जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by dinesh donde
Tuesday, December 13, 2022
dinbhim@gmail.com

Namaskar ,First let me thank and appreciate for your online service. My question is that can a person become owner of a land by paying taxes and irrigating the land for more than 50yrs?" kashil tyachi jamin" is it correct before law? what is the produre toget possession of a land which is never seen or irrigated (paid the tax) for more than 50 yrs.
What is the legal way to avoid family distpute .pl clear.
If the cultivator is a protected tenant or permanent tenant or is declared as a deemed tenant under the relevant Tenancy Act, he can become the owner of the land.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jayesh N Nair
Tuesday, December 13, 2022
jayeshkumarnair29@gmail.com

Can we purchase land category under Occupant class 2, which has the remark of Private Forest land. We intend to use the land for plantation of medicinal plants. We have heard that it can be purchased under the section 8 of the companies act. If yes, what would be the procedure regarding the same. Kindly guide us on this.
Yes Private Forest Land can be purchased and there is no bar .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhupinder chandok
Monday, December 12, 2022
bschandok@gmail.com

We are not getting possession of our plot in pune Kondhwa 66/6/B inspite of having all documents in our name
You are planning to take back the possession from whom. Better you approach the Civil Court for the peaceful possession of the land.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मोहन vishe
Monday, December 12, 2022
vishe.mohan@gmail.com

सर 1970 साली माझ्या वडिलांच्या चुलत भावाने आमच्या वहीवटीची जागा वडिलांच्या नावे केल्याचा फेरफार मध्ये नोंद आहे. परंतु त्यानंतर एकत्रिकरण झाल्यापासून पुढे वडिलांच नाव 7/12 वर दिसत नाही, जागा आजही आमच्याच कब्जा ला आहे, जागा नावावर करण्यासाठी काय करावं लागेल कोणते पेपर काढावे लागतील मार्गदर्शन करावं
एकत्रीकरण यामध्ये जागा आपल्या वडिलांच्या चुलत भावाच्या नावे गेलेली असेल. एकदा एकत्रीकरण योजना अमलात आल्यानंतर एखाद्या दुसऱ्या सर्वे नंबर च्या ताब्यात बाबत कोणतीही बदल करता येत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jadhav Vikas Dattatray
Sunday, December 11, 2022
jadhavvikasdattatray@gmail.com

माझ्या वडिलांनी 10 - 12 वर्षांपूर्वी एक एकर जमीन विकत घेतली, आणि त्या जमीन मालकाला (काही गावातील लोकांच्या हाताने)पैसेही दिले, मात्र आता सातबारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी तो मालक सही देत नाही अशावेळी आम्ही काय करावे?

आपण नोंदणीकृत दस्त द्वारे जमीन खरेदी केली आहे काय ?नोंदणीकृत दस्त द्वारे जमीन खरेदी केलेली असल्यास व त्या जमिनीचा मालक आपल्याला ताबा देत नसेल तर त्याला प्रथम आपण वकिलामार्फत एक कायदेशीर नोटीस द्या व ताबा देण्याबाबत त्याला विनंती करा. जर तो ताबा देत नसेल तर आपण ताबा घेण्याचा प्रयत्न करा व आपल्या ताब्यात घेण्याचा जर त्याने प्रतिबंध केला तर आपण त्याबाबत दिवाणी न्यायालयात जमिनीची मालकी प्राप्त झाली असल्याकारणाने ताबा मिळण्यासाठी चा दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sijauddin mujawar
Sunday, December 11, 2022
mujawar2255@gmail.com

