अ.क्र. प्रश्न व उत्तर
1

महसूल अधिकाऱ्यांनी जन पीठ मध्ये प्रश्न ,शंका विचाराव्यात का?

नाही . महसूल अधिकाऱ्यांनी महसूल व्यासपीठाचा वापर करणे अपेक्षित आहे.

2

लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना कसे उत्तर देत येईल?

आपणाला सदस्य नोंदणी करून त्यातून login व्हावे लागेल, नंतर your reply म्हणून विंडो दिसेल तेथून उत्तर देत येयील, प्रयत्न करा.

3

मराठी मध्ये type करता येते का?

होय. Control+G च उओयोग करून आपण दोनीतील कोणतीही भाषा निवडू शकता. मराठी तील typing उच्चाराप्रमाणे (phonetic) पद्धतीने होत असल्याने खूप सोपे आहे.

4

जन पीठ च्या प्रश्नाच्या उत्तरला काय disclaimer जातो?

Disclaimer : हे संकेतस्थळ महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या व त्या अनुषंगाने कार्यालयीन कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आहे . हे संकेतस्थळ परिपूर्ण व आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी संकलन व वर्गीकरण मर्यादा आणि विषय व्याप्ती यामुळे या प्रयत्नातील अपूर्णता व सदोषता नाकारता येणार नाही . या संकेतस्थळावरील माहिती व याद्वारे पुरविण्यात येणारी माहिती हि विविध स्त्रोतातून आहे तशी संकलित करून त्याची पूर्ण अचूकता व सत्यता न पडताळता केवळ अतिरिक्त माहिती तात्काळ उपलब्ध असावी या हेतूने येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहे . म्हणून या संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीचा कोणत्याही न्यायिक वा अर्धन्यायिक बाबीसाठी उपयोग करता येणार नाही .

5

जन पीठ ची reply window लहान आहे

नाही,ती आपणाला पाहिजे त्या आकारात मोठी करता येवू शकते.उजव्या खालच्या कोपऱ्या वर mouse नेवून आपण आकार वाढवू शकता.

6

email id ने लोगिन होत नाही.

होय . आपल्याला membership registration करून त्यात आपण दिलेल्या username v password नेच लोगिन होता येईल.अन्यथा गैरवापर होवू शकतो .