[Ctrl+G for Marathi/English]

सर नमस्कार -माझा प्रश्न आहे की आम्हाला कुळकायद्याने ३२ ग वर्ग २ ची जमीन १९६५ मध्ये मिळाली आहे ,परंतु चारी बाजूच्या शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे ,आम्हाला मोजणी करायची आहे ,त्यासाठी तालुक्याला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये अर्ज केला होता .परंतु जमिनीच्या गटाचा उतारा मिळाला ,परंतु सर जमिनीच्या फाळणीचे उतारा मिळणार नाहीत ,सापडत नाहीत ,रेकॉर्ड जीर्ण झाले आहे असे सांगण्यात आले ,तर साहेब फाळणीचे उतारे मिळण्यासाठी कुटे अर्ज करावा लागेल,व मोजणीसाठी काय करावे लागेल ,साहेब मार्गदर्शन करा

१. किंमत निश्चित झाली त्याचवेळेस , जमिनीची जोंनी करून घेणे आवश्यक होते .
२. हिस्सा मोजणी नकाशा उपलब्ध नसेल तर , वहिवाटीप्रमाणे , मोजणी केली जाते
३. आपले प्रकरणात , शेजारील खातेदारांनी , अतिक्रमण केले आहे , त्यामुळे ते त्यांनी अतिक्रमित केले क्षेत्र त्यांचे वहिवाटीखाली असल्याचे दाखवणार .
४. शेजारील खातेदार बरोबर चर्चा करून , प्रश्न सुटू शकतो

"अ" नावाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला "ब, क, ड" इत्यादी तीन आपत्ये आहेत. "अ" ने मृत्युपत्र करुन सर्व मिळकत "ड" च्या नावे केली. मृत्युपत्राप्रमाणे संपूर्ण सातबारे "ड" च्या नावाने झाले.
"ब" नावाचा मुलगा मयत झाला, त्याचा मुलाला सदर जागेवर हिस्सा मिळूशकेल का ? त्यासाठी काय करावे लागेल ? सदर जागा ही वडिलोपार्जीत आहे. सदर जागा "ड" च्या ताब्यात आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

हो . ब च्या मुलाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक आहे .
अ ला केवळ त्याचे हिस्स्याला योनीच्या मिळकतीचे मृत्य पत्र करता येते . वरील उदाहरणात , अ त्याची तीन अपत्ये , म्हणजे अ हयात असताना वाटप झाले असे तर , मिळकतीचे ४ हिस्से झाले असते . अ स्वतः , व तीन अपत्यांचा प्रत्येकी १ हिस्सा . अ केवळ एकूण मिळकतीपैकी १/४ हिस्सायचे मृत्यपत्र करू शकला असता .
ब च्या मुलास , त्याचे वडिलांचे हिस्स्यास येणाऱ्या १/४ हिस्सा वेगळा करून मिल्ने व त्याचा ताबा मिल्ने करता , The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र वरील उदाहरणात , अ कधी मयत झाला आहे ?
२००५ नंतर जर मयत झाला असेल व अ ला मुली असतील तर , मुलींनाही हिस्सा देवा लागेल .

A गावातुन B गावचे विभाजन झाले. विभाजन मध्ये A गावा मध्ये पूर्वीचे गावठन समविश्ठ झाले. आणि B गावा मध्ये गावठन नाही. पण B गावात नकाशा मधे पाडे ची नोंद आहे तर त्याना गावठन समजुन या मध्ये इमारत चे बांधकाम करायचे आहे. तर B गावा मधील जे पाडे आहेत त्यांनाच गावठन समजुन त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देणे बद्दल शासन निर्णय आहे का ?

जो पाडा त्यास गावठाण जाहीर करणे आवश्यक आहे .मग त्या नंतर बांधकाम परवानगी ग्राम पंचायत देऊ शकते

महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) ए कु पुढारी फेरफार आव्हानात करताना सगळे ७/१२ अभिलेख पण अर्जासोबत जोडायचे का?
२) गावातील मुलांसाठी क्रिकेट व इतर खेळ खेळण्यासाठी मैदान हवा आहे तर मैदान मिळणेसाठी काय करावे लागेल?
३) गावातील तलाव दुरुस्त करायचा कारण बांध तुटला आहे, नीट बांधकाम करायचा आहे, तर जलशिवार योजनेअंतर्गत होऊ शकेल तर कुठे अर्ज करावा लागेल आपण योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती .

1. हो
२. जिल्हाधिकारी यांचेकडे ग्राम पंचायतीने अर्ज करावा
३. आपण तहसीलदार यांना भेटून , तलाव दुरुस्त कातणे बाबाबत विंनती करा . सदरचे काम लेबर बजेट मध्ये समाविष्ट करावे लागेल . तसेच त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल

माझ्या वडिलांनी वर्ष २००४ मध्ये इगतपुरी, जि. नाशिक येथे फ्लॅट विकत घेतला होेता. सदर इमारतीमध्ये एकूण १६ फ्लॅट होते. त्यापैकी फक्त ४ फ्लॅट विकले गेले. दोन वर्षानंतर सदर इमारतीच्या मालकाने इतर (१२ फ्लॅट) दुस-्या व्यक्तीस विकले. त्याने तिस-्या व्यक्तीस विकला. आम्ही जेव्हा सदर व्यक्तीस भेटून आमच्या फ्लॅटची घरपट्टी आमच्या नावावर करून देणेबाबात विचारले तेव्हा त्यांनी नकार दिला. नगरपालिकेत याबाबत विचारले असता तुम्ही त्यांची एन ओ.सी. आणा असे सांगितले. तसेच सर्व फ्लॅटवर सदर नविन मालकाच्या नावाची नोंद नगरपालिकेत झालेली आहे. आता घरपट्टी थकीत राहिल्याने नगरपालिकेतील कर्मचारी सील लावण्याबाबत सांगत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

आपण आपले खरेदी खत नगरपालिकेत सादर करा . अर्ज द्या .
नगरपालिका आपली घर पती लावण्यासाठी तुम्ही ज्याच्याकडून घर घेतले त्याला नोटीस देईल . त्याने प्रतिसाद दिला ठीक . त्याने जर प्रतिसाद दिला नाही तर , घरपट्टी आपले नावावर करणे नगरपालिकेस बंनधन कारक आहे

नमस्कार सर,
माझ्याकडे
भोगवटादार वर्ग - २ विविध कायद्या खालील नवीन शर्तीने, वतन खालसा कायद्या नुसार शर्तीस पात्र
इतर अधिकार :-नवीन अविभाज्य शर्त (शर्तीचा भंग -७००) आहे
१) ही जमीन मी विकू शकतो का ?
२) यातील शर्ती मला शासनाच्या कोणत्या निर्णयात मिळतील ?
३) भोगवटादार २ मधून भोगवटादार १ करण्यासाठी शासनास नजराणा भरावा लागेल काय ? असेल तर किती ?

