मुख्य विषय
अ.क्र. मुख्य विषय विषय
डोळे

दरवर्षी करा रेटीना तपासणी

मधुमेहामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच; पण मुख्यत्वे मधुमेहामुळे रेटिनावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डायबेटिक रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. डायबेटिक रेटिनोपॅथी फक्त डायबेटिस नीट कंटड्ढोल न झाल्याने होते असे नाही. तो किती दिवसांपासून आहे यावरही रेटिनोपॅथी अवलंबून असते. असेही पाहण्यात आले आहे की, रेटिनोपॅथीसुद्धा एक प्रकारच्या जीनवर अवलंबून असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णाने दरवर्षी रेटिनाची तपासणी केली पाहिजे. रेटिनाची तपासणी हे एक स्वतंत्र तंत्रज्ञान आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे डोळ्यांत औषध टाकून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या केल्या जातात. नंतर इनडायरेक्ट किंवा क्वचित डायरेक्ट ऑफथॅलमोस्कोपद्वारे रेटिनाची पाहणी केली जाते. रेटिनाचे फोटोग्राफ फंड्स कॅमे-याद्वारे घेता येतात. एक औषध शिरेत देऊन रेटिनाच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफीही केली जाऊ शकते. कशा प्रकारे तपासणी केली त्यापेक्षा तपासणीत काय दिसले हे महत्त्वाचे. आपल्या रेटिनाची रचना अशा प्रकारे केलेली असते की, त्याच्या निरनिराळ्या लेअर्स असतात. रेटिना हे डोळ्यांच्या आतील पातळ पटल आहे. यावर आर्टरीज आणि व्हेन्स (रक्तवाहिन्या) ठराविक पद्धतीने पसरलेल्या असतात. रेटिनाच्या बाहेरील बाजूस कोराईड व डोळ्यांबाहेरील आवरण म्हणजे स्कलेरा असतो. रेटिना संवेदनशील असून त्यावर पडलेल्या प्रतिमेस ज्ञानतंतूंद्वारे ऑप्टिक डिस्कमधून ऑप्टिक नव्र्हद्वारे मेंदूस माहिती दिली जाते. ती आपणास दिसते.

लक्षणे : या रेटिनावर मॅक्यूला नावाचा अतिसंवेदनशील भाग असतो. त्याच्या मध्यास फोबिया नावाचा सर्वांत जास्त संवेदनशील भाग केवळ काही मायक्रॉनच्या साईजचा असतो. या भागावरच संपूर्ण दृष्टीची तीव्रता अवलंबून असते. मधुमेहामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यामुळे रेटिनावर जागोजाग रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो. काही ठिकाणी पांढरा पदार्थ तयार होतो. ब-याच ठिकाणी अत्यंत बारीक नव्या रक्तवाहिन्या तयार होतात (निओ व्हॅस्क्युलॅरायझेशन). या अत्यंत नाजूक असतात. म्हणून त्या फुटतात. त्यामुळे रेटिनावर रक्तस्राव होतो. वारंवार होणारे रक्तस्राव, व्हाईट एक्झिडेट्स आणि नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या यामुळे मेंबरेन तयार होते. हे मेंबरेन आकसून गेल्यास ते रेटिनाला ओढते. त्यामुळे रेटिना आपोआप बाजूला सरकतो. यास डिटॅचमेंट ऑफ रेटिना असे म्हणतात.

उपचार : हे सर्व टाळता येऊ शकते. योग्य वेळी रेटिनाची तपासणी केल्यास या रक्तवाहिन्यांवर लेसर किरणोपचार करून त्यांना फुटण्यापासून थांबवता येते. तसेच जाणारी दृष्टी रोखता येते. आज जगात मोतीबिंदू नंतर अंधत्व भिंगारोपण शस्त्रक्रियेने कायमस्वरूपी दूर करता येते; पण रेटिनोपॅथीने आलेले अंधत्व पूर्णपणे दूर करता येत नाही, तर दृष्टीस येणारे नुकसान थांबवता येते. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये लेसर उपचारास फार महत्त्व आलेले आहे. ब-याच वेळेस हा उपचार वारंवार करण्याची गरज भासते. जागतिक पातळीवर व्हिजन २०२०, तर भारतात केंद्र सरकारने याला अंधत्व निवारणात खूप महत्त्व दिले आहे. यासाठी सरकारी पातळीवर बरेच कार्यक्रम राबवले जात आहेत. हा उपचार अत्यंत सुलभ आणि रुग्णास त्रास न होता करता येतो. यात कोठेही कापाकापी किंवा जखम होत नाही. योग्य उपचारांनंतर रुग्णास लवकर घरी जाता येते. डोळ्यांना पट्टी किंवा चष्मा लावण्याची गरज नसते. मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय किंवा उपचार करू नये.

त्वचा

उन्हाळ्यात अशी राखा त्वचेची निगा

आपण भारतीय साधारणत: गव्हाळ ते काळ्या रंगाचे मानले जातो. म्हणजे स्कीन टाईप त्वचा साधारणत: काळवंडते व क्वचितप्रसंगी रापते. सूर्यप्रकाशाचा आपला ठेवा समृद्ध आहे. त्यासाठीच त्वचेची काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रदूषण, धूळ, याबरोबरच जेव्हा वातावरणातील उष्मा आणि दाहकता वाढते, तेव्हा नैसर्गिक संरक्षण रचना आपल्या कामास सुरुवात करते. त्वचेमधील मेलॅनियम हे रंगद्रव्य प्रकाशकिरणे परावर्तित करते. त्वचेच्या वरच्या आवरणात असलेल्या घामाच्या ग्रंथी आद्र्रता राखण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आपल्या मज्जातंतूंचा -जे मेंदूशी जोडलेले असतात- उपयोग होतो. तापमानातील बदल नोंदवून त्याप्रमाणे त्वचा थंड ठेवली जाते.

काळजी कोणी घ्यावी

उन्हापासून बचाव करणे सर्वांनाच गरजेचे आहे. तरीसुद्धा जुने त्वचारोग असणारे, वृद्ध आणि लहान मुले याबाबतीत जास्त संवेदनशील असतात. वरील लोकांच्या त्वचेची क्षमता आद्र्रता कमी झाल्यामुळे नैसर्गिक संरक्षण कमी झाल्यामुळे आधीच कमी असते. अंतर्गत विकार उदा. डायबिटिस असलेले लोक व व्यवसायानिमित्त उन्हात हिंडणा-यांनासुद्धा उन्हाचा मोठा त्रास होतो. अर्थातच आपला चेहरा व सौंदर्याबाबत जागरूक तरुण-तरुणींना विसरून चालणार नाही.

कारणे

सूर्यप्रकाश हा १०० ते ४०० एनएम अशा वेव्हलेंथमध्ये विभागलेला असतो. त्यातही यूव्हीबी आणि यूव्हीए २९० ते४०० ही घातक किरणे त्वचाविकार तयार करू शकतात. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत याची तीव्रता सर्वाधिक असते. साधारणत: ज्याला आम्ही शॉर्ट यूव्हीबी मानतो तो २९०-३२० पर्यंतचा किरण त्वचेच्या वरील स्तरावर शोषला किंवा परत फेकला जातो. मात्र त्वचेचे नुकसान व्हायला सुरुवात होते.

सामान्यपणे या काळात दिसून येणारे विकार

मिलियारिया (घामोळ्या) : त्वचेवरील घामाच्या ग्रंथी त्यांची रंध्रे बंद झाल्यामुळे होणारा एक विकार. वरील आवरणाच्या ४ प्रमुख स्तरांपैकी जो स्तर गुंतलेला आहे, त्या प्रमाणात त्याची तीव्रता अवलंबून असते. लालसर रंगाचे चट्टे, पाणी भरल्यासारखे फोड येतात. खाजवल्याने जंतूंचा प्रादुर्भाव होतो.

पॉलिमॉर्फिक लाईट इरप्शन

अ‍ॅलर्जिक स्वरूपाचा विकार. उन्हात गेल्यावर चेहरा, मानेवर, हातावर आग होणे, लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. गजकर्ण आणि जंतुसंसर्ग. घाम साचून राहिल्याने प्रक्रिया होऊन अमोनिया व यूरियासारखे घटक त्वचेत खाज निर्माण करतात. त्यात नव्याने जंतुसंसर्ग होतो. हात आणि पायाची बोटे, बगल, मांड्यांमध्ये हे संसर्ग होतात. वरील आजारांव्यतिरिक्त इतर अनेक वेगळ्या श्रेणीतले त्वचाविकार या दिवसांत होतात. काही अंतर्गत व्याधीमुळे त्रास होतो. काही वेळेस औषधांमुळेसुद्धा हे विकार वाढतात.

उपाययोजना

काळजी व निगा कशी राखावी- आहारात प्रथिने, व्हिटॅमिन्स, पाण्याचे प्रमाण भरपूर असावे. सूर्यकिरणे परावर्तित होतील असे हलके, कॉटन, सुती पांढ-या, फिकट रंगाचे कपडे, गोल हॅट, पांढ-या बाह्याचा अ‍ॅप्रन, पांढरे हातमोजे

वापरावेत. लहान मुुुलांसाठी मेडिकेटेड टाल्कम पावडर, क्रीम उपलब्ध आहेत. शरीरावर घाम साचू देऊ नये. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चेहरा, मान, पाठीवर, हातावर सनस्क्रीन लोशन आवश्यक ठरते. कॅलमिन लोशनपासून एसपीफ-५० पर्यंत ते उपलब्ध आहेत, पण व्यक्ती-व्यवसाय व इतर कसोटीनुसार त्याचा उपयोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. सनस्क्रीन लोशन चैन नसून आवश्यकता आहे. दर तीन-चार तासांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन पुन्हा लावावे.

महत्त्वाचे- विशेष शारीरिक हालचाल नसणारे, स्थूल, आजारी व्यक्तींनी गच्च बसणारे कपडे, सॉक्स टाळावेत. घामाच्या दुर्गंधीसाठी अनेक डिओडरंट व साबण उपलब्ध आहेत, पण जाहिरातीवर जास्त विसंबून राहणे नेहमीच टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या

त्वचेला श्वास घेऊ द्या ! उन्हाळा तुमची वाट पाहात आहे. -

हृदय

हृदयविेकार म्हणजे काय?

हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणा-या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात. जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात.हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायूंमुळे हृदयाला होणा-या रक्तपुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टिव हार्ट फेल्युअर) होतो व त्यामुळे पावलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.

हृदयविकार का होतो ?

आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थर साठू लागतात, ज्यात कोरोनरी आर्टरीचा देखील समावेश असतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तपुरवठ्यात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांच्या अशा पद्धतीने चिंचोळ्या होण्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात.

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला सेक्स हार्मोन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमुळे सुरक्षित आहेत. याचा प्रभा कमीत कमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

- धूम्रपान करणे
- मधुमेह
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- उच्च कोलेस्टेरॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल
- शारीरिक श्रमाची कमतरता
- अनुवंशिकता
- तणाव, रागीटपणा आणि चिंता
- वंशानुगत मुद्दे

काय लक्षणे असतात ?
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यत:

- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे हीदेखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात.
- तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- इतर लक्षणे जसे मळमळ, उलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
- काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन मृत्यू येतो.

