जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by sunil landge
Friday, December 30, 2022
EMAILS.LANDGE@GMAIL.COM
mala shetsara (tax) bharaycha aahe 3.13 hekarater aahe ,online bhata yete ka - kalave
होय . Government Accounting Accounting System (GRAS) द्वारे भरू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by D.M.Kulkarni
Thursday, December 29, 2022
dipgayu@gmail.com
माझे पणजोबा यांचे नावावर 19 एकर जमीन होती. सदर जमीन 1945 साली फक्त नोटिफिकेशन वरून वन विभागाचे नावावर झाली. 1954 साली 7/12 वर वन विभागाचे नाव लागले व ताबा वन विभागाने घेतला. 1961 साली ग्याझेट मध्ये सदर जमीन proposed फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आली. या सर्व कारवाई बाबत आम्हाला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. आता 2016 सालच्या ग्याझेट मध्ये ही जमीन महाराष्ट्र शासन राखीव वन म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
माझे खालील प्रश्न आहेत.
1) वन विभागाचे हे संपादन कायदेशीर ठरते का?
2) या भुसंपादन बद्दल पर्यायी जमीन अथवा नुकसान भरपाई मिळते का?
3) या संबधी कुठे दाद मागावी?
भारतीय वन कायदा १९२७ नुसार , खाजगी जागा वन जाहीर करण्यासाठी संपादन करता येते . सदरचे संपादन भू संपादन कायद्यानुसार करणे आवश्यक आहे . भू संपादन कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते . स्माप्दन खूप जुने आहे . आपल्या भागाचे Forest Settlement Officer यांचेकडे मागणी करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Dattatray kadam
Thursday, December 29, 2022
maheshkadam8199@gmail.com
सर जमीन भोगवटादार 2 मध्ये जमीन स्वतः करण्याचा अटीवर दिलेली असेल आणि जमीन दुसरा कसत असेल 12 वर्षे त्याची कागदोपत्री नोंद असेल तर त्याला कूल कायदा लागु होईल काय? ती जमीन आता सरकार हक्क असेल तर जमीन 12 वर्षे करणारा व्यक्ति नावावर करू शकतो का? ही जमीन दुसर्या व्यक्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केलेने जमीन शर्त भंग झाली आहे त्यामुळे सध्या सरकार हक्क आहे.
शासनाने प्रदान केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोन म्हणून तिचा धारणाधिकार असतो. शासनाने जमीन प्रदान केल्यावर त्याच व्यक्तीने ते जमीन कसणे आवश्यक आहे. व जमीन प्रदान आदेशामध्ये या अटी व शर्तीचा उल्लेख असतो. जर ती व्यक्ती स्वतः जमीन करत नसेल तर सदर जमीन शासन जमा केली जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dhairya Hariya
Thursday, December 29, 2022
dhairyah615@gmail.com
My Land at Ambivali is shifted from one location to another . How can a land be shifted ?
Question by Yogesh Dharmraj Poul
Thursday, December 29, 2022
yogeshpoul1996@gmail.com
Sir plot cha Pralambit ferfar mandal adhikari Yana kiti divsat manjur karne aniwary aste maja khup divs zal Pralambit ahe
हरकत नसेल तर १५ दिवस नोटीस कालावधी असतो . हरकत असेल तर एक वर्षात नोंद मंजुरीबाबत निर्णय घेणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Manoj
Thursday, December 29, 2022
manojkjagdale@googlemail.com
I got LND-1071/275810-A-2 GR from Google from your website. GR is having total 06 no pages but page no 02 is missing in your website GR. So can i get this missing page no 02 ? Thank you.
