अ.क्र. विषय लेखक दिनांक
1

Sci-Math Humor

View File

2

एक विनोद

झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .

रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!

दैनदिन (countinuous ) आत्महत्या : MPSC ची परीक्षा द्या आणि महसूल विभाग जॉईन करा.

विकास नाईक
3

मंत्रालयातील tech ऑफिसर विषयी

आपल्या एका मित्राविषयी आलेला नावाचा उल्लेख नसलेला लेख आपल्या सर्वांसाठी पोस्ट करीत आहे , त्याने नाव येवू नये याची दक्षता घेतली आहे पण मुळात आपल्या विषयी इतके चांगले अपवादानेच छापून येते आणि ते ही अनामिक राहू नये या हेतूने मी संकेताला (व त्याच्या इच्छेला) दूर ठेवून हे करीत आहे. आपले हे अनामिक मीत्र आहेत, मा. आरोग्य मंत्री महोदयाकडे PS असलेले
"डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार ".
मंत्रालयातील अनेक अधिकारी व पदाधिकारी, आमदार, पत्रकार , इतर PS यांच्याप्रमाणेच मी पण माझी contact list यांच्या database मधूनच update केली आहे. Congratulations to Him.

4

मराठी भाषेतील " क " ची गम्मत

मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा.प्रत्येक शब्द ''क'' पासून सुरु करुन येवढा
मोठा परिच्छेद लिहिला आहे.जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
पहा तर मग मराठी भाषेचा चमत्कार:::-
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने
काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे
कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून
काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.काकूंनी कागद कापल्याचे
कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस
कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच ! काकूंनी कर्कश्श किंचाळून
कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार ! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन- कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी '' कोलाज '' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
''कथासार'':-''क्रियेविण करिता कथन,किंवा कोरडेची कीर्तन,कितीक किताब कष्टाविण,काय कामाचे''