हृदयविकार कसा ओळखला जातो ?

डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.

इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.

ईसीजीमुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.

मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येते.

छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.

हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.

कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अॅ्न्जियोग्राम हा निर्णायक साबीत होतो.

हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णास काय प्रथमोपचार द्यावे ?

हृदयविकारावर झटकन ऊपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे. जर ऑॅक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑॅक्सिजन द्यावे. जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ढवळून अॅॅस्प्रीन द्यावे.

हृदयविकारावर काय उपचार असतात ?

हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनिटे आणि तास जरा संकटपूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात. हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते. जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. यात कोरोनरी अॅेन्जियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

हृदयविकारापासून बचाव कसा करता येतो?

हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत :

जीवनशैलीत परिवर्तन :

- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल - कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत असावे.
- वजन जास्त असणा-यांनी वजन कमी करावे.
- शारीरिक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
- धूम्रपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
- मधुमेह, रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणा-यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.

सर्वसाधारण माहिती

वृद्धत्व आणि अँटी ऑक्सिडंट

आपले शरीर आपणास एक वाटत असते, पण त्याच्या अंतर्गत भागात अगणित पेशींचे जिवंत अस्तित्व असते. प्रत्येक पेशी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपण घेतलेले अन्नपाणी, प्राणवायू शरीरभर फिरून पेशीत जाऊन पोहोचतात व पेशींमधील एनर्जी कायम राखतात. पेशींमधील नको असलेल्या रसायनांना ऑक्सिडंट्स अथवा फ्रीरॅडिकल्स म्हणतात. त्यांचा निचरा करण्याचे काम अँटी ऑक्सिडंट्स करतात. त्याचा समतोल बिघडल्यास अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी पडते व पेशींची कार्यक्षमता कमी पडते. नंतर वार्धक्याचे दुष्परिणाम चालू होतात. याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हृदयविकार व रक्तवाहिन्यांवरील घेतलेल्या औषधांनीदेखील पेशींची कार्यक्षमता कमी होते. सिगारेट, दारू ही व्यसने व हवेतील प्रदूषण हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत.

आपल्या आहारात शरीरास पोषक असणारे, शरीराची झीज भरून काढणारे, वाढ करणारे घटक असतात. त्यापैकी फॅट्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बाेहायडड्ढेट, पाणी आपल्या शरीराचा एक भाग होऊन राहतात. विविध बायोकेमिकल्स हा समतोल राखण्यास मदत करतात. व्हिटॅमिन्स, एन्झाइम्स, को-एन्झाइम्स हार्माेन्स इत्यादींचा यात समावेश असतो. प्रत्येक पेशीमध्ये अनेक घटक कार्यक्षम असतात. त्यापैकी टोकॉडिड्ढयामध्ये ऊर्जेचा भरपूर साठा असतो. वृद्धापकाळात दुखण्यामुळे व अशक्तपणामुळे अँटी ऑक्सिडंट्स खूपच कमी झालेले असतात. पार्किन्सन्समुळे पेशंटची अवस्था फारच परावलंबी होेते. याशिवाय न्यूरॉलॉजिकल्स, रक्तदाब, मूत्रपिंडाची दुखणी, डायबिटीस या सर्वांसाठी अँटी ऑक्सिडंटस उतारवयात घेणं अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे उतारवयातील आजारांवर घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम अँटी ऑक्सिडंट्सच्या एका गोळीमुळे नक्कीच टाळू शकतात.पौष्टिक तसेच चौरस आहारात हिरव्या भाज्या, सफरचंद, केळी, पेरू, पपई, संत्री, मोसंबी इत्यादी फळे, द्विदल धान्य, दही, अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, शेंगदाणे इत्यादींचा समावेश होतो. हाडे बळकट करण्यासाठी कॅल्शियम व त्याचे शरीरात नीट पोषण व्हावे म्हणून व्हिटॅमिनही घ्यायला पाहिजेत. अँटी ऑक्सिडंट्समध्ये सर्व व्हिटॅमिन्सशिवाय लायकोपेन, सेले नियम असतात. सध्या बाजारात ींीळलेलरश्र, ीशपशूीश, रर्लीीश्र्रीींसारखे अँटी ऑक्सिडंट्स मिळतात.

शेवटी तेल, तूप, मीठ आणि साखर यांचा मर्यादित वापर असलेले अन्न खावे, सात्विक आहारामुळे पचनशक्ती व ग्रहणशक्ती टिकून राहते. हृदयविकार, डायबिटीस व स्थूलता तसेच कॅन्सर इत्यादी व्याधींमध्ये आहारात बदल करावा. सकाळी फिरणे, योगा करणे नक्कीच तुम्हाला आजारांपासून दूर ठेवील व तुम्ही आनंदी जीवन जगाल.

व्यायाम

व्यायामाचा कंटाळा नको

सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम सगळेच जाणतात; पण लोकांना हे माहीत नसते की, एक पाकीट सिगारेट पिण्याने जितके नुकसान होते त्यापेक्षा अधिक नुकसान एक आठवडा व्यायाम न करण्याने होते. यासाठी आठवड्यातून कमीत कमी चार दिवस किमान ४५ मिनिटे व्यायाम जरूर करा.

आजारांपासून बचाव होतो : व्यायाम आजारांपासून बचाव करण्यात प्रमुख भूमिका बजावतो. यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली होतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा संपूर्ण शरीर गतिमान होते. त्यामुळे शरीर चांगलेच राहते. व्यायामामुळे हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांपासून बचाव होतो.

प्रतिकारशक्ती वाढते : जर तुम्ही व्यायाम करत असाल तर शरीराला ऊर्जेची गरज असते. अ‍ॅरोबिक व्यायामामध्ये हालचालींबरोबरच शारीरिक व्यायाम जास्त होतो. उदा. सायकलिंग, वॉकिंग इत्यादी. यामुळे तुमचा स्टॅमिनाही वाढतो.

मसल्स बिल्डिंग : बेट टड्ढेनिंगसारख्या व्यायाम मसल्ससाठी जरूरी आहे. यामुळे लिगामेंट आणि हाडांना याचा फायदा होतो. यामुळे तुमचा पॉश्चर, मसल्स जास्त सुधारतात.

लवचीकता : चांगल्या पॉश्चरसाठी स्टड्ढेचिंगची आवश्यकता आहे. यामुळे शरीराची लवचीकता वाढते. तुम्ही पाहिजे तसे शरीर वाकवू शकता. लवचीकतेमुळे शरीराला इजा होण्याचा धोका कमी असतो.

सर्वसाधारण माहिती

पाणी भरपूर प्या

घराबाहेर तीन-चार तास घालवणा-या लोकांना तहान लागत नसावी काय? निश्चितच लागते. मग ते जिथे जसे मिळेल तसे पाणी पितात व विविध आजारांना निमंत्रण देतात.दूषित पाण्यामुळे होणारे विकार व विशेष म्हणजे त्याच्या जीवघेण्या तीव्रतेबद्दलच्या अज्ञानामुळे दरवर्षी लक्षावधी लोकांचा बळी जातो. कोट्यवधी रुपये औषधोपचार करण्यात अक्षरश: वाया जातात.

आजारांचा ९० टक्के फटका बालकांना : शुद्ध पिण्याच्या पाण्याअभावी दरवर्षी कॉलरा व हगवणीसारख्या आजारांमुळे १६ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात पाच वर्षांखालील बालकांची टक्केवारी ९० आहे. दूषित पाण्यामुळे १६ कोटी लोकांना शिस्टोसोमिएसिसची लागण होऊन त्यापैकी लाखो लोक मरण पावतात. ५० कोटी लोकांना टड्ढकोमा नामक संक्रमण होऊन कित्येक लाख लोक आंधळे होतात. दूषित पाण्यामुळे १५ लाख लोकांना कावीळ (हिपॅटायटिस) होतो, तर १३ कोटी लोकांना जंत होतात. अशिक्षित जनतेमध्ये या समस्येची तीव्रता अधिक असली तरी सुशिक्षित लोकांमध्ये असणारी बेदरकार वृत्ती आश्चर्यकारक आहे. जलप्रदूषणाचा फटका : नैसर्गिकरीत्या होणारे जलप्रदूषण म्हणजे पाण्यातील माती, वाळू, चिखल इत्यादी घटक. पाण्यात कार्बन डाय ऑक्साईड, नायटड्ढोजन, हायडड्ढोजन सल्फाईड वायू, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी विविध क्षार विरघळलेल्या स्थितीत असतात. औद्योगीकरण व शहरीकरणामुळे पाण्याचे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी अधिक घातक असते. पाण्यात विविध नैसर्गिक व मानवाच्या चुकींच्या वर्तनामुळे विषाणू, जिवाणू, प्रोटोझुआ, हेलमिंट(जंत) यांची वाढ होते व फैलाव होतो. अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया), प्रोटोझुआ, लेप्टोस्पायरा, हेलमिंट (जंत) रसायने व धोकादायक धातू असे एका ना अनेक घटक असतात. पाण्यातच राहणा-या विविध प्रकारच्या किडे, अळ्या, जीवजंतू, प्राण्यांमुळे पाणी हे एक धोकादायक पेय ठरते.

उपाययोजना :

उकळून मिळवा शुद्ध पाणी : पाणी पिण्यायोग्य करण्याचा साधा व सर्वांत सोपा उपाय म्हणजे पाणी उकळून व त्यानंतर थंड करून पिणे. पाणी उकळल्यामुळे अनेक जिवाणू, इतकेच नव्हे तर कित्येक प्रकारचे विषाणू नष्ट होतात. याशिवाय स्वच्छ कापडाने पाणी गाळून पिण्यासाठी साठवल्यास ब-याच समस्या कमी होऊ शकतात. ब-यापैकी कालावधीसाठी पाणी साठवल्यास गाळ, तळाला जमा होतो व ते गढूळ पाणी पिण्यापेक्षा नक्कीच बरे ठरते. आजकाल पाणी शुद्ध करण्याची विविध उपकरणे उपलब्ध आहेत. त्यासाठी काही हजार रुपये खर्च करणे दूषित पाणी पिऊन होणा-या आजारांवर पैसे खर्च करण्यापेक्षा अधिक धोरणात्मक ठरेल. घरातून बाहेर पडताना स्वत:चे पाणी स्वत:सोबत न्यायची सवय लावा.

वापरातील पाण्यानेही आजार : पिण्याच्या पाण्यामार्फतच नव्हे तर शारीरिक स्वच्छतेसाठी, विशेषत: तोंड धुण्यासाठी, जेवणासाठी, भांडी धुण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्यामुळे, जलतरण तलावातील पाण्यामुळेसुद्धा अनेक आजार पसरतात.

स्वच्छ व शुद्ध पाण्याबाबत थोडी जागरूकता व चांगल्या सवयींच्या आचरणामुळे अनेक दुर्धर, जीवघेण्या, त्रासदायक व महागड्या आजारांपासून स्वत:चा व आपल्या कुटुंबियांचा बचाव करता येऊ शकतो.

