[Ctrl+G for Marathi/English]

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, मुखत्यारपत्र म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

एखादा काम स्वतः करण्या ऐयवैजी दुसर्याने करण्याकरता त्यास प्राधीकृत करणे .
कृपया भारतीय करा कायदा १८८२ चे प्रकरण १० , कलाम १८२ ते २३८ वाचा .

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भोगवटदार वर्ग-१ जमीन म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

जमीनहस्तांतरांवर निर्बंध नसलेली जमीन म्हणजे , भोगवटादार वर्ग १ जमीन

नमस्कार सर

एका अर्जदाराने नॉन क्रिमिलयेर दाखला मिळणेसाठी अर्ज केला आहे परंतु जातीचे दाखला हा ऊत्तर प्रदेश चा कुशवाह जातीचा जोडला आहे
तर त्याला महाराष्ट राज्यत राज्याचे किंवा केंद्र शासनाच्या नॉन क्रिमिलयेर देता येऊ शकते का thank u sir

नाही

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी B चे पुढे आहे. दोघांनीही पहिली संधी वापरून महसूल अहर्ता परीक्षा दिली आणि A कर्मचारी नापास झाला व B कर्मचारी परीक्षा पास झाला तर बी कर्मचाऱ्यास लगेचच पदोन्नती देण्यात येते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली वेळ दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळविले व तो परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होईल का ? कृपया याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, वाजीब-उल-अर्ज म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग) ही परीक्षा दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर परीक्षेत राहीलेल्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेत 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले तर संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे घोषित केले जाते काय ? ( 3 विषयात सूट मिळाली व 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली आहे. ) कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, स्थायी आदेश नस्ती म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, महसूल अपील प्रकरणामध्ये रीतसर चौकशी कशाप्रकारे केली जाते? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर,
पदोन्नती साठी कोणकोणते निकर्ष लागतात.
कोतवालाना 25 टक्के शिपाई होण्याकरता जागा राखीव आहेत.या जागा जाती नुसार भरण्यात येतील कि आपली सेवा किती वर्ष झाली, आपले शैक्षणिक पात्रता किती उच्च, किंवा शिपाई संवागातील एख्यादया जातिच्याची पदोन्नती झाली,तर ती जागा कोतवालामधून त्याच जातीच्या उमेदवाराणे भरली जाईल का?

नमस्कार सर,
मला वसुली बाबत माहिती पाहिजे आहे, जसे कि एखादी वाळू ची ट्रक धरली असता त्याच्याकडून किती royalties रक्कम भरून घ्यायची ,जर तो मालक त्याच ठिकाणी (रस्तावर) जर ती रक्कम भरण्यास तयार असेल तर ती रक्कम घ्यायची का ? रक्कम तहसीलदारच घेवू शकतात का?
इतर कर्मचारी हि ती रक्कम घेवू शकतात. जेव्हा तो रेती मालक royalties ची रक्कम भरतो त्यावेळी आपण चलन काढलेले नसते, जर तो मालक पावती मागत असेल तर त्याला पावती कशी द्यायची ? जर आपल्याकडे पावतीचा फॉरमॅट असेल तर तोही मला इमेल वर पाठवावा.
धन्यवाद

माझ्या जमिनीची मोजणी होऊन मला क प्रत मिळाली आहे.तरी लगतदार शेतकरी अतिक्रमण काढून देत नाही. त्याच्यावर पुढची प्रोसेस करून मला अतिक्रमन काढून मिळण्याची तारीख मिळाली.गावचे तलाठी, सर्कल वगैरे लोक आले.व या तलाठी सर्कल यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या तशी मागणी केली.ऐन वेळी पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही याची कल्पना मला नव्हती परंतु तलाठी सर्कल यांनी त्या शेजाऱ्याबरोबर संगनमत करून अतिक्रमण काढण्यास नकार दिला त्यापूर्वी २ दिवस आधी त्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढू नये म्हणून स्टे ची दिवाणी केस दाखल केली. आता पावसाळ्यापूर्वी आणि त्या स्टे ची नोटीस मिळण्यापूर्वी मला ते अतिक्रमण काढून मिळावे यासाठी मी काय करावे.कृपया मार्गदर्शन करा मी शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाने आणि धमक्यांने वैतागलो आहे.

वरिष्ठ दिवाणी कोर्ट मधून स्टे खारीज करावा

नमस्कार सर,
माझा दिनांक ८ एप्रिल २०१७ चा प्रश्न - क्षेत्र हे गावाच्या शिवेजवळ आहे. क्षेत्राची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे.सदर क्षेत्राची २ वेळेस हद्दकायम मोजणी केलेली असून दोन्ही वेळेस आलेल्या खुणा ह्या एकच आहेत. जमिनीच्या लगत असलेला शिव रस्ता च्या पलीकडे हद्दीच्या खुणा मोजणीदार यांनी दाखविलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र मिळेल कि नाही

आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..

