[Ctrl+G for Marathi/English]

नमस्कार साहेब
बांधकामाबाबत शासनाच्या कोणत्याही परवानगी नसताना गृहनिर्माण संस्था नोंदणी कर्ता येते का ? नोंदणी बाबत गृहनिर्माण संस्थेने जमीन विकत किंवा भाडे तत्वावर घेतली नाही. बिन शेती आदेश झालेले नाहीत. विकास आराखडा महानगर पालिकेने मंजूर केला नाही. यू.एल.सी ची परवानगी घेतली नाही. संस्थेने बांधकाम केले नाही. त्याचे वितरण संस्थेने केले नाही. संस्थेमधील रूम (खोल्या ) , सदनिका नोंदणीकृत केल्या नाहीत. संस्था नोंदणी निबंधकाने संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र दिले आहे. नोंदणी प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असे आहे. व त्याचे वर्गीकरण भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था असे आहे. महानगरपालिकेची घरपट्टी ,पाणीपट्टी , लाईट बिल सभासदांच्या नावे येत आहे. संस्थेच्या नावे येत नाही. पूर्वी एका विकासकाने जमीन मालकांकडून विकासकरार व कुलमुखत्यार पत्र करून घेतले आहे. ते साध्या स्टॅम्प पेपर वर केले आहे. ते नोंदणीकृत केलेले नव्हते. जमीनीचे मालक मयत झाल्यावर जमीन मालकच्या वारसांनी दुसर्‍या विकासकास जमीन नोंदणीकृत कन्व्हेंस डिड करून विकली आहे. आता संस्थेला संस्थेच्या सातबारा नावे करावयाचा आहे. तो सातबारा संस्थेच्या नावे होईल का ? संस्थेचे रि डेव्हलपमेंट करण्यास संस्था पात्र आहे का ? कृपया मार्गदर्शन मिळावे

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .

नमस्कार सर, माझ्या मित्राच्या आजोबाच्या नावाची जमीन आहे त्याच्याकडे १९४९ चे सातबारा प्रती आहेत ते त्याच्या आजोबाच्या नावे आहेत व आता सद्यस्थितीत प्रांतिक सरकार यांचे नावे आहे. सदर जमिनीच्या सर्वे क्रमांकावरुन नगर भूमापन क्रमांक कश्या पध्दतीने काढता येतील व कोणत्या कार्यालयातुन माहिती उपलब्ध होईल तसेच उपरोक्त जमीनीचे गटबुक कश्या पध्दतीने व कोणत्या कार्यालयातुन मिळविता येईल.

आपण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयात जा . त्या ठिकाणी चौकशी नोंदवहीवरुय्न आपणास सर्वे नंबर वरून नागरभूमान no काढता येईल

सर, आमची कुळकायद्यानी आलेली जमीन होती. ती एका वक्तीने कलम ४३ नुसार जिल्हधिकारींची परवानगी न घेता खरेदी केली. नंतर परवानगी ३ वर्षांनी घेतली. तसेच परवानगी आल्यावर ४ महिन्यांनी सदर जमिनीच्या सातबारावर कलम ४३ नुसार कलेक्टर च्या आगाऊ परवानगी शिवाय सदर जमीन कोणासही गहाण,दान, विकू नये असा फेरफार तसेच ४३ ला पात्र असा शेरा लागला..
तर हा फेरफार घडल्यावर ४ महिन्यापूर्वी घेतलेली
परवानगी रद्द होते का? का हा फेरफार घडल्यापासून परत नवीन परवानगी काढायची होती? तर ३ वर्षांपूर्वी झालेले व्यवहार हा कायदेशीर आहे का? का रद्द होतो?.....कृपया मला कळवा....

जमीन खरेदी करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते . खरेदी पचश्चत परवानगी देता येत नाही . अश्या प्रकरणात कलाम ८४ क क खाली कारवाई अपेक्षित आहे

आदरणीय सर, आमच्या शेती जवळ एक पाझर तलाव आहे . शेजारच्या एका शेतकऱयाने त्या पाझर तलावाच्या दहा मीटरच्या अंतरावर एक विहीर खोदली आहे. अशी विहीर खोदण्यासाठी शासनाची परवानगी लागत नाही का ? जेणे करून मलाही पाझर तलाव जवळ विहीर खोदता येईल. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.

पाझर तलाव जर जिल्हा प्राधिकरणाने , Public Drinking Water Source म्हणून अधिसूचित केला असेल तर , The Maharashtra Ground Water ( Management and development ) Act 2009 च्या कलम २१ अन्वये , ५०० मित्राच्या आत विहीर खोदता येणार नाही . मात्र पाझर तलाव अधिसूचित नसेल तर , विहीर खोदण्यास कोणतीही कायद्याची बाधा नाही

संरक्षित कुळ आणि एकत्र कुटुंब मॅनेजर ह्यांचा संबंध काय असतो. संरक्षित कुळ कोण्या एकाच्या नावाने असेल तर एकत्र कुटुंबातील इतरांना त्यात काय हक्क न अधिकार असतात. ह्या विषय माहिती हवी आहे.