लहान मुलांसाठी

बाळाच्या आरोग्यासाठी...

बाळाची सुदृढता खरे तर शारीरिक व बौद्धिक वाढ तसेच आजारी पडल्यावरचे प्राथमिक

उपचार व परत आजारी पडू नये म्हणून करावयाचे प्रयत्न यावर अवलंबून असते. बाळाला पहिले सहा महिने फक्त अंगावरचेच दूध पाजावे. दूध चांगले येण्यासाठी आईने चार वेळा

जेवावे. नाश्ता वेगळा करावा. संपूर्ण विश्रांती घ्यावी अन् मन प्रसन्न ठेवावे. त्यासाठी माहेरी राहणे श्रेयस्कर! सर्व प्रकारचे अन्न आईने खाल्ले तर बाळालाही सर्व घटक मिळतात. सहा महिने फक्त अंगावर पिणारे मूल क्वचितच आजारी पडते. अशा मुलांना जुलाब, उलट्या अशा आजारांत औषधांची गरजच नसते. टाळू तुम्ही भरल्याने भरून येत नाही म्हणून तेलाने माखणे बंद करावे. मानेखाली तेल लावून थोडा वेळ कोवळ्या उन्हात ठेवून नंतर आंघोळ घालणे जरूर सुरू ठेवावे. मात्र, कानात, नाकात आणि बेंबीत तेल घालायला आपले बाळ मशिन नाही हे लक्षात ठेवा. त्याला वंगणाची गरजच नाही. धुरी देणे, काजळ लावणे, रडले की वरचे दूध देणे हे अशास्त्रीय आहे. एक महिन्याची मुले संध्याकाळी वातावरणाचा कंटाळा आल्यावर रडतात. त्यांना फिरायला न्यावे. मुलांची बुद्धी पहिल्या एक-दोन वर्षांत वाढत असल्याने वयानुसार खेळणी कोणती द्यायची, वातावरण कसे ठेवायचे याची माहिती करून घ्यावी. जन्मत: पहिले ३ महिने बाळाशी गप्पा माराव्यात, खुळखुळे व चिमण्या आणून त्याला खेळवावे. रेडिओ किंवा टेप बाळापासून ३ फूट अंतरावर ठेवून गाणी ऐकवावीत. जन्मापासून ६ वर्षांपर्यंत शास्त्रीय आधारावर बौद्धिक कार्यक्रम देता येतो. मोठ्या व लहान स्नायूंचा विकास, बौद्धिक व सामाजिक विकास, व्यक्त व ग्रहण भाषा विकास अशी मुलांची वाढ मोजली जाते. -

सौंदर्य

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा

त्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेह-यावरील मेकअप न काढल्यास तो चेह-यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेह-याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.

पुनर्निर्माण प्रक्रिया

रात्रीच्या वेळी त्वचा जलद रिकव्हरीच्या स्थितीत असते. म्हणजे हानी पोहोचलेल्या पेशींच्या जागी नव्या पेशी येतात आणि नव्या पेशी विकसित होत असतात. ही प्रक्रिया त्वचेसाठी महत्त्वाची असते. रात्री चेह-यावर मेकअप असल्यास ही प्रक्रिया बाधित होते. परिणामी त्वचा निस्तेज आणि सुरकुत्या असल्यासारखी दिसते.

सुरकुत्यांना आमंत्रण

झोपताना चेह-यावर फाऊंडेशन, पावडर किंवा ब्लश लावलेला असल्यास त्वचेच्या नैसर्गिक तजेलपणाला नुकसान पोहोचते. याच्यामुळे त्वचा निस्तेज होत सुरकुत्या येण्याची प्रक्रिया सुरू होते. अवेळी वयस्क होण्याचा धोका कमी करायचा असल्यास अशी चूक करू नये.

चेह-यावर येतात फोड

५५०० वेळा प्रत्येक व्यक्ती एका दिवसात आपल्या चेह-याला हात लावतो. अशाने अजाणतेपणे अनेक अपायकारक बॅक्टेरिया किंवा धुलीकण चेह-याला चिकटतात. झोपताना चेहरा साफ न केल्यास मेकअप, धुळीचे कण आणि त्वचेतून निघणा-या तेलकट पदार्थामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होतात. अशाने चेह-यावर मुरूम किंवा काळ्या डागांची समस्या निर्माण होते.

आरोग्यदायी त्वचेसाठी

त्वचेवर असणा-या रंध्रांमुळे घाम येणे आणि सिबमची निर्मिती या क्रिया होत असतात. सिबम हा असा तेलकट पदार्थ आहे, जो त्वचेतील तजेलदारपणा टिकवणे आणि सुरक्षा देण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे मृत पेशींना हटवण्यात मदतीचा ठरत असतो. मेकअप स्वच्छ न केल्यास रंध्रे बंद होतात आणि सिबमची कार्यप्रणाली प्रभावित होते.

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे हा त्वचा आरोग्यदायी ठेवण्याचा एक चांगला पर्याय आहे. मेकअप करणा-या महिलांनी ही गोष्ट आवर्जून केली पाहिजे.

त्वचा

सोरायसिस व त्वचारोगावर चिकित्सा उपलब्ध

शरीर, मन, सांैदर्य व आरोग्याचा आरसा असणारी त्वचा म्हणजे प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. हीच त्वचा जेव्हा रोगग्रस्त होते तेव्हा मनुष्य चिंताग्रस्त होतो, डिप्रेशन यायला लागते, आत्मविश्वास कमी होऊ लागतो, तारुण्यपिटिका, पांढरे कोड, सोरायसिस, इसबगोल, एक्झिमा, चामखिळ, हातापायांना भेगा पडणे, सनबर्न यांसारख्या आजारांनी शारीरिक व मानसिक अस्वस्थपना उत्पन्न होतो.

यापैकी सोरायसिस हा आजार गंभीर व चिवट स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या काळात फक्त कोंडा म्हणून सुरुवात झालेला विकार हळूहळू शरीरात घर करून राहतो व गंभीर स्वरूप धारण करू लागतो. त्वचेवर खवले पडायला लागतात, त्वचेवर लालसर, उभट गोल चट्टे निर्माण होतात, त्वचा फुगीर बनते, त्वचेला खाज येणे, त्वचेचा दाह होणे अशा प्रकारची एक किंवा अनेक लक्षणे उत्पन्न होतात.

म्हणूनच सुरुवातीचा कोंडा हा साध्या स्वरूपाचा समजून त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य तज्ज्ञांकडून त्यावर औषधोपचार करून घेणे फायदेशीर ठरते.

असा सोरायसिसग्रस्त रुग्ण मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. जो भाग लपविण्यासारखा असतो तो भाग संपूर्ण कपडे घालून लपविण्याचा प्रयत्न केला जातो. दर्शनीय भागात त्वचेने उग्र स्वरूप धारण केल्यास त्यास चार लोकांमध्ये, समारंभामध्ये मिसळणे व लोकांची वाईट दृष्टी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे नकोसे होते.

ज्या व्यक्तींची जीवनशैली दगदगीची आहे, ज्यांना सतत मानसिक ताण-तणाव असतो, ज्यांची शांत झोप होत नाही, दमट वातावरण, सतत एसीमध्ये काम, आम्ल पदार्थ, तिखट-मसालेदार पदार्थ, मांसाहार, तंबाखू, व्यसने यांचे अतिप्रमाण असलेल्यांमध्ये सोरायसिस होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. डोक्यामध्ये, कानाच्या मागे, हाताचे कोपरे, गुडघा या भागावर सोरायसिसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये आयुर्वेदातील शरीर शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे पंचकर्माद्वारे सोरायसिस हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु रुग्ण अवस्थेनुसार यास ६ महिने ते २ वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, तक्रधारा, शिरोधारा व आभ्यंतर आयुर्वेदिक औषधींद्वारे सोरायसिसवर उपचार केला जातो. याबरोबरच रुग्णाचे मानसिक बळ वाढविण्यासाठी त्यास समुपदेशन करणे, त्यास धीर देणे, आहाराचे व राहणीमानाची सर्व पथ्ये समजावून सांगितली जातात. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केल्यास परिणाम लवकर मिळतात व विकार कायमचा बरा होतो. या औषधांचे शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नसून उपचार बंद केल्यावर १० ते १५ वर्षांनंतर सोरायसिस उद्भवला नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय येथे मागील बारा वर्षांच्या काळात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. संपर्क फोन नंबर- ०२३८२ २२१३६४

द्वारा- डॉ. पवन लड्डा

लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय, लातूर

हृदय

हृदयातील छिद्रांवर विनाशस्त्रक्रिया उपचार!

माणसाच्या हृदयावर परिणाम होण्याची

सर्वसामान्य कारणे म्हणजे अल्परक्तताजन्य हृदयरोग, संधिवाती हृदयरोग आणि जन्मजात हृदयरोग. अल्परक्तताजन्य हृदयरोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे. संधिवाती हृदयरोगाचे प्राबल्य कमी होते आहे. मात्र दुसरीकडे जन्मजात हृदयरोगांचे प्राबल्य जगभर तसेच राहिले आहे. ते ८-१०/ १००० जन्मांमागे या प्रमाणात असल्याचे विविध अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे. भारतातील १० टक्के बालमृत्यूदरा-

मागे जन्मजात हृदयरोग आहे. लहान मुलांसाठी हृदयरोग सेवा भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे.

हृदयातील जन्मजात व्यंगाचे अचून निदान होऊ शकते. ईसीजी, एक्स-रे, २ डी-इको, कार्डियाक कॅथरायझेशन आणि एमआरआय अशा विविध निदान चाचण्यांच्या शोधामुळे हृदयातील जन्मजात व्यंगाचे अचूक निदान होऊ शकते. बहुतांश जन्मजात हृदयरोग एएसडी, व्हीएसडी आणि पीडीए या हृदयातील छिद्रामुळे होतात. या व्यंगांमुळे रुग्णांना संसर्गजन्य हृदयस्तरशोथ,

आवर्ती प्रजनन मार्ग संसर्ग आणि आयसेन्मेन्जरयझेशन असे त्रास होतात. म्हणून योग्य वेळी उपचार केल्यास मुलांच्या समस्या ब-या होतात. हे उच्च रक्तदाब/मधुमेह किंवा हृदय अभिशोष यावर कायमचा उपचार नाही अशा हृदयविषयक समस्यांच्या अगदी उलटे आहे.

जर हृदयातील छिद्रे अगदी लहान असतील तर उपचारांसाठी वैद्यकीय थेरपी, ओपन हार्ट शस्त्रक्रिया आणि परक्युटॅनियस कॅथेटर आधारित उपचारांचा समावेश आहे. रुग्ण तसेच डॉक्टरांकडून दुर्लक्ष, आर्थिक समस्या, रुग्णालयांची भीती आणि ओपन हार्ट शस्त्रक्रियेची भीती यामुळे बहुतांश रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये वाढती जागरूकता, २ डी इकोसारख्या निदानास उपयुक्त चाचण्यांचा वापर, राजीव गांधी योजना, राष्टड्ढीय ग्रामीण आरोग्य अभियान यांसारख्या विविध योजनांची सोय असताना मुख्यत: ओपन हार्ट शस्त्रक्रियेच्या भीतीमुळेच लोक उपचारांपासून दूर राहात आहेत. पण आता ही बहुतांश छिद्रांवर उपकरण वापरून शस्त्रक्रियेविनाच उपचार केले जाऊ शकतात.