Question by SHREYAS MEHTA
Wednesday, December 28, 2022
accounts@rhco.in
ORIGINAL QUESTION :I am Co-owner of Agriculture Land Details as Under : Village :Dhamni Taluka : Karjat District : Raigadh State :Maharashtra Bhumapan Kramank : 99 Hissa # 4 BRIEF ON MATTER 1) Wrong Entry passed in my record 2) Could not download/ View the 7/12 extract from the site 3) Not Executed any POA or not sold this land by me 4) Many complain latter issued to the office of the Jilla Adhikari Copy to Tahasildar. .No reply till date. Kindly Guide the following to resolve the above issue: 1) Name & Address of all the concern Authority for the complain -To stop the transfer 2) Contract No. of Concern Dept/ office/officer with Email ID if any 3) To understand the status of entry # 1681 4) To understand the Current status & to view & download the copy 7/12 extract from the site. Thanks & Regards SHREYAS MEHTA
YOUR REPLY : Dear Shreyas , go and meet Talathi concerned and obtain the Mutation Entry extract no. 1681 . Ask concerned Talathi to provide the basis on which the said mutation entry is certified . Then you revert back
QUERY : We had approach Talati & also Write Latter But No response . Pl Guide Further Action
What was Talathi's response , when you approached ? Did he give any written reply to your query ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hamir
Tuesday, December 27, 2022
hamirs@gmail.com
Our society is in Vile Parle East, the society is in TPS V of vile Parle and it has the final plot no. too. Our property card still has " Sheti" writteen on it. With CTS nos., TP remark has society's name on plot, B form also has society's name along with the original owner who has given us conveyance in the society's favour. 7/12 extracts have society's name but 7/12 extracts are destroyed in Govt's record and not even there digitally. "Fer Far Utara" shows societys name too. Now CIty Survey office is asking me to get NA sanad. My question is when there is TP scheme implemented, Final Plots have been marked, road is handed over and in Mumbai then why do we have to get NA sanad? isnt it that Mumbai being Urban area, all plots whoes Final pltts have been done are considered to be NA. How to go about?
You don't need to have NA Sanad. Town Planning Scheme is prepared as per the development plan. Could you ask him written reply to your application?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम अनिल जाधब
Tuesday, December 27, 2022
sj515502@gmail.com
फेरफार नोंद हरकत कोण घेऊ शकतो.. म्हणजे लिहून देणारा की सातबाऱ्यावर असलेले बाकी हिस्सेदार.
फेरफार मंजुरीला ज्या व्यक्तीचा त्या मिळकतीमध्ये हितसंबंध आहे किंवा त्याचा पूर्वीचा हक्क डावललेला आहे अशी व्यक्ती फेरफार आला हरकत घेऊ शकते. थोडक्यात फेरफार आला कोणीही हरकत घेऊ शकते. नोंद मंजूर करताना हरकत घेणाराचा आक्षेप मंडळ अधिकारी यांनी गुणवत्तेच्या आधारे ठरवण्याचा असतो,
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by adv swapnil kulkarni
Saturday, December 24, 2022
kswapnil705@gmail.com
ईनाम वर्ग-६ब (महार वतन) अशा शर्तीची जमीन विना परवानगी हस्तांतरित झाल्यास शर्तभंग नियमानुकूल करता येईल का ? किवा कसे ?
तसेच सदर GR उपरोक्त बेकायदेशीर व्यवहारास लागू होतो का ? तरी कृपया महाराष्ट्र शासन,महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.१०७७/३६९६५/७७१/ल-१ दि.३०/०७/१९७७
हा शासन निर्णय मिळणेस विनंती.
जमीन जर विनापरवाना हस्तांतरित केलेली असे तर नियमानुकूल करता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jayesh N Nair
Saturday, December 24, 2022
jayeshkumarnair29@gmail.com
सर, भोगवटा वर्ग २, इनाम वर्ग ६ब ची जमीन असेल आणि ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीवर असा शेरा असल्यास, अशा जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का ?
Question by N E Ookabhoy
Friday, December 23, 2022
ookabhoy@hotmail.com
Sub: Property Extract Card
Four sets of co-owners were owning undivided share, right title and interest in a plot of land with bungalow in which they each had their distinct individual dwelling unit. Their names appeared in the Property Extract Card. They sold the land with bungalow to a builder but the builder did not take conveyance in its name.
The Builder redeveloped the property and constructed a six-storied residential building with commercial premises on ground floor, and formed a co-op. housing society of owners of residences and commercial premises. Each of the four co-owners also owned a residential flat in the said redeveloped building. Accordingly, they too became members of the said Society.
The builder however, did not get the property transferred from the original co-owners to the housing society. After the death of the co-owners, their concerned heirs did not get their respective names entered in the Property Extract Card. In the result, property continued to remain in the names of the co-owners.
Subsequently, due to non-co-operation of the Builder, the Society got Unilateral Deemed Conveyance executed by the Dy. Registrar, Co-op. Societies, in its favour through due process of law, including service of Notices on each of the concerned heirs as also publishing Notices in two Newspapers and reciting them in the Deemed Conveyance which has been duly registered with the Sub Registrar of Assurances in favour of the Society.