नमस्कार सर ...माझा प्रशा असा होता कि माझा मालकीचा ग्रामपंचायत गावठाण मध्ये २५०० sq फट प्लॉट १९८५ ला खरेदी खाता नुसार रिजिस्ट्रेड खरेदी केली आहे. पण तेंव्हा पासून सादर जागेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केल्या गेली नाही, सध्या त्या जागेवर अतिक्रमण केले आहे . २०१० पासून जागेची नोंद करण्यासाठी आम्ही अर्ज करत आहोत पण ग्रामसेवकाने नोंद घेतली नाही.. परत आम्ही ग्रामसेवकाला नोंद करण्यासाठी विनंती केली आहे...व नोंद करण्यासाठी सर्च रिपोर्ट मागितला आहे. सर्च रिपोर्ट ची गरज आहे का. याबाबत मार्गदर्शन करावे. सदर जागेवर एका व्यक्ती ने अतिक्रमण केले आहे व त्याचा नावे खोटी नोंद घेतली आहे.

गावठाण जर unsurveyed असेल तर , अश्या जागेचे अधिकार अभिलेख म्हणजे , ग्राम पंचायत कर आकारणी पत्रक . आपण हि जागा ज्याच्याकडून घेतली , त्याचे नाव कर आकारणी नोंदवहीत नमूद होते का ? जर आपण ज्या इसमाकडून खरेदी केली त्याचे नाव , अश्या आकारणी नोंद वहीत असेल तर , आपण गट विकास अधिकारी यांचे कडे , ग्राम सेवकाने जी खोटी नोंद घंटील्याचे आपण नमूद केले आहे त्या विरुद्ध अपील करा .
मात्र जर आपण ज्याच्याकडून खरेदी केली आहे त्याचे तत्कालीन वेळी मिळकत आकारणी नोंदवहीत नाव नसेल तर , आपले नाव गावठाणातील जागेला लागणार नाही
गावठाण surveyed असेल तर , त्या मिळकरीचा मिळकत उतारा , आपण खरेदी करते वेळी कोणाचे नावावर होता , त्या वर , आपले नाव लागणे अवलंबून आहे

नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का?

नमस्कार सर , गृहनिर्माण सहकारी संस्था याचे री डेव्हलपमेंट म्हणजे काय ? संस्थेच्या नावे जमीन किंवा सदनिका धारकांच्या नावे जमीन बाबतचे हक्क नसताना री डेव्हलपमेंट करता येते का ? सभासदांच्या नावे महानगर पालिकेचा कर पाणी बिल लाईट बिल येत आहे. त्यांना कोणते अधिकार प्राप्त होतात , जमीन मालक यांना दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकत येते का ? पूर्वी जमीन मालकाने एका विकासकाला विकास करार करून दिला होता. तसेच कुलमयूखत्यारपत्र करून दिले होते. सदरचे कुलमुखत्यारपत्र व विकास करार नामा रजिस्टर केला नाही. विकासकाने सदनिका धारकांना सर्व सदनिका रजिस्टर नोंदणी करून विकले नाहीत. अश्या परिस्थितीत सानिका धारकांना जमिनीवर काही हक्क सांगता येतील का?. काही हक्क सांगण्या करीता कोणता कायदा आहे का? कृपया मार्गदर्शन मिळावे. हि विनंती

सर
जात अर्जदारांनी जात प्रमाणपत्रसाठी जर रक्तातील नात्याची वंशावलीनुसार सर्व सदशांचे जातप्रमाणपत्र किंवा जातपडताळणी प्रमाणपत्र प्रस्ताव सोबत सादर केल्यास १९५० च्या मानीव पुरावाची गरज असेल का

होय मूळ रहिवाशी असलयाचे सिद्ध करणे साठी

नमस्कार सर,प्रथम तुमचे आभार ठुमरी मार्गदर्शना मुले मी खूपच यौग दिशेने जात आहे . आटा माझ्या एक प्रश्न आहे कि ,फेरफफर दुरुस्थी साठी ताल .कोरेगाव येते माननीय प्रातःशाईब यांच्याकडे केश चालू होती दोनी बाजूचे म्हणणे मांडून झाले आहे पण सर अजून कोणताच निर्णय मला लेखी अथवा तोंडी समजला नाही .मी वकिलांच्याकडे विचारणा केली असता सांगण्यात आले कि निकाल तुम्हाला पोस्टाने कळवळा जाईल .हाय गोष्टीला १ वर्ष होऊन गेले आहे .मला तो निकाल मिळवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मागर्दर्शन करा .

नवीन कायदा दुरुस्तीनीसार , अपील दाखल झाल्यापासून १ वर्षाचे आत त्यावर निर्णय घेणे , महसूल अधिकारी यांना क्रमप्रपात आहे . आपण संबंधित प्रांत सहेब्बन भेटून हि बाब निद्रशनास आणून द्या .
तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे हि लेखी पत्राद्वारे कळवा

नमस्कार,

जमिनीची मोजणी करावयाची आहे पण लगतचे कब्जेदार आणि त्यांचे पत्ते चौकशी करून सुद्धा उपलब्ध होत नसतील तर त्यांच्याविना सरकारी मोजणी होऊ शकते का ?