आपल्याकडे कोणत्या वतन कायद्याखालील जमीन आहे त्याचा तपशील विगत करा . म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल

7/12 वर आदिवासी जमीन आहे की नाही हे कसे ओलखावे?

एका आदिवसी मित्राची60 एकर जमीन दुर्गम ठिकाणी आहे.
मुख्य रस्त्यापासून काही अंतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची असून काही जमीन वन खात्याची आहे. त्या ठिकाणी एका देवीचे छोटे मंदिर असून आजु बाजुच्या 15 ते 20 गावच्या लोकांची खुप श्रद्धा आहे.

रस्ता नाही मला त्यातील 20 एकर जमीन कृषिपर्यत्न आणि पवन चक्की साठी हवी असल्यास विकत घेता येईल का?
त्या जागेत आधी 40 ते 45 परिवारची आदिवासी वस्ति होती रस्ता नसल्याने त्यांना स्तलान्तर करावे लागले त्यांना परत त्या जागी जायचे आहे.
मला त्या जमिनीत वाट मिळू शकते का?

१. वर्णनावरून जमीन हरित वापर विभागातील आहे . आपण जर शेतकरी असाल तर आपणास जमीन खरेदी करता येईल .
२.आदीवासी व्यक्तीच्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात ३६ अ नुसार शासनाचे परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा असतो .
३. मात्र प्रस्तावित खरेदी करावयाची जागा व रस्ता या मध्ये वन विभागाची जमीन असल्यास , त्यामधून जाण्यासाठी वन विभागाची अडचण येऊ शकते . पक्का रस्ता आपण बंधू शकणार नाही . मात्र वन विभागाचे परवानगीने कच्चा रस्ता वापरू शकता

नमस्कार सर
माझा गाव मु.देवपे,ता.पो.मुरबाड,जि.ठाणे या गावचा रहिवासी आहे.
सर मी गेले सन १९५५ सालापासुन एका जागेवर घरल बांधले आहे. त्याच जागेवर माझे भाईबद राहतात. पण 1982 साली माझ्या चुलत आजोबाने तिच जागा माझ्या आजोबाच्या भावाकडुन विकत घेतली. पण आज काही घरगुती वादामुळे मला ते धमकी देतात.कि तुझा घर अतिक्रमण आहे आणि तु ते खाली कर....हे कितपत योग्य आहे.
तर कृपया मला मार्गदर्शन करावे ही विंनती...

१९५५ पासून आपले घर आहे . आपण या जागेचे Adverse Possession तत्वानुसार , जमीन जरी आपल्या भावबंदची असली , अश्या स्थित आपण मालक जाहीर होऊ शकता .
आपले भाऊ बंद आपणास कायदेशीर पद्धतीचा अवलंब केल्या खेरीज जमिनीतून बेदखल करू शकत नाही

पोट खराब (अ) वर्गाची शेत जमीन लागवडीच्या क्षेत्रात बदलण्या ची पद्धत काय? अर्ज कुणाकडे करावा लागेल.

अधीक्षक भूमिअभिलेख

वडिलांचा मृत्यु १९७६ मध्ये व आईचा १९९६मध्ये झाला.त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये असून मुलीचे लग्न १९७५ मध्ये झाले आहे. वडिलांचे नावाने स्वकष्ठीत घर आहे जे त्यांनी १९३० मध्ये विकत घेतले होते. सदर घराची मालकी कुणाकडे जाईल.

घराची मालकी मुलगा व मुलगी या दोघांकडे जाईल .
या ठिकाणी वडील मयत आहे , त्यामुळे हिंदू वारसा कायद्या प्रमाणे , दोन्हीही अपत्यांना घरामध्ये हक्क आहे

सर शेतात जाण्यासाठी शेतकऱयाला जाण्यासाठी पायवाट रास्ता आहे परंतु सादर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी बैलगाडीचा रास्ता पाहिजे तसा रस्ता देता येतो काय किंवा कोणत्या कलमा मध्ये देता येतो
धन्यवाद सर

म.ज.म.अ १९६६ चे कलम १४३
या कलमानुसार तहसीलदार , शेतीवर जाण्यासाठी किती वाजवी मार्गाची आवश्यकता आहे याची पडताळणी करून निर्णय घेणे अपेक्षित आहे .
शेती किफायतशीर कसण्यासाठी शेतीची मशागत करणे , पिकाची वाहतूक करणे या साठी बैलगाडी शेतात घेऊन जाणे आवश्यक आहे .
कलम १४३ वाचा . बैलगाडीचा रस्ता देता येईल

नगर भूमापन हद्दी मधील शेती मिळकती चे मोजणी काम नगर भूमापन अधिकारी कार्यालयांनी केले असल्यास हिस्सा फॉर्म नंबर १२ भरता येतो का? असल्यास कुठल्या नियम प्रमाणे

महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) वहिवाटदार जर कुळ बनला असेल तर त्याविरुद्ध अपील कुठे करावे ?
२) एक व्यक्तीने २००७ साली कुळकायदा घोटाळा करून म्हणजे फेरफार बघितला त्यावर ३२ग ची खरेदी उल्लेख असून दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांचे नाव टाकले , मुळात त्याच्या वडिलांनी कधीच जमीन कसली नव्हती व घोटाळा करून कुळ दाखल केलेले व नंतर रोख पैसे घेऊन ७०ब चा स्टॅम्प पेपर वर
डिकलरेशन वर सही सुद्धा केली आहे पुरावा स्टॅम्प पेपर आहे आमच्याकडे पण २००७ ला परत त्याच्या मुलाने जमीन विकण्यासाठी पेपर मध्ये नोटीस दिली आम्ही त्याबद्दल कोर्टात हरकत सुद्धा घेतली पण २ सुनावणी नंतर त्याने आमच्याकडचे पुरावे बघितले व परस्पर जमीन विकली ह्याच प्रकरणात पिकपाहणी त्याच्या मुलाने लाच देऊन गायब केली पिकपाहणीच उपलब्ध नाही १९४६ पासून आमचेच ताब्यात जमीन आहे, तर त्यांनी ३२म चे प्रमाणपत्र पण नाही घेतले, कोणत्या अधिकाऱ्याची विक्रीसाठी परवानगी सुद्धा नाही घेतली विकलेली जमीन कशी परत मिळू शकते कुठे केस दाखल करावी लागेल, तो व्यक्ती कुळाच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाही व आमच्या कुटुंबातील आहे आमचे १च कुलदैवत आहेत पण आम्हला वंशावळ नाही माहिती ?
३) कुळकायद्यात कुळाच्या व्याख्येत कोणताच कुळ बसत नाही व कुळ व पिकपाहणी ला नाव दाखल केल्यानंतर कधीच नोटीस दिली नाही अशा कुळवहिवाट विरुद्ध कुठे अपील करावे?
४) तलाठ्यांना कुळ दाखल करण्याचा हक्क असतो का?
५) सामनेवाले यांच्याकडे कुळ सिद्ध करणेसाठी कोणते पुरावे लागतील?
आपण योग्य ते मार्दर्शन करावे विनंती.,

आपणास प्रांताधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल
खाडाखोड केली आहे असे आपले म्हणणे आहे .आपण फौजदारी कारवाई हि करू शकता .
तलाठ्यांना कुल दाखल करण्याचा अधिकार नाही
एखादी व्यक्ती कुल आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मामलतदार म्हणजे तहसीलदार यांना कुल कायद्याअंतर्गत आहे
कुळकायद्याचे कलम २(१७) २(१८) व कलम ४ वाचा .

महोदय सर
एक व्यक्तीने असा अर्ज केला कि ह्या सर्वे नंबर ची जमीन १२ वर्षांपासून माझ्या कब्जेवहिवाटीत आहे व ह्या जमिनीवर वेग-वेगळ्या प्रकारचे पीक घेत आहे फेरफारामध्ये कोणताही कायदेशीर दस्त नाही अशी नोंद मंजूर करून तलाठ्यांनी ७/१२ सादरी त्यांचे नाव दाखल केले ह्या बद्दल कुठे अपील करावे आपण मार्गदर्शन करावे .,

कब्जावहिवाटीखाली आहे म्हणून जमिनीस नाव लावण्याचा अधिकार ना तलाठी ना तहसीलदार यांना आहे . Adverse - Possession या तवाच आधार घेऊन एखादी व्यक्ती कब्जाहक्काने एखादी जमीन १२ वर्षाहून अधिक काळ कस्त असेल तर त्यास मालक म्हणून घोषित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास आहे

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
जर कोणतीही परवानगी ना घेता कुळकायदा जमिनीची विक्री झाली असेल तर कलम ८४ क क अन्वये तक्रार कुठे दाखल करावी न्यायालयात कि उपविभागीय अधिकारी यांकडे व कोणते पुरावे सादर करावे शर्तभंग झाली हे सिद्ध होण्यासाठी ?
२) ८४क क अन्वये २००७ साली झालेले शर्तभंग त्यामध्ये झालेली जमीन विक्री खरेदीखत रद्द करता येईल का? तर कुठे रद्द करण्यासाठी केस दाखल करावी?
३) ४३ च्या शर्तीस पात्र जमिनीची शर्तभंग झाल्याप्रकरणी? जमीन शासनजमा होईल का? कि मूळ मालकांना परत मिळेल., मार्गदर्शन करावे,;
आपण प्रत्येक वेळेस अनेक प्रश्नांची उत्तरे देतात त्यामुळे आम्हाला जमीन परत मिळवता येईल आदरणीय श्री किरण पाणबुडे सर आपणास व संजय कुडेटकर सर आपणास साष्टांग नमस्कार मनापासून आभारी ..

८४ k खाली कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत . आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
८४ क क च्या नवीन सुधारणेनुसार , खरेदीदारास दंडाची रक्कम भरून , त्याचा अवैध व्यवहार नियमित करू शकतो

नमस्कार सर, मागील 8 वर्षापुर्वी जेष्ठता डावलून पदोन्नती करण्यात आले आहेत. त्यानंतर वरीष्ठांकडे वारंवार विनंती अर्ज करुन ही पदोन्नती केली जात नाही व बिंदू नामावली नोंदवही पुर्ण न झालेने पदोन्नती करता आली नसल्याचे कारणे दिली जात आहे. याबाबत दाद कुणाकडे मागता येईल.

श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
आमचा गावठाण जागेचे प्लॉट नंबर १८ व २२ चा भूमी अभिलेख यांचे निकाल झाले आहेत. सदर निकाल हे मे महिन्यात झाले कोणीही अपील केलेले नाही. मग आम्ही भूमी अभिलेख यांचेकडे अतितातडी मोजणीसाठी अर्ज केला त्यानुसार मोजणी तारीख ३ व ४ नोव्हेंबर मिळाली आहे. आता मोजणीनुसार आम्ही मोजमाप घेऊन ग्रामपंचायतीकडे आमचे नाव व मोजमाप टाकून मिळावे म्हणून अर्ज करावा का ? कारण ग्रामपंचायत आमचे विरोधात आहे त्याला दुसरा मार्ग आहे का ? आता आमचे नाव भूमी अभिलेख यांचे प्रॉपर्टी कार्डला, चौकशी उतार्याला लागले आहे व त्यानुसार नकाशात दुरुस्तीही झाली आहे व आता रजिस्टर कागद करताना भूमी अभिलेख यांचेकडील प्रॉपर्टी कार्ड नुसार रजिस्टरदस्त करावेत असा जीआर भूमी अभिलेख यांनी पाटण सब रजिस्टर ऑफिसाला दिला आहे त्यामुळे ग्रामपंचायत उतार्याला जर आमची नोंद नाही झाली तर चालेल का ? मार्गदर्शन करावे हि विनंती.