जमीन मूळ मालकाला परत मिळणार नाही

नमस्कार सर , गट नं २६६ बागायत (१.४७ हेकटर + ५ आर पॊटकराब ) मध्ये ४ हिस्से करावयाचे आहेत A . ४० आर , B . २३ आर , C . ४२ आर व D . ४२ आर + ५ आर पोटकाराब. तसेच गट नं ६६ (जिरायत ३५ आर) मध्ये B . १८ आर व D . १७ आर .
वरीलप्रमाणे चार भावांचे चार हिस्से करावयाचे आहेत तरी सर्वांचे स्वतंत्र ७/१२ उतारे होतील का कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती . गावाचे नाव टाहाकली तालुका धरणगाव जिल्हा जळगाव

आदरणीय सर,पूर्वी निवासी प्रयोजनासाठी बिनशेती आदेश घेतला होता.परंतु मनपा.कडून व्यावसायिक प्रयोजनासाठी परवानगी घेऊन त्यानुसार बांधकाम केले असल्यास बिनशेती आदेश व्यावसायिक प्रयोजनासाठी करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....

वापरात बदल ची महसूल अधिकारी यांची परवानगी घावी

नमस्कार,
आमची सामाईक जागा शेतीची आहे ३५ गुंठे सदर जमीन वडीलोपार्जित काळापासून १९५४ पासून आमचे नावे आहे व आम्ही सामाईक भाऊबंदकी आजही लागवड करत आहेत. आमचे जमीनिस लागूनच असलेल्या शेतकरीने जागा विकली की गहन ठेवली त्यावेळी त्यांचे कोर्ट कचेरी चालू झाली असता आमचे इतर ८ शेतकरी ७/१२ वर १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे असा. उल्लेख आमचेही ७/१२ वर असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्हाला याची सुतराम माहिती किवा पत्र कोणाकडून मिळाली नाही. परस्पर उलेख केला आहे. काय करावे तसेच ही बाब का मान्य करावी . १९६६ चे कलम १५५ आन्वये प्रकरण चालू आहे हा उल्लेख काढून टाकायचा आहे. मार्गदर्शन मिळावे.

पूर्वी अश्या प्रकारचे प्रकरण चालू असावे . तथापि १५५ खाली प्रकरण चालू आहे म्हणून इतर हक्कात शेरा ठेवता येत नाही . आपण या इतर हक्कातील शेरा काढून टाकणे बाबत तहसीलदार याना वू=उन्नती अर्ज द्या

