जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Nikhil Poladiya
Tuesday, February 13, 2024
nikhil.poladiya@gmail.com

Agricultural land (CTS NO. 698B/3) , situated in Mulund west under BMC - T WARD.It is used for residential purpose since 1991 , after obtaining collector interim permission . In order to convert this agricultural land to non agricultural (NA) for residential use in official records - what is the basis for calculation of conversion tax , premium , nazrana , any other payment required for above conversion and the actual amount payable for above change of land use.Please share the logic of calculation and the amount as well . Thanks in advance .
Pl read section 47A of Maharashtra Land Revenue Code 1966 .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Hariprasad Madhukar Patil Patil
Tuesday, February 13, 2024
hariprasadpatil@rediffmail.com

सर मी माझे शेत दिनांक 05/05/2023 रोजी माझ्या शेतीची सरकारी मोजणी झाली असून ,माझ्या कडून आर्थिक टंचाई मुळे मला ताबा घेता आला नाही, आता शेजारील शेतकऱ्याने ताबा देण्यास विरोध केला आहे. व हद्द कायमची खून पण नष्ट केली आहे.
या परिस्तीत मला माझ्या शेतावर ताबा घेणे आहे
तरी मला वाद न होता ताबा कसा मिळणार ही सांगण्याची विनंती करावी
धन्यवाद
आपली व आपले शेजारील शेतकरी यांचे शेताची हद्द निच्छित झाली असेल , त्यावेळी कलम १३८ अन्वये , हद्दीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचा जमीन धारण करण्याचा हक्क कोणत्या क्षेत्रापर्यंत आहे हे निच्छित होते . लगतच्या शेतकर्याने अतिक्रमण केले असेल तर , आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . असा अनधिकृत ताबा काढून देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIJAYKUMAR GOPALDAS AGRAWAL
Monday, February 12, 2024
akshau_agr@yahoo.co.in

राज्यात कुणी व्यक्ति आपल्या मुलाना हयात असताना मालमत्ता वाटणी करूण फेरफार अर्ज करु सकतो का ?
जर वाटप करण्यात आलेली जमीन मिताक्षरा hindu एकत्र कुटुंबाची असेल तर , अशे वाटप यामुळे आवश्यक फेरफार अर्ज करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shilpa raut
Tuesday, February 06, 2024
shilparaut35@gmail.com

नमस्कार साहेब आमचे एकूण 43 सातबारा आहेत ही आमची सामायिक जमीन आहे याच्यापैकी साधारणता 18 सातबारा हे माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या कब्जे वापरात आहेत यातील आम्ही काही सातबारा मध्ये माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या नावासमोर एकत्रित क्षेत्र आणलेले आहे (एक खाते नंबर बनवून माझ्या वडिलांचा आणि काकांचा ) तरी या पैकी फक्त चार सात बारा वरील माझा काकां चा आणि वडिलांच्या नावासमोर विभागून क्षेत्र आणण्यासाठी कलम 85 द्वारे अर्ज करू शकतो का म्हणजेच भविष्यात इतर राहिलेल्या सातबारांसाठी आम्ही वेगळा अर्ज केला तरी चालतो का?
थोडक्यात प्रश्न असा आहे की कलम 85 अन्वये आम्ही एकाहून जास्त वेळा अर्ज करू शकतो का?
हो . आपल्यावर अवलंबून आहे कि आपण किती संयुक्त रित्या धारण केलेल्या जमिनीचे वाटप करू इच्छिता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by AVINASH BHAGANE
Thursday, February 01, 2024
avinashbhagane@ymail.com

महाराष्ट्र शासन ई हक्क प्रणाली द्वारे ऑनलाइन वारस नोंद करताना नोटरी अथवा मा. तहसीलदारसाहेब यांजकडील वारस नोंद प्रतिज्ञापत्राची आवश्यकता आहे का? असल्यास जर एखाद्या व्यक्तीची जमीन कोल्हापूर येथे असेल व सदर व्यक्ती मुम्बई येथे वारस नोंद प्रतिज्ञा पत्र नोटरी करून ऑनलाइन नोंद अर्ज करु शकतो का?