मिळकत पत्रिकेला आपले नाव लागले आहे .
ग्राम पंचायत कर आकारणी पत्रकास हि आपले नाव लागणे आवश्यक
अर्ज करा . आपल्या विरुद्ध ग्राम पंचायतीने , निर्णय घेतला तर गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करा

सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?

ज्या फेरफारानें केवळ तीन भावांची नवे लागली तो फेरफार आपण आव्हानात केला . त्याचा निकालही आपले बाजूने लागला आहे . मात्र दरम्यानचे कालावधीत जमीन अधिग्रहण होऊन , राष्ट्रीय महामार्गाचे नवे दाखल झाली आहे . त्यामुळे ७/१२ सदरी नाव लावण्याची आवश्यकता नाही उलटपक्षी आपली नावे हि ७/१२ सदरी लागणार नाहीत
नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यापूर्वी आपण जर उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपील केले असते तर , आपले प्रकरण न्यायालयाकडे निर्णयासाठी गेले असते .
असोत अद्यावपही वेळ गेलेली नाही . आपण न्यायालयात दावा दाखल करा . आपल्या हिस्स्याची नुकसान भरपाई रक्कम आपले मामाकडून देणे बाबत न्यायालयास विंनती करा . आपणास रक्कम व्याजासह मिळेल . मात्र नुकसान भरपाईची रक्कम व न्यायालयीन लाढालीसाठी येणार खर्च याचे गुणोत्तर पहा

मी गिम्हवणे,तालुका दापोली येथे १० वर्षांपूर्वी एकत्रित २२ भूखंडाच्यापैकी १ विभाजित भूखंड खरेदी केला आहे.

सदर जागेस उप विभागीय अधिकारी यांनी भूखंड विभाजनास व रेखांकनास तात्पुरती व अंतिम मंजुरी दिलेली आहे.व याची कागदपत्रे नकाशासहित उपलब्ध आहेत. सदरच्या तात्पुरत्या मंजुरीमध्ये असा उल्लेख आहे कि रेखांकनामधील सर्व भूखंडांचा
वापर करणेआधी सक्षम अधिकारी यांची अकृषिक परवानगी घेऊन वापर करणेच आहे
१. प्रत्येक विभाजित प्लॉटसाठी अकृषिक परवानगी घेणे आवश्यक असते का ? व सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यायची म्हणजे कोणत्या खात्याच्या अधिकाराची यांच्याकडून
परवानगी घ्यावयाची ?

सदर प्लॉटवर मूळ मालकाने घरबांधणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली होती व नंतर मी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मंजुरी घेऊन त्यानुसार सदर प्लॉटवर घरबांधणी केलेली आहे, व प्रत्येक वर्षी घरपट्टी जमा करीत असतो.

२.माझ्या विभाजित प्लॉटसाठीची वेगळी अकृषिक परवानगी मी न घेतल्याने मी केलेले प्लॉटवरील इमारत बांधकाम बेकायदेशीर ठरते का ? व ते तसे असेल तर मी आता ते कायदेशीर करणेसाठी मी काय करावे लागेल ?

३. सदर जागेच्या ७/१२ उताऱ्यात भूखंडाचे वर्णन ओपन बिनशेती असे लिहिले आहे. मी प्लॉटची बऱ्याच वेळा भूमी अभिलेख खात्याकडून हद्दीची मोजणी करून घेतली, परंतु सदर जागेची बिनशेती मोजणीसुद्धा करायची असते हे मला माहितच न्हवते बिनशेती मोजणी झालेली नसल्याने ७/१२ उताऱ्यात ओपन बिनशेती असा उल्लेख येतो का ?

कृपया मार्गदर्शन करावे

वास्तविक रेखांकनास परवानगी देताना बिनशेती हि परवानगी दिली जाते . आपले प्रकरणात केवळ रेखांकनास परवानगी दिली आहे .
नवीन म. ज.म अ १९६६ च्या कलम ४२ क नुसार , रेखांकन परवानगी असेल तर , केवळ बिन शेती आकार भरणे बाबत , नियोजन प्राधिकाऱ्याने म्हणजे उपविभागीय अधिकारी यांनी आदेश देणे आवश्यक

नमस्कार आमची संस्था आहे जी सांस्कृतिक कार्यात कार्यरत आहे. मुंबई सार्वजनिक नियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. नाटक , संगीत आणि नृत्य सारखे विविध कला आम्ही जोपासतो. आम्हाला तालमी करीत जागेचा त्रास होतो त्यासाठी काही उपाय आहे का ?

आदरणीय सर ,एखाद्या जमिनीचे न्यायालयातून declaration घेणे म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया कशी असते

The Specific Relief Act खाली , न्यायालयाकडून मिळकतीचा मालकी हक्क जाहीर करून घेणे , मिळकत ताब्यात आहे असे जाहीर करून घेणे म्हणजे declaration घेणे . न्यायालयात दावा दाखल करणे .
Adverse possession ने जमीन मालकीची झाली हे जाहीर करून घेणे

नमस्कार सर , माझे व बहिणींमध्ये हक्क सोड पत्र दिवाणी कोर्ट मध्ये झाले आहहे ,काहीकारनं मुले तलाठी व इतर अधीकार यांनी योग मार्गदर्शन न केल्या मुले माझे नवे ७/१२ मध्ये अली नाहीत बहिणांचीच नावे राहिली आहेत ,त्यांनी तिझामिन गावातील वक्तीला विकली आहे ,त्याचा दस्त नोदनिकात तलाठी यांच्याकडे अल्ला आहहे ,तेव्हा मी तलाठी सर्कल व तहसीलदार दार यांना दिवाणी कोर्ट चा हुकूमनामा व बहिणीचे हक्कसोड पत्र सादर केल्यावर त्यांनी माझे नावाची नोंद करण्याचा आदेश दिला व माझे नवे ७/१२ झाला आहहे ,त्या विरोधात जमीन विकत घेणारे लोकांनी प्रांत साहेब यांच्याकडे त्या विरोधात तक्रार केले व ती नोंद फेरफार राधा करून मागितलं व ते प्रांत अधिकारी याने मेनी केले आहहे.माझ्याकडे सर्व कागद पत्र असताना माझा विरोधात आदेश झाला आहहे ,ती मंडळी दस्त नोंद व्हावी म्हणून तलाठी यांच्याकडे दबाव अन्नात आहहे प्रात अधिकारी यांचा फेरफार रद्ध करावा हा आदेश झाला आहे हे सांगून त्यांचा नावाची नोंद करतील तर सर मी फुडें काय करू कृपया मार्ग दर्शन करा.

