[Ctrl+G for Marathi/English]

सर मला माझ्या काकाच्या नावावरील ०.५(अर्धा गुंठा) जमीन माझ्या नावे करायची आहे परंतु तलाठी म्हणतात कि, हयातीत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसा हक्काने वाटप करता येत नाही. ती नोंदणी कार्यालयातून नोंदणी करावी लागते. खरे काय आहे सांगावे?

हो

आदरणीय सर,
पिंपरी चिंचवड हद्दीत बांधकाम परवानगी कामी एखाद्या बांधकाम व्यावसायिकास १ कोटीपेक्षा जास्त रक्कम चलनाद्वारे भरावयाची आहे.(१ महिन्याच्या आत)परंतु आर्थिक मंदी असल्याने सदर रक्कम ते आज रोजी भरू शकत नसल्यास त्यांना २/३ महिन्याची मुदत मिळू शकते का?किंवा कसे?त्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली संधी वापरुन दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळाले व तो कर्मचारी परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % पेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी सदर परीक्षा उत्‍तीर्ण होईल का सर? याबाबत मार्गदर्शन करावे सर खूप मोठी मदत होईल सर.

नमस्कार सर , कृपया मार्गदर्शन करावे ,
मी आदिवासी या जमातीचा असून , वडिलांनी ( मयत ) मागील २० वर्षांपूर्वी गैर आदिवासी असलेल्या व्यक्तीस २०००/- मध्ये २ एकर शेत जमीन विकली होती...हा व्यवहार तोंडी झाला होता, ७/१२ मध्ये आज हि आमची नवे आहेत. गैर आदिवासी व्यक्ती चा ताब्यात असलेली जमीन मला परत मिळण्यासाठी काय करता येईल याबाबाबत मार्गदर्शन करावे .

जमीन restore करून मिळण्यासाठी दावा दाखल करा ( तहसीलदार यांचे कडे - जिल्हाधिकरी यांचे अधिकारी तहसीलदार यांना दिले आहेत

महोदय,
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ या अधिनियमानुसार जमिनीचे भूसंपादन केल्यास दि १९.०३.२०१४ चे शासन राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क घ्यावयाचे आहे.परंतु शासनाचे दि.१२.०५.२०१५ चे आपसी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने जमीन घ्यावयाचे परिपत्रकानुसार जमीन असल्यास घ्यावयाचे असल्यास ३% आस्थापना शुल्क व ३% सोयीसुविधा शुल्क संपादन यंत्रणेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

१२.०५ २०१५ चे परिपत्रकानुसार सेवाशुल्क व आस्थापना शुल्क घेण्याची तरतूद नाही . तशी तरतूद करून घेणे आवश्यक

आदिवासी जमिनीचे 1982,1983 व 1996 रोजी बेकायदेशीर पणे हस्तांतरण झालेले आहे तरी सदर जमीन परत मिळेल का ?
व कोणत्या अधिनियमानुसार?

आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणात जिल्हाधिकारी नंतर महसुल न्याय प्राधिकरण नंतर अपिल कोठे करावे?

अपिलाची तरतूद नाही . वरील याचिकेद्वारे आपण MRT चा निकाल आव्हानात करू शकता

जर का चुलती ने जमीन पुतण्याच्या नावी केली असेल (अर्ज केला चुलती ने ) तर चुलतीचे मयत झाले व तीची मुलगी पण, चुलतीची मुलीची मुलगी आहे? तर त्या मुलीचे काही चालेल का?

मुलीची मुलगी हि चुलतीची वर्ग १ वारस आहे ( चुलतीची मुलगी मयत असल्याने ) . मिळकतीत चुलतीच्या मुलीच्या मुलीचाच हक्क आहे . पुतण्याचा नाही

hello sir,
maze nav suhas patil. maza question asa hota ki,
1) 7/12 utaryvar tukadebandi virudh vavahar asa jo shera asto tych arth kay ?
2) 7/12 utaryvar kul kayada virudh vavahar asahi shera asto tychahi arth kay ? tasech
3) avibhajit satta prakarane asa jo shera asto tycha arth kay asto ?
please mala reply dy...

