्यात बहिणी मिळकतीत त्यांचा हक्क सांगू शकतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by असद अली
Tuesday, August 30, 2022
aasayyed88@gmail.com
नगर परिषदेच्या रेकॉर्ड वरील अतिक्रमित मिळकतीचे हस्तांतरण साठी दस्त नोंदणी अवश्यक आहे का ?
Question by Vishal Dnyanoba Shinde
Monday, August 29, 2022
vishalrajeshinde143@gmail.com
1980 वर्षी गट नंबर 111 यास क्षेत्र 1 हेक्टर होते,
पुनर्वसन अंतर्गत 111अ यांस क्षेत्र 0 हेक्टर 80आर (खातेदार मुळमालक) तर
111ब यांस क्षेत्र 0 हेक्टर 20 आर ( जिल्हाधिकारी )
असे दोन 712 पत्रक तयार झाले.
पण आज तागायत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांचाच नावे आहे .
सदर क्षेत्र पुनर्वसनाचा अंतर्गत कोणाचे ही पुनर्वसन नवीन खातेदार कडे वर्ग झाले नाही.
तर हे क्षेत्र मुळमालकास परत मिळवता येईल का? योग्य सल्ला मिळावा.
शिंदे साहेब नमस्कार
आपले आपले प्रश्नावरून, जी पुनर्वसनासाठी जमीन संपादित झालेली आहे ती जमीन भूसंपादन कायदा 894 अन्वये संपादित झालेली आहे. या जुन्या संपादन कायद्यानुसार, जमीन संपादन झाल्यानंतर तिच्या उद्देशासाठी संपादन झालेली आहे, त्या उद्देशासाठी त्याचा वापर झालेला नसेल किंवा संबंधित संपादन संस्थेकडे ती अतिरिक्त म्हणून शिल्लक असेल, तरीही अशी जमीन मूळ मालकाला परत देण्याची तरतूद नाही.
केरळ राज्य शासन विरुद्ध एम भास्कर पिल्ले, या दाव्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालील निर्देश दिले आहेत.
विनावापर शिल्लक राहिलेली संपादित जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात यावी अन्यथा अशा जमिनीचा जाहीर लिलाव करावा. त्यामुळे आपणास ही जमीन परत हवी असल्यास जर या जमिनीचा जाहीर लिलाव झाला तर त्यामध्ये आपण भाग घेऊ शकता. अन्यथा मूळ मालकांना अशी जमीन परत करावी अशी तरतूद जुन्या भूसंपादन कायद्यामध्ये नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
Monday, August 29, 2022
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची वडीलपार्जित सामाईक जमीन एकूण 10 एकर त्या पेकी त्याचा भावाने 5 एकर 1667 ला इतर दोन लोकांना विकली आमच्या आजोबांना किवा त्याच्या मुलांना कोणतीही कल्पना न देता तर आज त्या जमिनीवर आमच्या आजोबांचा कोणता अधिकार पोहचतो का
सागर पाटील साहेब,
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये , आपले वडील, आपण स्वतः व आपल्या अपत्ये यांचा हक्क असतो. आपले आजोबा यांना केवळ एकच भाऊ असेल व त्या भावाने जर त्याचा हिस्सा विकला असेल, तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणताही हक्क नाही.
तसेच आपल्या चुलत आजोबांनी 1967 ला विक्री केलेली आहे. आज या गोष्टीला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet
Friday, August 26, 2022
amitpatole123@gmail.com
जर 7/12 वर एका खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
नमस्कार अभिजित साहेब,
केवळ दोन गुंठे क्षेत्र एकूण सहा गुंठे क्षेत्रापैकी कसे बिनशेती झाले याचा फेरफार अथवा काही परवानगी असेल तर ती तपासून घ्या.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 ड च्या तरतुदीनुसार कदाचित दोन गुंठे क्षेत्र पुरतेच, बिनशेती धार याची रक्कम मेहरबान तहसीलदार यांच्या नोटीस प्रमाणे जमा केलेले असेल व त्याचा परिणाम म्हणून दोन गुंठे क्षेत्र बिनशेती दाखवलेले गेलेली असेल.