अर्ज या ऐवजी अपील असे वाचा

मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

सर.. कलेक्टर मंजूर NA प्लॉट वर महापालिकेच्या नगररचना विभागाला DEVELOPMENT PLAN मधे डीपी रोड (डेव्हलोपमेंट प्लॅन रोड ) टाकण्याचा अधिकार आहे का?

हो
MRTP Act खाली प्रारूप DP मंजूर झाल्यावर , आपण हरकत घेतली होती का ?
DP प्रारूप सध्या प्रसिद्ध झाला असेल तर हरकत घ्या .

श्री किरण पाणबुडे सर
१) मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुखत्यारपत्र पुरेसे नाही ( सर्वोच्च न्यायालय- सूरज लँप आणि प्रा. लि. विरुद्ध हरियाणा राज्य व इतर ) सर हे कुडतकर सरांच्या जमीन खरेदी ह्या लेखात वाचले.
२) कुळवहिवाट विरुद्ध अपील कुठे करावे ?
३) एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत फेरफार आव्हानात केल्यावर किती दिवसात निकाल लागेल? व चुलत काकांनी हरकत घेतल्यावर पुढे काय होईल ?
योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती,

२.उपविभागीय अधिकारी
३. तक्रार नोंद १ वर्षात निकाली काढण्याची तरतूद आहे . तथापि तीन महिन्यात अशी तक्रार नोंद निर्णीत करावी असेही निर्देश आहेत

नमस्कार सर,
मी शेत जमीन खरेदी केली आहे त्या वरती सहकारी पत संस्थेचा बोजा आहे . सदर संस्थेचे मुळ मालकाडे थकित कर्ज आहे व मुळ मालकाची जमीन आहे (जो गट संस्थेकडे तारण आहे त्यापैकी मी खरेदी केला आहे ) पण कर्ज रक्कम जास्त आहे सहकारी संस्था मी खरीदी केलेली जमीन खरेदी रद्द कारू शकते का ?

खरेदी रद्द करू शकत नाही मात्र , कर्जाचे वसुलीसाठी जमिनीची जप्ती करू शकते

माझ्या घराच्या शेजारी एक गृहनिर्माण सोसायटी आहे.त्यात एकूण तीन apartment आहे.आमच्या घराला लागूनच उजव्या बाजूला शेजारी सोसायटीचा मोठा रस्ता आहे.त्या रस्त्याला लागूनच शेजारी आमचे घर आहे. तो रस्ता मी वापरू शकतो का? काही सोसायटीचे लोक मला आणि माझ्या कुटुंबातील लोकांना तो रस्ता वापरू देण्यास मनाई करतात.आम्ही रस्ता वापरू नये म्हणून आम्ही आमच्या जागेत केलेल्या गेटसमोर वाळलेली झाडे टाकतात.तरी आम्ही काय करावे.आमच्या घराच्या डाव्या बाजूला आमचा वैयक्तिक रस्ता आहे पण त्या रस्त्यातून त्याच सोसायटीची ड्रेनेज पाईपलाईन गेलेली आहे आणि तिथे खूप चेंबर काढलेले आहेत तेही आमची परवानगी न घेता.अनेक चेंबरमूळे हा रस्ता वापरण्यालायक राहिलेला नाही. त्यामूळे आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या घरालाच लागूनच असलेला उजव्या बाजूचा त्याच सोसायटीचा रस्ता मी वापरू शकतो का? मला प्लीज उपाय सांगा.मी आपला आभारी राहील.

रस्ते हे सार्वजनिक आहेत . गृहनिर्माण संस्था आपणास रोखू शकत नाही .
मात्र आपले घराचे उजव्या बाजूस सहकारी संस्थेचा जो रस्ता आहे त्याचा वापर करा
डाव्या बाजूस जी जागा ती आपले मालकीची आहे का ?

Dear Sir,
We have taken harkat regarding land case in march 2017.when I made enquiry at tahsil office, I came to know that hearing is in 23.10.17.But we still haven't received notice.Is it proper to attain hearing without notice.pls guide.thanks.regards hemant

By the time , i got your question , date fixed for your hearing has lapsed . I don''t know whether you have attended the hearing.
But there is no harm in attending the hearing , even if you don't receive the hearing notice . Hearings before quasi judicial authorities are public hearing . Any one can attend the hearing . You are party to the suit , you can attend such hearing even if you dont receive the notice .

सर माझ्या आजोबाची खरेदी जमीन खासरा पत्रकाला असून वारसा हक्काने त्यांचे तीन मुले यांच्या
नावे न यता ती जमीन माझ्या चुलत चुलत्या ने सहाजणांच्या नावे कब्जेदार मध्ये लावली आहे
खरी ती जमीन आमच्या आजोबाची असून त्याचे वारस तीन चुलते आहेत तरी काय करता येईल सल्ला द्या .

ज्या फेरफाराने चुलत चुलत्यांची नावे लागली आहेत तो आव्हानात करा . मात्र मुदतीच्या कायद्याची त्यास बाधा येऊ शकते . अश्या स्थित आपण , न्यायालयात आपला हक्क मिल्ने बाबत दावा दाखल करा