जमिनीची मोजणी करणे अनिवार्य आहे कृपया मार्ग सुचवा.


लगतचे कब्जेदारांचे पत्ते उपलब्ध होत नसतील तर , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , मोजणी नोटीस , कब्जेदारांचे जागेवर प्रसिद्धही करण्याची तरतूद आहे

नमस्‍कार सर माझा प्रश्‍न असा आहे की, A नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण नाही. B नावाचा कर्मचारी महसूल अहर्ता परीक्षा उत्‍तीर्ण आहे. पण जेष्‍ठते मध्‍ये A कर्मचारी सिनीयर आहे व B कर्मचारी ज्‍युनीयर आहे. A कर्मचारी यांची जेष्‍ठता कायम आहे कारण त्‍यांच्‍या तीन संधी झाल्‍या नाही व 9 वर्षाची सेवा पण झाली नाही. मग आता B कर्मचारी ज्‍युनीयर असला तरी परीक्षा लवकर पास झाला म्‍हणून त्‍यांना लगेच पदोन्‍नती देण्‍यात येते का सर, याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे. हि नम्र विनंती

पदे जशी रिक्त होतात , तसे पद्दोनीतीची बैठक होते . बैठकीमध्ये आपण पदोन्नतीसाठी पात्र यादीमध्ये येत याल, तर आपणास पदोन्नती मिळेल

सरजी आपणास विचारलेल्या प्रश्नाची किती दिवसात आपण उत्तर देता ?

महोदय , येथे अधिकारी त्यांच्या कार्य व्यापातून आपला बहुमूल्य वेळ काढून उपलब्धतेनुसार उत्तरे देतात, धन्यवाद.

माझ्या बिनशेती जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'ओपन बिनशेती' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय होतो ?

ओपन बिनशेती अशी संकल्पना नाही . आपली मिळकत बिनशेती असल्यास , ओपन हा शब्द वगळण्याबाबत कलाम १५५ ( MLRC 1966 ) खाली तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

माझी बिनशेती जमीन ग्रामपंचायत रस्त्यालगत आहे जी मी १० वर्षांपर्वी खरेदी केली होती. ग्रामपंचायत रस्त्यालगत माझ्या हद्दीच्या आतील बाजूस पूर्वीपार ४ फूट गटार होते व जमिनीतील प्रवेशासाठी जागा खरेदीवेळी गटारावर मोरी बांधलेली होती त्याच्या खालून पावसाळी पाण्याचा निचरा होतो.

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार माझ्या हद्दीत गटारासाठी मी आता ४ फुटांच्या ऐवजी ८ फूट रुंदीचे अंतर गटारासाठी ठेवले आहे. त्यामुळे आता माझ्या हद्दीतील मोराची रुंदी कमी झाली आहे. ग्रामपंचायत मला नवीन रुंद मोरी बांधायला सांगत आहे, परंतु हा खर्च करणे शक्य नसल्याचे मी कळविल्यावर 'पावसाळी पाण्याचा निचरा' होणेसाठी ८ फूट रुंदीचे अंतर मोरीसाठी आवश्यक असून मी मोरी रुंद न केल्यास मूळची मोरी तोडून टाकू व पावसाळी पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करू असे ग्रामपंचायतीने कळविले आहे. ग्रामपंचायतीस असे करण्याचा अधिकार आहे का ? गेली १० वर्षे असलेली प्रवेशासाठीची मोरी तोडून माझा वहिवाट मार्ग ग्रामपंचायत बंद करू शकते काय ? मी हद्दीतील प्रवेशासाठी ग्रामपंचायत रस्त्यालगत मोरी बांधली तेंव्हा कोणतेही परवानगी न घेतल्याने ती बेकायदेशीर आहे असे ग्रामपंचायत सांगते आहे. ग्रामपंचायत रस्त्यावरून हद्दीत प्रवेशासाठी मोरी बांधण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते का ?

आपण मोरीसाठी ४ फूट ऎवैजी ८ फूट जागा सोडली आहे . मात्र ग्रामपंचायत आपणास , मोरीचे बांधकाम करण्यास सांगू पाहत आहे . मोरीचे बांधकाम ग्रामपंचायतिने करणे आवश्यक . जर सध्या . ग्रामपंचायत ८ फूट मोरीचे काम न केल्यास , मोरीवरील बांधकाम तोडण्याची सूचना आपणास करत आहेत , आपण सध्याचे मोरीमुळे , पाण्याचा निचरा होत नाही का याची खात्री करा .
आपण ग्रामपंचायतीचे पत्रास उत्तर द्या .

सर विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) या परीक्षेच्‍या शासन निर्णयातील नियम क्र. ८ नुसार सदर परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी प्रत्‍येक वि‍षयात कमीत-कमी ४० टक्‍के गुण व संपुर्ण परीक्षेत एकूण गुणाच्‍या ५० टक्‍के गुण (म्‍हणजे १००० पैकी ५०० च्‍या वर गुण ) मि‍ळाले तर सदर परीक्षा उत्‍तीर्ण झाल्‍याचे जाहिर केले जाते. तसेच नियम क्र. १० नुसार जर परीक्षार्थी परीक्षा नापास झाला तर त्‍याने कोणत्‍याही व‍िषयात किंवा व‍िषयांमध्‍ये त्‍याने ६० टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण मिळविले तर त्‍याला त्‍या विषयाला पुन्‍हा बसण्‍यापासुन सुट देण्‍यात येते.

