जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Laxmikant Sheshrao Parihar
Thursday, March 09, 2023
lxmkntparihar11@gmail.com

माझ्या प्लॉट समोरील रस्ता मध्ये मंजूर असूनही सदरील रस्ता वारंवार आमचीच जमीन आहे असे म्हणून लातूर आतील डी फार्मसी कॉलेज वाली अडवणूक करत आहेत तरी डीपी प्लॅन प्रमाणे रस्त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी महानगरपालिका टाळाटाळ करत आहे यासाठी काय करावे
एका गटामधून आम्ही 0.21 हे आर एवढी शेतजमीन खरेदी केली आहे सदर जमीन साठी कायम रस्ता व कॅनॉल पाण्यासाठी दंड / पाट खरेदी घेतली आहे. मूळ मालकाने गटातील उर्वरित क्षेत्र बेकायदेशीर रित्या गुंठेवारी पद्धतीने इतर लोकांना दिले आहे त्या गुंठेधारक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर पाटाच्या पाण्यात सांडपाणी सोडले आहे आम्ही पोलिसांना न्याय मागितला ते बघ्याची भूमिका किंवा साधी कलम लावत आहेत कृपया मार्गदर्शन व्हावे

Question by sagar patil
Wednesday, March 08, 2023
sp109391@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या आजोबांचे चुलते त्यांना कोणी वारस नसल्यामुळे आमचे आजोबा त्यांच्या हीशाची सर्व जमीन खरेदी खताने 1960 ला विकत घेण्यासाठी गेले असता आमच्या आजोबांना त्यावेळेस सांगण्यात आले की तुमचे चुलते भूमिहीन होत असल्यामुळे खरेदीखत करता येणार नाही पुढे 1962 ला ते चुलते मयत झाले तर आजही सातबारा वरती त्यांचेच नाव आहे व ती जमीन तेव्हापासून आमच्याकडेच आहे तर त्या सातबारा वरती आमची नावे लावण्यासाठी काय करावे लागेल (आजोबांना पाच भाऊ आहेत)

Question by sagar patil
Wednesday, March 08, 2023
sp109391@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की सातबाराच्या इतर अधिकारामध्ये XYZ व्यक्तीने रक्कम रुपये 325 दिनांक 1992 रोजी कोर्ट अवॉर्ड करून घेतले असे नमूद केले आहे तर कोर्ट अवॉर्ड करून घेणे म्हणजे काय

Question by Sachin b gawande
Wednesday, March 08, 2023
s18gawande@gmail.com

सर मी कारंजा नगरपरिषद अंतर्गत लेआऊट मधे प्लॉट घेतला त्याला शिवडी रस्ता लेआऊट मॅप मधे होता आणि आता बाजूला २ लेआऊट झाले आणि त्यांनी त्या शिवडी रस्त्या मधे पलोटिंग केले त्याबाबत तो शिवडी रस्ता मोकळा कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती

Question by Sachin gawande
Wednesday, March 08, 2023
s18gawande@gmail.com

सर मी एक प्लॉट घेतला त्याला लागून शिवडी रस्ता होता आणि आत बाजूला नवीन लेआऊट झाले आणि तो शिवडी रस्ता प्लॉट टाकण्यात आले आहेत तो रस्ता अत्त अतिक्रमण मुक्त कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती
सर माझा असा एक प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी मी लहान असताना माझे नाव पाच एकर जमीन रजिस्टर केली होती तेव्हा मी अज्ञान पालक होतो आता सध्या माझं वय 36 आहे आणि आत्ता सातबारा माझ्या नावाने निघतो सध्या माझ्या वडिलांनी माझ्याकडून पाच एकर जमीन रजिस्टर खरेदी केली आहे अमुक अमुक एवढे पैसे मिळाले असा उल्लेख आरटीजीएस केला आहे तरीही माझ्या अकाउंटला एकही रुपया जमा झालेला नाही खरेदी झाल्यानंतर मी तहसील मध्ये अर्ज केला होता की माझ्या अकाउंटला एकही रुपया जमा झालेला नाही तरी तुम्ही फेर फार नोंद घेऊ नये तरीसुद्धा आमच्या गावातील तलाठ्याने फेरफार नोंदवला आहे तरी मला काय करावा लागेल प्रोसेस कशी असेल
आदरणीय महोदय,