नमस्कार सर , आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे नेहेमीच होणार मानसीक त्रास कमी झाला आहे. माझ्या वडिलोपार्गिट गावी शेती आहहे मी दत्तक पुत्र आहहे ,वडील जिवंत असताना तयांनी माझ्या नवे काही जमीन केले त्या नंतर ते मयत झाले माझ्या आई ने व मुलींनी वडिलांचा नवे असलेल्या जमिनीवर माझे नवा ना लावता मला ना विचारता ती पुतीन जमीन विकून याकाळी मी दिवाणी नाय्यलात अपील करून त्या वर स्टे आणला पुढे ताडझोड होऊन हुकूमनामा झाला माझ्या आई ने व बाहीने ती जमीन विकून घेतलेले रुपया खर्च केले त्या मुले जमीन विकत घेतलेले विक्तिश ते रुपये मी परत दिले व त्या बदल्यात आई व बहिणिचाकडून कोर्टातच हाक सोड पत्रं हिऊन घेतले व दिवाणी न्यालयात हुकूमनामा झाला कि ती विकलेली जमिनीवर केवळ माझ्याच हाक राहील . पुढे वारंवार तलाठीच्या बदली मुले माझेनावे ७/१२ वर नोंद होऊ शकली नाही त्या कालावधीत ती जमीन पुन्हा विकली गेली व दस्त नोंदणी साठी तलाठी यांच्याकडे अल्ला मी त्याला विरोध केला ,व त्या विऱोयुद्ध तलाठी ,सर्कल,ताशिलदार यांच्याकडे माझा नोंदणी साठी अराझकेला व खूप परतनाने माझी नोंद झाली ७/१२ वर पण झणी ती जमीन पुन्हा विकत घेतली त्यांनी उपविबकीय मॅडम कडे त्या विरुद्व ती नोंद रद्ध करण्या साठी अपील केले व त्यांनी ते मान्य हि केले कागदी पुरावा नसताना आता पुढे मी काय करू माझी नोंद रद्ध करा तो फेरफार रद्ध झाला आहहे असा निकाल दिला आहहे.कृपया मायेंग्दर्शन करावे.मी दुसऱ्या कोणाची जमीन घेत नाही माझी जमीन मलाच परत मिळत नाही असा कसा न्याय होऊ शकतो.फुडें काय करावे लागेल कृपया सांगा माझे नाव कमी करून ते फेरफार रद्ध करून दस्त झालेल्या विक्तिचे नाव लगेच लावतील.

उपवि भागीय अधिकारी मॅडम यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा

नमस्कार सर, ना.ज.क.धा. १९७६ अंतर्गत जमीन शासनाने ताब्यात घेतलेली आहे, सादर बाबतीत शासनाने पेमेंट साठी नोटीस काढलेली आहे व मालकाने नोटीस स्वीकारलेली नाही परंतु त्या नंतर मालकाने आजतागायत संपादित मिळकतीचा मोबदला स्वीकारलेला नसून नियमाप्रमाणे सदर मोबदला युएलसी ने कोषागारात अथवा कोर्टात देखील जमा केला नसल्याचे दिसून येते तरी याबाबत नवीन २०१३ कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला मागता येणे शक्य आहे का??? कृपया मार्गदर्शन करावे.

LARR कायद्याच्या कलम २४ प्रमाणे , केवळ जुन्या भू संपादन कायद्याप्रमाणे अवॉर्ड जाहीर झाले नसेल अथवा निवडा ५ वर्षापेक्षा जादा कालावधीपूर्वी , नवीन कायदा अस्तित्वात अळ्यापूर्वीपासून जाहीर झाला आहे पण जमीनच ताबा घेतला नसेल अथवा नुकसान भरपाईची रकम वाटप केली नसेल तरच , नवीन कायद्याप्रमाणे , नुकसान भरपाई मिळू शकते
आपली जमीन Urban Ceiling Act संपादन झाली आहे त्यामुळे कलम २४ च्या तरतुदी लागू शकणार नाहीत

मा. किरण पाणबुडेसाहेब
माझी बहिण FYBSc ला असताना तिचे नाव सारिका असे होते, नंतर तिने तिचे नाव बदलुन रुपाली असे केले आहे. व तसे राजपत्र सुद्धा तिने प्राप्त केले आहे. FYBSc च्या परीक्षा शासनाने कॉलेजकडे स्थानांतर केल्या असल्यामुळे तिचे गुणपत्रक सुद्धा सारिका नावाचेच म्हणजे पहिल्या नावाचे आले. नंतर SYBSc ला प्रवेश घेताना तिने तिचे नवीन नावानुसार प्रवेश घेतला आहे. व SYBSc चे तिचे सर्व गुणपत्रक सुद्धा नवीन नावानुसार आले आहेत. चालु वर्षी म्हणजे TYBSc ला प्रवेश घेताना FYBSc व SYBSc चे गुणपत्रकाची गरज असल्याने आम्ही ते दाखल केली होती. FYBSc च्या गुणपत्रीकावर सारिका असे नाव व SYBSc च्या गुणपत्रिकेवर रुपाली असे नाव असल्याने विद्यापिठाने तिला चालु वर्षी TYBSc ला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. राजपत्र दाखल करून सुद्धा विद्यापीठ ते मानण्यास तयार नाही आणि नाव बदलाबाबत कवरिंग लेटर मागत आहे. कवरिंग लेटरबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. विद्यापीठाच्या परीक्षा चालु होण्यास १ महिना कालावधी आहे आणि तोपर्यंत माझ्या बहिणीचे एडमिशन होणे अतिशय गरजेचे आहे परंतु विद्यापीठ राजपत्र मानत नाही व तशी लेखी पण देण्यास तयार नाही. तरी आम्ही सध्या काय करावे.
१. विद्यापीठाचे उत्तर योग्य आहे का ?
२. विद्यापीठ शासनाचे राजपत्र मानण्यास नकार देऊ शकते का ?
३. आम्हांला मा. उच्च न्यायालयात गेल्यास लवकरात लवकर न्याय मिळेल का ?
४. अन्य काही उपाय असल्यास माहिती देण्यात यावी.

विद्यापीठ ग रेजिस्ट्रार यांना भेटा.

निवासी झोन मध्ये तुकडेबंदी कायदा लागू नाही उत्तर दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर त्यामधील नवीन कायदेदुरुस्तीची प्रत मिळेल का

शासन संकेत स्थळावर , ए gazzte पहा

सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?

