ओळख

भुमिका – मित्र हो,
आपले हे संकेतस्थळ निर्माण व विकसीत करण्यामागची भुमिका विस्तारीत संक्षेपाने (!) सांगणे आवश्यक आहे. कारण इतर कोणतेही संकेतस्थळ व आपले हे संकेतस्थळ यात एक महत्वाचा व मुलभूत फरक आहे. इतर कोणतेही संकेतस्थळ एखादी व्यक्तील/समुह निर्माण व विकसीत करतो आणि इतर सर्व व्यक्तीय त्या संकेतस्थळाला भेट देतात; फार तर Feedback देतात. एवढाच त्यांचा त्या त्या संकेतस्थळाशी संबंध असतो. परंतू, आपल्या या संकेतस्थतळाची सुरुवात जरी येथून झालेली असली तरी सुद्धा संकेतस्थळाची सुरुवात/वापर सुरु झाल्यानंतर ते कोणा एकाची निर्मीती न राहता आपल्या प्रत्येकाची निर्मीती ठरणार आहे, कारण या संकेतस्थळाला आपल्यातील
प्रत्येकजण Contribute करणार आहे, हे संकेतस्थळ अद्यावत राहील यासाठी प्रयत्न‍ करणार आहे, थोडक्यात हे "आपणां सर्वांसाठी आपण सर्वांनी” तयार केलेले संकेतस्थळल असणार आहे व ते याच सुत्राने /याच मार्गावर वाटचाल करणार आहे..
हे संकेतस्थळ आपणां सर्वांचे असल्याने इतर संकेतस्थळा प्रमाणे अतिशय मर्यादित स्वरुपात Moderator/Administrator न ठेवता व्यापक प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात Moderator ठेवून संकेत स्थळ सतत Update ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपल्या दुस-या ग्रुपवर (revenueofficers@yahoogroups.com) कार्यरत असणारे Members हे Moderator असतील तसेच प्रत्येक विभागाचे महसूल उपायुक्त हे Administrator/Moderator असतील नंतर कालांतराने स्वेच्छेने जिल्हानिहाय Moderator हे संकेतस्थळ अद्यावत ठेवण्यासाठी योगदान देतील. आपल्या पैकी कोणालाही सर्वांच्या उपयोगाचे किंवा आवश्यक असलेले कोणतेही साहित्य या संकेतस्थळावर Add व Update करु वाटले तर ते आपणाला Moderator मार्फत टाकता येईल किंवा Revenue Forum व Feed back च्या माध्यमातून कोणत्याही Member ला ते direct सुद्धा टाकता येईल. इतक्या विकेंद्रीकृत पद्धतीने आपले संकेतस्थळ सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे. संकेतस्थळाच्या मूळ स्वरुपात बदल होवून वर्गीकरणात अडचण निर्माण होवू नये एवढ्या मर्यादीत स्वरुपात व केवळ तांत्रिक बाबतीत काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्या्त येईल. त्यातही काही बदल आवश्यक वाटल्यास आपण चर्चा करुन आवश्यकतेप्रमाणे तो बदल पण करता येईल.
ज्या सोप्या पद्धतीने आपण Feed back वर Status Update करतो तितक्या‍च सोप्या पद्धतीने आपण या संकेतस्थळावर आपल्याशी निगडीत विषय Update करणार आहोत. या संकेतस्थळावर आपणाला आवडणा-या, मनाला खटकणा-या, मनाला आनंद देणा-या, नोंद घ्यावी वाटणा-या, इतर सदस्यांनी वाचाव्या/पाहाव्या वाटणा-या, आपल्याशी निगडीत, आपल्या कुटुंबांशी निगडीत, आपल्या पाल्याशी निगडीत कोणत्याही लहान-मोठ्या घटना इथे Share करता येणार आहेत व आपण त्या Share करणार आहोत. कारण एका कुटुंबात असूनही आपणाला एकमेकांविषयी फार कमी माहिती आहे. आज आपण आपल्या कुटुंबाची व्याप्ती फार फार तर आपल्या जिल्ह्याच्या मर्यादेत ठेवली आहे, ती वाढवून आपणाला आपले कुटुंब राज्यस्तरीय कुटुंब या विस्तृत व महाकाय कुटुंबात बदलायचे आहे. त्यामुळे पद, जिल्हा, विभाग हे कोणतेही बंधन न पाळता आपणाला येथे Share करायचे आहे.