माननीय ,
अर्जदार - देवाप्पा पांडुरंग संकपाळ राहणार शेगाव ता जत जिल्हा सांगली. माझे वय आता ७८ वर्ष आहे.
विषय- नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी चुकीचा आदेश देण्याबद्दल मी न्याय मागण्यासाठी अपील करीत आहे .
महोदय -
माझा अपील अर्ज क्रमांक / न .भू /प्रा सु /१६९४/२०१४ (अर्ज क्रमांक / न .भू ./ अपील एस. आर.१८२८/२०१६) हा आहे . मौजे शेगांव ता . जत जि सांगली येथील सी. सर्वे. नंबर. ३०४ व ३१२ या मिळकतीमध्ये वडिलार्जीत वारसा हक्क मिळण्यासाठी मी १९.०८.२०१४ विनंती अर्ज सादर केला हॊता तरी मी दिलेल्या तारखेला वेळोवेळी हजर राहून माझे पूर्ण पणे म्हणणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली (वि. सा.शिंदे)यांना सांगीतले .
मी माझ्या सि. स. नं. ३०४ व ३१२ पहिल्यापासून या घरामध्ये राहत होतो हे घर वडिलार्जीत आहे .हे घर मोडकळीस आल्यामुळे मी तिथून दोन मिनिटे दूर पाठीमागे राहत आहे.माझे जाबदार हे या घरापासून कमीत-कमी दोन ते तीन किलोमीटर या अंतरावर राहतात .
मी शेगांव तालूका जत जि सांगली येथे माझा जन्म झालेला आहे माझे शिक्षण ,माझ्या मुलांचे शिक्षण सर्व शेगांव गावामध्ये झालेले आहे. माझे कुटूंब शेगांवमध्ये राहते मुलामुलींची लग्न झाल्यापासून आणि माझी पत्नी वारल्या पासून मला कुणाचाही आधार नसल्यामुळे मी अधूनमधून माझ्या मुली- मुलाकडे त्यांना भेटण्यासाठी काही दिवसाकरीता त्यांच्याकडे जात असतो.
याचा फायदा घेऊन जाबदार यांनी माझे वडिलार्जीत घर मला न विचारता पाडून तिथे दुसरी नवीन इमारत बांधण्यासाठी सुरु केली आहे मी त्यांना विचारले मला न विचारता घर का पाडून बांधत आहे. जाबदार यांनी मला धमकी देऊन माझ्या अंगावर येऊन म्हणाले तुझे काही यामध्ये नाही तुला काय करायच आहे ते तू कर जा.
तेव्हा ग्रामपंचायत शेगांव व उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यामध्ये चौकशी केली तेव्हा माझ्या लक्षात आले यांनी वारसा हक्क लावलेला नाही व मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. व कोणत्याही प्रकारची नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख सी. सर्वे. जत यांचा कडून कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही.
मग मी सर्व घराचे उतारे मिळवून अपील अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली येथे केला. एकही तारीख न चुकता ३ ते ३ १/२ वर्ष तारखेला हजर राहिलो.
दिनांक २०/०८/२०१६ नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत यांनी फक्त जागेची पाहणी करून निर्णय दिलेला आहे. यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे अपीलदार रहिवाशी आहेत की नाही याची पूर्णपणे चौकशी करायला पाहिजे होती. त्यांनी फक्त जाबदार यांची माहिती फक्त नोंद केलेली आहे जाबदार यांनी ग्रामपंचायत शेगांव येथे कोणतीही माहिती न देता सि. सर्वे. न. ३०४ ते ३१२ ही जुनी इमारत पाडून नवीन बांधकाम सुरु केले होते. त्यामुळे हि जागा अर्धवट बांधकाम झालेले आहे.अपीलदार आणि जाबदार राहण्याचा आणि वहिवाटचा कोणताही संबंध येत नाही मी सर्व पहिल्यापासून रहिवाशी असलेली कागद पत्रे जोडलेले आहेत .
नं. भू. शिरस्तेदार उपअधिक्षक भूमि अभिलेख जत आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांनी दिलेला आदेश अपीलदार हा १९५९ पासून वहिवाट व रहिवाशी नाही. हा चुकीचा निर्णय दिलेला आहे तरी आपण हे समजून घ्यावे हि नम्र विनंती.
आपला नम्र आणि विश्वासू
देवाप्पा पांडुरंग संकपाळ.

नमस्ते सर, माझा प्रश्न असा आहे कि, नियुक्ती खुल्या प्रवर्गातून झालेली असेल, तर जिल्हा बदलीसाठी सदरचे जिल्हयात त्या व्यक्तीच्या मूळ प्रवर्गाची जागा रिक्त असावी कि नियुक्ती खुल्या प्रवर्गातून असल्याने खुल्या प्रवर्गाची जागा रिक्त असावी. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

Sir 68 gunthe shetjamin asnarya jaminit itar adhikarat tukda ashi nond ahe. Tar ti jamin vikta yete ka
2) sadar jamin parvangi n gheta vikli aslyas kay karave

६८ गुंठे क्षेत्र असेल तर तुकडा असू शकत नाही . जुने फेरफार पहा .

थोरल्या भावाच्या पत्नी ने स्वताच्या भावाच्या मुलाच्या नावाने ९५ आर ३२ ग कुळाची जमिनीचे आमच्या ,वडिलांनी खरेदी केलेली जमीन न अ शर्थीने शेरा आहे जमिनीचे व घराचे मृतूपत्र RAGISTER झाले आहे ते फसउन केले आहे.ते दोघेपण मयत आहेत ते आम्हाला मान्य नाही ,परंतु मंडळ अधिकारी ,व तलाठी आमची वारसाची नोंद घातली नाही ,मंडळ अधिकारी यांनी निकाल व आदेश त्याच्या बाजूने दिला आहे ,आम्ही हरकत घेतली आहे ,आम्ही कोर्टात ,अपील केली आहे जमीन सध्या आमच्या ताब्यात आहे जमीन एकत्रीकरण आहे वाटणी झाली नाही
मृतुपत्र मध्ये घराचा सुधा उल्लेख आहे
(घराची नोंद वारसाने आमच्या नावाने झाली आहे ,ग्रामपंचायतिने आमची नोंद घातली आहे ,सामने वाल्याने त्यावर हरकत घेतली नाही,
मृतूपत्राला मुद्दे
1)मृतूपत्राला फिजिकल मेडिकल फिट चा दाखला जोडला नाही
त्यावेळेला आजारी होत्या वय 72 वर्षे होते
2)मृतूपत्रवर मिळकतीचा कुठून आली त्याचा उल्लेख नाही
3) मृतूपत्रवर साक्षीदार यांचे नाव चुकीचे आहे
4) मृतूपत्र बरोबर साक्षीदारांची ओळख पत्रे नाहीत आणि साक्षीदार त्या गावाचे नाहीत पत्ता चुकीचा आहे
5) आणि मृतूपत्रात फक्त एवढेच लिहिले आहे कि मृतूपत्र लिहून ठेवते कारण माझा भाचा सांभाळ करतो आणि पुढेही करील म्हणून मृतुपत्र करत आहे
परंतु त्याने मृतुपत्र करून पंधरा वर्षे झाली त्याने सांभाळले नाही किवा आला पण नाही .परंतु आमच्याकडे डॉक्टर चे फाईल पेपर आहेत व सांभाळलेले पुरावे पण आहेत
यावर काय उपाय योजना करता येतील साहेब कृपया लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती

नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत मधील सिटी सर्वेवर जर वडिलोपार्जित नोंद असेल तर एखादी व्यक्ति मृत्युपत्राण्वये सदरची मालमत्ता परस्पर एका नातवंडाच्या नावे करू शकतो काय? सदर गृहसतास 5मुले व त्यांची 16मुले म्हणजे 16नातवंड असा परिवार आहे.माझ्या माहितीप्रमाणे जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तरच ती व्यक्ति आपल्या मर्जीप्रमाणे मालमत्तेची विल्हेवाट लावू शकतोअन्यथा सर्व नातवंडाचा हक्क अभाधीत राहतो.कृपया योग्य मार्गदर्शन करावे अशी आपणांस नम्र विनंती आहे.

नरेंद्रजी , आपले म्हणणे बरोबर आहे

वडिलोपार्जित मिळकतीतील , केवळ त्यांचा हिस्सा वडील मृत्य पत्राद्वारे नातूंचे नावावर करूशकतात . पूर्ण मिळकत करू शकत नाही . घरामधील एका व्यक्तीचा हिस्सा अलग करू शकत नाही

साहेब गांवठान मोजणी सन 1983ला होऊन सिटी सर्वे नं पडला पण त्यात चुकीची नोंद झाली आहे.ग्रामपंचायत मधील असेसमेन्ट उतारा प्रमाणे नोंदी न झाल्याने कोर्टकचेरी चालू झाली. माझा प्रश्न असा की कायद्याच्या द्रुष्टीने सिटी सर्वेची नोंद महत्वाची की असेस्मेन्ट उतारा महत्वाचा.असेस्मेन्ट उतारा नोंद सन 1977 पासुनची आहे.कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

नगर सर्वेक्षण चुकीचे असल्यास , त्यास विहित कालावधीत आव्हान देणे आवश्यक होते . आपला विलंब माफ होण्याच्या आशेवर आपण नागरसर्वेक्षण आव्हानित करा

एखादा महसुल कर्मचारी आंतर जिल्‍हा / आंतर विभाग बदलीने बदनुल आला असता, नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता उत्‍तीर्ण केल्‍या असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास शासन परिपत्रक दि १४.०९.२०१६ नुसार पुन्‍हा परिक्षा देण्‍याची आवश्‍यकता नाही. परंतु सदर कर्मचा-यास नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता परिक्षेतील काही विषयामधुुुन सुट मिळाली असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास पुन्‍हा सुट मिळालेल्‍या विषयाची परिक्षा देणे बंधकारक आहे का ?

सूट दिलेल्या विषयांची परीक्षा देणे बंधन कारक नाही

नमस्कार
मी सण 1998 साली २ गुंठे जमीन खरेदी केली आहे त्या वेळी माझे नाव २ गुंठे क्षेत्र साठी मालक सादरी आले आहे सण 1999 साली मी ती जमीन विकली होती त्या वेळी खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात आले आहे.परत 2000 साली ती जमीन मी खरेदी केली आहे आत्ता माझे नाव मालक सदरी येणार नाही का

सध्या आपण जुंचे कडून जमीन खरेदी केली त्यांचे नाव इतर हक्कात कसे आले ? फेरफार पहा .

आदरणीय साहेब, भुसंपादन कायदा १८९४ अन्वये जमीन संपादित केली गेल्यानंतर जमीन मालकाने सदर जमिनीचा मोबदला म्हणून अॅयडव्हांस रक्कम देखील स्विकारलेली आहे आणि उर्वरीत रक्कम न्यायलायत जमा केलेली आहे, अशा परिस्थितीत सदर जमीन आज रोजी मोकळी आहे तर अशी जमीन मालकाला परत मिळावी यासाठी कायद्यामध्ये काही तरतुद आहे का? तशी तरतुद असल्यास कृपया अधिनियम आणि कलम त्याची माहिती देण्यात यावी. ही नम्र विनंती...