१. जमीन संपादन संस्थेचे नवे ७/१२ सदरी दाखल असेल , त्यामुळे आपले नाव्७/१२ सदरी लावता येणार नाही
२. आपणास भावांकडून रक्कम ( बहिणीचे हिस्स्याची ) परत मिल्ने बाबत न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
३.वरील दोन प्रमाणे . अन्य मार्ग नाही
४.हो . त्य्नाचे विरुद्ध आपण गुम्हा दाखल करू शकता . मात्र तीन बहिणीही वारस असले बाबत , न्यायालयाचा legal heirship प्रमाणपत्र काढून घ्या
५. त्यांचे मार्फत आता कारवाई साठी विलंब झालेला आहे

Respected Panbude Saheb,
Thanks for earnest reply to my previous querry regarding wrong name being wriiten on sale deed for the year 1988. Sir,let me bring to your kind notice that this land was incidentally found while searching on mahabulekh website. In our family nobody was ever aware that we might own piece land.
In late Nov’2016 ,my uncle came asking for signature for waras nond for land which initially was 8Hectare and now only 2241 m2 remaining which is reserved for school..
That is when we started searching. Otherwise we all brothers by GODS GRACE are educated and earning bread and butter.
Sir ,My question is for this piece of land which is 1acre (Now 2054 m2 still remaining ) .This land comes under NA JA KA MA dharna KAYDA.Perhaps it is Land ceiling act .If for this NA JA KA MA dharna kayda ,permission has to be taken from collector prior to selling of land , then how come these kind of irregularities happen which for a lay man like me( in land matters) though engineer by profession make feel disappointed . If 32 years is a big span, but what about procedures being followed in old days. Just because everything has gone online and I am getting information with 3G speed which my father never got . we have done waras nond in march 2017 for this 2054 m2 land .Seeing those sale of 1988 ,I found that somebody else surname is also wrongly written which is duly corrected with signature on side.
With all due respect and full faith in judiciary ,I kindly ask Sir, How do I find out that Mr Baban of sale deed was only Mr Bhagwan and nobody else.
Thanks
Regards,
Hemant

Dear

Put entire facts in detail

महोदय,
नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार शासनाचे दि १२ मे २०१५ चे आपसी वाटाघाटीने थेट खरेदीचे परिपत्रकानुसार संपादन संस्थेने जमीन खरेदी केल्यास भूसंपादन अधिकाऱ्यास दि १९ मार्च २०१४ चे राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क सदर संपादन संस्थेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

थेट खरेदीसाठी ३ % आस्थापना व ३ % सेवासुविधा अनुज्ञेय नाही

आदरणीय सर
1) तलाठी यांना ७/१२ वर कूळ दाखल करण्याचा अधिकार ,३२ग ची किंमत निश्चित करण्याचा व पिकपाहणीस नाव लावण्याचा अधिकार आहे का? असेल तर ते कायदेशीर आहे का?
२) एका sarve nanbar cha ७/१२ ओंलीने उपलब्ध नाही व तसेच तहसील मधेही त्याचा रेकॉर्ड नाही पण नकाशा मध्ये ते क्षेत्र व सर्वे नंबर नमूद आहे तरी नवीन ७/१२ ऑनलाईन यावा ह्यासाठी काय करावे लागेल ?
३) नोटीस नाही आली हा विलंब माफीसाठी कारण होऊ शकतो का?
4) जमीन मालकास नोटीस न पाठवता कुळ दाखल करता येतो का व ३२ग किंमत निश्चित करता येते का?
5) एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी जमीन विकली असेल तर त्याच्याच वारसांच्या ताब्यात ती जमीन असेल तर कुळ दाखल करता येते का?
मागील प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद,,

१. नाही
२.आकारबंद मध्ये उल्लेख आहे का ?
३.हो .मात्र आपणास नोटीस मिळाली नाही हे सिद्ध करावे लागेल
४.नाही
५.नाही

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी ,४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनी kulkaydyat milalelya जमिनी कोणतीही शासकीय अथवा प्रांत यांचेकडून परवानगी ना घेता खरेदी विक्री झालेला व्यवहार रद्द करणे साठी काय करावे लागेल?
२) तसेच परवानगी ना घेता केलेले खरेदीखत कायद्यात मान्य आहरे का?
३) कोणतीही परवानगी ना घेतलेल्या कुलकायद्याच्या जमिनीची विक्री झालेली आहे तर आता परवानगी घेता येईल का ? कि झालेल्या व्यवहाराला कायद्यात काहीच किंमत उरलेली नाही ?

१. ३२ ग अन्वये विक्री किंमत निश्चित होऊन १० वर्षे झाले असतील तर , विक्री परवानगी घेण्याची आवश्यकता नाही .
२.जर १० वर्षापेक्षा कालावधी कमी असेल व विना परवानगी विक्री केली असेल तर , महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क क अन्वये कारवाई करणे आवश्यक
३.परवानगी न घेता विक्री झाली असल्यास अनु क्र २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करणे आवश्यक .
मात्र सुधारणा कायद्यानुसार , दंडात्मक कारवाई करून , व्यवहार नियमानुकूल करणे आवश्यक

सर मला माझ्या काकाच्या नावावरील ०.५(अर्धा गुंठा) जमीन माझ्या नावे करायची आहे परंतु तलाठी म्हणतात कि, हयातीत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसा हक्काने वाटप करता येत नाही. ती नोंदणी कार्यालयातून नोंदणी करावी लागते. खरे काय आहे सांगावे?

हो

आदरणीय सर,
पिंपरी चिंचवड हद्दीत बांधकाम परवानगी कामी एखाद्या बांधकाम व्यावसायिकास १ कोटीपेक्षा जास्त रक्कम चलनाद्वारे भरावयाची आहे.(१ महिन्याच्या आत)परंतु आर्थिक मंदी असल्याने सदर रक्कम ते आज रोजी भरू शकत नसल्यास त्यांना २/३ महिन्याची मुदत मिळू शकते का?किंवा कसे?त्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली संधी वापरुन दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळाले व तो कर्मचारी परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी सदर परीक्षा उत्‍तीर्ण होईल का सर? याबाबत मार्गदर्शन करावे सर खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर , कृपया मार्गदर्शन करावे ,
मी आदिवासी या जमातीचा असून , वडिलांनी ( मयत ) मागील २० वर्षांपूर्वी गैर आदिवासी असलेल्या व्यक्तीस २०००/- मध्ये २ एकर शेत जमीन विकली होती...हा व्यवहार तोंडी झाला होता, ७/१२ मध्ये आज हि आमची नवे आहेत. गैर आदिवासी व्यक्ती चा ताब्यात असलेली जमीन मला परत मिळण्यासाठी काय करता येईल याबाबाबत मार्गदर्शन करावे .