हेही पडताळणी करणे आवश्यक आहे की ही दोन्ही क्षेत्रे एकाच व्यक्तीच्या नावे आहेत की बिनशेती क्षेत्र एका व्यक्तीच्या नावे व उर्वरित क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रताप शामराव चौगुले
Friday, August 26, 2022
pratapchougule@gmail.com
ग्रामीण भागातील घरामध्ये मुलगी चा हक्क असतो काय? तसेच मला वडीलांनी खरेदी केलेले जमीन चे मुत्यपत्र करता येते काय?
प्रतापराव शामराव चौगुले साहेब,
ग्रामीण काय किंवा शहरी काय सर्वच क्षेत्रांमध्ये, वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांसह मुलींचाही हिस्सा असतो. वडिलांच्या नावे असलेल्या मिळकतीचे मृत्युपत्र आपणाला करता येणार नाही. वडिलांना जे वारस असतील जसे की आपण आपणास बहिण असल्यास तिचाही हक्क या मिळकतीमध्ये आहे. आपण आपल्या रत्या हिश्श्याचे मृत्युपत्र करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal kakde
Thursday, August 25, 2022
b9604876863@gmail.com
मा. महोदय....... Sir मा. दिवाणी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तसेच अपील सुनावणी साठी प्रलंबीत असेल विवादित मालमत्ता विक्री केली असेल तर मा. तहसीलदार साहेब फेर फार मंजूर करू शकतात का....
विशाल काकडे साहेब नमस्कार,
मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 52 अन्वये, एखाद्या मिळकती संदर्भात न्यायालयामध्ये दावा चालू असेल, व सदरचा दावा हा एकमेकांच्या संमतीने ( collosive ) दाखल केलेला नसेल, तर अशा दाव्यातील पक्षकारांनी, जमिनीची विक्री केल्यामुळे अन्य पक्षकारांच्या हक्कावर गदा येत असेल, तर संबंधित न्यायालयाच्या परवानगीशिवाय अशा जमिनीची विक्री करता येत नाही.
मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील ही तरतूद lis pendens या तरतुदी वर आधारित आहे.
या तरतुदीचा आधार घेऊन जमिनीचे हस्तांतरण रोखायचे असेल, तर दावा प्रलंबित असल्याबाबत दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी पत्र करणे आवश्यक आहे. जेणेकरून मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जो मालमत्तांच्या हक्कान संदर्भातला अन या हक्क तपासणी केली जाते ( title search ) त्यावेळी खरेदीदाराला, अशा प्रलंबित दावा जर नोंदणी केलेला असेल तर त्याची त्याला माहिती मिळेल कोणत्या जोगे तो जमिनीची खरेदी करणार नाही व पर्यायाने त्याची फसवणूक होणार नाही. कारण ज्या व्यक्तीने अथवा ज्या पक्षकाराने जमिनीची विक्री केली आहे त्याच्या विरोधात जर भविष्यात न्यायालयाचा निर्णय गेला तर खरेदीदाराला कोणताही मालकीहक्क अशा मिळकतीमध्ये प्राप्त होत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet Patole
Tuesday, August 23, 2022
abhijeetspatole@gmail.com
जर 7/12 वर खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
Question by प्रशांत गुरव
Tuesday, August 23, 2022
prashant.gurav69@gmail.com
गावाकडे आमच्या आजोबांची वडिलोपार्जित जमीन आहे. थोडी शेती आहे, एक घर आहे आणि घराभोवती थोडीशी जागा आहे. आजोबांच्या निधनानंतर गावातील पंचांकडून त्या जमिनीचे तीन हिस्से करण्यात आले. परंतू ते आम्हाला मान्य नाहीत. जमीन वाटप करताना समान वाटप झालेले नाही. असे असूनही हिस्सेदारांपैकी एकाने घरालगत असलेल्या जागेत स्वतःचे घर बांधले. तसेच पंचांनी आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेत सुद्धा अतिक्रमण केले. ग्रामपंचायत जमिनीच्या विषयात हस्तक्षेप करत नाही, असे ग्रामपंचायत ने आम्हाला कळविले आहे. कुठे दाद मागता येईल? आमची हरकत असूनही जे घर बांधले गेले, त्याला हटवण्यासाठी काही करता येईल का??