संकेतस्थळ निर्मीती मागची भुमिका सांगीतल्यानंतर संकेतस्थतळा विषयी, त्यातील प्रत्येक Tab, Heading, Sub-heading विषयी माहिती सांगणे आवश्यक आहे. संकेतस्थळाचे Home Page संकेतस्थळा विषयी सविस्तर माहिती देतेच तथापी, आपणाला प्रत्येक Heading, Sub-heading चे Content विषयी माहिती असणे आवश्यक आहे कारण त्यामुळे आपणाला आपल्या माहितीचे सुयोग्य व वर्गीकृत पद्धतीने नियोजन व Sharing करता येईल. त्यामुळे प्रत्येक Tab, Heading, Sub-heading याची माहिती संक्षेपाने खालील प्रमाणे सांगता येईल
1. गृह/होम – संकेतस्थळाचे प्रथम पेज.
2. आमच्या विषयी – यात आपली संघटना, नियामक सदस्य इ. विषयीची माहिती आहे.
3. आपल्यासाठी - हे नावाप्रमाणेच आपल्यासाठी महत्वाचे सदर आहे कारण आपणाशी संबंधीत, आपल्याला माहिती असणे आवश्यक असलेल्या पण दुर्दैवाने फारच थोडी माहिती आपणाकडे उपलब्ध असणा-या बाबी येथे ठेवण्या्त आलेल्या आहेत. सद्यःस्थितीत उपलब्ध माहिती येथे ठेवण्यात आली आहे, ती काही कालावधीत आपण अद्यावत करुयात. येथे ज्येष्ठता सुची, सेवा नियम, विभागीय परिक्षा, पदोन्नती, बदल्या व इतर महत्वाच्या आस्थापना विषयक बाबी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
4. संपर्क विवरण – हे अतिशय महत्वाचे व संकलित करण्यासाठी अतिशय त्रास झालेले संकलन आहे. यात आपणा सर्व सदस्यांचे संपर्क विवरण संकलीत करण्या‍त आले आहेत. यासाठी सेवा सुची Civil list चा आधार घेण्यात आलेला आहे. ब-याच जणांनी कार्यालयीन mail ID व mobile no. दिलेले असल्याने अद्याप हि माहिती सदोष आहे. तथापी, कोणत्याही उपलब्धा data पेक्षा जास्त‍ data आपल्या कडे उपलब्धत आहे. या संपर्क विवरणात व्यक्तीगत, कार्यालयीन व अवर्गीकृत अशा पद्धतीने माहिती वर्गीकृत करण्यात आली आहे. यातील व्यक्तिगत माहिती हि कायमची राहणार असल्याने सर्वांच्या सहकार्याने येथिल माहिती अचूक व अद्यावत करण्यासाठी आपणाला प्रयत्न करावा लागणार आहे. पुढील एक वर्षात या माहितीत ब-यापैकी सुधारणा व अचूकता येईल. तसेच प्रत्येक वर्षी बदल्या /पदोन्नती प्रमाणे हे संकलन अद्यावत व अचूक ठेवण्याचे काम आपणाला करावे लागणार आहे. महत्वाचेः- आपल्या या संकेतस्थळा साठी Member होण्यासाठी mail ID हा Username असून Mobile no. हा Password म्हणून वापरायचा असल्या‍ने तो अचूक असणे आवश्यक आहे (अर्थात Password नंतर बदलता येईल). यासाठी सर्वांना विनंती आहे स्वतःचे व मित्रांचे, सहका-यांचे mail ID व mobile no. अचूक पाठवावेत.
व्यक्तीगत संपर्क विवरणातील कोणत्याही नावाला Click केल्या्नंतर त्या सदस्यांशी संबं‍धीत details आपणाला मिळतील. त्यात बहुतेक सदस्यांचा फोटो नसल्याने तो टाकता आला नाही. तरी विनंती की, आपल्या जिल्ह्यातील फोटो संकलित करुन नावांसह, mail ID व mobile no. सह mail करावेत.
आपल्यातील बहुतेक सदस्यांनी आपल्या क्षेत्रात विवि‍ध प्रयोग केलेले असतात किंवा आपल्याय वैयक्तिक आयुष्यात आपण, काही वेगळे , विशेष केलेले असते पण त्याविषयी इतरांना माहिती नसते. यासाठी संपर्क विवरणात “विशेष” म्हणून एक सदर ठेवण्यात आले आहे. आपणाला येथे काही विशेष माहिती टाकावी वाटली तर ती आपण पाठवावी म्हणजे ती येथे आपल्या मित्रांसाठी उपलब्ध राहील.