thank you

१.प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करण्यावर महा तुके जोड व तुके बंदी कायद्याने निर्बंध आहेत . हे प्रमाणभूत क्षेत्र जिल्ह्यावर वेगवेगळे आहे .
साधारणपणे बागायत क्षेत्रासाठी - ५ गुंठे
एकपिकी जमीन -१५ गुंठे
वरकस जमीन -२० गुंठे
या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री झालेली असल्यास , अश्या क्षेत्राची नोंद मंजूर करता येत नाही . तथापि अश्या नोंदी मंजूर करून इतर हक्कात तुकडे बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार असा शेरा लिहलेला आहे
२. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी , खरेदी करणारा , शेतकरी असणे आवश्यक आहे . २०१६ पूर्वी जर , बिगर शेतकरी व्यक्तीने जमीनखरेदी केली असल्यास , महाराष्ट कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क अन्वये कारवाई करण्यात येत असे व अशी जमीन शासन जमा केली जात असे . अशी नोंद नामंजूर करणे आवश्यक आहे . मात्र अश्या हि नोंदी मंजूर करून , भोगवटादार सादरी खरेदीदाराचे नाव दाखल करण्यात आले आहे व इतर हक्कात कुल कायद्याचे तरतूद विरुद्ध व्यवहार अशी नोंद घेण्यात आली आहे
३. अविभाज्य सत्ता प्रकार - सक्षम अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय ज्या जमिनीची विक्री करता येत नाही अशी जमीन . अशी जमीन शासनाने प्रदान केलेली असते

namaskar sir,
mi suhas patil maze gav -gudal,tal-radhanagari ,dist-kolhapur
sir amchi kul kayada 43 navin shart ashi shera aslele 24.5 guntha jamin aaahe.
amchy ajobanche don bhau aahet . tyveli amchy ajobani ty doghana prateki 24.5 guntha ashi jamin amchi bhogavata varga-1 aslelei jamin vatani mhanun dili .aani aplyala kul kayada vahivat aslelei varga-2 chi jamin theun ghetali .
tyveli tyna kahi mahit nhavate. pan aata amhala te navavar karata veli samjl.
pan hi jamin actual amchy ajobani kasali mhanun milali aahe na?
te don bhau sheti karat nahit city madhe ahet .
mag amchi vadiloparjit jamin ti tar ty don bhavani ghetli aani aata ti tynchy navavar aahe 7/12 la nond aahe.
amche ghar v parisar ase amche 10 guntha area aahe. tyna ase vatate ki aamhi ti 24.5 kul kayadychi jamin + 10 guntha gharachi jamin ghetli mhanun te aata gharachy 10 guuntha madhil vatani magat aahet .
mag ti kul kayady chi jamin ty vatanicha ek bhag aahe ki nahi. he sanaga . ti jamin amchy ajobancy navavar aahe tyci tyveli ty jaminiche 30 % rakam bharali hoti sarakarla . mag aata te don dhau vatni magatat te barobar aahe ki worg te sanga.please ghar hi amchy ajobancy navavar aahe. te legali kahi karu shakat nahit na. don bhau. please sanga ....yavar kay karayche te

जमिनीची किंमत आजोबांचे नावावर निश्चित झाली म्हणजे , जमीन एकट्या आजोबांची होत नाही . या जमिनीस कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते हे महत्वाचे . जर उपरोक्त जमिनीस , आजोबांच्या वडिलांचे म्हणजे पंजोबांचे अथवा आजोबांचे ए कु मॅ म्हणून नाव लागले असेल तर , त्या दिन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वर्षांचा मिळकतीवर हक्क आहे . मात्र जर केवळ आजोबांचे वैयक्तिक क्षमतेत नाव लागले असेल तर , त्या दोन चुलत आजोबांचा अथवा त्यांचे वारसांचा हक्क नाही .
तसेच जे वाटप झाले होते त्या मध्ये , अशी जमीन जमिनीची वाटणी असेल असा उल्लेख असणारा दस्त बनव्याण्यात आला होता का ? असा दस्त असेल तर , आपण त्यांचे मागणीकडे लक्ष्य देण्याचे कारण नाही . मात्र असा दस्त नसेल तर , मात्र , उद्या त्यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , न्यायायलायचे निकालालप्रमाणे , आपणास कदाचित या जमिनीतील त्यांचा हिस्स्याचे क्षेत्र द्यावे लागेल