Question by Sushant vartak
Tuesday, January 30, 2024
sushantvartak1980@yahoo.co.in

नमस्कार साहेब आमचे काही सातबारा वरती सामायिक जमीन असून त्यावरती 50 ते 60 वारसांची नावे आहेत आहे आणि ही सर्व नावे अनुक्रमे "अ" "ब" "क" या तीन भावांच्या वारसांची आहेत. "अ" हा एकत्र कुटुंब प्रमुख असल्याने त्याच्या फेरफार मध्ये "अ" हा 1/3, "ब" हा 1/3 आणि "क" हा 1/3 साठी वारस आहे तरीही या फेरफाराच्या अनुषंगाने वारसांच्या नावासमोर क्षेत्र टाकण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करता येईल का
कलम 85 ने वाटणी करण्यात काहीजण सहकार्य करत नाही म्हणून आम्हाला सदस्यतीत नावासमोर क्षेत्र आणायचे आहे तरी आपला अभिप्राय द्यावा ही विनंती
कलम ८५ खाली वाटप हे सह- धारक यांचे मध्ये संमती असेत तरच करता येते अन्यथा नाही . ज्या जमिनीच्या सह-धारकांमध्ये वाद असेल त्या ठिकाणी दिवाणी संहिता कलम ५४ प्रमाणे दिवाणी न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुरज भोसले
Tuesday, January 30, 2024
suraj.bhosale27@gmail.com

नमस्कार साहेब, माझ्या वडिलांचे आकस्मित निधन झाल्यामुळे वारस नोंदी साठी मी तलाठी यांच्याकडे अर्ज दिला होता त्यांनी २१ दिवसात सात बारा वर वारसांची नोंद होईल असे सांगितले होते परंतु १ महिना झाला तरी अजून वारस नोंद झाली नाहीये त्यासाठी काय करावं लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ajit madam
Thursday, January 25, 2024
ajitk0421@gmail.com

बिल्डर कडून फसवणूक झाल्याने Conjumer कोर्टाचे आदेशाने जप्त झालेली बिल्डरची जमीन लिलावात घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही तर , शासन सदर जमीन शासनाचे नावे कोणत्या नियमाने ताब्यात घेवू शकते ? आणि त्यानंतर सदर जमिनीचे ७- 12 उताऱ्यावर इतर अधिकारात सुमारे 60 लोकांची नावे व बोजा थकबाकी नोंद आहे. ती रक्कम शासन परत केंव्हा मिळेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती . दत्तात्रय सोनवणे मो. नं 9870767328

Question by Vishal Shinde
Wednesday, January 24, 2024
vishalashokshinde1@gmail.com

मे.कलेक्टर सो.बहादूर यांचेकडिल हु.नं.आर.बी.डब्लू.एस/1606/65दि18/11/55अन्ववे यांचे परवानगीशिवाय वाटणी गहाण अगर तसदीबद्दल न करणेचे शर्तीवर 1591 असा शेरा दाखवत आहे,त्यावर काही करता येईल जेणेकरुन तो कमी होईल म्हणजेच कुठे अर्ज दाखल केल्यानंतर तो कमी होईल कारण हे चुकून शेरा दाखल करण्यात आला असून.

Question by विलास मिसाळ
Tuesday, January 16, 2024
Vilasmisal1992@gmail.com

नमस्कार
मा.
मी छत्रपती संभाजी नगर चा रहिवासी असून इ.स 1987 मध्ये आज्जी ने रजिस्टर खरेदी खत केले त्या नंतर तिच्या बहिणीच्या मुलाने मूळ खरेदी खत त्यांच्या जवळ घेतले व आज्जीला बोलला की घरी गेल्यावर देतो.त्याने ते दिले नाही.व आता आम्हाला त्यांची गरज आहे कारण त्याने 2000 साली ती जमीन त्याने परस्पर नावे केली आहे.आमच्या कडे त्यांची झेरॉक्स सुधा नाही क्रुपया मला त्यांची नक्कल कुठे मिळेल मदत करावी
सर ,मौजे सोनाळा १ येथे गट न १७४ २हे९१ आर शेती नामदेव गुलकरी ने विकत घेतली होती त्यानंतर १हे९४आर शेत महादेव इंगळे ला विकले त्यामुळे नामदेव गुलकरी जवळ ०.९७ आर नावे राहली परंतु ७/१२ मध्ये महादेव संस्थान तर्फे पंच असे नाव लागले आहे परतू संस्थान नोदणी कृत नाही कारण त्याचा काहीच संबंध नाही . तसेच नामदेव गुलकरी ह्यांनी सदर ०.९७ आर शेती संस्थानला दान दिली नाही किंवा नव्हती. त्या बाबत सह्यायक धर्मदाय ह्याचे कडे चौकशी केली तेथे सुद्धा सदर संस्थान रजिस्टर नाही सदर मिळकती आजरोजी वारसाच्या ताब्यात आहे. तसेच संस्थान त्या गावात नाही. महसूल रेकार्डला दान बद्दल माहिती तसेच फेरफार झाला नाही. संस्थान चे नाव कसे कमी करता येईल.मयत नामदेव चे वारसाची नावे ७/१२ लावायची आहे .त्यामध्ये काय व कुणाकडे अर्ज करावा. मार्गदर्शन मिळावे
नाहादेव संस्थांचे नाव कोणत्या फेर्फाराने दाखल झाले आहे ? तो फेरफार पहा . त्यावरून आपणास आपल्या प्रश्नाचे उत्तर मिलेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anshuman
Friday, January 12, 2024
anshumol2007@gmail.com

