[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

आदरणीय सर,
ग्रामपंचायत हद्दीतील सिटी सर्वेच्या जाणे-येणेच्या बोलतील अतिक्रमण ग्रामपंचायने नोटीस देऊनही सदर व्यक्ती उत्तर देत नाही तर पुढील कार्यवाही काय करावी व या बाबत अधिकार कोणाचे आहेत.?

आमच्या वडिलोपार्जित जमिनीचे माझ्या वडिलांनी माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे. पण माझ्या भावाला समजताच माझ्या भावाने व २ बहिणीने कोर्टात वाटणी पत्र करीत अर्ज केला आहे आता कोर्टात केस चालू आहे
तर केस चालू असताना माझे वडील वारले तर सदर मृत्युपत्र मान्य होईल का?
मी काय करू कृपया सल्ला द्या

मान्य होईल .
मात्र मिळकत वडिलांची , स्व कष्टार्जित असावी

सर, सद्ध्या स्वच्छ भारत अभियान चालू आहे, यात आमच्या गावातहि शौचालये बांधण्यास सांगत आहेत. आम्हालाही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे.
परंतु आमचे घर हे आमच्या पणजोबा यांचे नावे आहे व त्यांना आत्ता पर्यत ८ वारस आहेत सदर घर हे २०’x३३’ चे आहे. तर आम्हाला जवळ पास २.५’x ४’ इतकीच जागा मिळते आहे. व त्याच बरोबर आमच्या घरावर व जमिनीवर दिवाणी न्यायालयात केस चालू आहे.
आणि ग्रामपंचायतवाले बोलतात कि तुम्हाला शौचालय बंधावेच लागेल आम्हीही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे. पण अशा काही कारणामुळे आम्हाला शौचालय बांधता येत नाही.
याच बरोबर आमचे रेशन, वीज, सरकारी दाखले, गावचे पाणी बंद करणार आहेत. ग्रामपंचायत ग्राम सभेत आपले विचार न मांडू देणार नाहीत, आमच्या घरा समोर वाजंत्री लावून व गावात सार्वजनिक जागेत आमचे फलक लावणार आहेत.
या कारणाने आमचे घरचे निराश झाले आहेत व मला तर भीती वाटते आहेत कि कोन्ही या मुळे जीवाचे काही बरे-वाईट करून घेऊ नये या साठी तुम्हीच आम्हाला मदत करावी.
१) तरी आम्ही काय करू ?

२) तर रेशन दुकानदारांकडे, वीज वितरण मंडळाकडे, जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा याच्याकडे, ग्रामपंचायत कडे सरकारी दाखले देऊ नये असे कोणतेही GR पाठविले आहेत काय?

कृपा करून या दोन प्रश्नाची उत्तरे द्यावी.

आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये मी व माझ्या भावाने मिळून एकत्र घर बांधले व ते घर मोठा भाऊ म्हणून माझ्या मोठ्या भावाच्या नावे केले. त्या नंतर १० वर्षांनी मी त्या घरात हिस्सा मागण्यास गेलो असता तो म्हणतो कि, हे घर माझ्या नावे आहे आणि मी तुला आत्ता हिस्सा देणार नाही तर मी काय करू ?

कायदा , नियम आणि वैयक्तिक भावना ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत . त्याची सरमिसळ होत नाही . जर भावाच्या नावे नोंदणीकृत रित्या घर लागले असेल तर माझ्या मते आपणास हिस्सा मिळू शकणार नाही .

आपल्याला मी ०८/०७/२०१६ रोजी आजोबाने केलेल्या मृत्युपत्र या बाबत प्रश्न विचारला असता, आपणाच्या म्हण्यानुसार मी न्यायालयात माझ्या वडिलांच्या नावे वाटणीचा अर्ज केला आहे. व त्याच्या नोटीसा सर्व वारसांना व सह हिस्सेदाराना पाठविल्या आहेत.
माझे अजोबा जिवंत आहेत व माझ्या आजोबाना २ मुले व २ मुली आहेत.
तर आता
१)जमिनीचे हिस्से कसे पडतील ?
२)आजोबांच्या मृत्यू नंतर केस चालू राहील कि बाद होईल ?
३) आजोबांच्या मृत्यू नंतर मृत्युपत्र केस चालू असताना ग्राह्य धरले जाईल का?
धन्यवाद सर

मृत्यूपत्राचा अंमल हा मृत्यूनंतर दिला जातो. आपला दावा आता न्या‍यालयात आहे. न्यायालय त्याबाबत योग्य तो निर्णय घेइलच. त्या‍वर आता भाष्य करणे उचित ठरणार नाही.