कॅथेटरद्वारे हे उपकरण हृदयात बसवले जाते. अशी उपकरणे पाश्चात्त्य देशात दोन दशकांपूर्वीपासूनच वापरात आहेत. भारतात अजूनही निवडक रुग्णालयांमध्येच पण चांगल्या निष्पत्तीसह ही उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे निटिनॉलपासून बनवली जातात;

हा निकेल आणि टिटॅनियमचा मिश्रधातू आहे, जे मानवी शरीराला १०० टक्के अनुरूप आहे. कोणतीही क्षती न करता ते मानवी शरीरात संपूर्ण आयुष्यभर राहतात. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शारीरिक क्रियेत किंवा गर्भावस्थेत अडथळा येत नाही. ही उपकरणे शरीरात बसवल्यावर १-६ महिने अ‍ॅस्पिरिनची थोडी मात्रा घेण्याची गरज असते. जांघेतील धमनीत एक बारीकसे छिद्र करून कॅथेटरच्या सहाय्याने हे उपकरण हृदयात बसवले जाते. यासाठी हृदय उघडणे तर सोडाच, एकही टाका घालावा लागत नाही. शस्त्रक्रिया केली तर उरोभागाला छेद द्यावा लागतो. हृदय बंद करून ते बायपास मशिनवर टाकले जाते. सामान्यत: रुग्णाला एक दिवसासाठी यांत्रिक श्वास प्रणालीवर ठेवले जाते आणि रुग्णाला २ दिवस आयसीयूमध्ये ठेवले जाते. त्याला रुग्णालयातून ५ दिवसांपूर्वी सुटी दिली जात नाही. टाके घातलेल्या ठिकाणी संसर्ग होण्याची जोखीम असते. पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज, जसे बायपास, हा एक मोठा मुद्दा असतो.

सर्वसाधारण माहिती

पोटदुखीचे योग्य कारण शोधा

पोटदुखी वारंवार होत असेल तर निदान करणारी व्यक्ती अनुभवी आणि तज्ज्ञ असावी लागते. निर्णय घेण्यातील दिरंगाई किंवा चूक एखादेवेळी जीवघेणी ठरू शकते. प्रत्येक वेळी पोटदुखीचा होणारा त्रास हा नेमका कशामुळे होतो आहे, याचे निश्चित निदान करता आले तरच त्यावरील उपायाबद्दल खात्री देता येते. अंदाजावर आधारित उपाय योग्य ठरले तर ठीक, परंतु योग्य निदानाच्या अभावी केलेल्या उपचारात धोका संभवतो.एखादे वेळेस निदान योग्य झालेले नसताना रुग्णाला बरे वाटावे या हेतूने केलेले उपचार फसवे ठरू शकतात. यामुळे रुग्णाला काही काळ बरे वाटेल पण मूळ विकार तसाच राहतो. तो वाढत जातो आणि गंभीर स्वरूप धारण करतो. उदा. रुग्ण डॉक्टरला उलटी झाल्याचे सांगतो, त्याला उलटी थांबवण्याचे औषध सुचवले जाते. त्यामुळे रुग्णाला बरे वाटते. पण पोटात अपेंडिसायटिससारखा आजार आत राहतो. काही तासांनी अपेंडिक्स फुटले तर जीवघेणे दुखणे सुरू होते. प्रथम पोट तपासूनच नीट निदान करून मगच उपचार करावे लागतात. पोटदुखीची रुग्णांची तक्रार असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. कोणत्याही उपचाराचा पाया शास्त्रशुद्ध निदान हाच असला पाहिजे, असे निदान झाल्याशिवाय उपचार करणे चुकीचे आहे. अगदी तात्पुरते बरे वाटण्यासाठी जुजबी उपचार कधी - कधी क्षम्यही असतात. परंतु तत्काळ बरे वाटण्यासाठी केलेल्या निदानाचा पाठपुरावा न करणे घातक ठरते. रुग्णाला बरे वाटणे ही स्थिती रुग्णाला आणि उपचार करणा-यालाही फसवी असू शकते. पोट नेमके दुखते कोठे? पोट कोणत्या अवयवाच्या कामातील बिघाडाने हे समजणे ही निदानाची पहिली पायरी आहे. बहुतेकवेळा पोटातील एखादा अवयव पोटदुखीला जबाबदार असतो. जठर, लहान आतडे, आंत्रपुच्छ (अपेंडिक्स), मोठे आतडे, लिव्हर(यकृत), प्लिहा (स्पलिन), स्वादूपिंड(पॅनक्रियास), पित्ताशय (गॉलब्लायडर), मूत्रपिंड (किडनी), मूत्रवाहिन्या (युरेटर), मूत्राशय (युरिनर ब्लॅडर), पुरस्त ग्रंथी (प्रोटेस्ट) असे अनेक अवयव आपल्या पोटात असतात. या प्रत्येक अवयवाची पोटातील जागा ठरलेली असते. दुखण्याच्या जागेवरून अवयवयाचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांना येतो. उदा. पोटाच्या उजवीकडे खाली दुखले तर आंत्रपुच्छाचा दाह (अपेंडिसायटिस), ची शंका येईल. उजवीकडे वर बरगड्याखाली दुखल्यास जठराचा आणि बेंबीच्या आसपास दुखल्यास लहान आतड्याचा विचार करावा लागतो. कमरेच्या वरच्या भागात दुखल्यास एका बाजूचे दुखणे असल्यास मूत्रपिंडाचा, पाठीला पट्ट्यासारखे दुखले तर स्वादुपिंडांचा विचार करावा

लहान मुलांसाठी

लहान मुलांतील ल्युकेमियावरही उपचार

ल्युकेमिया या गटात मोडणा-या आजारात शरीराच्या बोन मॅरो या भागात मोठ्या प्रमाणावर असाधारण पांढ-या रक्तपेशींची निर्मिती होते. मुळात या बोन मॅरोचे महत्त्वाचे कार्य म्हणजे लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), प्लेटलेट्स आणि पांढ-या रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स) या पेशींची निर्मिती करणं हे आहे. शरीराला होणा-या जंतुसंसर्गाचा (इन्फेक्शन) मुकाबला करण्याचे मोलाचे कार्य या पांढ-या रक्तपेशी करत असतात.

ल्युकेमियाग्रस्त रुग्णात एकीकडे पांढ-या भिन्न व असाधारण पेशींची वेगात वाढ होत असताना दुसरीकडे त्याच बोन मॅरोची लाल रक्तपेशी व प्लेटलेट्सची निर्मिती मंदावते. अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा लहान मुलांत सर्वाधिक आढळणारा ल्युकेमियाचाच एक प्रकार. सुरुवातीला या रोगाची लक्षणे सौम्य असली तरी हा रोग झपाट्याने वाढत जातो. अखेरीस या रोगग्रस्त रुग्णाची अनेक संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती क्षीण होते. ल्युकेमियाचे निदान होणे ही त्या मुलाच्या कुटुंबाचे मनोधैर्य उद्ध्वस्त करणारी घटना असते. ल्युकेमियावरचे खर्चिक उपचार कुटुंबाला खचितच परवडणारे असतात. कॅन्सर स्पेशालिस्ट (ऑन्कोलॉजिस्ट्स) तपासण्या करतात, उपचार सुचवितात. उपचार करणा-यात मग त्यांच्याबरोबरच बालरोगतज्ज्ञाचा, नर्सेसचा, सायकोलॉजिस्टचा समावेश असतो. उपचारात केमोथेरपी, गरज भासल्यास रेडिओथेरपी उपचार पद्धतीचा समावेश असतो.

लक्षणे : ल्युकेमियाच्या प्रकारानुसार रुग्णात लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णात त्या लक्षणाची तीव्रता वेगात वाढत जाते. अशा रुग्णात : १. वजनात घट २. अशक्तपणा ३. सौम्य ताप ४. हाड किंवा सांधे दुखणे ५. पांढरटपणा (हिमोग्लोबिनची कमतरता) ६. प्लेटलेटस्ची निर्मिती घटल्याने थोडं खरचटलं तरी रक्तस्राव होणे ७. जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्भवणे. लक्षणे आढळून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या प्रकारानुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.

गुंतागुंती : शरीरातल्या वेगवेगळ्या भागात रक्तस्राव आणि जीवघेणे जंतुसंसर्ग या ल्युकेमिया या आजाराच्या गुंतागुंती होत. योग्य उपचार केले नाहीत तर इतर कॅन्सरप्रमाणे ल्युकेमिया जीवघेणे ठरतात. त्यात सुरुवातीला उपचारांना यश आले तरी पुन्हा ल्युकेमिया उद्भवण्याची शक्यता असतेच. शिवाय उपचाराचे अनेक साईड इफेक्टही असतात.

यांना ल्युकेमियाचा धोका अधिक : रेडिएशनची बाधा झालेल्या किंवा वेगवेगळ्या डड्ढग्जचा परिणाम म्हणून ल्युकेमिया होतो. जर एका जुळ्यातील मुलाला ल्युकेमिया झाला तर दुस-या जुळ्यालाही ल्युकेमिया होण्याची शक्यता अधिक असते. डाउन्स सिंडड्ढोम असलेल्या मुलांत ल्युकेमिया मोठ्या प्रमाणावर आढळतो. दोन ते सहा या वयोगटातील मुलांत ल्युकेमिया होण्याचे प्रमाण अधिक असते तर मुलींपेक्षा मुलांत ते थोडेसे जास्त असते.

निदान : ब्लड स्पिअरसारख्या साध्या चाचण्याच्या मदतीने ल्युकेमियाचे निदान करता येत असले तरी ल्युकेमियाचे निदान पक्के करण्यासाठी त्याच्या बोन मॅरोची तपासणी करणे अनिवार्य असते. एका लघुशस्त्रक्रियेने बोन मॅरोची तपासणी करण्यात येते. ल्युकेमियाचा प्रकार निश्चित करण्यासाठी अन्य चाचण्याही कराव्या लागतात. ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी त्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. वर नमूद केलेल्या प्रकारानुसार ल्युकेमियाचा उपचार निश्चित केला जातो. अचूक आणि चपखल उपचारावरच रुग्णाचे बरे होणे ठरलेले असते. उपचारांची विभागणी खालील तीन प्रकारांत केली जाते.

* रेमिशन इंडक्शन : या उपचाराच्या पहिल्या प्रकारात शरीरातल्या सर्व असाधारण पेशींचा नायनाट करण्यात येतो.

*सेंटड्ढल नव्र्हज सिस्टीम थेरपी : उपचाराच्या दुस-या पायरीत रुग्णाला अतिरिक्त केमोथेरपी देण्यात येते, त्यामुळे पुन्हा ल्युकेमिया होण्याची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे ल्युकेमियाग्रस्त मुलांच्या मेंदूत व स्पायनल कॉर्ड (माकड हाड) ल्युकेमियाचा प्रसार रोखला जातो.