1. नुकसान भरपाई रक्कम न्यायालयात जमा झाली म्हणजे कायद्याने , खातेदारास नुकसान भरपाईची रक्कम दिली असे मानले जाते .
२. १८९४ च्या कायद्यानुसार जमीन संपादन झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर होत नसेल तर , अन्य सार्वजनिक कामासाठी अशी जमीन देण्याची आहे . अथवा अश्या जमिनीचा लिलाव केला जातो . ती मूळ मालकांना परत देता येत नाही

भास्कर पिल्ले विरुद्ध केरळ शासन ( सर्वोच्च न्यायालय )
३. २०१३ चे भू संपादन कायद्यात , जमिनीचा भू संपादन प्रयोजनासाठी वापर ५ वर्षात ना झाल्यास परत देण्याची तरतूद आहे

Nmaskar sir sasan jama jamnisadi kahi paryay ahi kaa? sir tyaver marg sangaa?....

होय. आपली जमीन महसूल न भरल्याने , शासन जमा झाली असल्यास , आपण जमीन परत मागू शकता

नमस्कार सर,

माझी रत्नागिरी जिल्ह्यात वडिलोपार्जित जमीन आहे. यातील काही जमीन मुंबई गोआ महामार्ग रुंदीकरणात जात आहे. सदर जमिनी संदर्भात माझे काही प्रश्न आहेत.

सन २००८ साली माझ्या आत्यानी नोंदणीकृत हक्क सोड पत्राद्वारे या सर्व जमिनीवरील आपला हक्क सोडला. त्यानुसार त्यांची नावे देखील ७/१२ उताऱ्यावरून कमी झाली. माझी आजी २००३ साली वारली आणि त्याचा उल्लेख वरील हक्क सोड पत्रात देखील आहे. परंतु, २००९ साली माझ्या आजीचे वारस म्हणून आत्यांची नोंद परत ७/१२ उताऱ्यावर करण्यात आली.
माझे प्रश्न असे आहेत कि,
२००९ साली माझया आत्याच्या नावांची परत करण्यात आलेली नोंद कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का?
२००९ साली परत करण्यात आलेली नोंद, मी रद्द करू शकतो का? आणि त्यासाठी मी कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू?
आपल्या उत्तरामुळे मला फार मदत होईल.
धन्यवाद....

आत्याने जर नोंदणीकृत दास्ताने हक्क सोडला असल्यास तिचा हक्क संपलेला आहे . नुकसान भरपाई रक्कम देण्यासाठी काला ( CALA -Competent Authority Land Acquisition) यांची नोटीस प्राप्त झाल्यावर , त्यांना हक्क सोड पात्र दस्त दाखवा . तसे आपले म्हणणे सादर करा .
आत्याचे लावणे चुकीचे आहे . कदाचित आपण हक्क सोड पत्र आजी मयत झाल्यावर , वारस नोंद होताना , हक्क सोड पत्र तलाठी / मंडळ अधिकारी यांना सादरकेले नसेल . तथापि आपण सध्या उपरोक्तनमूद केल्याप्रमाणे , काला यांना हक्क सोड पत्र दाखवून आपली नुकसान भरपाई रक्कम प्राप्त करून घ्या

नमस्कार सर मला जमीन खरेदी विषयी थोड़ी माहिती हवी आहे
सर मला 2 गुंठे शेती जमीन एका व्यक्ती कडून घ्यायची आहे तो सध्या तेथे राहत आहे आणि त्याची घराची नोंद ग्रामपंचायत मधे आहे तर या व्यवहारात खरेदी होईल की नोटरी आणि आणखी काही पर्याय आहे का। धन्यवाद

१.जमीन रहिवासी वापर विभागातील असेल तर , तुकडे बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाही .
२. जमीन नोंदणीकृत दस्ताने खरेदी करा . notarorized दस्तास कायद्यात आधार नाही

नमस्कार सर,
मला एक प्रश्न विचारायचा आहे आमचा एक घर आहे ते १९९४ पासून ग्रामपंचायत मध्ये माझ्या नावावर आहे व सदरील घर हे १९९४ च्या आधी मोकळी जागा होती नगरपंचायत मध्ये सगळे फेरफार व्यवस्थित झाले आहेत पण माझ्या नावावर PR कार्ड नाही व घरच्या पण कोणाच्या नावावर pr कार्ड निघत नाही आम्ही १९88 पासून येथे राहत आहोत तर PR CARD नसेल किंवा दुसर्याच्या नावावर असेल तर?
बहुतेक सिटी सर्वे ला नोंद झाली नसावी त्या काळात