शेतीला जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मागणी अर्ज केला असता मा.तहसीलदार सोहेब यांनी ६ फुटी रस्त्याचा आदेश पारित केला असून सदर प्रतिवादी यांनी सदर आदेशावर मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे अपील केले असून अपिलचा निर्णय काय लागू शकतो ?
सदर सर्वे नंबरच्या फाळणी नकाशा सोबत जोडला आहे तरी आम्हाला रस्ताच्या मंजुरीचा आदेश मा.उपविभागीय अधिकारी साहेब हे किती दिवसात देऊ शकतील ? आदेश काय स्वरूपाचा असू शकेल ?

उपविभागीय अधिकारी सर्व पुराव्यांची पडताळणी करून योग्य‍ तो निर्णय देतील. निमन्याययीक प्रकरणात सर्व पुरावे व युक्तीवाद संपल्यानंतरच निर्णय दिला जातो. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांना भारतीय घटनेच्या कलम 226, 227 कलमांन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन, रिट पिटिशन क्र. 4101/2007 मध्ये निम-न्यायीक अधिकार्यांना (सर्व मंत्री, सचिव, अधिकारी, दावेदार) यांच्यासाठी अपील, पुनर्निरीक्षण, पुनर्विलोकन यांच्याबाबतीत सुनावणी घेणे, निर्णय घेणे याबाबत कशी कार्यवाही करावी यासाठी काही निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सुनावणी आणि युक्तीवाद संपल्यानंतर कमाल चार ते आठ आठवड्यात निकाल देण्यात यावा.
तथापि, या निकालावर आपले समाधान झाले नाही तर आपण अपील दाखल करू शकता.

मी जुन्नर तालुक्यात येणेरे गावचा रहिवाशी असून माझे राहते घर गावठाणात आहे १९६५ साली येणेरे गावाचे सिटी सर्वे रेकोर्ड तयार झाले असून आमच्या घरच्या पूर्व दिशेला जाण्या-येण्यासाठी सामाईक ७ फुटी बोळ ठेवला होता त्या प्रमाणे सिटी सर्वे रेकोर्डला त्याची नोंद आहे . सदर सिटी सर्वेच्या बोळा मध्ये पक्के बांधकाम करता येते का ? सदर बांधकाम शेजारील व्यक्तीने केले असल्यास कोणत्या आधारे काढता येईल ?

सदर बोळामध्ये पक्के बांधकाम करता येत नाही

माझ्या आजोबाच्या व चुलत आजोबाच्या नावे १० एकर वडिलोपार्जित जमीन आहे तर माझ्या आजोबाने माझ्या चुलत्याच्या बायकोच्या(सून) नावे ४ एकर जमीन व माझ्या(नातू) नावे १ एकर जमीन हि मुत्युपात्राने दिलेली आहे व बाकीच्या मुला, मुलींना काहीच दिले नाही.
तरी आम्हाला समजताच आम्ही माझ्या वडिलांच्या नावे मा.तहसीलदार व मा. तलाठी यांना हरकतीचे अर्ज दिले आहेत
माझे आजोबा आजून ह्यात आहेत परंतु ते कोणतीही बाब मान्यास तयार नाही ते माझ्या चुलत्याच्या बाजूने बोलत आहेत.
जमिनीमध्ये माझ्या अजोबा व चुलत अजोबा यांच्यात कोणतीही खाते फोड अगर वाटणी, हिस्सेवारी झालेली नाही कोणत्याही चतु:सीमा हि पडल्या नाहीत. फक्त खाण्यासाठी वेगवेगळी जमीन कसत आहेत.
तरी हे मृत्युपत्र आम्हाला मान्य नाही. तर मा.तहसीलदार व मा.तलाठी यांना आम्ही हरकतीचे अर्ज दिलेले आहेत तर या व्यतिरिक्त अजून काय करावे ?
१)न्यायालयात वाटपपत्र साठी अर्ज करावा ?
२) वडिलांच्या नावे वारसदार म्हणून जमिनीवर स्टे टाकावा ? 3rd party stay
३) रक्ताच्या नात्यामध्ये सून येत नाही म्हणून केस टाकावी ?
४) कि, या व्यतिरिक्त काही करावे ?
कृपया आपल्या सर्वांच्या सहकार्च्याही अपेक्षा आहे.