* मेंटेनन्स थेरपी :

उपचाराच्या या अंतिम टप्प्यात रुग्णाला पुन्हा कॅन्सर उद्भवू नये म्हणून काही वर्षे उपचार चालूच ठेवले जातात. कॅन्सरपेशींना मारणा-या औषधींचा समावेश केमोथेरपीत केला जातो. दुर्दैवाने केमोथेरपीसाठी वापरण्यात येणा-या औषधींचे अनेक साईड इफेक्टस् आहेत. त्यात प्रतिकारशक्ती खच्ची होणे, मळमळ, उलट्या होणे, यकृतावर सूज येणे, त्वचेचा दाह होणे, केस गळणे यांचा समावेश असतो. एएमएल किंवा सीएमएल या ल्युकेमियाच्या प्रकारासाठी बोन मॅरो टड्ढान्सप्लांटेशनही करावे लागते. आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब केल्यास एएलएल आणि काही प्रकारचे ल्युकेमिया बरे होतात. मात्र एएमएल किंवा सीएमएल ग्रस्त मुलांसाठी बोन मॅरो टड्ढान्सप्लांटेशन करणे अगत्याचे ठरते. जरी अशा उपचारांनी ल्युकेमिया बरा झाला तरी पुन्हा ल्युकेमियाग्रस्त मुलांची पुढे नियमित तपासणी करावी लागते. मुलाला ल्युकेमिया झाला हे कळणे त्या कुटुंबासाठी मोठा मानसिक आघात असतो. ल्युकेमियावर उपचार करणारी डॉक्टरांची टीम वैद्यकीय उपचारासह तुम्हाला मानसिक आधार देण्याचे मोलाचे कामही करते.

व्यायाम

शस्त्रक्रिया झाल्यावरही व्यायाम सुरू ठेवा

सी-सेक्शन ही महिलांमध्ये पोटाची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया असते. ही गर्भावस्थेच्या काळात होते. इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच सी-सेक्शन शस्त्रक्रियेचे टाके भरण्यासही वेळ लागतो, पण याचा अर्थ तोपर्यंत व्यायाम करायचा नाही, असे नाही. या शस्त्रक्रियेनंतरही व्यायाम बंद करू नका.

व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. पण व्यायाम प्रकाराची निवड काळजीपूर्वक करा. शरीरावर कमीत कमी ताण पडेल, असा व्यायाम करा. शस्त्रक्रियेनंतर नियमित व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेचच कठीण व्यायाम करू नका. श्वसनाचे व्यायाम किंवा पोटाच्या सर्वांत सोप्या व्यायामाने सुरुवात करता येईल. यामुुळे पोटावर फार ताण पडणार नाही आणि टाके भरण्यात अडचण येणार नाही. दररोज ५ ते १० मिनिटे चालण्याचा व्यायाम करता येईल. पहिल्या आठवड्यात चालण्याचा वेग कमी ठेवा. चालण्याने शरीरात रक्ताभिसरण वाढेल आणि टाके भरण्यास मदत होईल. प्रत्येक आठवड्यात व्यायामाचा वेळ ५/७ मिनिटांनी वाढवा. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी चेस्ट स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. बाळाला दूध पाजण्यातही या व्यायामामुळे लाभ होईल. खांदे बळकट करण्यासाठी शोल्डर एक्झरसाईज करता येईल. शस्त्रक्रियेच्या ६ आठवड्यांनंतर स्त्रीरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने स्टड्ढेंथ टड्ढेनिंग आणि क्रंचीज करता येईल.

हे व्यायामप्रकार शस्त्रक्रियेनंतर लगेचच केल्यास हर्निया किंवा प्रोलॅप्ससारखे गंभीर विकार उद्भवण्याचा धोका असतो. शस्त्रक्रियेनंतर खाण्यापिण्यातही काही बदल करा. उदाहरणार्थ पातळ पदार्थांचे प्रमाण वाढवा. प्रथिने, लोह आणि कॅल्शियम हे घटक असलेल्या पदार्थांचा वापर वाढवा. व्यायाम हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा. झटपट करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर त्रास होण्याचा धोका आहे. स्थिती वेगाने बदलत जाणारे व्यायामप्रकार किंवा जर्क, बाऊन्स होण्याची भीती असलेला व्यायाम करू नका. व्यायाम करताना जराही वेदना झाल्या किंवा रक्तस्राव झाला तर तात्काळ व्यायाम बंद करा आणि वेळ न दवडता दवाखान्यात जा.

ताणतणाव

निद्रानाशाच्या समस्येवरील घरगुती उपाय

तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.

या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया.

कारणे - १) तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे.

२) उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बीअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. ३) आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. ४) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या ५) रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. ६) मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे. ७) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. ८) पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. ९) प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन. १०) वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी खालील साधारण उपाय करावेत.

उपाय - १. नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.२. योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.

३. रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.

४ रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.

५. अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.

६. झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाईल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.

७. झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे लळेश्रेलरश्र लश्रेलज्ञ सेट राहील.

८. चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

९. झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.

१०. नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-याची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.

वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव (वशीिशीीळेप) दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे याची सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा -झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.

आहार

फिट राहण्यासाठी नवा फूड ट्रेंड

वेट मॅनेजमेंट (वजनावर नियंत्रण ठेवणे) हे आता सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग बनले आहे. ७०-८० वर्षे वयाचे लोकही याचे काटेकोर पालन करताना दिसतात. गेल्या वर्षी केलेले सर्वेक्षण आणि त्याच्या अहवालानुसार या वर्षी सर्वाधिक लोक वजन कमी करतील. सध्या वजन कमी करण्यासाठी जेवणात नवा टड्ढेंड दिसतो आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात व अनावश्यक चरबीपासून सुटका होते. यामुळेच सेंद्रीय पदार्थांची मागणी वाढली आहे. छोट्या दुकानांमध्येही हे पदार्थ सहज मिळू लागले आहेत. लोक फसवे खाद्यपदार्थ उदाहरणार्थ गोड पदार्थांपासून अंतर राखून आहेत. शाकाहारी अन्न अधिक रुचकर करण्याचे विविध प्रयत्न सुरू आहेत. या जेवणात ग्रिल सँडविच, सॅलड, ज्यूस हे पदार्थ समाविष्ट केले जात आहेत. विविध प्रकारच्या तेलांचा वापर केल्यास आरोग्याला लाभ होईल. उदाहरणार्थ सॅलेडमध्ये खोबरेल, भाजीमध्ये मोहरीचे तेल, इत्यादी.

दोन-तीन प्रकारच्या धान्यांचे पीठ वापरल्यास शरीराला पौष्टिक घटक मिळतील. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांची मागणी वाढत आहे. लवकरच डॉक्टरही हे पदार्थ खाण्याचा सल्ला देतील. मध्य आशियातील अन्नपदार्थांचा वापर वाढला आहे. हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये तिळाचे पदार्थ, सॅलडचा समावेश होईल. तेलकट किंवा पचनास जड पदार्थांऐवजी साध्या व पचनास हलक्या पदार्थांकडे लोकांचा कल वाढतो आहे.

सर्वसाधारण माहिती

अनैच्छिक धूम्रपानाचा सर्वांनाच धोका

शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालूनही आठ वर्षे झाली आहेत. का बरे शासनाने हा निर्णय घेतला असावा? तंबाखूच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असते. विशेष म्हणजे हे वायू शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. एखाद्या धूम्रपान करणा-या व्यक्तीमुळे इच्छा नसताना आजूबाजूच्या व्यक्तींच्या नाका-तोंडावाटे तो धूर त्यांच्या शरीरात जात असतो. त्यालाच अनैच्छिक धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग) म्हणतात. धूम्रपान करताना दोन प्रकारचा धूर निर्माण होत असतो. धूम्रपान करणा-याच्या तोंडावाटे जो धूर त्या व्यक्तीच्या शरीरात जात असतो त्याला मेनस्टड्ढीम स्मोक अथवा मुख्य धूर म्हणता येईल. याउलट जो धूर सिगारेटमधून बाहेर पडत असतो त्याला साईडस्टड्ढीम स्मोक अथवा बाह्य धूर म्हणता येईल. सामान्यत: धूम्रपानामुळे बाहेर पडणा-या धुरापैकी १५ टक्के धूर धूम्रपान करणा-याच्या शरीरात जात असतो, तर ८५ टक्के धूर वातावरणात बाहेर पडत असतो. यातील बराचसा धूर आजूबाजूच्या व्यक्तींच्या शरीरात त्यांची इच्छा नसताना जात असतो. म्हणजे त्यांच्यावर हा अन्यायच नाही काय? सर्वांत वाईट बाब म्हणजे साईडस्टड्ढीम धूर वा बाह्य धुरात कार्बन मोनॉक्साईड, नायटड्ढोझमाईन व बेन्झोपायरिनसारखे अत्यंत घातक घटक अधिक प्रमाणात असतात. (तंबाखूत एकंदर ४००० घटक आढळतात. त्यापैकी जवळजवळ ४० टक्के घटक कर्कजन्य असतात.) तंबाखूत जवळजवळ ६ टक्के या प्रमाणात आढळणा-या कार्बन मोनॉक्साईड या वायूला रक्तातील जीवनावश्यक हिमोग्लोबिनचे प्राणवायूपेक्षा २० पट जास्त आकर्षण असते. त्यापासून निर्मिती होते कार्बाेक्झी हिमोग्लोबिन या पदार्थाची. त्यामुळे हृदय किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयगती थांबण्याची किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता वाढते.

*नायटड्ढोझमाइन्स व बेन्झोपायरिन हे दोन्ही पदार्थ कर्कजन्य पदार्थ आहेत. स्वाभाविकच बाह्य धुरातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणा-या धुरामुळे इतरांना कर्करोग होऊ शकतो.

* धूम्रपान न करता अनैच्छिक धूम्रपानामुळे यूएसएमध्ये दरवर्षी जवळजवळ ३००० लोकांना फुप्फुसाचा कर्करोग होतो असा अंदाज आहे. त्यामुळे समाजातील काही जाणकार लोकांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे.

*अनैच्छिक धूम्रपानामुळे धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या सतत संपर्कामुळे सरासरी तीन सिगारेट प्रत्यक्षात ओढण्याएवढ्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.

*अनैच्छिक धूम्रपानामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता खूप वाटते. यात ब्राँकायटिस, न्यूमोनियाचा समावेश होतो. शिवाय अस्थमा होण्याची शक्यता वाढते.

*याव्यतिरिक्त अनैच्छिक धूम्रपानामुळे हृदयविकार, अर्धांगवायू, कर्करोग, घशाचा संसर्ग, कानाचा संसर्ग, डोळे चुरचुरणे वारंवार चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे इत्यादी त्रास होतात.

*धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या कुटुंबियांना तर वर नमूद केलेल्या धोक्यांचा सर्वाधिक फटका बसतो. गर्भवती मातांना तर त्यामुळे अविकसित वा मृत बाळ होऊ शकते. लहान मुलांचा विकास त्यामुळे खुंटतो. क्वचितच त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो.

*आपण धूम्रपान वा तंबाखूच्या सर्व सवयी सोडा व आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य सुखमय करा.

व्यायाम

सूर्यनमस्काराचे महत्त्व व नियम

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत व्यायामास फारच महत्त्व असते. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा एक भाग आहे. मात्र सूर्यनमस्कार करण्यापूर्वी, करताना व केल्यानंतरही काही नियम पाळायचे असतात. ते पुढील-

प्रमाणे आहेत.

१) जागा-ज्या ठिकाणी सूर्यनमस्कार करायचे आहेत ती जागा स्वच्छ व हवेशीर असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास सूर्यनमस्कार घरात घातले तरी चालतात. यासाठी योग्य अशी जागा निश्चित केल्यानंतर शक्यतो तिच्यात बदल करू नये.

२) वेळ-सूर्यनमस्कार शक्यतो सकाळी कोवळ्या उन्हात घालावेत.

कडक उन्हात घालू नयेत. यासाठी सकाळी प्रातःर्विधी व स्नान आटोपल्यानंतर साधारणत: ६ ते ७ ची वेळ सर्वाेत्तम आहे. दिवसातील इतर कोणतीही वेळ या वेळेच्या तुलनेत गौणच आहे. या वेळेत यासाठी पाळावी लागणारी अनेक पथ्ये आपोआपच पाळली जातात. सूर्यनमस्कारासाठी एक वेळ निश्चित केली की तिच्यात बदल करू नये.

३) आसन - सूर्यनमस्काराचा अभ्यास करताना जमिनीवर काहीतरी आच्छादन घालून त्यावर अभ्यास करणे श्रेयस्कर आहे. ग्रंथांमध्ये मृगाजिन हे सर्वांत उत्कृष्ट आसन सांगितले आहे. ते नसेल तर व्याघ्राजिन चालेल. सध्या तर मृगाजिन व व्याघ्राजिन मिळणे अशक्यच आहे. प्रचलित कायद्यांचा विचार करता ही आसने मिळवण्याचा प्रयत्न करू नये. मृगाजिन व व्याघ्राजिन नसेल तर कांबळे वापरावे व तेही नसेल तर सतरंजी वापरावी. मात्र ती स्वच्छ धुतलेली असावी. शक्यतो याच अभ्यासाकरिता वापरण्यासाठी ठेवलेली असावी.

४) पोशाख - पोशाख सैलसर पण त्याचबरोबर शरीराच्या अवयवांच्या हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता येतील असा असावा.

५) वय - आबाल-वृद्धांना करता येण्यासारखा हा अभ्यास आहे. परंतु असे असले तरी व्याधित, दुर्बल आदी व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा अभ्यास करावा.

६)आहार-विहार- सूर्यनमस्कारांचा अभ्यास रिकाम्यापोटीच करावा. मलमूत्र निस्सारणानंतरच सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी साडेतीन तासांपर्यंत घन आहार व अर्धा ते पाऊण तास द्रव आहार घेऊ नये. तसेच सूर्यनमस्कार केल्यानंतर २ तासांपर्यंत घन आहार व १ तासापर्यंत द्रव आहार घेऊ नये. हा अभ्यास करणा-यांनी शाकाहार करणे जास्त श्रेयस्कर आहे. तसेच धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने कटाक्षाने टाळली पाहिजेत.

७) स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास करावा का? - स्त्रियांनीही सूर्यनमस्काराचा अभ्यास जरूर करावा, परंतु मासिक पाळीच्या काळात, गर्भिणी अवस्थेत सूर्यनमस्कार करू नयेत. तसेच प्रसूतीनंतर २ ते ३ महिन्यांनी हा अभ्यास करावा. वैद्यकशास्त्रातील व योगातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार सूर्यनमस्काराच्या अभ्यासाला सुरुवात करावी.

८) श्वसन- सूर्यनमस्कार करत असताना श्वसन नाकानेच करावे, तोंडाने करू नये. सूर्यनमस्कार करताना ते सावकाश, सम व संथ गतीने, श्वासावर योग्य ते नियंत्रण ठेवून करावे.

९) पूरक हालचाली- सूर्यनमस्कार करण्यापूर्वी पूरक हालचाल करण्याची पद्धतही काही ठिकाणी प्रचलित आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार करणे अधिक सोपे होते. या सर्वसामान्य नियमांव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीची शरीररचना, क्षमता, आजार इत्यादी अनेक घटकांनुसार अनेक बाबींचा विचार सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्गात केला जातो. सूर्यनमस्कार करणे सोपे असले तरी केवळ वाचून अथवा सीडी पाहून ते करण्याचा प्रयत्न करू नये. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या देखरेखीखाली ते शिकून घ्यावेत. त्यांचा व्यवस्थित सराव करावा. त्यानंतर सूर्यनमस्कारांचे सर्व फायदे मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे.

स्वच्छता

बॅड ब्रेथ : तोंडाची दुर्गंधी टाळा!

तोंडाची दुर्गंधी हा एखादा स्वतंत्र आजार नसून, ते काही आजारांत आढळणारे एक लक्षण आहे. तोंडाची दुर्गंधी तोंडाबरोबरच नाकातूनही येत असते. ही प्रामुख्याने खराब दात व हिरड्यांमुळे आणि दातांच्या अन्य आजारांमुळे निर्माण होते; परंतु इतरही काही प्रमुख आजारांत उदा. ताप, कान-नाक-घशाचे विकार, मधुमेह इ. मुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. शिवाय दारू पिणे, सिगारेट ओढणे, कांदा-लसूण-मसालायुक्त पदार्थ खाणे यामुळेही तोंडाला दुर्गंधी येते. यावर उपाय आवश्यकच आहे. अन्यथा मुलाखतीसह अनेक ठिकाणी तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावून बसता. याकडे दुर्लक्ष करणे व्यक्तिगत आरोग्यासह सामाजिक जीवनातही महागात पडू शकते.

हिरड्यांचा पायोरिया : प्रत्येकवेळी काहीही खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत, तर अन्नाचे कण दात व हिरड्यांमध्ये साचून राहतात. लाळेच्या चिकटपणामुळे हे अन्नकण कडक होतात आणि त्याचे किटण (कॅल्क्युलस) बनते. किटणाभोवती जंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने हिरड्यात पू तयार होतो. सरतेशेवटी हिरड्यांचा पायोरिया होऊन तोंडावाटे दुर्गंधी येते.

२) अ‍ॅनग : पायोरियाव्यतिरिक्त हिरड्यांना अल्सर, ताप, हिरड्यांचा दाह यामुळे असह्य ठणक लागल्यास अ‍ॅनग नावाचा हिरड्याचा आजार होतो. अ‍ॅनग या आजारात तोंडाला असह्य दुर्गंधी येत राहते. ३) किडलेले दात : किडलेल्या दातांच्या खड्ड्यात अन्नकण साचून राहतात. ते रात्रभर दातात तसेच शिल्लक राहिल्यामुळे अन्नकण कुजतात, दात किडत राहतात. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

४) तुटलेली फिलिंग्ज : दातात, दाढेत काही फिलिंग्ज असतील आणि ती जरी तुटल, तर अशा फिलिंग्जभोवती अन्नकण साचतात. ते वेळीच साफ केले नाहीत, तर अशा तुटक्या-अयोग्य फिलिंग्जमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.

५) कृत्रिम दातांची कवळी : तोंडात एक किंवा अनेक दातांच्या कृत्रिम कवळ्या असतील, तर अशा कवळ्यांभोवती अन्नाचे कण हमखास साचतात. यासाठीच काहीही खाल्ल्यानंतर कवळी तोंडाबाहेर काढून गार पाण्याने स्वच्छ धुवावी लागते. जर ती न धुता तशीच तोंडात राहू दिल्यास, त्या कवळीच्या अवतीभोवती अन्नकणांचे थरच्या थर जमा होतात आणि त्यामुळे साहजिकच तोंडातून दुर्गंधी येत राहते.

६) ऑर्थाेडेण्टिक उपचार चालू असताना : वेडेवाकडे दात सरळ करण्याच्या दंतव्यंगोपचाराच्या वेळी दातांभोवती विविध ब्रॅकेटस, ब्रँडस वा बारीकसारीक उपकरणे जोडल्यामुले दातांत अन्नकण साचतात व दुर्गंधी येते. त्यामुळे काहीही खाल्ले तरी दात पेस्टने स्वच्छ करून चुळा भरून धुवावेत. तसे न केल्यास दात, हिरड्या खराब होऊन तोंडातून दुर्गंधी येत राहते. ७) कँक्रम

ओरीस, स्कव्र्ही (व्हिटॅमिन सी ची कमतरता) उगवणारी अक्कलदाढ इ. आजारांमध्येही तोंडातून दुर्गंधी येत राहते. शिवाय कानाची युस्टेशियन नलिका, घशात कान-नाक विकारातही नाका-तोंडातून दुर्गंधी येते. अ) ताप व अंथरुणाला खिळून ठेवणारे आजार ब) घशाचे विकार क) श्वसनमार्गाचे विकार ड) पचनसंस्थेचे विकार इ) कानाचे विकार फ) डायबेटिस मेलिटस ज) लाळेच्या ग्रंथीचे विकार च) गर्भारपणाच्या काळात व आजारात तोंडाला दुर्गंधी येते. दुर्गंधीची अन्य कारणे-दारू पिणे, धूम्रपान, काही खाद्यपदार्थ उदा. कांदा-लसूण, काही औषधे, उपवास. सारांश : असे सांगता येईल की तोंडाची दुर्गंधी हा आजार नसून, आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. दातांची निगा राखल्यास तोंडाची दुर्गंधी सहज टाळता येते आणि समाजात आत्मविश्वासाने वावरता येते. कारण हा आजार बरा न केल्यास वैवाहिक जीवनात, दाम्पत्य जीवनात अडथळा ठरू शकतो तोंडाच्या दुर्गंधीमुळे समाजात वावरणेही, मित्र-सहका-यांत वावरणेही कठीण ठरते आपल्याबद्दल लोकांचे मत वाईट होऊ शकते. याशिवाय मुलाखतीसह अनेक ठिकाणी तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावून बसता. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे व्यक्तिगत आरोग्यासह सामाजिक जीवनातही महागात पडू शकते त्यामुळे यावर त्वरित उपाय करणे हेच उत्तम. दुर्गंधी टाळण्याचे उपाय :- दात वेळोवेळी ब्रश-पेस्टने घासून साफ ठेवले पाहिजेत : भरपूर पाणी घेऊन स्वच्छ, खळखळून चुळा भरल्या पाहिजेत यामुळे तोंडातील अन्नकण, कचरा बाहेर फेकले जातात. फ्लॉसिंग : डेंटल फ्लॉस नामक नायलॉन-इलॅस्टिकसदृश धाग्याने दोन दातांमधील भाग व हिरड्यांच्या आतील भाग सहज साफ केला जातो.