आपले घर ग्राम पंचायत मध्ये असताना , गावठाणात असेल व गावठाणाचा सिटी सर्वे झाला नसेल तर प्रॉपर्टी कार्ड , काढले जात नाही .
आता आपण नागरपंच्यात मध्ये समाविष्ट झालेले आहेत . नागरपंचायतने , सिटी सर्वे करणे बाबत , अधीक्षक भूमी अभेलेख यांना प्रस्ताव देणे आवश्यक . सिटी सर्वे झाल्यावर , नगर पंच्यात क्षेत्रासाठी , प्रोप्रेर्टी कार्ड निघेल

एका महिलेचे लग्न होऊन दोन वर्षे झालेली आहेत. तरी, सदर महिलेसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावयाचे असल्यास त्यांचे करीता कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे लागेल ?
जर वडिलांचे उत्पन्न ग्राह्य धरावयाचे असेल परंतु, वडील हयात नसल्यास किंवा वडील कमावते नसल्यास अशा प्रसंगी कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे ?

कमावते नसले तर उत्त्पन्न शून्य धरावे लागेल

ग्रामपंचायत मध्ये नमुना ८ वर वारसांची नोंद करण्यासाठी मुदतीची आवश्यकता असते का ? २० वर्षानंतर वारसांची नोंद करता येते का ? जाहीर प्रगटन देऊन केलेली वारसांची नोंद कायदेशीर असते का?

अधिकारी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागत यांनी द्यावयाची चिट्ठी हि शासन निर्णय दि ७-५-१९३० अथवा इतर शासन निर्णय असेल तर त्याची प्रत उपलब्ध होणेस विनंती

आदरणीय सर, मला १.०२ हेक्टर जमीन होती. यातील .०.५१ आर जमीन मी विकली आहे. सदर जमिनीमधुन मला आता ०.१० आर जमीन परत घ्यावयाची आहे.सदर जमीन माझ्या जमीनीलगतच असुन मुळातच सध्या तिचा वहिवाट मी करीत आहे. सदर जमीन विकताना ०.४०आर ऐवजी ०.५१आर खरेदी दिली गेली. खरीददार १०आर परत करावयास तयार आहे. सदर शेत जमीन बागायती आहे. जर १०आर खरेदी करावयाची असेल तर तुकडाबंदी कायदा लागू होतो का? जर खरेदी करावयाची असेल तर कशी करता येईल.कृपया मागॆॆदशॆन व्हावे.

मूळ खरेदीत शुद्धी पत्रक करता येईल का याचा प्रयतन करावा

तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही . खरेदी खत करा

नमस्कार मी अविनाश शिंदे मी २०१५ साली ९ एकर जमीन घेतली आहे परंतु त्या जमिनी विषयी काही कायदेशीर सल्ला मला आपणाकडून घायचाआहे
सादर जमीन हि माझ्या पणजोबाव त्यांचंया भावाकडे कडे जमीन कस्नयसाठी इसवी सॅन १९५३ साला पासून आहे तसेच १९५३ साली त्यांचे व भावाचे संरक्षित कुल म्हणून नाव लागले परंतु जमीन मालकाने ते कुल म्हणून तहसील समोर कुल हक्क सोडून दिले व तास फेर पडला त्या नंतर १९६३ पुन्हा संरक्षित कुल लागले पण त्या वेलेस पण कुल म्हणून हक्क सोडून दिले व नवीन फेर पडला तदनंतर १९७३ पर्यंत मालकाने मंजुरीने व खंड ने जमीन कसून घेतली व कागतोपात्री कुल म्हणून व इतर हक्कात कधी नाव लागले नाही व आज पर्यंत त्यांनी पीक पाणी खुद्द असे आहे कागतोपात्री आज पर्यंत ते मालक आहेत पण कब्जा आमचा होता
२) त्यांनी आम्हाला जमीन विक्री साठी विचारले आम्ही ती घेतली परंतु माझ्या आजोबांच्या भावाने आमच्या विरुद्ध केस मनाई साठी लावली आहे तरी मला कायदेशीर मार्गदर्शन करावे

कुल मालक हे संभांड केव्हाही निर्माणहोऊ शकतात . आपले आजोबांचे भावाने , जर न्यायालयात , त्यांची वहिवाट सिद्ध केली , तर न्यायालय आपणास मनाई हुकूम देऊ शकते

आदरणीय सर,एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडे नोंदीबाबत तक्रार केस चालू असताना सदर केस निकालावर ठेवली असता,अर्जदारास आपले लेखी म्हणणे दाखल करता येईल का?दाखल केल्यास सदर मुद्दे निकालपत्रात समाविष्ट केले जातात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...