Thereafter, Society made application to the City Survey Office to get Society’s name muted in their records and also have it entered in the Property Extract Card. However, the City Survey Office declined Society’s said Application and insisted that heirs/legal representatives of each of the four co-owners should first be brought on its records in order to reflect their names in the Property Extract Card, and only thereafter can Society’s name be entered in the Card on the basis of the registered Unilateral Deemed Conveyance.
Query: Is the stand taken by City Survey Office correct in law? If yes, then please advise how Society should proceed in the matter since some of the heirs/ legal representatives of the four co-owners too may have died, some may have settled abroad while others may not co-operate as they do not have any interest.
DDR has ordered a deemed conveyance. CTSO shall follow the Order of DDR of Deemed conveyance. He cannot ask for the legal heirs to be brought on the record.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Harshal dilip dongare
Thursday, December 22, 2022
dongare.harshal@gmail.com
नमस्कार,
सर गावात काही लोक गुरचरन क्षेत्रात भात लागवड करतात .ती जमीन आता सरकारी मोजमाप झाली तेव्हा समजला. जो पर्यंत सरकार ती जमीन ताब्यात नाय घेत तो पर्यंत लागवड करून पीक विमा गुरचारण चा 7/12 लावून काढू शकतो का
Question by SHREYAS MEHTA
Thursday, December 22, 2022
accounts@rhco.in
I am Co-owner of Agriculture Land Details as Under :
Village :Dhamni Taluka : Karjat District : Raigadh State :Maharashtra
Bhumapan Kramank : 99 Hissa # 4
BRIEF ON MATTER
1) Wrong Entry passed in my record
2) Could not download/ View the 7/12 extract from the site
3) Not Executed any POA or not sold this land by me
4) Many complain latter issued to the office of the Jilla Adhikari Copy to Tahasildar. .No reply till date.
Kindly Guide the following to resolve the above issue:
1) Name & Address of all the concern Authority for the complain -To stop the transfer
2) Contract No. of Concern Dept/ office/officer with Email ID if any
3) To understand the status of entry # 1681
4) To understand the Current status & to view & download the copy 7/12 extract from the site.
Thanks & Regards
SHREYAS MEHTA
Dear Shreyas , go and meet Talathi concerned and obtain the Mutation Entry extract no. 1681 . Ask concerned Talathi to provide the basis on which the said mutation entry is certified . Then you revert back
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SHREYAS MEHTA
Thursday, December 22, 2022
accounts@rhco.in
I am Legal Hire of the Estate of my Deceased father of the Property Situated in Proper Mumbai.
The land of the said property is on the Lease for 999 tear with BMC.Mumbai
Kindly Guide us the following for the Transfer of Property in my name
1) Name & Address of all the concern Authority for submission of Document for Transfer
2) Contract No. of Concern Dept/office/officer with Email ID if any
3) Full procedure & requirement of List of Documents for the Transfer of Name on the Propery/Property Card
4) COPY OF Form / other format required to be submitted along with the Transfer application if any
Thanks & Regards
SHREYAS MEHTA
Question by Shraddha
Wednesday, December 21, 2022
shraddhagundal@gmail.com
कोकणात असलेल्या सामायिक जमीनीसंबंधी दोन्ही भावांमध्ये दिवाणी दावा दाखल आहे कोर्टामध्ये. दोघही समान हिसेदार आहेत. दावा दाखल करण्याऱ्याने कोर्ट कमिश्नर कडून त्यांचा हिश्याचे वाटप करून मागितले आहे.
सर्व जमिनीचे वेगवेगळे तुकडे आहेत जे साधारणपणे शेतजमीन ०. ३६ हे.आर , ०. ३१ हे. आर , ०. २१ हे. आर , ०. ४१ हे.
तसेच वरकस जमिनीमध्ये ०. ३१ हे .आर. ,०. ३६ हे . आर. असे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ आहे. पोट खराब जमीन ०. १६ हे . आर. , ०. २१ हे. आर. असे भाग आहेत
जर वाटप झाले तर निम्मा भाग दोंघांमध्ये सेपरेट होऊन त्याचे तुकडे पडू शकतात का ?