प्रश्‍न खालील प्रमाणे-
(१) तीन व‍िषयाला यापुर्वीच्‍या परीक्षेत सुट म‍िळाली होती. म्‍हणून फक्‍त ३ विषयाची पुन्‍हा परीक्षा दिली तर संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण होण्‍यासाठी तीन्‍ाही विषयात प्रत्‍येकी ६० टक्‍के गुण मिळवावे लागतील कि ४० टक्‍के गुण मिळवावे लागतील सर.
कृपया करुन मार्गदर्शन करावे. खुप मोठी मदत होईल सर.

आदरणीय महोदय माझा प्रश्‍न असा आहे की, माझे आजीचे नावावर २ एकर जमीन होती, त्‍यांचे निधन सन २००० मध्‍ये झाले पण माझे आजीने कोणत्‍याही मुलाच्‍या नावाने मृत्‍युपत्र लिहून दिलेल नाही.
मग आजीचे निधन झाल्‍यानंतर त्‍या जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून फक्‍त माझे वडीलांचे नाव आजच्‍या तारखेपर्यंत आहे. माझे वडीलांचे दोन भाऊ सदर जमीनीच्‍या ७/१२ वर वारस म्‍हणून आमचे नाव नोंदविण्‍यात यावे म्‍हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर तलाठी साहेब त्‍यांचे नाव वारस म्‍हणून ७/१२ वर नोंदवतील का सर ?
कृपया करुन याेेग्‍य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

आपले कथनानुसार , आपले आज्जीस तीन मुले आहेत . त्यामुळे साहजिकच अन्य दोन वारसांची नावे लागणे आवश्यक

नमस्कार सर,
जमिनीची मोजणी केल्यास मोजणी अधिकारी अतिक्रमण असल्यास ते काढून देऊ शकतात का?
जर बाजूच्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढण्यास मनाई केली तर त्याची तक्रार कोठे करावी?
शेत जमिनीवर असणारे अतिक्रमण काढण्यास तलाठी अधिकारी मदत करतात का?
त्यांची मदत होऊ शकते का ? उत्तर द्या?

मोजणी अधिकारी मोजणी कधी शकत नाही
तलाठी हि खाजगी जमिनीचारील अतिक्रमण काढू शकत नाही .
आपणास ते अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावे लागेल

MLRC act 1966 अंतर्गत सेक्शन 44 मधील Amendment 2014 नुसार Ddevelopment plan मध्ये समावेश असलेल्या नगरपालिका हद्दीतील जागा अक्रुषिक वापरासाठी कलेक्टर NA ची गरज नाही परंतु तहसीलदारांकडील NA ची सनद मिळवण्यासाठी काय करावे

नमस्ते श्री किरण पाणबुडे साहेब या पूर्वी मी आपणास २ ई-मेल पाठवले होते त्याचा आपल्या कडून कुटला ही प्रतिसाद मिळाला नाही .मी नमूद केलेले प्रश्नांचे उत्तर अपेक्षित आहे १- ७/१२ मध्ये इतर हक्कात महाराष्ट्र खाजगी वन आधीनियमतील तरतुदीस अधीन राहून अशी नोंद असताना अशा शेत जमीची खरेदी विक्री करता येते का? त्याची शासन शासकीय परवानगी घेणे आवश्यक आहे का ? जर खरेदीदाराने सदर जमीन रीतसर खरेदी केलीतर त्याच्या नावाची नोंद 7/12 मध्ये होईल का ? कृपया माहिती मीळावी ही विनंती.

नमस्कार साहेब माझा प्रश्न असा आहे कि मी एक गृहनिर्माण संस्थे मध्ये सदनिका विकत घेतली आहे. सदनिका विकत घेताना संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सदनिकेचा महानगरपालिका कर पावती , नळाचे जोडणी बिल पाहून खरेदी केली आहे. संस्थेचे प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असून त्याचे वर्गीकरण भाडेकरी सह भागीदारी संस्था असे आहे. आता संस्थेचे नावे कोणताही महानगरपालिकेचा कर येत नाही. सातबारा मध्ये कोठेही संस्थेचे नावाचा उल्लेख नाही. अनधिकृत बांधकाम असा उल्लेख आहे. जागेचा बिन शेती आदेश नाही. महानगरपालिकेने आराखडा मंजूर केलेला नाही. बांधकाम परवाना दिला नाही. टायटल मध्ये चुकीची माहिती आहे. सातबारामध्ये कु.का.की.४३ अशी नोंद आहे. पूर्वी १९८८ साली विकासकरारनामा व कुलमुखत्यार करून दिले होते त्या आधारे विकासकाने सर्व सदनिका अन रजिस्टर सदनिका धारकांना विकल्या सातबारा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांची नोंद झाली. सातबारातील वारस जमीन मालकांनी पुन्हा ती जमीन विकासकाला कन्व्हेन्स डिडने विकली आहे.
आता संस्थेचे नावे जमीन होईल का? सदनिकेवर सदनिका धारकांचा मालकी हक्क काय असणार आहे. विकासक यांच्या विरुद्ध किंवा जमीन मालकानं विरुद्ध काही दावा दाखल केला तर फायदा होईल का? विकासक आम्हाला घराच्या बदल्यात त्याचा ठिकाणी २७% जागा वाढवून देतो आहे. ते मान्य केलेले चांगले का दावा दाखल केल्याने फायदा होईल . या बाबत मार्ग सुचवावा. हि विनंती