सर्व प्रथम सर मनापासून आभार
माझा प्रश्न असा की जुने 7/12 सदरी थोरले आजोबा याची एकोप अशी नोद आहे. त्यांच्या पश्यात त्याच्या जेष्ठ मुलाची एकोप म्हणून नोंद असे पुढे चालत आहे. सर हे एकोप कमी होवुन इतर आजोबांच्या मुलांची 7/12 सदरी नोद होने साठी काय करावे?
खरेतर सातबारा संगणीकरण यामध्ये जे इकपू म्हणून शेरे आहेत ते कमी करण्यात येऊ सर्व कायदेशीर वारसांची भोगवतादर सदरी घेण्याबाबत शासनाचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये ही कार्यवाही करण्यात आलेली आहे तथापि काही प्रकरणात एकपू शेरे काही जर शिल्लक असतील तर सदरची बाब आपण मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनास आणून द्या त्यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये दुरुस्ती बाबाचे आदेश काढले जातील आणि तलाठी यांच्या मार्फत एकपु शेरा कमी होऊन त्याच्या अंतर्गत असलेल्या इतर सर्व वारसांची नावे सातबाराचा भोगवटदार सदरी दाखल होतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडिलोपार्जित औरंगाबाद महानगपालिका च्या हद्दीत १.६९ आर शेत जमीन आहे. सदरील जमीन ही वडिलांच्या नावे आहे. आता वडिलांकडून आम्हा ४ भावनांना जमीन वाटून घ्यायची आहे अशी आम्ही १०० च्या बॉण्ड वर वाटणी पत्रक हे केले आहे .सदरील जमिनीचे वाटणी पत्रक करतांना एकाच ठिकाणी न घेता वेगवेगळ्या ठिकाणी १० -१०आर जमीन घेतली आहे . तर फेर साठी काही प्रॉब्लेम येईल का तुकडेबंदी चा किंवा दुसरा काही...
*नाही तर वाटणी अशी करावी
महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याच्या तरतुदी नवीन सुधारणा नुसार लागू नाहीत. परिणामी तुकडा पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by जयेश राऊळ
Friday, December 09, 2022
jayesh7rajput@gmail.com

साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या शिफारसी
आमची वडिलोपार्जित औरंगाबाद महानगपालिका च्या हद्दीत १.६९ आर शेत जमीन आहे. सदरील जमीन ही वडिलांच्या नावे आहे. आता वडिलांकडून आम्हा ४ भावनांना जमीन वाटून घ्यायची आहे अशी आम्ही १०० च्या बॉण्ड वर वाटणी पत्रक हे केले आहे .सदरील जमिनीचे वाटणी पत्रक करतांना एकाच ठिकाणी न घेता वेगवेगळ्या ठिकाणी १० -१०आर जमीन घेतली आहे . तर फेर साठी काही प्रॉब्लेम येईल का तुकडेबंदी चा किंवा दुसरा काही...
*नाही तर वाटणी अशी करावी
महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा या तरतुदी लागू नाहीत याबाबत शासनाने 2017 मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जरी जमिनीचे वाटप प्रस्तावित असले तरी त्यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा प्रत्येकाच्या वाट्याला येणारे क्षेत्र जरी कमी असले तरी कायद्याचा भंग होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Abhijeet Patole
Thursday, December 08, 2022
amitpatole123@gmail.com

7/12 वर नाव नसल्या मुळे फेरफार नोंद रद्द झाली आस त्या फेरफार वर लिहिलं आहे . पण ज्या साली फेरफार झाला त्या सलच्या अगोदर पासून 7/12 वरती नाव आहे तरी पण त्यांनी फेरफार रद्द केला . प्रांत कार्यालय अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की 25 % शुल्क भरून नियमितीकरण करणे हा अर्ज करावा लागेल . माहिती मिळावी रद्द झालेल्या फेरफार साठी काय करावे लागेल