आपले आजोबाना 5 एकर जमीन होती . जर ही जमीन आजोबांचे वडिलांकडून आजोबानाप्राप्त झाली असेल तर , आजोबांचे हयातीत , आजोबांचे खालील 4 पिढ्यापर्यन्त ( पुरुष ) वारसांना , हिंदू coparcenary तत्वानुसार जमीन वाटप करून मागण्याचा हक्क होता .
सध्या आपले आजोबा मयत आहेत , त्यांनी त्यांचे नावावर असलेली जमीन , जिचा त्यांना त्यांचे इच्छे प्रमाणे विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे , त्याप्रमाणे त्यांनी ती जमीन मृत्यपत्राने एक सुनेला व मातुल दिलेली आहे. त्या मुले आता त्यात खावी करता येईल असे मला वाटत नाही .

मृत्यपत्राचे वैधतेबाबत शंका असल्यास त्यास आपण आव्हानात करू शकता

आजोबांची जमीन जर वडिलोपार्जित म्ह्णजे आजोबांच्या वडिलांकडून वारसा हक्काने आली असेल तर आजोबांना त्यांंच्या हिस्या‍पुरतेच मृत्यू्पत्र करता येईल ज्याचा अंमल त्यांच्या निधनानंतरच होईल.
भावनिक न होता व्यवहार व वारसाहक्कांचा विचार करून तुम्ही न्यायालयात वाटपासाठी अर्ज करू शकता.

ग्रामसेवकाकडे तीन महिन्यापूर्वी घराच्या नोंदी वेळी दिलेल्या कागदपात्रांची प्रमाणित नक्कल मागितली होती
तर ग्रामसेवक आमच्याकडे घराच्या नोंदी वेळी दिलेली कोणतीही कागद पत्रे नाही असे तोंडी सांगत आहे
2000 साली घराची नोंद झालेल्या सर्व घरांची नोंद ग्रामपंचायत कडे आहे तर सदर घराची नाही याचा काय अर्थ घ्यावा
कोणत्याही कागद पत्राशिवाय घराची नोंद होते की , घराची नोंद खोटी आहे
तर mala लेखी स्वरूपात उत्तर मिळण्यासाठी काय करावे

आपणास घराची नोंद करण्यासाठी दाखल केलेले अभिलेख हवेत आहे की ग्रामसेवक यांचे कडून , घराची झालेली नोंद खोटी आहे ही लेखी हवे आहे ?

पहिली माहिती आपण मागू शकता . मात्र दुसरी माहिती ( , घराची झालेली नोंद खोटी आहे) हे माहिती अधिकारात मिळणार नाही

आपण माहितीच्या अधिकाराचा वापर करू शकता

१९९७ साली माझ्या वडिलांकडून कोणतेही समतीपत्र न घेता आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या भावाने घर बांधले.
त्या नंतर त्यावेलेसच्या ग्रामसेवकास पैसे चारून घर कोणतेही कागदपत्र न देता ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली. स्वत : जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस (मी व माझ्या बहिणी ) यांची कोणतीही संमती न घेता घर नावावर केले.
तर आत्ता आम्ही घराची नोंदी वेळेसची कागदपत्र अर्ज द्वारे मागितली असता ग्रामपंचायत आम्हाला आमच्याकडे कोणतीच कागद पत्र नाही असे लिहून द्यायला तयार आहे तर त्या ग्रामपंचायत पत्र द्वारे मी सदर घराची नोंद रद्द करू शकतो का?
त्या नंतर माझ्या वडिलांचे नावे व त्याच बरोबर आमचे सर्वांचे नावे घर करू शकतो का ?
वडील हयात आहेत .

घराखालील जमीन वडिलोपार्जित आहे . मात्र घर तुमच्या भावाने बांधले आहे. त्यामुळे घराला ग्राम पंचायत दप्तरी केवळ त्याचे नाव दाखल होणे गैर नाही .
सामायिक / वडिलोपार्जित जागे वर , घर बांधले, त्या जागेतील हिस्स्या बाबत आपण नुकसान भरपाई बाबत दावा दाखलकरू शकता

१९३५ साली आम्हाला आमच्या स्वताच्या विहिरीच्या कायम स्वरूपी पाण्याच्या बदल्यात घर बांधण्यास तोंडी जागा दिली. त्यावर आम्ही घर बांधले. त्यानंतर आमच्या ५ पिढ्या आम्ही ती जागा आम्ही वापर करतोय जागेचा कोणताही कागद आमच्या कडे नाही घर बांधताना आम्ही आमच्या घराभोवती तीन बाजूने आंगण काढले व आता आम्हा विहिरीचे पाणी नको आम्हला आमची जागा द्या म्हणतात
घर नोंद करताना जुन्या काळात फक्त घरातील मोजमाप होत होते अंगणाचे नाही तर आमची १९३५ साला पासून वहिवाट आहे आज पर्यंत आम्हाला कोणीही आडविले नाही
मार्गदर्शन करावे

80 वर्षे आपण जागेचा वापर करत आहेत. आपली वहिवाट /ताबा त्यांना माहित आहे . आपल्याला जागेतून निष्कासित करणेसाठी त्यांनी कोणतेही प्रायांतही केलेले नाही. त्यामुळे आपण Adverse Possession च्या तत्वाने मालक झालेला आहेत .आपली मालकी The Specificc Relief Act खाली या पूर्वीच्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाकडून जाहीर करून घ्या .