जमीन restore करून मिळण्यासाठी दावा दाखल करा ( तहसीलदार यांचे कडे - जिल्हाधिकरी यांचे अधिकारी तहसीलदार यांना दिले आहेत

महोदय,
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ या अधिनियमानुसार जमिनीचे भूसंपादन केल्यास दि १९.०३.२०१४ चे शासन राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क घ्यावयाचे आहे.परंतु शासनाचे दि.१२.०५.२०१५ चे आपसी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने जमीन घ्यावयाचे परिपत्रकानुसार जमीन असल्यास घ्यावयाचे असल्यास ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क संपादन यंत्रणेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

१२.०५ २०१५ चे परिपत्रकानुसार सेवाशुल्क व आस्थापना शुल्क घेण्याची तरतूद नाही . तशी तरतूद करून घेणे आवश्यक

आदिवासी जमिनीचे 1982,1983 व 1996 रोजी बेकायदेशीर पणे हस्तांतरण झालेले आहे तरी सदर जमीन परत मिळेल का ?
व कोणत्या अधिनियमानुसार?

आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणात जिल्हाधिकारी नंतर महसुल न्याय प्राधिकरण नंतर अपिल कोठे करावे?

अपिलाची तरतूद नाही . वरील याचिकेद्वारे आपण MRT चा निकाल आव्हानात करू शकता

जर का चुलती ने जमीन पुतण्याच्या नावी केली असेल (अर्ज केला चुलती ने ) तर चुलतीचे मयत झाले व तीची मुलगी पण, चुलतीची मुलीची मुलगी आहे? तर त्या मुलीचे काही चालेल का?

मुलीची मुलगी हि चुलतीची वर्ग १ वारस आहे ( चुलतीची मुलगी मयत असल्याने ) . मिळकतीत चुलतीच्या मुलीच्या मुलीचाच हक्क आहे . पुतण्याचा नाही

hello sir,
maze nav suhas patil. maza question asa hota ki,
1) 7/12 utaryvar tukadebandi virudh vavahar asa jo shera asto tych arth kay ?
2) 7/12 utaryvar kul kayada virudh vavahar asahi shera asto tychahi arth kay ? tasech
3) avibhajit satta prakarane asa jo shera asto tycha arth kay asto ?
please mala reply dy...

thank you

१.प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करण्यावर महा तुके जोड व तुके बंदी कायद्याने निर्बंध आहेत . हे प्रमाणभूत क्षेत्र जिल्ह्यावर वेगवेगळे आहे .
साधारणपणे बागायत क्षेत्रासाठी - ५ गुंठे
एकपिकी जमीन -१५ गुंठे
वरकस जमीन -२० गुंठे
या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री झालेली असल्यास , अश्या क्षेत्राची नोंद मंजूर करता येत नाही . तथापि अश्या नोंदी मंजूर करून इतर हक्कात तुकडे बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार असा शेरा लिहलेला आहे
२. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी , खरेदी करणारा , शेतकरी असणे आवश्यक आहे . २०१६ पूर्वी जर , बिगर शेतकरी व्यक्तीने जमीनखरेदी केली असल्यास , महाराष्ट कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क अन्वये कारवाई करण्यात येत असे व अशी जमीन शासन जमा केली जात असे . अशी नोंद नामंजूर करणे आवश्यक आहे . मात्र अश्या हि नोंदी मंजूर करून , भोगवटादार सादरी खरेदीदाराचे नाव दाखल करण्यात आले आहे व इतर हक्कात कुल कायद्याचे तरतूद विरुद्ध व्यवहार अशी नोंद घेण्यात आली आहे
३. अविभाज्य सत्ता प्रकार - सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय ज्या जमिनीची विक्री करता येत नाही अशी जमीन . अशी जमीन शासनाने प्रदान केलेली असते

namaskar sir,
mi suhas patil maze gav -gudal,tal-radhanagari ,dist-kolhapur
sir amchi kul kayada 43 navin shart ashi shera aslele 24.5 guntha jamin aaahe.
amchy ajobanche don bhau aahet . tyveli amchy ajobani ty doghana prateki 24.5 guntha ashi jamin amchi bhogavata varga-1 aslelei jamin vatani mhanun dili .aani aplyala kul kayada vahivat aslelei varga-2 chi jamin theun ghetali .
tyveli tyna kahi mahit nhavate. pan aata amhala te navavar karata veli samjl.
pan hi jamin actual amchy ajobani kasali mhanun milali aahe na?
te don bhau sheti karat nahit city madhe ahet .
mag amchi vadiloparjit jamin ti tar ty don bhavani ghetli aani aata ti tynchy navavar aahe 7/12 la nond aahe.
amche ghar v parisar ase amche 10 guntha area aahe. tyna ase vatate ki aamhi ti 24.5 kul kayadychi jamin + 10 guntha gharachi jamin ghetli mhanun te aata gharachy 10 guuntha madhil vatani magat aahet .
mag ti kul kayady chi jamin ty vatanicha ek bhag aahe ki nahi. he sanaga . ti jamin amchy ajobancy navavar aahe tyci tyveli ty jaminiche 30 % rakam bharali hoti sarakarla . mag aata te don dhau vatni magatat te barobar aahe ki worg te sanga.please ghar hi amchy ajobancy navavar aahe. te legali kahi karu shakat nahit na. don bhau. please sanga ....yavar kay karayche te

जमिनीची किंमत आजोबांचे नावावर निश्चित झाली म्हणजे , जमीन एकट्या आजोबांची होत नाही . या जमिनीस कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते हे महत्वाचे . जर उपरोक्त जमिनीस , आजोबांच्या वडिलांचे म्हणजे पंजोबांचे अथवा आजोबांचे ए कु मॅ म्हणून नाव लागले असेल तर , त्या दिन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वर्षांचा मिळकतीवर हक्क आहे . मात्र जर केवळ आजोबांचे वैयक्तिक क्षमतेत नाव लागले असेल तर , त्या दोन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वारसांचा हक्क नाही .
तसेच जे वाटप झाले होते त्या मध्ये , अशी जमीन जमिनीची वाटणी असेल असा उल्लेख असणारा दस्त बनव्याण्यात आला होता का ? असा दस्त असेल तर , आपण त्यांचे मागणीकडे लक्ष्य देण्याचे कारण नाही . मात्र असा दस्त नसेल तर , मात्र , उद्या त्यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , न्यायायलायचे निकालालप्रमाणे , आपणास कदाचित या जमिनीतील त्यांचा हिस्स्याचे क्षेत्र द्यावे लागेल