जमीन वहिवाटीचा वादाबाबत तहसिलदार यांचेसमोर फौजदारी संहिता 145 नुसार केस सुरु असून प्रतिवादी हा परगावी राहत आहे, त्याने वकिलांची नेमणूक केली असून तो स्वत हजर रहात नाही. 145 केस मधे वकिल दिला तरी स्वत उपस्थित रहाणे आवश्यक आहे का त्याबाबत काही नियम आहे का? कृपया मार्गदर्शन करावे

Question by Kedar
Thursday, January 11, 2024
army101guy@gmail.com

#माजी सैनिक जमीन प्रश्न #
प्लॉट वाटप केलेल्या वाढीव गावठाणाचा(वर्ग 2) सिटी सर्वे झालेला नाही.नकाशा उपलब्ध होत नाही.गट हा ग्रामपंचायत क्षेत्रात आहे .घरठान उतारा ही उपलब्ध आहे.तसेच 7/12 ला पण नाव आहे . काही लोक म्हणतात वैयक्तिक प्लॉटची मोजणी होत नाही तर संपूर्ण गटाची मोजणी करावी लागेल.
# जर माजी सैनिकाला या वाटप केलेल्या गटातील वैयक्तिक प्लॉटची सिटी सर्वे मोजणी करायची आहे तर काय करावे लागेल?
# पोलीस प्रोटेक्शन कसे मिळवावे आणि यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काय करावे लागेल?
या आधी प्रांत साहेबानी वर्ग 2 मध्ये 7/12 नाव लावले असून आदेशामध्ये तहसीलदारांना जागेचा कब्जा देण्याबाबत लिहिलेले आहे पण अजून अंमलबजावणी झालेली नाही. सिटी सर्वे मोजणी व कब्जा यासाठी काय करावे लागेल ?
आपणास जी जागा दिली त्याचा ताबा शासनाने आपणास पूर्वी दिला होता का ? जर पूर्वी ताबा दिला नसेल तर , अतिक्रमण विरहीत जागेचा ताबा देण्याची जबाबदारी तहसीलदार / शासनाची आहे . मात्र जागेचा ताबा आपणास पूर्वी दिला होता व त्यानंतर जागेवर अतिक्रमण झाले असेल तर, असे अतिक्रमण काढून टाकणे आपली जबाबदारी आहे . भू मापन करण्यासाठी आपणास भूमी अभिलेख विभागास अर्ज करणे आवश्यक आहे .
तहसीलदार यांना ताबा देण्याबाबत निर्देशित करूनही ताबा दिला नसेल तर , आपण जिल्हाधिकारी कार्यालयात , सैनिक मदत कक्ष स्थापन केले आहेत त्यांचे कडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anil B
Wednesday, January 10, 2024
barhateanil21@gmail.com

नमस्कार सर,
आमचे आजोबा 17 एकर चे स. कुळ होते 1970 मध्ये 3 एकर चे 32ग करून 32म प्राप्त झाले
कब्जेदर सदरी 3 एकर ला नाव लागले इतर हक्कात फेरफार नवीन शर्त 47 व कब्जेदार सदरी 47 फेर पडला तसेच इतर हक्क हा पूर्ण 17 एकर अस्तानी 3 एकर खरेदी होऊन उर्वरित इतर हक्क मधून सुद्धा फेरफार 47 धकाऊन नाव कमी झाले.....नाव कमी कशाने झाले त्या बद्दल काहीच माहिती नाही सापडत आहे...
मूळ मालकाने नंतर 2 व्यक्तींना 5 आणि 5 असे 10 एकर विक्री केले...त्यात त्यांनी कोणतीही परवानगी प्रांत घेतली नाही तसेच चलन भरले नाही......तर त्यांचा व्यवहार कायदेशीर आहे का तो कोर्ट मध्ये ॲपील होऊ शकतो का......कारण आम्ही कुळ होतो 1.4.57 चे आणि 3 एकर घेतली होती आम्ही त्यातील... जर ती जमीन आम्हाला पुन्हा मिल्व्याची असेल तर काय करावे लागेल
जर आपले पूर्वाधिकारी /वाड- वडील हे सौरीक्षित कुल होते म्हणजे ते कृषक दिनी मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत आपले नाव कमी होणे चुकीचे आहे . आपण ज्या फेरफाराने आपले नाव कमी झाले आहे त्याविरुद्ध अपील दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर आपले पूर्वाधिकारी /वाड- वडील हे सौरीक्षित कुल होते म्हणजे ते कृषक दिनी मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत आपले नाव कमी होणे चुकीचे आहे . आपण ज्या फेरफाराने आपले नाव कमी झाले आहे त्याविरुद्ध अपील दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anil B
Wednesday, January 10, 2024
barhateanil21@gmail.com