महोदय,
मी माझी जमीन रजिस्टर गहाण खत करून माझ्या काकांना दिली होती
ती मी आता त्यांचे पैसे देवून गहाण फेड दस्त करून घेतला आहे मी जमीन सोडवली आहे
परंतु माझ्या सातबारावर माझ्या काकांचेही नाव चढले आहे त्यासाठी मी तलाठी कडे अर्ज केला होता
तलाठी कडे असणाऱ्या रजिस्टर वर काकांच्या सह्या हव्या आहेत असे तलाठीचे म्हणणे आहे
परंतु ते आता सह्या करत नाहीत मी काय करावे माझ्या सातबारा वर असलेले काकांचे नाव कसे कमी होईल ते सांगावे

आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..

मूळ मालकाला जमीन परत देता येणार नाही कलाम ११ खाली निवडया नंतर जमीन govt. ची होते

महोदय , आमचे ७/१२ वर ०.१५ हेक्टर शेत्र पोटखराब आहे , तथापि सध्या संपूर्ण क्षेत्र बागायती आहे , तरी पोटखराब क्षेत्र बागायती म्हणून वर्ग करता येईल का ?

सहा . संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा व आदेश प्राप्त करून घेणे

महोदय,एका शेतकऱ्याने अनोंदणीकृत आपसी वाटणीपत्राने शेतजमीन दोन मुलाचे नावे करून दिली.ज्या तारखेस अनोंदणीकृतआपसी वाटणीपात्र तयार करून दिले त्या तारखेस त्याचा सदर शेतजमीन वरील मालकी हक्क संपुष्टात येईल काय? किंवा मुले त्या तारखेस सदर शेतजमिनीचे मालक झाले असे समजण्यात येईल काय? यास कायदेशीर आधार आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.

वाटप पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक . अनोंदणीकृत असल्यामुळे , वडिलांचे मालकी हक्क संपुष्टात येणार नाहीत .

Section 17 (b ) of Indian Registration Act *
non-testamentary instruments which purport or operate to create, declare, assign, limit or extinguish, whether in present or in future, any right, title or interest, whether vested or contingent, of the value of one hundred rupees and upwards, to or in immovable property;

नमस्कार सर ,
माझ्या वडिलांनी ८ वर्षा पूर्वी एक जमीन खरेदी केली आहे . तसेच सर्व कागद पत्रे त्यांच्या नावी आहेत.ती जागा भाडे तत्वावर गेली ९ वर्ष दिली आहे . पण त्याचे भाडे अग्रीमेंट बनवले नाही . ते आदिवासी आहेत . . आता भाडेकरू ती जागा हडप करू पाहत आहेत . तर ते शकय आहे का . कृपया मार्गदर्शन करावे .

कलम ३६ अ प्रमाणे , आदिवासी कडून बिगर आदिवासींकडे भोगवटा हस्तांतरण करण्यावर निर्बंध आहेत . आदिवासी खातेदार हे भाडे करार शिवाय , जमिनीवर कब्जा करून कास्ट आहेत . त्यामुळे ते अतिक्रमणदार आहेत . आदिवासी भाडेकरू महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे , भोगवताधारक होऊ शकत नाही . त्या मुळे कलम ३६ अ अथवा आदिवासी जमीन प्रत्यार्पण कायदा लागू होणार नाही .
Adverse possession ने मालकी सिद्ध करण्याकरता , जमिनीचा ताबा १२ वर्ष किंवा त्या पेक्षा जादा काळ , जमीन ज्याचे ताब्यात आहेत त्याचे कडे असणे आवश्यक आहे
आपण The Specific relief Act खाली , आदिवासी भाडेकरूस जमिनीतून काढून टाकणे बाबत , दिवाणी दावा दाखल करा

३ एकर जिरायत शेती पैकी आम्हाला एक एकर शेती घायची होती. परंतु खरेदी करण्यासाठी कार्यालयामध्ये गेलो असता आम्हाला कळले कि एक एकर शेतीची खरेदी होत नाही त्या मुले ३ एकर शेती ज्यांच्या नावे होती (गैर आदिवासी) यांनी त्यांची पत्नी (गैर आदिवासी ) व माझी आई (आदिवासी) च्या नावे सामाईक ३ एकर शेतीची खरेदी करून दिली. सदर खरेदीची नोंद तहसील / तलाठी कार्यालयामध्ये झालेली आहे. परंतु आमहाला फक्त १ एकर शेती घायची होती . आता आम्हाला फक्त १ एकर शेती आमच्या नावे स्वतंत्ररित्या करण्यासाठी काय करावे लागेल
कृपया मार्गदर्शन करा.
धन्यवाद !!!