Question by Anshuman Nikam
Tuesday, August 23, 2022
anshumumol2007@gmail.com
माझ्या आजोबांनी 1960 ते 1968 या सालामधे आमच्या एकूण 6 एकर जमीनीतील 30 गुंठे जमीन 3-3 गुंठे खरेदी खताने 10 लोकांनी विक्री केलेली आहे, या सर्वांनी त्यामधे घरे बांधली असून. बाकी जमीन आमचे ताबेवहिवाटीस असून आम्ही त्यामधे पिके घेतो. आमचा गट नंबर एकच आहे. प्रश्न असा आहे की, सदर 30 गुंठे जमीनाचा 7/12 वेगळा करता येईल का ? यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल व प्रक्रिया काय आहे ?
अंशुमन निकम साहेब नमस्कार
प्रत्येकी ३ गुंठे क्षेत्र आपल्या आजोबांनी विक्री केले आहे . त्यामुळे ७/१२ स्वतंत्र करण्यासाठी , तुकडे बंदी कायद्याची बाधा येईल . पर्यायाने या क्षेत्राची मोजणी होणार नाही ही अक्वा मोजणी जरी झाली व त्याप्रमाणे आकारफोड पत्रक जरी तयार झाले तर तुकडेबंदी कायद्याप्रमाणे त्यावर अंमल होणार नाही.
मात्र आपण , याचा अभिन्यास व बांधकाम नियामानुकुल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अथवा तेथील स्थानिक नियोजन प्राधिकरण या कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhushan bhaurao mhaisane
Monday, August 22, 2022
bhushanmhaisane5083@gmail.com
Sir mazya sheti madhun rasta ahe to mi bandhawarun deu shakto ka tyabaddal mala mahiti dyawi
भूषण साहेब नमस्कार,
आपल्या शेतांमधुन जर रस्ता जात असेल व आपली इच्छा असेल की तो रस्ता त्या वहिवाटदार आणि आपल्या बांधावरून वापरावा, निश्चितच आपण तो जो वहिवाटदार आहे त्याच्या संमतीने आपल्या बांधावरून रस्ता देऊ शकतात.
जर तो संमती देण्यास तयार नसेल व त्याचा आग्रह जो पारंपारिक रस्ता आहे त्यावरून जायचं असेल, तर आपणाला दिवाणी न्यायालयात जाऊन त्याला बांधावरून रस्ता देण्यास आपण तयार आहात त्याप्रमाणे त्याने बांधावरून रस्ता वापरावा अशा प्रकारचा हुकूमनामा घ्यावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रविण पाटभाजे
Monday, August 22, 2022
pravinpatbhaje12@gmail.com
माझ्या शेताची मोजणी 2018 साली झाली असून माझ्या शेतातिल बांधालगत आंब्याचे झाड क प्रतीत गटाच्या सिमेत आहे. याच आंबा झाडालगत बांध कोरून प्रतिवादी ने 3 फुट खोल नाली खोदली, परंतू या नालीतील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे पाणी मुरुण माझ्या शेतात पाझरते, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. नाली खोदण्यापुर्वी या शेतातील पाणी लगत गटाच्या बांधाशेजारुन नाल्यात जात होते . परंतू नाली खोदकाम
करतांना त्या जागी बांध टाकण्यात आला. याबाबत मा. तहसीलदार यांना जमिन महसुल कायदा कलम 138 नुसार अर्ज केला, परंतु कारवाई करण्यात आली नाही. नंतर मी मामलेदार कोर्ट नुसार पूर्वस्थिती करण्यासाठी अर्ज केला. परंतु सदर प्रकरणी आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे पत्र मा. तहसीलदार यांनी दिले. या प्रकरणी, आणखी कोणा कडे. व कोणत्या नियमाने दाद मागावी. क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
प्रवीण साहेब नमस्कार,
मेहेरबान तहसीलदार साहेब यांनी जे काही उत्तर आपल्याला दिलेला आहे ते बरोबर आहे. याशिवाय आपणाकडे अन्य कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3021 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
राजेश जे वझीरे | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
अजित नथू शेलार | 3 |