सर आमचे आजोबा 1.4.57 चे स.कुळ होते 1970 मध्ये आम्ही 3 एकर चे 32ग केले व 32 म प्राप्त केले नंतर 7/12 ला इतर हक्क मध्ये नाव कमी झाले तसेच नवीन शर्त 47 आणि कब्जेडार मध्ये फेरफार 47 तसच आमचे आजोबांचे नाव फेरफार 47 ने इतर हक्क मध्ये कमी झाले दिसून येते...नाव कशाने कमी झाले त्या बद्दल काहीच उपलब्ध नाही मूळ मालकाने 1980 मध्ये ती जमीन आपल्या विधवा सूने चा नवे केले आणि आज रोजी 3 वर्षा पासून नापीक आणि मोठ्या कात्या आहेत त्या मध्ये.....तर ती जमीन पुन्हा मिळवता येऊ शकते का त्या साठी काही प्रोसेस

Question by Suraj Sanjay Borude
Wednesday, January 10, 2024
surajborude906@gmail.com

विभागी आयुक्त यानी पारित केलेल्या आदेशने मंडळ अधिकारी नोद घेत नाही काय केलं पाहिजे किंवा आदेशाला काही मुदत आसती का

Question by Kiran
Saturday, January 06, 2024
kiranghodke47@gmail.com

सात बारा च्या वेळी आपली हरकत तलाठी कडेच घेतली पाहिजे का ?

Question by अमोल वाघ
Friday, January 05, 2024
amolwagh6828@gmail.com

म.ज.म.अ.१९६६ चे कलम १५५ अन्वये क्षेत्र दुरुस्ती संदर्भात अर्ज केलेला होता. त्यात सर्व संबंधितांना नोटीस बजावण्यात आलेली होती. क्षेत्र कमी होणार असल्यामुळे काही जणांनी त्यास विरोध केला. तहसिलदार साहेब यांनी दिलेल्या निर्णयावर विरोध असलेल्यांनी मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचेकडे अपील केले. माझा प्रश्न असा आहे की, मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या निर्णयावर देखील नाराज असलेले मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे अपील करू शकतात का? किंवा दिवाणी न्यायालयात जाऊ शकतात का?
कारण अर्जातील मुद्दा हा चुकीने वाढलेले क्षेत्र कमी करावयाचा असून तहसिलदार साहेब यांनी वाढलेले क्षेत्र खातेदार यांच्या हिस्सा चे सरासरीच्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय दिलेला आहे परंतु काहींना तो मान्य नाही. परंतु त्यामुळे मान्य असलेल्या व्यक्तीनांही अपील केलेले असल्याने तारखेसाठी वेळ द्यावा लागत आहे.
नमस्कार महोदय मी भास्कर दशरथ पिंपळे रा रहिमपुर ता संगमनेर जि अहमदनगर येथिल रहिवासी आहे. मि २१ नोव्हे. २०२३ रोजी याच पोर्टलवर गायराण जमिन नियमित करण्यासाठी मार्गदर्शन मागितले होते त्यावर आपण मा. जिल्हाधिकारी यांना 2 हे. पर्यन्त जमिन नियमीत करण्याचा अधिकार आहे व त्यासाठी कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे असे कळविले होते. मि सन १९७५ पूर्वी पासुनचे २हे२०आर क्षेत्रावर अतिक्रमण असल्याचे सर्व पुरावे सादर केलेले आहेत. परन्तु मा जिल्हाधिकारी यांनी आमची मागणी सर्वोच्च न्यायालय २०११ जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या निर्णया अन्वये नामंजुर केली आहे. परंन्तु माझा मुलगा चि किरण भास्कर पिंपळे (MSc.Agri) याने सदर निर्णयाचा अभ्यास केला असता त्यातील मुद्दा क्र 22 मध्ये दिलेल्या विवेचना प्रमाणे काहि अपवादात्मक परिस्थिति मध्ये भुमिहीन मजुर/ अनुसुचित जाती/ जमाती यांची अतिक्रमणे नियमित केली जाऊ शकतात असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले आहे. त्यामुळे मि अनुसूचित जमाती चा असल्यामुळऐ कोणाकडे दाद मागावी कृपया मला सांगावे. सदर जिमिनीचे पुरावे मि आपल्याला सादर करु इच्छितो तशी मला परवानगी द्यावी.

This page was generated in 0.51 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3204
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3