आधी विचारलेल्या प्रश्नास व उत्तरास अनुसरून,

गावा शेजारी ७/१२ उताऱ्यावर नसलेली डोंगराळ पड जमीन कृषी वन निगडित प्रयोजने साठी जर शासनाकडून / वन विभागाकडून खरेदी घ्यावयाची असेल तर कश्या प्रकारे मागणी अर्ज करता येईल या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

रोहिदास काळे



आधीचा प्रश्न

प्रश्न : मला महाराष्ट्र शासनाची / वन महसूल विभाग मालकीची गावा शेजारी असलेली कमी उंचीचे लहान डोंगराळ वा टेकडी भाग जमीन हि कृषी वन निगडित प्रयोजने साठी खरेदी घेवयाची आहे. तर त्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल. तसेच शासन जमीन खासगी कृषी वन निगडित प्रयोजने साठी प्रदान करण्याचे कोणाला अधिकार आहेत व त्या साठी कोणत्या गोष्टींची वा कागद पात्रांची आवश्यकता आहे.
शासनाकडून कमी उंचीचे लहान डोंगराळ व टेकडी जमीन भाग हा कृषी निगडित प्रयोजने साठी खरेदी घेऊ शकतो काय या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

उत्तर : वृक्ष लागवडीसाठी जागा देण्याचे अधिकार, वित्तीय मर्यादेनुसार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनास आहे. आपण मागणी करत असलेली जागा आपल्या जागे शेजारी आहे असे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. शासनाकडून मागणी करणाऱ्या व्यक्तीला, जास्तीत जास्त पडीक जागा दोन हेक्टर, एक पाणी असणारी जागा एक हेक्टर व बागायत जागा पडीक जागेच्या निम्मी मिळतो. यासाठी आपणाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेचा सातबारा उतारा सह आपला मागणी अर्ज करावा लागेल. त्या आधारे जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी मेहरबान तहसीलदार साहेब यांची कडून करून घेतील. व जागेची शिघ्र सिद्धगनका नुसार येणारे मूल्य, उपरोक्त नमूद महसूल अधिकारी यांच्या वित्तीय मर्यादेमध्ये असेल त्याप्रमाणे संबंधित त्याबाबत निर्णय घेतील.
महसूल किंवा वन विभाग जमीन विकत देत नाही . शासनाकडून जमिन प्रदान केली जाते . त्याची कार्य पद्धती आपणास या पूर्वी सांगितली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vivek Kondawar
Saturday, March 04, 2023
vkkondawar@gmail.com

आमच्या सोसायटीने (पोस्टल ऑडिट कॉलोनी) ५०+ वर्षांपूर्वी नागपुरात शेतजमीन विकसित करून प्लॉट्स विकले होते. तेंव्हापासून वार्षिक NA (non-agricultural) टॅक्स आम्ही भरतो आहे. सध्या त्याच्या ५-६ किलोमीटर पलीकडेही sanctioned लेआऊट्स आहेत.
१) हा टॅक्स बंद केल्याची बातमी वाचल्याचे लोक सांगतात, ते खरे आहे काय
२) हा टॅक्स भरण्याकरिता कलेक्टर ऑफिस मध्ये जावे लागते. आणि फार त्रासाचे आहे वृद्ध लोकांकरिता. तो online भरता येईल काय? कोणत्या संकेतस्थळावर?
NA Tax बंद केलेला नाही . आपण online NA Tax भरू शकता . GRAS हे शासन संकेत स्थळाचे नाव आहे . या संकेत स्थालाद्वारे द्वारे आपण हा कर भरू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amol Sampat Hargude
Friday, March 03, 2023
amolhargude00@gmail.com