१ एकर जिरायत जमीनीची खरेदी करण्यावर निर्बंध नाही . तथापि आपण ३ एकर जागा दोघांमध्ये सामायिक खरेदी केली आहे . जर खरेदी खतात,प्रत्येकाचे क्षेत्र नमूद केले असेल , व आपले आईचे नावे १ एकर क्षेत्र असेल , तर त्या प्रमाणे नोंद मंजूर होईल . तथापि क्षेत्र नमूद नसेल तर दोहांचे नावे १.५ -१,५ एकर क्षेत्र दाखल होईल

आदरणीय सर , माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने मला न विचारता माझ्या शेतातून पन्नास मीटरची पाईप लाईन टाकली आहे सदरची पाईप लाईन टाकतांना मला त्याने विचारले नाही या बाबत मला त्याच्यावर काय कार्यवाही करता येईल

तहसीलदार यांची कलम ४९ खाली ( म.ज. म.अ १९६६ ) खाली परवानगी घेतली नसेल तर , आपण pipe line काढून टाकू शकता

पती व पत्नींमध्ये उपनिबंधक ह्याच्याकडे आपसी घटस्फोट झालेला आहे.दोघांना एक मुलगा आहे.मुलगा आईकडे राहतो.आईच मुलाचे पालनपोषण व शिक्षण करते.मुलाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( कास्ट,डोमिसाईल,इनकम, नॉन्क्रीमीलेयर,व इतर दाखले ) काढावयाचे आहे.पत्नीचे नावाने वरील कागदपत्रे तयार करता येईल काय ?याबाबत कायदेशीर तरतूद आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,भूमिहीन व्यक्तीला जमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीर काय तरतूद आहे? कृपया मार्गदर्शन करावे.

भूमिहीन व्यक्ती , शेती कारणासाठी प्रचलित कुळकायदा तरतुदी नुसार , जमीन खरेदी करू शकत नाही .
शेत जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात परंतु अश्या व्यक्तीचे इतर मार्गाचे उत्त्पन्न १२००० -वार्षिक पेक्षा जादा असता कामा नये . सध्याचे परीस्थित १२००० पेक्षा कमी वार्षिक उत्त्पन्न असणे दुरापास्त

महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये संपादन केलेली जमीन,जर जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनासाठी होत नसल्यास,मूळ जमीन मालकास जमीन परत देण्याची तरतूद आहे काय?कृपया मार्गदर्शन करावे.

जमिनीचा औद्योगीक प्रयोजनासाठी वापर केला नसल्यास , अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करून , जर आवश्यक असेल तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जाडा दिली जाते . अन्यथा जाहीर लिलावाने जागा विक्री केली जाते . मूळ मालक लिलावात सहभागी होऊ शकतात . मूळ मेकांना परत देण्याची तरतूद नव्या भू संपादन कायद्यात आहे

७/१२ भोगवटा सदरी रेषेच्या वर सरकार असे नाव व त्याच्यापुढे त्याचा फेरफार क्र.आहे.रेषेच्या खाली इतर खातेदारांची नावे आहेत.आशा ७/१२ साठी भूधारणा पद्धत कोणती निवडायची?

जमीन जर सरकारी असेल तर , इतर खातेदाराची नवे ७/१२ वर असण्याचे कारण काय आहे ? जुने फेरफार पाहून , अधिउकर अभिलेख अद्यावत करणे आवश्यक

आदरणीय सर,एखाद्या जागेत इमारतीचे बांधकाम चालू असताना गौणखनिज उत्खनन केल्यास त्याबाबतचा का.तलाठी यांनी पंचनामा करतेवेळी मूळ मालक किंवा त्यांचा प्रतिनिधी यांची उपस्थिती आवश्यक असते का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...

मूळ मालक किंवा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे . त्यांना आगाऊ सूचना देणे आवश्यक . जात ते जाणूनबुजून हजर नसतील तर , पंचांचे उपस्थित पंचनामा करण्यात यावा . पंचनाम्यात , मालकांना नोटीस दिल्याचे व ते गैर हजर राहिल्याचे नमूद करावे . सादर बाब पंचांचे हि निदर्शनास आणून द्यावी

नमस्कार साहेब . देवस्थानची शेतजमीन आमच्या ताब्यात आहे.सदरील 7/12वर इतर हक्कात साधे कूळ व सरंक्षित अशा दोन्हीही ठिकाणी आमचीच नावे लिहिली आहेत व 4 ट्रस्टीची नावे आहेत ती 50-60वर्षे जुनी आहेत. माझा आपणास असे प्रश्न आहे की साधे व सरंक्षीत कूळ अशी दोनवेऴा नावे का लिहिली व त्याचा आम्हास पुढे कायदेशीर फायदा मिळू शकेल का ?दूसरे ट्रुस्टि म्हणून जी नावे दाखल केली होती ते व त्यांची मुले मयत झालेली आहेत.अशावेळी त्यांचे नातू वारस म्हणून दाखल करू शकतात क? तिसरा प्रश्न असाकि देवस्थान नावे कमी करण्यासाठी काय करता येईल? वा धर्मादाय आयुक्ताकडे त्यासाठी अर्ज करता येईल का?कारण देवस्थान विक्रीस स्थगित असा कोठेही शेरा दिसून येत नाही.कृपया पूर्ण मार्गदर्शन केले तर बरे होईल साहेब.