अयोग्य सवयी टाळणे : सतत पान चघळत राहणे, तंबाखू, जर्दा, मावा खाणे, दाताला मिश्री लावणे, सिगारेट-बिडी ओढणे. वारंवार डेन्टिस्टकडून दात तपासून घ्यावेत : हिरड्यात किटण साचले असल्यास दात साफ करून घ्यावेत, माऊथवॉशने गुळण्या कराव्यात, स्केलिंग या उपचाराने हिरड्या साफ करून घ्याव्यात. उपचारानंतर माऊथवॉशचा चांगला उपयोग होतो. मात्र डेन्टिस्टकडून उपचार करून घ्यावा. किडलेले दात व तुटलेली फिलिंग्ज त्वरित भरून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तेथे अन्नकण साचणार नाहीत. उपवास करायचे तर भरपूर पाणी प्यावे. उपवास केला तरी काहीही खाल्लेले नसले तरी दात घासावेत. ताप, दीर्घ आजारपण वा गर्भारपणात महिलांनी दातांची योग्य काळजी घ्यावी. तोंडाची दुर्गंधी कान, नाक, घशाच्या विकारामुळे असल्यास त्या शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे व त्यानुसार उपचार करावे. बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन टाळणे आवश्यक आहे. तोंडाची दुर्गंधी येणार नाही यासाठी भरपूर पाणी प्यावे. पापिणेप्यवोआहारात चोथा व तंतुमय पदार्थांचा समावेश भरपूर प्रमाणात करावा म्हणजे पचनसंस्थेचे विकार टळू शकतील व करपट ढेकर व अपचनामुळे साइड इफेक्ट म्हणून तोंडाला दुर्गंधी येणार नाही.

सर्वसाधारण माहिती

आम्लपित्त शरीराचा शत्रू

अम्लपित्त (अ‍ॅसिडीटी) म्हटल की लगेच हृदयात जळजळ सुरु होते. आयुर्वेदात अम्लगुणोदिक्तं पित्त अम्लपित्तम. म्हटलय. या आजारात अम्ल गुणाने पित्त वाढले जाते, म्हणून यास अम्लपित्त, म्हणतात. अम्लपित्त हा आजार चिरकारी म्हणजे अनेक दिवस हेतु घडत राहून ज्याची हळूहळू संप्राप्ती घडत राहून आजारनिर्मिती होते. व त्यामुळेच आजार बरा होण्यास बराच कालावधी लागतो. अम्लपित्त हा अभ्यंतर मार्गातील एक व्याधी असून, तो बराच कष्टसाध्य असतो.

अम्लपित्त प्रकार : - उध्र्वग अम्लपित्त, अधोग अम्लपित्त १)उध्र्वग अम्लपित्त-अ‍ॅसिडीटी झाल्याने पित्त हे उल्टीद्वारे बाहेर पडते व उल्टीला वास येतो.२) अधोग अम्लपित्त-हे कमी प्रमाणात असते गुदमार्गाने मलाद्वारे पित्त बाहेर पडते. जुलाब होतात.

आम्लपित्त होण्याची कारणे : हरी, करी आणि वरी ही याची मुख्य कारणे आहेत. १) हरी- घाईने काम करणे. २) करी- मसालेदार पदार्थ अतिसेवन करणे. ३) वरी- चिंता करणे ४) मसालेदार, उष्ण, मांसाहार अतिसेवन, अति चहा. ५) जास्त जेवण करणे. ६) व्यायाम न करणे. ७) मद्यपान. ८) आंबवून केलेले पदार्थ- इडली, डोसा, ढोकळा अति खाणे. ९) जेवणानंतर लगेच झोपणे. १०) गरम पाण्याने फार वेळ स्नान करणे. १४) जेवताना जास्त पाणी पिणे. १५) शिळे अन्न खाणे. १६) अति जड, विदाही, अभिष्यंदी पदार्थ खाणे. १७) अति क्रोध. १८) रात्रीचे जागरण.

आम्लपित्त संप्राप्ती :- अ) त्रिदोष (वात, पित्त, कफ) प्रकोप. - अग्निमांद्य - अपथ्य चालू राहिल्यास - आम्लपित्त - आमाशय क्षोभ. ब) पित्तप्रकोप अधिक (द्रव व आम्लगुणाने) - अपथ्य चालू राहिल्यास अन्नाला विदग्धता - आम्लपित्त - आमाशय क्षोभ.

अ‍ॅसिडिटी नसणे : - १) अन्न न पचणे, उलटी-जुलाब. २) श्वास घेताना त्रास. ३) छातीत जळजळणे, छाती दुखणे. ४)तो डाला आंबट पाणी येणे. ५) पोटात आग होणे. ६) घशात जळजळ ७) जेवणाची इच्छा न होणे. (अरुची) ८) उदरशूल. ९) डोके दुखणे. १०) अंगावर लाल पित्त उठणे (गुथी येणे) ११) अस्वस्थ वाटणे. १२) व्रण (अल्सर होणे)

अ‍ॅसिडिटी उपचार :

१) औषधी चिकित्सा : लक्षणांनुसार पित्तशामक औषधी वापरली जातात.

२) पंचकर्म चिकीत्सा : अ) स्नेहन (संपूर्ण शरीराची तेलाने मालिश करणे. ब) स्वेदन- वाफ देणे. क) वमन ड) विरेचन ई) बस्ती.

३) नियमीत व्यायाम करणे.

४) पायी फिरणे, पळणे. ५) प्राणायाम, मानसिक शांतता ६) जेवणाची पथ्य पाळणे.आयुर्वेदाच्या औषधी व पंचकर्म चिकित्सेने अ‍ॅसिडीटी अल्सर पूर्णपणे बरा होतो.

आहार

आयोडीनयुक्त मीठ

आमच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी एक घटक आवश्यक असतो व तो म्हणजे आयोडीन. आयोडीन नसेल तर अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्सना तोंड द्यावे लागेल.

आयोडीन नसेल तर तुमची वाढच खुंटेल व अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्सना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. भारतामध्ये आयोडीनच्या अभावामुळे जवळजवळ २० कोटी लोक व्याधिग्रस्त आहेत व त्यापैकी जवळपास ७ कोटी लोकांवर आयोडीनच्या अभावामुळे अधिक गंभीर दुष्परिणाम झाले आहेत. शासनातर्फे शास्त्रीय माहिती देणारे कार्यक्रम आयोजिले आहेत. त्यासाठी मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आयोडीन शरीराला कसे उपयोगी पडते हे थोडक्यात पाहूया. आयोडीन हे मिनरल असून थायरॉइड ग्लँडचे कार्य, वाढ, तसेच मेंदू व शरीर यांचा एकूण विकासासाठी त्याचा उपयोग होतो. थायरॉइड ग्लँड आपल्या मानेच्या पुढील भागात असतात. या ग्लँडमधून स्रवणा-या हार्माेन्समुळे आपल्या शरीराचे तापमान मर्यादित ठेवले जाते.रक्तपेशी निर्माण होतात. प्रजोत्पादनासाठी आवश्यक पेशी निर्माण होतात. तसेच स्नायू व नसांना बळकटी प्राप्त होते. जर आयोडीनची कमतरता असेल तर अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: मेंदूचे विकार व मानसिक आजार होण्याचाही धोका संभवतो. वास्तविक शरीराला फार थोडे आयोडीन आवश्यक असते व ते नियमितपणे आणि तुमच्या जेवणातूनच मिळायला हवे. तसे झाले नाही तर तुमचे वजन वाढू शकते. तुम्हाला थकवा येऊन तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. बद्धकोष्ठासारखे आजार होतात. तुमचा आवाज घोगरा बनू शकतो. सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे मानसिक आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी तर आयोडीन योग्य त्या प्रमाणात मिळते की नाही याबाबत खूपच दक्षता घेतली पाहिजे. हे प्रमाण कमी राहिले तर गर्भपाताची शक्यता वाढते व जन्माला येणा-या मुलाचे वजनही कमी राहते. आईच्या अंगातूनच लहान बाळाला आवश्यक ती शक्ती मिळत असते. त्यामुळेच बाळाची वाढ होऊन वजन वाढत असते. अन्नात पुरेसे आयोडीन नसेल तर ऐकू न येणे, बोलताना अडथळे जाणवणे, अपुरी शारीरिक वाढ व मानसिक आजार इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. आयोडीनमुळे तर बाळाच्या थायरॉइड ग्लँड व मेंदू यांची वाढ होते. आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत. आयोडीन शरीरात साठवले जात नाही. त्यासाठी आयोडीनचे सेवन रोज केले पाहिजे. मीठ आपण रोजच्या जेवणात घेतोच. या मिठात जर आयोडीन असेल तर आपोआप तेही आपल्या पोटात जातेच. मिठाशिवाय पाणी, दूध, मांस, मासे, भाजीपाला इ.मधूनही आपल्याला आयोडीन मिळू शकते. थोडक्यात, आयोडीनचे योग्य त्या प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

सर्वसाधारण माहिती

कॅन्सर !

कॅन्सरमध्ये पेशीच्या अनियमित आणि अनैसर्गिक वाढीमुळे ट्यूमर तयार होतो. जेव्हा पेशीचे विभाजन नियमित होत नाही, तेव्हा पेशीची अनैसर्गिक वाढ होते. त्यातून तयार होणा-या गाठी (ट्यूमर) दोन प्रकारच्या असतात. १) बिनाइन २) मॅलिग्नंट. बिनाइन ट्यूमर हा ठरावीक आकारापर्यंतच वाढतो. तो शरीराच्या इतर भागात पसरत नाही. त्याचा जिवाला धोका नसतो, शस्त्रक्रियेने काढून टाकल्यावर तो परत होत नाही. मॅलिग्नंट ट्यूमर हा आजूबाजूच्या पेशीवर हल्ला करतो. शरीराच्या इतर भागातही पसरतो. या पसरण्याला ाशींरीींरीळी म्हणतात. तो शरीराच्या सर्व भागात पसरू शकतो. या प्रकारातील कॅन्सरवर शस्त्रक्रिया करून काढून टाकल्यावर अथवा ीरवळरींळेप व किमोथेरपी दिल्यानंतरही परत होण्याचे प्रमाण असते. कारण यातील काही कॅन्सरच्या पेशी शरीरात उपचार करण्याआधीच पसरलेल्या असण्याची शक्यता असते. सहजरीत्या दिसणारे किंवा जाणवणारे शरीरातील बदल म्हणजे कॅन्सरची सुरुवात असू शकते. असा काही बदल दिसला किंवा जाणवला की लगेर्च ीिंरश्रळषळशव डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुमची तपासणी करून तुम्हाला दिसणारे किंवा जाणवणारे बदल हे कॅन्सरशी संबधित आहेत का? हे बदल बिनाइन किंवा मॅलिग्नंट आहेत का? हे सांगू शकतात. संशयित भागाचा थोडासा तुकडा काढून त्याची ाळलीेीलेशि च्या खाली तपासणी करून त्यावरून कॅन्सरचे निदान करणे याला लळेीिू म्हणतात. लळेीिू च्या निदानावरून कॅन्सर व त्याचे प्रमाण ठरवले जाते. प्रत्येक अवयवाच्या कॅन्सरर्चे ीील-ीूंशि असतात. त्यावर पुढील उपचार अवलंबून असतात. लळेीिू निदानानंतर त्यार्चे ीील-ीूं ठरवण्यासाठी र्खााीपेहळीीेंलहशाळीींीू गर्र्् ींीोीी ारीज्ञशी व या अतिशय नवीन उपयुक्त पद्धतीचा आधार घेतला जातो.