) सर प्रश्न असा आहे की आमच्या शेजारी एका माणसाने सामाईक रोड वर बोर खोदली आहे . जागा मालकाने ५फूट रोड दिला आहे व प्रत्येकांनी अडीच फूट रोड सोडले आहे त्या माणसाने त्यानी सोडलेले अडीच फुटत बोर मारला आहे . मालकाचे ५ फूट व प्रत्येकाचे अडीच फूट असा मिळून १० फूट रोड आहे . वाहने आण्यासाठी व न्यासाठी प्रॉब्लम होतो या वर काय करता येइल मी महानगर पालिका हद्दीत रहातो कुणाकडे दाद मागता येइल
आपण ज्याठिकाणी राहता त्या जागेच्या सर्व परवानग्या घेतल्या असतील तर , रस्त्यासाठी जागा अभिनयासा मध्ये सोडलेली असेल . रस्त्यामध्ये विहीर खोदली म्हणून आपण स्थानिक नियोजन प्राधिकारणाकडे अर्ज करू शकता . अन्यथ सार्वजनिक उपद्रव दूर करावा म्हणून , उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amol Sampat Hargude
Friday, March 03, 2023
amolhargude00@gmail.com

सर प्रश्न असा आहे की आमच्या शेजारी एका माणसाने सामाईक रोड वर अतिक्रमण केले आहे रोड ला जि जागा सोडली आहे अडीच फूट भरत नाही . संडास चा दरवाजा रोड ला करून त्याची पायरी पण रोड वर आहे . त्याच्या संडास चा दरवाजा नेमका माज्या दरवाजा समोर आहे . या वर काय ऊपाय आहे
मी महानगर पालिका हद्दीत रहातो कुणाकडे दाद मागता येइल
2)३) सर प्रश्न असा आहे की कॉलनी रोड आहे. माझे घर शेवटी आहे तर त्या रोड वर मी माजी व भाडेकरूंच्या गाड्या लावू शकतो का मी पार्किंग केले नाही दोन चाकी गाडी जाईल एवढा रोड रहातो जाण्या येण्या साठी . १० फुट त्या रोड वर मी महानगर पालिका हद्दीत रहातो
आपण ज्या भागात राहतात , तेथे महानगर पालिका विकास आराखडा मधील ( DP) रोड नाही का ? जी आपली वसाहत / कॉलनी आहे त्यासाठी अंतर्गत रस्ता नाही का ? या बाबत आपण , महानगर पालिका , नगर रचना विभागाकडे विचारणा करा .
जरी विकास आराखड्यात असा रस्ता नसला तरी हि , महाराष्ट्र महानगर पलीका अधिनियम १९४९ च्या कलम २०५ अन्वये , महानगर पालिका आयुक्त यांना , नवीन सार्वजनिक रस्ता करण्याचा अधिकार आहे . तसेच या कायद्याच्या कलम २२९ अन्वये , कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर , पायऱ्या किंवा अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही . आपण महानगर पालिकेकडे तक्रार करा . त्यांचे मार्फत अतिक्रमण काढून देतील .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amit Bagade
Friday, March 03, 2023
amitvikasbagade@gmail.com

आमचे शेत तळे करण्यासाठी गेले आहे मला धरणग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणतेही कागदपत्र नाहीत तरी काय करावे
प्रकल्पग्रस्त अथवा धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी, आपली जागा भूसंपादन कायदा १८९४ खाली संपादन केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर , पुनर्वसन कायदा जागा संपादन होताना त्या प्रकल्पाला लागू केलेला असणे आवश्यक आहे. संपादित झालेल्या जागेबाबत, तलाठी यांच्याकडून संबंधित फेरफार प्राप्त करून घ्या व त्या आधारे तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे धरणग्रस्त दाखला मिळण्याबाबत अर्ज करा. अर्ज केल्यानंतर संबंधित पुनर्वसन विभागाकडून आपणाला जी काही अतिरिक्त कागदपत्र आवश्यक आहे याबाबत आपणास कळवतील त्याप्रमाणे संबंधित कागदपत्र सादर करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SATISH PATIL
Friday, March 03, 2023
satishpatil118@gmail.com

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम-2013 date 01/01/2013

Question by PARAG LAXMAN KADAM
Tuesday, February 28, 2023
paraglkadam@hotmail.com

After the redevelopment of society under the category of PWR-219 on Collector land in Mumbai suburban Who will give the approval to new flat purchaser's membership ( .free to sale}) category. The Collector or Social Welfare Deptt.