Question by Abhijeet Patole
Thursday, December 08, 2022
amitpatole123@gmail.com

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत । त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत सुधारणा 2017 दिनांक 07/09/2017 ह्या परिपत्रका मध्ये जर का फेरफार रद्द झाला असेल तर हा अर्ज भरावा लागतो का
अभिजीत जी आपल्या प्रश्नावरून नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजून येत नाही कृपया सविस्तर प्रश्न मांडा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन हद्दीवरुन शेजारील जमीन धारकांनी न्यायालयात वाद चालू आहे.शेजारील जमीन धारकांचे खरेदी खत सब रजिस्ट्रार ऑफिस मधे अर्ज करुन मागितले असता सब रजिस्ट्रार ऑफिस मधून असे समजले की त्या खरेदी दस्ताचे शेवटचे पान गहाळ झालेले आहे त्यामुळे आम्हाला देता येणार नाही. आम्हाला त्यातील वहीवाट व संबंधीत जमिनी समोरील रोड साईज कोर्टात पुरावे म्हणून सादर करायची आहे.तर प्रतिवादीचे दस्त कोर्टात कसे सादर करता येईल??
ज्या स्वरूपात तो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे त्याची प्रत आपण प्राप्त करून घ्या त्याला शेवटचे पान असो अथवा नसो. याउपरही दुय्यम निबंधक कार्यालय आपणाला दस्त देत नसेल तर न देण्याबाबतचे लेखी कारण त्यांना देण्यात सांगा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार तहसीलदार ऑफिस मध्ये एखादा जागेचा फेरफार आपसातील संमतीने लेखी अर्जावर मंजूर झाल्यावर त्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात कळवणे ही कोणाची जबाबदारी ? भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी हे तहसील मधील अशा मंजूर फेरफारांची नोंद स्वतः येवून घेवून ,त्यानुसार भुमिअभी लेखात नोंद करतात का ? याबाबत महसूल अधिनियमात काय तरतूद वा नियम आहे ते कृपया कळवा ही विनंती . दत्तात्रय त्रिंबक सोनवणे
ज्या भागामध्ये अथवा गावठाणा मध्ये सर्वेक्षण झालेले असते त्याच ठिकाणी मिळकत पत्रिका असते. अशा क्षेत्रातील जमिनीची हस्तांतरण व त्या अनुषंगाने होणारे फेरफार याची सर्व जबाबदारी नगर भूमापन अधिकारी/ उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची असते.
याउलट या क्षेत्रामध्ये सर्वेक्षण झालेले नसते त्या ठिकाणी सातबारा असतो. अशा क्षेत्रातली जमिनीचे हस्तांतरण होतात त्या अनुषंगाने होणारे फेरफार याबाबतची सर्वस्वी जबाबदारी तेथील संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी व अंतिमत तहसीलदार यांची असते.
त्यामुळे असे जे काही बदल होतात त्याबाबत परस्परांना सांगण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मात्र एखादे शेतीत स्वरूपाचे क्षेत्र बिनशेती मध्ये रूपांतर झाले तर अशा क्षेत्राची मोजणी करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाचे असते व त्याप्रमाणे त्यांच्या स्तरावरती कमी जास्त पत्रक तयार करून ते महसूल खात्याकडे म्हणजे तहसीलदार कार्यालयाकडे पाठवतात व त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गाव दप्तरामध्ये बदल केले जातात.
आपल्या प्रश्नामध्ये आपण सविस्तर तपशील दिलेला नाही केवळ मोघम माहिती विचारली आहे आपण जर सविस्तर तपशील देऊ शकला तर कदाचित याबाबत समर्पक उत्तर देणे (जर वरील उत्तराने आपले समाधान झाले नसेल) तर शक्य होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अहमदनगर जिल्हा महसूल मंडल व त्याअंतर्गत येणारी गावांची यादी
तहसीलदार महसूल अहमदनगर यांना भेटा त्यांचेकडून आपणाला उपरोक्त माहिती मिलेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Navanath Patil
Wednesday, December 07, 2022
navnathmpatil23@yahoo.co.in

महार वतन 6ब जमिन बिना परवानगी खरेदी केली असेल आणी आता त्यांची परवागी काढता येत का

Question by Jayesh N Nair
Tuesday, December 06, 2022
jayeshkumarnair29@gmail.com

सर, भोगवटा वर्ग २, इनाम वर्ग ६ब ची जमीन असेल आणि ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीवर असा शेरा असल्यास, अशा जमिनीची पोट हिस्सा मोजणी करावयाची असेल तर सक्षम प्राधिकरणाची पोट हिस्सा कामी परवानगी घेणे आवश्यक आहे का ? असल्यास त्याबाबतचे शासन निर्णय / परिपत्रके याची माहिती मिळावी ही विनंती. धन्यवाद.
विषय: शेतबांधावरील किंवा इतरत्र विखुरलेल्या बांबू बेटांची 7x12 वर नोंद घेण्याबाबत मार्गदर्शन

'महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान' हे महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम आहे.

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी (प्रामुख्याने कोकण, विदर्भातील डोंगराळ व अदिवासी भागात) शेत बांधावर डोंगर उतारावर व इतरत्र विखुरलेल्या भागात बांबूची लागवड करतात. परंतु या बाबतची नोंद 7x12 उता-यावर घेतली जात नाही. या प्रकारच्या बांबू उत्पादनाला व्यावसायीक मुल्य असल्याने त्याची नोंद 7x12 उता-यावर करणे गरजेचे आहे.

शेतात लावणी केलेल्या बांबू लागवडीची तलाठी कार्यालयात नोंद घेतली जाते, परंतु विखुरलेल्या बांबू बेटांची नोंद घेतली जात नाही.