आता कॅन्सर झाला हे निदान पक्के झाले, त्यानंतर पुढची पायरी म्हणजे तो शरीरात दुसरीकडे कुठे पसरला आहे का? हे तपासण्यासाठी ीेपेसीरहिू छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय व पेट स्कॅन यापैकी योग्य पद्धतीचा अवलंब करुन त्याची ीींरसळपस ठरवता येते. त्याच हिशेबाने उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी केली जाते. स्टेज ठरवण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे डॉक्टरांना साह्य करतात. रुग्णांनी अथवा नातेवाइकांनी स्टेज कोणती आहे याचा विचार करत निगेटिव्ह अप्रोच घेऊ नये. कितीतरी रुग्ण ब-याच कॅन्सरच्या प्रकारात तिस-या किंवा चौथ्या स्टेजलाही चांगले आयुष्य जगतात. गरज आहे ती रुग्णांच्या, त्याहीपेक्षा त्याच्या नातेवाइकांच्या पॉझिटिव्ह अप्रोचची.

निदान झाल्यानंतर रुग्णाला त्याचे निदान सांगणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यांना व्यवस्थित र्लेीपीशश्रश्रळपस करणे हे डॉक्टरांचे व त्यांच्या टीमचे काम आहे.कारण या आजाराबाबत असलेल्या गैरसमजामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक घाबरून जातात. त्याऐवजी उपचार करणा-या डॉक्टरांनी व्यवस्थित चर्चा करून शंकानिरसन करून घ्यावे. त्यामुळे मन निश्चिंत होते. आधार वाटतो.

रुग्णांवर करण्यात येणारे उपचार परिणामकारक होण्यासाठी प्रोटोकॉल ठरलेले आहेत. फक्त त्याचा अवलंब करताना डॉक्टर तुमच्यापूर्वीच्या व्याधी, तुमची सर्वसाधारण प्रकृती याचा विचार करतात. कॅन्सरवर करण्यात येणारे उपचार हे रुग्णाच्या शारीरिक क्षमतेवर व गरजांवर अवलंबून असते. कॅन्सरच्या निदानानंतर उपचार लवकरात लवकर सुरू करावेत. काही प्रकारच्या ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया करावी लागते. ती करताना आजूबाजूच्या ङूाहि पेवश मध्ये पसरले असतील तर ते ही काढावेत. जेव्हा कॅन्सरच्या ट्यूमरची खूप वाढ होते. शस्त्रक्रिया शक्य नसते तेव्हा ठरवळरींळेप ींहशीरूि हा उपचाराचा प्रकार वापरून तो ट्यूमर क्ष-किरणाच्या साह्याने जाळून टाकण्यात येतो. काही कॅन्सरमध्ये ठरवळरींळेप ींहशीरूि हा शस्त्रक्रियेनंतरचा भाग असतो. कॅन्सरच्या पेशीची वाढ कमी करण्यासाठी व थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया व ठरवळरींळेप ींहशीरूि सोबतच कॅन्सरविरोधी औषधीचा उपयोग करता येतो. त्याला आपण किमोथेरपी म्हणतो. ही औषधे कॅन्सरच्या पेशीबरोबर इतर चांगल्या पेशीवर परिणाम करत असल्यामुळे ही औषधे वापरताना इतर सुदृढ पेशींवर कमीत कमी परिणाम करून कॅन्सर पेशींचा नाश करणे असा समतोल राखणारे डोस देणे हे डॉक्टरांचे काम आहे. आता उपलब्ध असलेली किमोथेरपी औषधे ही खूपच परिणामकारक व शरीराला कमीत कमी अपायकारक आहेत. जेनेरिक औषधांमध्येसुद्धा किमोथेरपीची औषधे उपलब्ध आहेत. ती तेवढीच परिणामकारक आहेत. कमी खर्चात किमोथेरपी औषधे रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतात.

व्यायाम

अभ्यासासोबत फिटनेसकडेही लक्ष देणे गरजेचे

परीक्षेच्या काळात विद्याथ्र्यांवर अभ्यासाचा तणाव वाढणे स्वाभाविक आहे. या काळात शारीरिक आणि मानसिक दबाव जास्त असतो. अभ्यास करताना अर्धवट झोप घेणे आणि खाण्यापिण्यात बेफिकीरपणा आरोग्यासाठी चांगला नाही. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर घसरून आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

पुरेशी झोप घ्या : अभ्यास करण्यासाठी फार उशिरापर्यंत जागरण करण्याची चूक करू नये. अशामुळे मेंदूला एकाग्र करण्यात अडचणी येतात. अशाने परीक्षेवेळी विद्यार्थी अभ्यासलेल्या गोष्टी विसरून जातो. यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना आपली झोपेची वेळ प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी.

योग्य आहार : स्मरणशक्ती वाढणे, मेंदूला ऊर्जा पुरवठा होणे आणि इतर प्रणालीचे काम योग्य पद्धतीने चालण्यासाठी आहारात पोषक तत्त्वाची भूमिका फार महत्त्वाची असते. या काळात पुरेशा हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे.

तणाव घेऊ नये : अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा मिनिटांचे मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे यामुळे मानसिकरीत्या तुम्ही रिलॅक्स होऊ शकाल. -

आहार

उत्तम आरोग्यासाठी करा हे जुने मात्र दमदार उपाय

आपले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. जर तुम्हालाही सुदृढ आरोग्य हवे असेल तर हे जुने फंडे आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरा. हे जुने फंडे आरोग्य फिट ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला फिट राहण्याचे काही जुने मात्र दमदार फंडे सांगत आहोत.

अति जेवण करणे हे आरोग्यासाठी हितकारक नाहीये. कमी खाणारे व्यक्ती नेहमी निरोगी आणि सुखी असतात. जी व्यक्ती खूप भूक लागल्यावर प्रमाणात जेवण करते ती नेहमी निरोगी राहते. त्यामुळे पोटाला लागेल जेवढेच खा.

काळे मिरे वाटून त्याचे चुर्ण बनवा. हे चुर्ण ३ ग्रॅम तुप आणि साखरेत रोज सेवन करा. त्यामुळे डोळे निरोगी राहतता. डोळ्याचे आजार उद्भवणार नाहीत. डोळे लाल होत असतील तर हा उपाय नक्की करा. डोळ्याचे आजार दूर करण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.दररोज जेवन झाल्यानंतर १० ग्रॅम गुळाचे सेवन करा. पोटाचे आजार उदा. अपचन, गॅसेस, पोटदुखी या त्रासापासून सुटका होईल. दररोज १० ग्रॅम गुळ खाण्याची सवय लावा. गुळाच्या सेवनामुळे जेवण पचायला मदत होते. -

आहार

बाहेरच्या जेवणामुळे आजारांना आमंत्रण

घरच्या जेवणामुळे शरीरातील कॅलरीजचा स्तर नियंत्रणात राहण्यासोबत अतिरिक्त चरबीपासून देखील बचाव होतो. घरच्या जेवणाने स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात मदत होते. त्यामुळे बाहेरचे जेवण शक्यतो टाळावे.

विषबाधेचा धोका : सेंटर फॉर डेसीज कंटड्ढोलनुसार बाहेरचे अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. हॉटेलमध्ये साफ-सफाईकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच भाज्या उकडून अनेक तास तशाच ठेवलेल्या असतात.

वजन वाढते : र्जनल ऑफ पब्लिक हेल्थ पॉलिसीनुसार बाहेर जेवण करताना शरीराच्या गरजेच्या दोन ते पाच पट जास्त अन्न खाल्ले जाते. यामुळे लठ्ठपणा वाढतो.

मीठ, चरबीचे प्रमाण : हॉटेलातील खाद्यपदार्थांमध्ये मीठ आणि टड्ढान्सफॅटचे प्रमाण जास्त असते. जे आर्टरीज प्रवाहास अडथळा निर्माण करतात. अशाने वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

संतुलित आहार : घरात जेवण तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, खाद्यपदार्थांमधील पोषक तत्त्वे कायम राहतात. अन्नात किती प्रथिने, कबरेदके आणि तेलाचे प्रमाण असावे हे स्वत: ठरवू शकतो. याच्या उलट हॉटेलमधून मिळणा-या खाद्यपदार्थात पोषक द्रव्यापेक्षा कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.

बाधितांच्या संख्येत वाढ : यूएस पब्लिक इंटरेस्ट रिसर्च ग्रुपच्या’ ताज्या अहवालानुसार अमेरिकेत बाहेरच्या जेवणामुळे आणि दूषित खाद्यपदार्थांमुळे आजारी पडणा-यांची संख्या दोन वर्षांत ४४ टक्क्याने वाढली आहे.

आहार

जास्त मसालेदार पदार्थ टाळा

दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम मंद असतो. त्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. अशा वेळी शरीरातील इतर क्रिया बाधित व्हायला लागतात. अधिक

मसालेदार जेवण घेतल्याने त्याचा नकारात्मक

परिणाम झोपेवर होऊ शकतो.

छातीत जळजळ होणे : रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे यामुळे स्टमक लाइनिंग (जठर) मध्ये सूज किंवा जळजळीचा त्रासदेखील होऊ शकतो. पोटदुखीसाठीही मसालेदार जेवण कारणीभूत ठरते. यालाच सर्वसामान्यपणे अ‍ॅसिडिटी असे म्हणतात.

तोंडाचा वास येणे : मसालेदार जेवणात साधारणपणे वापरल्या जाणा-या लसूण, कांदा आणि मिरची या पदार्थांमुळे तोंडाचा वास येतो. मसालेदार पदार्थांचे काही फायदेदेखील आहेत. असे असले तरी मुखवासाची समस्या अपमानित होण्याचे कारणही ठरू शकते.

शरीराचे तापमान वाढणे : जास्त तिखट आणि मसालेदार जेवण केल्याने टाळू आणि ओठांमध्ये तीव्र दाह होतो. अशावेळी शरीराच्या तापमानात वाढ होते. तापमान वाढणे रात्रीच्या वेळी चांगले नसते. तज्ज्ञांच्या मते साधारणत: रात्रीच्या वेळी

शरीरातील तापमान नैसर्गिकरीत्या कमी असते. गाढ झोपेसाठी हे तापमान आवश्यक ठरते.

झोपेशी संबंधित समस्या : रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश केल्याने झोप न येणे, झोपमोड होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. यासाठी रात्री हलके जेवण घ्यावे. एखाद्या कार्यक्रमात जर भरपेट जड जेवण घेतले असेल तर अशावेळी दूध घेतल्याने पोटास आराम मिळू शकतो.