हा वाद दिवाणी न्यायालात सोडवला जाऊ शकतो

दोन भावाच्या नावे वडिलोपार्जित जमीन असताना, यात कोणतेही वाटप अथवा खातेफोड नसताना एका भावाने स्वतचे मुत्युपत्र तयार केले आहे या मुत्युपात्रास आम्हा वारसांचा विरोध आहे तसेच दुसर्या भावाचाही विरोध आहे. तर हे मुत्युपत्र तलाठी साहेबांनी नोंद न करण्यास काय करावे.
आम्हा सर्व वारसांची वारस नोंद लागावी व सर्वाना समान हिस्सा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे
कृपया मदत करावी
कोणत्याही सीमा किव्हा चातुर्सिमा ठरलेल्या नाहीत किवा कोणतीही मोजणी झालेली नाही

वडिलोपार्जित जमिनीतील स्वतःचा हिस्सा मृत्यू पत्राने दिला जाऊ शकतो. नोंदीबाबत तक्रार असेल तर तक्रार अर्ज तालाठीकडे दाखल करा. मंडलाधिकारी त्यावर तक्रार केस चालवून निकाल देतील

आदरणीय सर,
माझ्या आजीचा मूत्यू सन १९९५ ते ९६ च्या दरम्यान झाला आहे पण त्यांचा मुत्युचा दाखला नाही कारण त्याची नोंद कोठेही नाही तर नोंद मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?

माझ्या चुलत्यांनी नकली मुत्युचा दाखला क्षेरोक्स लावली व त्याच्या मूत्यू दिनांक २/१/२०१३ रोजी दाखवला आहे व त्याच्या खाली वारस नोंद लावली आहे . हे कायद्याने चुकेचे आहे तरी वारस नोंद फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे
कृपया मार्गदर्शन करावे

चुलत्यांनी लावलेला मुत्युचा दाखला खोटा आहे हे सिध्द करण्यासाठी तुमच्याकडे खरा दाखला असावा. तुम्ही चुल्त्याविरुध्ह फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. दाखला नसेल तर इतर कागद पत्रांवरून ते सिध्द करावे लागेल. फेरफार रद्द करण्यासाठी प्रांताकडे अपील करावे लागेल.

आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या मोठ्या भावाने आमची कायदेशीर वारसानची कोणतीही सहमती न घेता सदर घर त्याच्या बायकोच्या नावे केले आहे त्यास साधारणपणे १० वर्षे झाली आहेत आम्ही गावी नसतो म्हणून त्याने आमच्या खोट्या सह्या केल्या व आमच्या वडिलोपरजीत जमिनीवर घर बांधून ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली
तर या विरोधात आम्हला न्याय हवा आहे तरी आपण आम्हास सहकार्य करावे

भावाने खोट्या सह्या केल्या असतील तर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा. मालमत्तेचे कायदेशीर वाटप आणि नोंद करून घ्या.

आमच्या वडिलांनी मूत्यूपत्र तयार केले आहे. हि जमीन वडिलोपार्जित आहे व या मूत्यूपत्रास आमची हरकत आहे .आम्हाला हे मान्य नाही. माझ्या मोठ्या भवाने लबाडीने हे मूत्यूपत्र तयार करून घेतलले आहे. माझी परिस्थिती या मुत्युपात्राला कायदेशीर आव्हान करण्याची नाही मी खूप गरीब आहे. तरी मला या बाबत साथ मिळावी व माझी जमीन हाच मला एक आधार आहे कृपया सहकार्य करावे.. धन्यवाद

मूत्यूपत्राला फक्त न्यायालयातच आव्हान देता येते. भावाशी, प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने चर्चा करण्याचा प्रयत्न करा.