या पूर्वीची उत्तरात खालील दुधर्न वाचण्यात यावी . जर णयासाचे सर्व उत्पन्न , ण्यासष्ठी वापरले जात असेल तर , अश्या जमिनीची कुळाचे लाभत विक्री होऊ शकणार नाही

साधे कुल किंवा सौरिक्षीत कुल असे एकच नोंद इतर हक्कात असणे क्रमप्राप्त आहे . दोन नोंद असतील तर , फेरफार पाहून , योग्य तो नोंद ठेव्याची कार्यवाही करावी .
जर ट्रस्ट नोंदणीकृत असेल तर , विश्वस्त मयत झाल्यावर / राजीनामा दिल्यावर कोणाची नावे लावायची या बाबत , सार्वजनिक न्यासाचे घटने मध्ये तरतूद असते . त्या प्रमाणे विश्वस्तांची नावे लावली जातात . कृपया उक्त न्यासाचे घटना पहा .
देवस्थान जमिनीची कुळाचे नावे विक्री होऊ शकते . तथापि , सर्व उत्पन्न न्यासाचे कामासाठी उपयोगात आणले जाते असे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांनी दिलेले असणे आवश्यक
मा. धर्मदाय आयुक्त यांनी मालकांना म्हणजे न्यासाला जमीन विकण्याची परवानगी देणे आवश्यक तरच न्यासाचे नाव कमी होऊ शकते

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाची तत्‍वे, अभिलेखाचे वर्गीकरण करण्‍याची पध्‍दत, अभिलेख ज‍तन करण्‍याचा कालावधी किती, ड वर्ग अभिलेख नष्‍ट करण्‍याची कार्यपध्‍दती, अ,ब,क,ड यादी या सर्व बाबींची माहिती मला घ्‍यावयाची आहे. त्‍यासाठी मला कोणत्‍या कायद्याचे किंवा शासन निर्णयाचे वाचन करावे लागेल याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन करावे. आणि याबाबत आदरणीय महोदय आपल्‍याकडे PDF स्‍वरुपात माहिती उपलब्‍ध असल्‍यास कृपया करुन मला ई-मेल व्‍दारे सदर माहिती पुरवीण्‍याची कृपा करावी. ही नम्र विनंती.

या पूर्वी A , B, C, D list अभिलेखांचे जतनाबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत . तथपि या लिस्ट सध्या स्थितीत , तेवढ्या उपयोगात येऊ शकत नाहीत . काही प्रमाणात काळ बाह्य झाल्या आहेत .
शास्नानाने , Maharashtra Public Records Acts संमत केलेला आहे . या कायदयानुसार प्रत्येक विभागाने , retention schedules बनवण्याचे आहेत व त्यास संचालक पुराभिलेख महाराष्ट्र शासन यांची मान्यता घेण्याची आहे .

नमस्कार सर ,
विषय - ७/१२ वरील कुळ कमी करण्याविषयी
सर माझा प्रश्न असा आहे कि माझ्या ७/१२ वर इतर अधिकारात नोंद - कुळ दत्तात्रय अ.पा.क. ( xxx ) शाम मनोहर गीते यास ( xxx )
कु.का.क. 32 ग. ( xxx ) प्रमाणे खरेदीचा हक्क नाही ( xxx )
असा शेरा असून आताचे कुळ शाम मनोहर गीते यास यांच्या पूर्व संमतीनुसार ७/१२ वरील इतर अधिकारातून कुळ कमी करावयाचा आहे तरी त्याबद्दल कायदेशीर सल्ला मिळावा हि विनंती . सरकारी मूल्यांकन रु- ५ लाख असून कायदेशीर खर्च किती येईल या विषई मार्गदर्शन करावे हि विनंती .

शाम गीते हे केवळ अज्ञान पालन करते आहेत . त्यांचे नावे किंमत ठरू शकणार नाही अथवा त्यांचे संम्मतीनेही कुळाचे नाव कमी होणार नाही . कुल दत्तात्रय , जर संज्ञांन झाला असेल तर , त्याचे नावे ३२ ग किंमत निश्चित होणे आवश्यक व ती होईल .
कुलास कुळहक्क मालकाचे लाभात सोडून देण्याचा असल्यास , प्रथम The Hindu Minority and Guardianship Act खाली दिवाणी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक .

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, नस्तीबद्ध झालेल्या प्रकरनांचा त्रिअक्षरी क्रमांक खाली दिलेला आहे.
LND-२०
TRS-१६
NAP-३४
LND-४१
LEN-३९
NAA-४६
या सर्व प्रकरणांना अभिलेख कक्षात जतन करून ठेवान्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भूसंपादन अधिनियम 1894 नुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे कडून भूसंपादनाचा निवाडा घोषीत करण्याची कार्यवाही कशाप्रकारे केली जाते? या बाबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायद्यातील तरतुदीसह योग्य मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.