सर्व जमिनीचे तुकडे पडतात का?
सातबारा सेपरेट होऊन दोघांच्या नावावर सेपरेट जमिनीचे तुकडे करता येतील का?
आपणाकडून अपेक्षित ऊत्तर भेटेल अशी आशा आहे.
धन्यवाद,
श्रद्धा
वाटपामुळे जर जमिनीचे क्षेत्रामध्ये तुकडे पडत असतील, तर काही सहज धारकांना त्यांना हिश्श्याच्या प्रमाणात जे क्षेत्र मिळणार असते त्यांचे तुकडे पडू नये म्हणून , सर्व धारकांना , जमीन किंवा पैस्याच्या स्वरुपात नुकसान भरपाई देण्याबाबत पर्याय दिला जातो . जे जमीन घेण्यास तयार असतात त्यांना तुकडे न पाडता जमीन दिले जाते , जे पैसे घेण्यास तयार असतात त्यांची जमीन , जमीन घेनारांना दिली जाते . ज्यांना जमीन मिळणार नाही त्यांना त्यांचे हिस्स्याचे प्रमाणत जमिनीचे बाजार मूल्य भू संपादन कायद्या प्रमाणे निच्छित केलेल्या पाधीतीने नुकसान भरपाई दिली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shraddha
Tuesday, December 20, 2022
shraddhagundal@gmail.com
महोदय,
खालीलप्रमाणे माझ्या प्रश्नाचे उत्तर आपणाकडून अपेक्षित आहे व त्यासाठी मी आपला ऋणी आहे.
माझे आजोबा आणि त्यांचे बंधू ह्यांच्यामध्ये सामायिक खालसा पद्धतीचे जमीन आहेत. माझे आजोबा हे गावी शेती करत व जमीन सांभाळत असत आणि त्यांचे बंधू मुंबईला कामाला असत. त्यांचे बंधू हे गावी येत नसत व काही आर्थिक मदत हि देत नसत.
दोघानचे मिळकतीमध्ये अर्धे समान वाटप आहेत. एकूण ०.३1 हे.आर वरकस शेत जमिनी मध्ये आमचे जुने वडिलापार्जित घर होते. १९८९ मध्ये जुने कच्चे घर पावसात कोसळल्याने नवीन घर बांधण्यात आले. नवीन घर बांधण्यापूर्वी त्यांना विचारणा करण्यात आले कि तुम्ही किती पैसे देणार त्यावरून त्यांनी घरासाठी एकूण खर्च पैकी १०% पैसे दिले म्हणून आमच्या घराला लागूनच सेपरेट त्यांना एक पडवि देण्यात आली आणि घराचे दोन भाग झाले आणि ग्रामपंचायत मध्ये तेवापासून अससेसमेंट सादरी नोंद हि झाली. सध्या त्यांचा आणि आमच्या घरच्या मध्ये एक कॉमन भिंत आहे.
१९८9 पासून आम्ही बांधलेल्या घराची घरपट्टी आम्ही भरतोय आणि त्यांचा हिश्याला असलेली घराची पडविची घरपट्टी ते भरत आहेत. आता सध्या स्तिथीत माझ्या आजोबांच्या बंधूनि दावा दाखल केला असून संपूर्ण सामायिक मिळकत जमिनीचे वाटप कोर्ट कमिश्नर काढून व्हावे असे म्हटले आहे.
जर वाटप जाहले तर आमच्या हिश्यास असलेली ८०% घर हे त्यांचे ताब्यात जाऊ शकते का? घराचे अथवा जमिनीचे समान तुकडे वाटप होईल का?
तसेच आमचे हि घर आता जुने झाले असून त्याचे पक्के बांधकाम करणे आवश्यक झाले आहे तर कोर्ट मध्ये आम्हाला परमिशन मिळू शकते का आमचा तेवढा भाग आम्ही बांधून घेणेसाठी.
सध्या आमचे काका व माझे वडील गावीच असल्याने त्यांना नवीन घर बांधणे आवश्यक आहे समोरच्याना तशी तेव्हडी गरज नसल्याने ते टाळाटाळ करत आहेत तसेच वाटपाचा दावाचा कधी पर्यंत निकाल लागेल ह्याचा काही सुनिश्चित वेळ हि नाही. तरी आपण वरील प्रशनवार आवश्यक ते मार्गर्शन करावे हि अपेक्षा.