तरी कृपया खालील मुद्यांवर मार्गदर्शन मिळावे.
1) तलाठी कार्यालयात विखुरलेल्या बांबू बेटांची (bamboo clumps) नोंद घेण्याकरीता सध्या अस्तित्वात असलेले नियम/मार्गदर्शन पुरेसे आहेत की याबाबत शासन स्तरावर विशेष परिपत्रक/निर्णय निर्गमीत करण्याची आवश्यकता आहे?

2) गावठाणातील घरांशेजारील बांबूची नोंद तलाठी नव्हे तर ग्रामसेवकांमार्फत घेण्यात येते अशी धारण आहे. तरी धरणा पक्की करावी.


वि.गिरिराज, IAS(Retd)
मुख्य कार्यकारी अधिकारी
'महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान'

Question by sumit kakde
Sunday, December 04, 2022
sumitkakde2018@gmail.com

सर माझे पंजोबा दामोदर यांना चार मुले होते. विनायक, नारायण,राजाराम,दिगंबर यांची वडिलोपार्जित जमीन पंजोबा वारल्यानंतर मोठ्या मुलाच्या विनायक च्या नावे एकत्र कुटुंब करता (HUF) म्हणून फेरफार नोंद झाली . या जमिनीत प्रत्येकाचा १/४ भाऊ हिस्से आहेत विनायक ला ३ मुले आहेत नारायण ला २ मुले व राजारामला २ मुली व दिगंबरला ३ मुले आहेत . दिगंबर आणि राजाराम व त्यांची पत्नी विनायक च्या अगोदर मरण पावले त्यांची मुले हि लहान होती. नारायण हा प्रत्येकाचा हिस्सा १/४ अशी वाटणी करून द्या म्हणल्यावर विनायक व त्यांची मुले नकार देत व भांडण करत असत. एकत्र कुटुंब करत ( HUF ) नोंद असल्यामूळे ते केवळ स्वतःच्या मालकीची जमीन आहे म्हणून त्यांनी जमिनीचे फ्लॅट पाडून विनायक च्या मुलांनी त्यांचा वडिलांच्या नावे विकले पैसे त्यांनी स्वतःकडे ठेऊन घेतले त्यामुळे इतर भावांच्या वारसांवर अन्याय झाला आहे याबाबत दाद कशी मागावी झालेले नुकसान हे भरून कशी काढावी याबाबत यावर मार्गर्दर्शन करावे हि नम्र विनंती .
आपण प्रत्येक भावाचा हिस्सा व त्याचा ताबा मिळणे करिता दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा . विनायक व त्याच्या मुलांनी जरी जमीन विकली असेल व ती अन्य भावाच्या हिस्स्याची विकली असली तरी न्यायालय त्यास , त्या बद्दल इतरांना सव्याजी पैसे परत देण्याबाबत आदेशित करेल . दावा दाखल करणे शिवाय पर्याय नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rohit
Saturday, December 03, 2022
www.roraj8@gmail.com

जमीम वाटपाची केस चालू असताना जमिनीचे कोणतेही हस्तांतरण होऊ नये यासाठी मी रजिस्टर लीज पेंडेन्सी करून घेतली आहे, आणि 7।12 नोंद करण्यास गेल्यावर तलाठी नोंद करून घेत नाही, काय करावे?
अशी नोंद करणे अपेक्षित नाही . आणि समजा अशी नोंद तलाठी यांनी घेतली म्हणून , त्यामुळे मिळकत हस्तांतरण करण्यास प्रतिबंध निर्माण होते असे नाही . लीस पेंदेंस नोंदणीकृत केले म्हणजे त्या बाबत तुम्ही सर्व जगाला नोटीस देता असता कि जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित आहे . Title सर्च घेताना , प्रस्तावित खरेदीदार याला या बाबत माहिती होते . तलाठी यांचे नोंद घेण्यास नाकारणे चुकीचे नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shrikant Shriniwas Kompelli
Friday, December 02, 2022
shrikantkompelli567@gmail.com

1. Please inform as to whether the City Survey officers etc. must prepare and issue the Separate Property Card extracts for the Open Space shown in the approved layout plan.
2. Please supply a copy of the relevant Section, Rule, Government Ressolution / Circular etc. providing for issuing the Separate Property card extracts to be issued for Open Spaces in the approved layouts in Municipal Corporation ares in Maharashtra.

This page was generated in 0.09 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3004
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
कामराज बसवंन्‍ना चौधरी 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
रामदास के कोळगने 6
श्री.मोहन टिकले 6
श्री. महेश शेवाळे 4
अजित नथू शेलार 3