पंकजजी एखादा जुना निवाडा वाचा .
भू संपादन प्रकरण नसती वाचा

namskar सी र मी अविनाश शिंदे
माझा प्रश्न तलाव गाळ पेर संभंदी आहे
मी २०१५ साली एका व्यक्ती कडून ३.२७ आर जमीन घेतलीय त्या मालकाची सादर गटशेजारील ३ .१ आर जमीन पाझर तलाव मध्ये गेली आहे त्याचा त्याना शासन मोबदला मिळाला आहे परंतु त्य्नाच्या म्हणणंय नुसार त्याना त्या जमिनी मध्ये गाळपेर करण्याचा हक्क आहे .असे त्यानं मला खरेदी खाता मध्ये लिहून दिले आहे
सादर दोन्ही जमिनीचे मूळ मालक एक आहे
१)आसा हक्क असतो का ?
व तो हस्तनतरीत होतो का ?
२)गाळपेरीचा नेमका अर्थ काय
३)गाळपेरीचा शासन निर्णय आहे का
४) गाळपेर कायदा असेल तर मार्गदर्शन kara

-संबंधित कायर्कारी अभियंता दरवर्षी लीजवर ती जमीन मंजूर करू शकतो .गाळपेर हक्क मिळणार नाही

नमस्कार सर , जर एखाद्य शेतकऱ्याची जमीन रस्त्यासाठी एका बाजूने दिली असेल पण त्याच सर्वे नंबर ला दुसऱ्या बाजून सरबांध असून 10 शेतकऱ्यांनी मागणी तहसीलदारांकडे केली तर तर रास्ता मंजूर होईल काय .कृपया उपाय सांगा

होय म ज म अधिनियम १९६६ चे कलाम १४३ खाली रस्ता देता येतो

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा एखादा कर्मचारी उत्‍तीर्ण नसेल तर त्‍या कर्मचा-याला कालबध्‍द पदोन्‍नती देता येते का ? याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

नाही

नमस्‍कार सर, माझा प्रश्‍न असा आहे की, जिल्‍हातील एखादा तलाठी ज्‍या उपविभागामध्‍ये कार्यरत असेल त्‍या ठिकाणाहून त्‍याने दुस-या उपविभागात बदली व्‍हावी म्‍हणून विनंती अर्ज केला व त्‍याची विनंती मान्‍य झाली व त्‍याला जिल्‍हातील दुस-या उपविभागात पदस्‍थापना दिली तर जिल्‍हातील जेष्‍ठतेमध्‍ये त्‍याचे नाव सर्वात खाली टाकले जाते का? तलाठी संवर्गाची जेष्‍ठता फक्‍त उपविभागा पुरती मर्यादीत असते का?
कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

As per MCSR is it essential for ladies in government service to change their maiden name after marraige and get it mentioned in service book to claim maternity leave and expenses. Is change in name necessary at all in service for ladies. Please also give rule or judgements if any.
Thanks.

There is no requirement under Maharashtra Civil Service Rules either under Leave or General Conditions of Service , that , female government servant shall change her name after the marriage to avail the Maternity leave. Even under the Maternity Benefit Act , no such provision exists .

नमस्कार सर
1994 साली आमच्या जमिनी मधून रस्ता करण्यात आला नंतर 2005 साली त्याचे रुंदी करण्यात आले,आम्ही जमिनी ची शासकीय मोजणी भरली त्यानुसार त्यांनी हद्द दाखवली ,हद्द वरून असे लक्षात आले की सर्व रस्ता आमच्या च्या जमिनी तुन जात आहे.900 फूट लांब आणि 15 फूट रुंद असा रस्ता असून तो सर्व आमच्या जमिनी तुन जात आहे. जमिनी ची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे असे आढळून आले . आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. आमची जमिनी कशी काढून भेटेल .कोना कडे आपिल करावी.कृपया मार्गदर्शन करावे.

रस्ता शास्नानाने , स्थानिक सव्रज्या संस्थेने केला आहे का ? जर त्यांनी रस्ता केला असेल तर , आपली जमीन बाहो संपादन कायद्याखाली संपादन न करता , असा रस्ता करता येत नाही . आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे . आपण जेवढे क्षेत्र रस्ताखाली गेले आहे , त्याची नुकसान भरपाई संबंधित विभागाकडे मागा.
जर आपणास , रस्ता नको असेल तर . आपणास न्यायालयाचा मार्ग पत्करावा लागेल

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा सुट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर कर्मचार्याने राहीलेल्या विषयात त्याने किती गुण मिळविणे आवश्यक आहे ? या बाबत माननीय न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत काय ? याबाबत सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

आदरणीय सर,इमारत बांधकाम करणेसाठी २०१२-१३ मध्ये गौणखनिजचे उत्खनन करण्यात येऊन त्याचा वापर त्याच जागी केलेला आहे.परंतु त्याबाबत मा.तहसीलदार साहेब यांनी तीन पट दंड भरणेची नोटीस काढल्यास त्या नोटीसवर मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करणे योग्य होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....