निकालावर ठेवली म्म्हणजे दोनी बाजूंचे पुरावे संपले आहेत . तथपि विरोधी पक्षाने संमती दिल्यास , लेखी म्हणणे देता येईल

आदरणीय सर, ७/१२ सदरील इतर हक्कात बाँडिंग तगाई बोजा र.रु.....आहे सदर रकम कोठे भरावी लागेल कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....

तगाई बोजे कधीं टाकणे बाबत , शासन निर्णय आहे . ( माझ्याकडे प्रत नाही ) . कालबाह्य अंतर हक्कातील बुजे काढून टाकणे बाबत शासन निर्णय आहे

सर नमस्कार

महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?

धन्यवाद

आवश्यक नाही . मात्र कालावधी पाळला जातो

नमस्कार सर,
२००७ मध्ये नोंदणीकृत खरेदी खताने २ एकर जमीन विकत घेतली. खरेदी देणार पती आणि पत्नी होते. मालक सदरी दोघांची नावे सातबारा उतारावर होते. त्यांना 2 मुली व १ मुलगा असे अपत्य आहेत. खरेदी खतात १ मुली व १ मुलगा यांच्या संमती देणार म्हणून सही घेतलेल्या आहेत. १ मुलगी अमेरिका येथे असल्याने तिची सही घेतलेली नव्हती. जमीन विकत घेताना खरेदी देणार पती व पत्नी यांच्या नावावर ४ एकर जमीन शिल्लक होती व आजही आहे. खरेदी खताच्या आधी दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटिस दिलेली होती.
मागील वर्षी अमेरिकेत असलेली मुलगी भारतात परत आलेली आहे, तिने २०१७ मध्ये मंडळ अधिकारी यांनी २००७ मध्ये मंजूर केलेल्या फेरफार वर नाराज होऊन मा.उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज केलेला असून त्याची नोटिस मिळालेली आहे.
१) मा.उपविभागीय अधिकारी अर्ज मंजूर करतील का?
२) मंजूर फेरफार रद्द होऊ शकतो का?
३) सदर अर्ज बाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो?
योग्य मार्गदर्शन व्हावे.

७/१२ सादरी पती पत्नी होते . सादर मिळकत पती पत्नी यांचे स्व कष्टार्जित मिळकत असावी . त्यामुळे त्यांचे मुलांना त्यात हक्क नाही . त्यामुळे त्यांची संमती घेण्याची गरज नव्हती . मुलीला अपील करून उपयोग होणार नाही

आदरणीय साहेब,
माझा प्रश्न पुढीलप्रमाणे, सन १९३८ मध्ये माझ्या आजोबांच्या काकाने (काशिबा) आमच्या जमीनीस मालक माझे आजोबा (बाबुराव) व त्यांचे सख्खे भाऊ (बाजीराव) असताना देखील काकाची (काशिबा) यांची वहिवाट आहे असे दाखवुन आजोबांच्या भावाने म्हणजेच बाजीराव याने अर्ज दिलेवरुन बाजीराव चे नाव कमी करुन काशिबा चे नाव दाखल केले. परंतु फेरफार वर माझ्या आजोबांचे नाव दिसुन येत नाही. तरीदेखील सदर बाबतीत बाबुराव याची वहीवाट असताना देखील बाबुराव याच्या नावे नोंद असलेला आठ आणे हिस्सा याची नोंद विचारात न घेता तलाठीने संपुर्ण क्षेत्र हे काशिबा च्या नावे दाखल केले आहे. यामध्ये बाबुराव याने जागा सोडलेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. तसेच काशिबा याने पुढे जागा विकली आणि परत तिच जागा काशिबा ची बायको(राहीबाई) च्या नावावर झाली.
परंतु राहीबाई च्या नावावर जागा कशी आली याचे फेरफार काढले असता सदर फेरफार आमच्या मिळकती संदर्भात दिसुन येत नाही. तसेच १९६५ साली राहिबाई हिने जागा विकली परंतु तिचे खरेदीखत पाहिले असता खरेदीखतावर आमच्या मिळकतीचा उल्लेख दिसुन येत नाही. परंतु तलाठिने नोंद मात्र आमच्या मिळकतीची केलेली आहे. आणि राहिबाई ला इंग्रजी येत नसताना सदर दस्त ईंग्रजी भाषेत आहे. राहीबाई ची देखील फसवणुक झालेलेली आहे.

सदर प्रकरणात आम्हाला झालेल्या फेरफार वर अपिल दाखल करुन आज रोजी आमच्या आजोबांच्या नावे नोंद असलेले आठ आणे क्षेत्राबाबत कशाप्रकारे न्याय मागता येईल का?? कृपया मार्गदशन करावे, मी आपला कायम ऋणी राहिल...