धन्यवाद
श्रध्दा
आपले जे चुलत आजोबा आहे त्यांना हे दाखवून द्यावे लागेल की घरासाठी काही खर्च झाला त्याचा 50 टक्के खर्च हा त्यांनी दिलेला जर ते हे सिद्ध करू शकले तर निश्चित घराचे वाटप 50- 50 टक्के होईल. मात्र जर ते सिद्ध करू शकले नाही तर तसे वाटप पन्नास -पन्नास टक्के होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramakant Jadhav
Monday, December 19, 2022
rmk60au@yahoo.com.au
Subject: Can I get access road to bring my agriculture produce on pucca road through
गट क्रमांक 18/1/a and 18/2/a
What ate the rules "
Whom to approach for access road and what is the procedure
माझे नाव डॉक्टर रमाकांत जगन्नाथ जाधव आहे.
मी भाटपुरे तालुका शिरपूर जिल्हा धुळे 425405 येथील माझ्या शेत जमिनी करिता access road साठी तक्रार करत आहे.. यावर काही मार्ग असेल तर कृपया सांगावे.
माझे वडील जगन्नाथ शंकर जाधव यांनी 1980 मध्ये त्यांच्या नावावरील शेताची खालील प्रमाणे वाटणी केली होती.
गट क्रमांक 18/1/b विलास जाधव (माझा मोठा भाऊ)
गट क्रमांक 18/2/b रमाकांत जाधव स्वतः (मी स्वतः)
गट क्रमांक 18/2/a संजीव कुमार जाधव (लहान भाऊ)
गट क्रमांक 18/1/a वडिलांनी स्वतःच्या नावावर ठेवला कारण लहान भाऊ प्रदीप जाधव अज्ञान होता.
वडिलांचा अचानक स्वर्गवास झाल्यामुळे आम्ही सर्व या शेतावर वारसदार आहोत.
माझ्या शेताच्या (18/2/b) दक्षिणेला गट क्रमांक 18/1/a and 18/2/a आहे आणि ह्या शेतांच्या अजून दक्षिणेला आजनाड-भाटपुरे या दोन गावांना जोडणारा पक्का रस्ता आहे.
( म्हणजेच माझं शेत आणि पक्का रस्ता यांच्या दरम्यान हे दोन गट क्रमांक आहेत).
गट 18 /1/ a आणि 18/2/a वर मोठा भाऊ विलास जगन्नाथ जाधव ने अवैधपणे 7-8 वर्षापासून कब्जा करून त्या शेतीची मशागत करत होता. त्याचा कोरोनामुळे दिनांक 10.4.2021 ला मृत्यू झाला . नंतर माझी वहिनी गं. भा. सविता विलास जाधव ने कब्जा केलेला असून ती आता दोन्ही शेतीमध्ये मशागत करत आहे.
उत्तरेकडील माझ्या शेतातून माल पक्या रोडवर आणण्यासाठी माझी वहिनी मला रस्ता देत नाही. .अडथळा करत आहे.
पीक आणि मालाची ने आण करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मी शेती करू शकत नाही .
मला शेती करायची आहे. पण मला access रोड नाही
मला गट क्रमांक 18/1/a आणि 18/2/a मधून मला रस्ता मिळेल काय.???
यासाठी मला काय करावे लागेल कृपया मला माहिती कळवावी.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 जर एखाद्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल तर बांधावरून रस्ता देण्याची तरतूद या कायद्यात आहे . त्यासाठी आपण आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करा प्रकरणाची चौकशी करून ती त्याबाबत निर्णय घेतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sijauddin mujawar
Monday, December 19, 2022
mujawar2255@gmail.com
सर, ११ डिसेंबर रोजी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मनपूर्वक आभार
सर 155 कलम अन्वय 1952 साली झालेली
चुक दुरुस्ती करता येते का? विलंब माफी ची काही अडचण येवू शकते का?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये जी चूक दुरुस्त करण्यात येते की चूक ही लेखन प्रमाण चूक असते आणि ती प्रामुख्याने महसूल विभागाकडून झालेली असते त्यामुळे कलम 155 ला कालमर्यादा निर्धारित केलेली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kedar
Monday, December 19, 2022
army101guy@gmail.com
# माजीसैनिक प्लॉट ७/१२ नोंद व अतिक्रमण#
वय 80 माजी सैनिकाला वाढीव गावठाण १९९२मध्ये शासन मंजूर १५० चौ.मी. प्लॉट मिळाला आहे. व कब्जेहक्काची रक्कम व मोजणी फी भरली आहे. ग्रामपंचायत घरठाण पत्रकाला 8अ नोंद आहे .ताबा मिळाल्यानंतर काही वर्षांनी एकाने दंडेलशाहीने त्या प्लॉटवर अतिक्रमण(पत्रा शेड) केले आहे. पोलीस तक्रार केली पण काही कारवाई नाही. "घरगुती अडचणी मुळे अजून पर्यंत सातबाराला नोंद व सिटी सर्व्हे झाला नाही."