5. महसूल व्यासपीठ – या संकेतस्थळावरील सर्वाधिक वापरात येणारे हे सदर आहे. दैनंदिन कामकाज, नविन शासन निर्णय/परिपत्रके, विविध अडचणी, आवश्येक मार्गदर्शन, काही मुद्दावर चर्चा इ. बाबींसाठी आपल्या– विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. सद्यःस्थितीत आपण आपल्या revenueofficers@yahoogroups.com वर अशा स्वरुपाची चर्चा करतो, या चर्चेचा अडचणीत असलेल्यांना फार उपयोग होतो. तथापी, हि चर्चा mail स्वरुपातील असल्याने Back reference म्हणून एकत्रितपणे वापरणे फार कठीण जाते. या ठिकाणी विषयवार माहिती एकत्रित राहणार असल्यासने भविष्या‍त पुन्हा कधीही या माहितीचा वापर करणे शक्य होईल. तसेच, या संकेतस्थळाच्या कोणत्याही भागात काही Addition/Updation करणे आवश्यक वाटले तर तो सदस्यं येथून ती Attachment पाठवू शकतो, ती नंतर आवश्यक त्या ठिकाणी Paste करण्यात येईल.
6. ज्ञान केंद्र – महसूल कर्मचा-यांसाठी व अधिका-यांसाठी नेहमीच आवश्यक असणारी माहिती, संकलने, कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके, न्या‍यालयीन निर्णय, महत्वाचे लेख, अहवाल, सादरीकरणे इ. सर्व एकत्रित परंतू आपल्याला आवश्यक स्वरुपात वर्गीकरण करून ठेवण्यात आली आहेत. हे काम एकट्याला करणे अतिशय कठिण व व्यापक होते. ( साधारणता १२००० पेक्षा जास्त GR व इतर संचिका मधून निवड व वर्गीकरण करण्याचे काम खरोखरच व पूर्णांशाने एकट्याला करावे लागले ) त्यामुळे हे वर्गीकरण परिपुर्ण झाले असण्या्ची व अचूक असण्याची शक्यता कमी आहे. काही कालावधीत आपण सर्व त्यात edition व modification करणार असल्याने त्या नंतरच हा data अचूक होईल.
7. जन पीठ – प्रश्न जनतेचे – आपला महसूल विभाग पारदर्शकते बरोबरच शासनाचा उत्तरदायी विभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जनतेचा आपल्या प्रती विश्वास असतो. या विश्वासातूनच जनतेच्या काही समस्या असतील तर ते mail ने आपणाला विचारतील आणि आपणांपैकी कोणीही त्यांना उत्तर देईल. सदस्य नसलेल्या व्यक्तीसाठी या संकेतस्थळाची इतर माहिती उपलब्ध राहणार नाही ते केवळ Home व जन पीठ या दोनच Tab वरील माहिती पर्यंत पोहोचू शकतील. या माध्यमातून आपण जनतेच्याच समस्या सोडवू शकलोत तर जनतेला विश्वासार्ह सुविधे बरोबरच आपल्या मार्गदर्शनाचा आपल्या सदस्यां नाही उपयोग होणार आहे.
8. अधिका-यांचे उपक्रम – आपल्या विभागातील अनेक अधिका-यांनी नविन योजना, नव कल्पना, विविध उपक्रम आपल्या जिल्ह्यात राबविले आहेत. त्यांची पुर्ण माहिती उपलब्ध होत नाही तसेच खुप उपक्रमांना प्रसिद्धी मिळत नसल्या्ने ते सुद्धा कोणलाही माहित होत नाहीत. यासाठी हे सदर ठेवण्यात आलेले आहे. उपलब्ध माहिती आधारे सध्या यात माहिती ठेवण्यात आलेली आहे. आपण आपल्या जिल्ह्यातील माहिती Share केल्यास त्याचा उपयोग राज्यभरातील आपल्या सर्व सहका-यांना होईल.