Question by tahsildar
Tuesday, February 21, 2023
tahsilsawantwadi@gmai.com

एखाद्या जमिनीवर मुळ जमिन मालकाचा बोजा नोंद असताना कुळाने 70 ब दावा दाखल करावयाचा असल्यास संबंधित बोजाबाबत कोणता निर्णय घ्यावा
जमिनीवर बोजा कश्याचा आहे ? ज्या संस्थेचा बोजा आहे त्यांनाही सुनावणीस बोलावणे आवश्यक . कुल मालक झाल्यावर , बोजा कमी करण्यात येईल त्यासाठी , मालकाकडून दुसरी मिळकत तारण घ्या असे वित्तीय संस्थेस सांगावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar Ramnivas Garg
Monday, February 20, 2023
sagarrgarg@gmail.com

I have a residence flat in my name and my father's name. I have to remove my father's name from the flat . Can this be done in a 500rupee stamp paper.
आपल्या वडिलांनी सदनिकी मध्ये असलेला त्यांचा, अर्धा हिस्सा आपणाला बक्षीस पत्राने देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क हे केवळ दोनशे रुपये एवढे आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला महाराष्ट्र शासनाची / वन महसूल विभाग मालकीची गावा शेजारी असलेली कमी उंचीचे लहान डोंगराळ वा टेकडी भाग जमीन हि कृषी वन निगडित प्रयोजने साठी खरेदी घेवयाची आहे. तर त्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल. तसेच शासन जमीन खासगी कृषी वन निगडित प्रयोजने साठी प्रदान करण्याचे कोणाला अधिकार आहेत व त्या साठी कोणत्या गोष्टींची वा कागद पात्रांची आवश्यकता आहे.
शासनाकडून कमी उंचीचे लहान डोंगराळ व टेकडी जमीन भाग हा कृषी निगडित प्रयोजने साठी खरेदी घेऊ शकतो काय या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
वृक्ष लागवडीसाठी जागा देण्याचे अधिकार, वित्तीय मर्यादेनुसार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनास आहे. आपण मागणी करत असलेली जागा आपल्या जागे शेजारी आहे असे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. शासनाकडून मागणी करणाऱ्या व्यक्तीला, जास्तीत जास्त पडीक जागा दोन हेक्टर, एक पाणी असणारी जागा एक हेक्टर व बागायत जागा पडीक जागेच्या निम्मी मिळतो. यासाठी आपणाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेचा सातबारा उतारा सह आपला मागणी अर्ज करावा लागेल. त्या आधारे जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी मेहरबान तहसीलदार साहेब यांची कडून करून घेतील. व जागेची शिघ्र सिद्धगनका नुसार येणारे मूल्य, उपरोक्त नमूद महसूल अधिकारी यांच्या वित्तीय मर्यादेमध्ये असेल त्याप्रमाणे संबंधित त्याबाबत निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझे जमिनीला 1/4/57चे कुळ लागले आहे.कुळाने कुळ खरेदीला नकार दिला आहे. कुळव व त्याचा मुलगा मयत आहेत. त्या तिघानी तहसीलदारांना जमिन नको आहे असे पत्र दिले आहे जमिन मालकाने पेपर नोटीस देउन व सर्च रिपोर्ट काढुन जमिनीची विक्री केली आहे.काही समस्या होइल का?
कृषक दिनी जी व्यक्ती कुळ असते ती व्यक्ती त्या मिळकतीची खरेदीदार झाली आहे असे कायद्याने मानले जाते. त्यामुळे केवळ कुळाने जमीन मालकाला परत केली तर तो व्यवहार अत्यंत चुकीचा आहे. कुणाला अशी जमीन मालकाच्या लाभात देता येत नाही. कुळाच्या अन्य वारसांनी भविष्यात हरकत घेतली तर ज्या आदेशाने कुळाचे नाव कमी करून आपले नाव दाखल केलेले आहे ते आदेश रद्द बादल होऊ शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Himanshu Patil
Sunday, February 19, 2023
himanshupatil1992@yahoo.com

How to remove reservation from my 7/12 extract. Where can i get the procedure to remove reservation
Once the land is reserved for any Public Purpose by the Local Body/Planning Authority, it can only be deserved if the acquisition proceedings lapse. Or otherwise, by resolution, Local Body decides to deserve the same, and de-reservation stands the scrutiny regarding the requirement of the Regional Plan .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sawant Tanaji Bandu
Friday, February 17, 2023
tanajisawant010787@gmail.com

Adhikarpatr sadhya panavar kelele chalate ka . Adhikar patr kase karave

This page was generated in 0.09 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3076
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3