बाबुराव यांचा मिळकतीत हक्क होता . तथापि बौराव यांचे नाव कमी झालेवर वहीत मुदतीत अपील दाखल करणे आवश्यक होते .
आत्ता आपण अपील दाखल केले तरी , विलंब माफ होणे आवश्यक आहे . त्याही पुढे जमिनीची विक्री झाली आहे . त्यामुळे आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून हक्क साबूत करू घ्यावे लागतील . जमीन परत मुळेच अशे नाही मात्र जमिनीचे हिस्स्याची किंमत मिळू शकते

1)नमस्कार सर आजोबांच्या शेत जमिनीवरील 7/12 वर वारस हक्काने त्यांच्या बहिणीचे नाव ईतर अधिकारात लागलेले होते, त्या मयत झाल्यावर मुलाचे व मूलगा मयत झाल्यावर त्यांच्या सूनेचे नाव लागलेले आहे, आज आजोबा व त्यांची बहिण दोघेही हयात नाहीत , आम्ही त्यांना काही प्रमाणात मोबदला देवून हक्कसोड करण्यास प्रयत्नशील असून तरी त्या महसूल कोर्टात केस टाकण्याची धमकी देत असून तयार होत नाही. तरि त्यांचे नाव दुसरया मार्गाने काढता येईल का? हो असेल तर कसकाय

2) आजोबांना मूलगा नसलयाने त्या जमिनीवर वारस हक्काने त्यांच्या मुलींची नावे लागलेली आहेत, 7/12 पूर्ण क्षेत्र हे सामाईक क्षेत्र आहे तर एकूण जमिनीचे समान वाटप करता येईल का? त्या साठी काय करावे लागेल तसेच त्या साठी सर्व बहिणीचीं संमती आवश्यक आहे का
धन्यवाद

१. दुसऱ्या मार्गाने नाव काढता येणार नाही
२. समान वाटप करावयाचे आहे . बहिणी संमती देतील

७ १२ वर नावे लागल्यानंतर किती दिवसात हरकत घेता येते.

नावे ७/१२ सदरी लागल्यावर . हरकती घेण्याचा प्रश्न उदभवत नाही
वर्दी नोटीस दिल्यावर हरकत घेता येते
मंजूर फेरफारावर अपील दाखल करा . ६० दिवस मर्यादा आहे

आदरणीय सर ,१० वर्षांपूर्वी आजोबांच्या नावावर शेतजमीन आम्ही पैसे देऊन विकत घेतली होती.आजोबांचे निधन झाल्यानंतर आम्ही वारसनोंद करताना फक्त आमचीच नावे लावून घेतली कारण फक्त आम्हीच पैसे दिले होते.त्यामुळे सादर नावे लावण्यास इतर वारसांचीही हरकत नव्हती.व आजही नाही.आज रोजी सदर जमीन आमच्याच ताब्यात आहे .व आम्ही ती विकसित करणार आहोत.परंतु भविष्यात इतर वारसांनी हरकत घेऊ नये म्हणून आम्हास काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....

त्यांचे हक्क सोड पत्र घ्या

कोणतेही खरेदी खत तसेच कोणताही कायदेशीर व्यवहार न करता खातेदार हा ७/१२ तसेच ८अ वर सहहिशेदारी म्हणून कोणाचीही नोंद करू शकतो का ?

नाही

Sir majya vatnila ८ gunthe shetjamin येत ahe Teri mala तुकडे bandi kaydyanusar vatap patrala adchan yeyil ka. १) mi register vatap karu shakto ka court vatap karu shakto plz detail dya

तुकडेबंदी कायदयाचा भंग होतो

आपली जमीन कोणत्या स्वरूपाची आहे ? बागायती असल्यास अडचण येणार नाही . नसल्यास तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार आहे

नमस्कार सर , कुंटेकर सर मला अँप्लिकेशन आणि विस्तृत माहिती हवी होती... कृपा आपला मेल ईद मिळेल का

आदरणीय सर, एखादी व्यक्ती आपले जनरल मुखत्यारपत्र एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना करून देऊ शकते का ?

दोन किंवा त्या पेक्षा जाडा लोकांना नेमल्यास , दस्तामध्ये , दोघे एकत्र अथवा वेगवेगळे काम करणार याचा उल्लेख करणे आवश्यक

होय

Sir mi aplya website var itke prashn vachle te prashn wachun mala asa prashn padla ki 20 gunthe 22 gunthe kitihi gunthyacha dast hotay mag tukde bandi kaydyacha faayda kay te dast awaidh kA hot nahi plz kalave

२० गुंठे क्षेत्र हे पडीक जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र आहे , त्या पेक्षा कमी क्षेत्राची विक्री झाली तर , तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याच्यान्वये कारवाई केली जाते