१)उपविभागीय अधिकारी यांचेकडे अतिक्रमण काढणे व 7/12 नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे.
२)त्यांनी बांधकाम शर्तभंग झाला म्हणून पूर्वीच्या आदेशाप्रमाणे 7/12 ला नाव लावण्यासाठी बाजारभावानुसार 75℅ शर्तभंग रक्कम शासनाला भरण्यास सांगितले आहे. नोंदणी होईल पण जागा खाजगी होणार त्यामुळे अतिक्रमण काढून मिळणार नाही असे सांगितले आहे.
# ७/१२ तयार झाल्यावर माजी सैनिकाच्या प्लॉट वरील अतिक्रमण कोण व कसे काढता येईल ?
#तहसीलदार माजी सैनिकांच्या प्लॉट वरील अतिक्रमण काढू शकतात का?काही कायदे व तरतूद ?
#वृद्धापकाळाच्या अडचणीमुळे दिवाणी न्यायालयात न जाता अतिक्रमण काढता येईल का?
कृपया मार्गदर्शन करावे ..ही नम्र विनंती.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व आजी सैनिक यांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर निराकरण करणे यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आलेले आहे. (शासन निर्णयाची प्रत माझ्याकडे नाही.) मात्र यासंदर्भात आपण आपल्या जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून प्रथमता जमीन प्रदान आदेशाच्या अनुषंगाने मिळकतीच्या सातबाराला किंवा मिळकत पत्रिका उताऱ्याला नाव लावण्याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करा. प्रश्न उरतो शर्तभंग झाला की नाही ?
माझ्या मते या प्रकरणात शर्तभंग झाला आहे असे म्हणता येणार नाही कारण बाजूचे व्यक्तीने दंडेलशाही ने आपल्याला जो भूखंड वाटप करण्यात आलेला होता त्यावर पत्र्याच्या शेड चे बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे .. जिल्हाधिकारी कार्यालयाला आपणाला हे दाखवून द्यावे लागेल पत्र्याची शेड स्वातंत्र्यसैनिक यांच्या जागेत बांधलेली आहे ती परस्पर संमतीने बांधलेली नाही. ज्या वेळेस त्या व्यक्तीने जागेवर ती पत्र्याच्या शेड चे बांधकाम सुरू केले तर त्याने ते करू नयेत यासाठी काही प्रतिबंध केला का? पूर्वी या बाबत काही तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिलेले आहेत का किंवा तहसील कार्यालयामध्ये याबाबत काही पत्रव्यवहार केला होता का याचा तपशील जर आपण देऊ शकला तर निश्चितच स्वातंत्र्य सैनिकांच्या जागेवर असलेले हे अतिक्रमण हे अतिक्रमण म्हणून मानले जाणार नाही व त्याबाबत 75% जो दंड लावलेला आहे तो रद्द होऊ शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
श्री. किरण पानबुडे | 3076 |
कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
व्ही. आर. थोरवे | 102 |
शशिकांत सुबराव जाधव | 97 |
MCS Maharashtra | 67 |
श्रीमती.लीना फाळके | 62 |
मगर विनायक सुधीर | 60 |
डॉ.मोहसिन युसूफ शेख | 52 |
श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
विकास खरात | 15 |
कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
राजेश जे वझीरे | 10 |
श्री.पी.एम. गड्डम | 10 |
डॉ.जयकृष्ण फड | 7 |
श्रीधर गालीपेल्ली | 6 |
रामदास के कोळगने | 6 |
श्री.मोहन टिकले | 6 |
श्री. महेश शेवाळे | 4 |
MCS Officer | 3 |