9. विविध Weblinks & Blogs – वर्गीकरण केलेल्या स्वरुपात या ठिकाणी ह्या Links ठेवलेल्या आहेत.
10. E-Governance व तंत्रज्ञान – या सदरात E-Governance विषयीची व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनविन Softwares तसेच विविध Applications या विषयीची माहिती येथे ठेवण्यात आली आहे.
11. कला व साहित्य - या सदरात, आपले अधिकारी, त्यांचे कुटुंबीय यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. व्यंगचित्रे, छायाचित्रे, लेख, पुस्तके अशा विविध स्वरुपात आपले प्राविण्य अनेकांनी दाखवलेले असते, त्या‍ची माहिती सर्वांना करुन देण्यासाठी या सदराचा वापर करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर आपणाला वाचनात काही लेख, कविता किंवा इतर काही आवडले तर ते पण इतरांना share करावयाचे आहे,मग ते आपले स्वताचे नसले तरी चालेल.
12. फॅमिली कॉर्नर – आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी संबंधीत उपयुक्त माहिती येथे ठेवण्यात येणार आहे.
13. जेष्ठांचे बोल – आज सदस्य असणारे अधिकारी सेवानिवृत्त झाल्या‍नंतर सुद्धा या संकेतस्थळापासून निवृत्त होणार नाहीत तर ते आपल्याला सतत मार्गदर्शन करीत राहणार आहेत. तसेच सदस्य नसलेले अधिकारी सुद्धा या सदरा मार्फत आपणाला मार्गदर्शन करतील.
14. मुक्त छंद/मुक्त विचार – आवडलेले काहीही येथे टाकता येईल व येथे पाहता येईल – विषयाचे काहीही बंधन न ठेवता.
याशिवाय आपणाशी संबंधित खालील सदरे ठेवण्यात आली आहेत-
15. प्रेक्षणीय स्थळे
16. आरोग्य विचार
17. आर्थिक विचार
18. जीवन विचार
19. काही निवडक काही सुखद
20. महत्वपुर्ण घडामोडी
21. छायाचित्रे
22. सुचना व अभिप्राय
आभाराचे दोन शब्द –---
हे संकेतस्थळ निर्मीतीसाठी माझ्यावर जबाबदारी टाकणारे श्री. अविनाश ढाकणे, अध्यक्ष महसूल अधिकारी संघटना व श्री. सुरज मांढरे, विशेष कार्य अधिकारी, (मा. अपर मुख्य सचिव (महसूल)) यांचे मी आभार मानतो. तसेच, हे काम करीत असताना मला अथक सहकार्य करणारे श्री. शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर यांचा या संकेतस्थळ निर्मीतीतील सहयोग अतिशय मोलाचा आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, (खाजगी सचिव, मा. आरोग्य मंत्री) व श्री. के. आर. परदेशी, उपजिल्हा धिकारी आणि सर्व महसूल विभागाचे उपायुक्त व तेथील अधिकारी यांनी माहिती संकलनात जी मदत केली त्यामुळे संकेतस्थळ परिपुर्णतेच्या जवळ जाऊ शकते, त्या.बद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच माझे कर्मचारी मित्र श्री. पेंढारकर, वडगणे, जाजनूरकर, देशमुख व syscom चे श्री. दिपक जाधव, विनोद माळी, पत्रिके यांचे त्यांच्या अथक सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

श्री.आर.व्ही. सपकाळे

उप जिल्हाधिकारी

श्री के.आर.जोशी

नायब तहसीलदार

श्री. के.आर.जोशी

नायब तहसीलदार

श्री.जे.व्ही. वानरे

नायब तहसीलदार

श्री. ब्रिजेश पाटील

उप जिल्हाधिकारी

श्रीमती.आरती भोसले

उप जिल्हाधिकारी