आमच्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे मुत्युपत्र तयार केले आहे. तर तालाठीने मुत्युपत्र नोंद करण्यासाठी सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडण्यास सांगितले आहे
तर हे सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडावे लागते का?
तलाठी म्हणतांत हि सर्व जमीन वडिलोपार्जीत आहे . स्व:कास्ताची नाही

जमीन वडिलोपार्जित असली व तिचे वाटप अथवा वारसाने वडिलांचे हिस्स्यास आली असल्यास , इतर वारसांचे प्रतिज्ञा पत्र आवश्यक नाही .
तलाठी यांना म्हणा , वर्दी नोटीस इतर नातेवाईकांना द्या . कोणाची हरकत असल्यास , नोटीस दिल्याने लक्षात येयील

वडिलोपार्जित जमिनीचे मूत्यूपत्र तयार होते का?
सदर जमीन स्व:कष्टाची नसून त्याच्या पूर्वजांची आहे
व यास वारसांचा विरोध आहे .

वर गणेश शिंदे यांना दिलेले उत्तर वाचावे

आदरणीय सर ,
माझे आजोबा यांनी मागील महिन्यात मूत्यूपत्र केले होते पण त्यांना ते रद्द करायचे आहे

नवीन मृत्यू पत्र केल्यास आधीचे मृत्यू पत्र रद्द होते. जरुरतर नवीन मृत्यू पत्रात तसा उल्लेख करावा

माझ्या आजोबांनी मुत्युपत्र केले आहे.
पण सर्व जमीन माझे आजोबा व चुलत आजोबा यांच्या दोघ्न्च्या नावे आहे
जमीन फक्त खाण्यासाठी वाटून घेतली आहे
तर माझ्या आजोबांनी केलेले मूत्यूपत्र मान्य ठरेल का?
आजोबा व चुलत आजोबा हयात ahet.

मूत्यूपत्र करणार्याच्या मृत्यू नंतर मूत्यूपत्र मान्य ठरते

मूत्यूपत्र तयार केले परंतु काही कारणास्तव खाते फोड करून सर्व वारसांना जमीन वाटून देण्यात आली तर मूत्यूपत्र रद्द होते का?
दोन भाऊ आहेत यांनी खाते फोड नाही परंतु एकाने मूत्यू पत्र लिहिले आहे सदर मूत्यूपत्र दुय्यम निबंधान्काकडे नोंद केलेली आहे
व आता खाते फोड करून सर्व वारसांना जमीन वाटून घेत आहे तर केलेले मूत्यूपत्र सदर व्यक्तीच्या मूत्यू नंतर काही त्रास देईल का?

मूत्यूपत्र रद्द करून घेणे आवश्यक

केलेले बक्षिसपत्र रद्द कसे करता येईल.?
आमच्या कोणच्याही परवानगी शिवाय बक्षिसपत्र केलेले आहे.
ते सद्या दुय्यम निबंधक याच्याकडेच केलेले आहे.
तलाठ्याने नोंद केलेली नाही.
ज्याने बक्षिसपत्र केले आहे ती व्यक्ती दारू पिऊन हे काम केले आहे.
सादर जमीन हि दोन भावाच्या नावे आहे त्यापैकी एकाने बक्षिसपत्र केले आहे.
हि जमीन वडिलोपाजीत आहे.
बक्षिसपत्र करताना सदर व्यक्तीने वारसांना विचारलेही नाही.
हि जमीन फक्त दोन भावाच्या नावे आहे.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

स्वतःच्या हिस्स्यापुरते बक्षिसपत्र करता येते

माझ्या आजोबा च्या नावे असलेल्या जमिनीतून सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
या नुसार आपण सांगितल्या प्रमाणे जुने १९७४ सालचे ७/१२ हि काढले आहेत यात सर्व जमीन व्यवस्तीत आहे
परंतु सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
तरी याबाबतची सर्व कागदपत्रे मी तहसील मधून सर्व ७/१२ व फेरफार घेतली आहे . तरी आता हि कागदपत्रे कोठे द्यायची व कोणता अर्ज करायचा या बाबत संपूर्ण माहिती मिळावी
धन्यवाद

जमीन एकत्रि कारण योजनेवेली जर क्षेत्र..कमी /ज्यादा झाले असेल तर त्याबाबत उप संचालक भूमी अभिलेख यांचेकडे दाद मागता येते

मी मौजे येणेरे , ता.जुन्नर . जि.पुणे येथील रहिवाशी आहे तर गट क्र.१४५ मधील १९८० साली ५० - ५० गुंठे अशी जमीन वाटप झाली पण आता आमच्या ७/१२ वर ४८ गुंठे व त्याच्या ७/१२ वर ५२ गुंठे अशी नोंद आहे . कुठेही पोटखराबा नाही व कोणत्यही फेरफार मध्ये कोणतीही नोंद नाही तर आमचे २ गुंठे जमीन परत लावण्यासाठी काय करावे.???

वाटप झाल्या पासूनचे 7/१२ पहा . २ गुंठे तफावत कशी झाली हे तपासा .