सर सरळ प्रश्न आहे ग्रामपंचायतीत झालेल्या जागेच्या वाटण्या ग्राह्य असतात का व वाटण्या झाल्यावर pr कार्ड ला पुन्हा वाटण्यावरून वाद होऊ शकतात का कारण pr कार्ड ला अजून जुनीच नोंद आहे ग्रामपंचायत नमुना न. ८ मालकी पुरावा असतो कि नसतो कारण पूर्वी लोक ग्रामपंचायत ला वाटण्या करत होते ना कि भूमी अभिलेख ला त्यांनी वाटण्या केल्या पण आता ते जिवंत नाहीत आणि pr कार्ड ला नोंद जुनी आहे आता कोणती वाटणी खरी आहे ?
२.ज्याने त्याने वाटण्या झालेल्या जागेवर घर बांधून गेले २० वर्ष महसूल भारत आहे तर आता pr कार्ड वरून वाद कसा होऊ शकतो
३.दोन्हीकडे फेर का होतात मग खरा कोणता आजही लोक ग्रामपंचायत ला जागेच्या वाटण्या करतात त्या कायदेशीर असतात का ?
४.आपण ज्या जागेचा घरपट्टी म्हणून कर भरतो तो मालकाच्या नात्यानं भरतो मग पुन्हा pr कार्ड ला वारसा करून वाटण्या करण्याचे कारण काय?
मी कोर्टात दाद मागू शकतो का ?

आपले गाव शहर सर्वेक्षण झालेले आहे . ग्राम पंचायत मध्ये कर आकारणी नोंदवही असते . त्या मध्ये घर नम्बर नमूद असतो . आपण अससेसमेंट नोंदवहीला वारसांची नवे लागल्यावर , त्याच वेळी , मिळकत पत्रिकेस हि नाव लावणे आवश्यक होते . पण अद्यापही वेळ गेलेली नाही . आपण ज्या पद्धतीने अससेसमेंट नोंदवहीला वापर केलेले आहे त्या[प्रमाणे मिळकत पत्रिकेस नाव लावणे व त्याप्रमाणे वाटप करून , स्वतत्र मिळकत पत्रिका मोजणी करून घ्या .
सर्वांची संमती असेल तर , वाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही

आदरणीय श्री संजय कुंडेटकर सर आपण मी विचारलेल्या प्रश्नाना बघावे योगय तो मार्गदर्शन मिळावा ह्या करीता विनंती ,,.
१) नमस्कार सर आमच्या जमिनीचा ७/१२ चा तहसीलदार मध्ये नाही रेकॉर्ड आणि ऑनलाईन सुद्धा नाही ,,पण त्या सर्वे नंबर चा घटबूक नकाशा मध्ये ते क्षेत्र आहे, व जुना विकत घेतल्याचा सुद्धा पुरावा आहे, तर नवीन ७/१२ मिळणेसाठी काय करावे लागेल?
२) ७०ब अन्वये ताबा सिद्ध करणेसाठी कोणता पुरावा सक्षम व कायदेशीर असेल.
३) ४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनीची विक्री २०१० साली कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर विक्री झाली आहे , हि झालेली विक्री रद्द करणेसाठी काय करावे लागेल?
४) ७०ब चा अर्ज केल्यानंतर माननीय श्री तहसलीदार कायदेशीर चौकशी करणेसाठी शेतजमिनीवर लागवड कोणी केली हे बघण्यासाठी स्वतः येऊ शकतात का? येण्यासाठी विनंती केल्यावर येऊ शकतात का? आपण मार्गदर्शन करावे विनंती ,,.
आपण जनसामान्यांसाठी ही वेबसाईट सुरु केल्याबद्दल मनपूर्वक आभार ..

१. ७/१२ नसेल तर केवळ गटबुक नकाशा असून उपयोग नाही .
२. ७० ब आपण महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ७० ब चा उल्लेख करत असाल तर , हे कलम हा कायदा प. महाराष्ट्र , कोंकण व खान्देश अथवा उत्तर महाराष्ट्र यास जो लागू आहे त्या अनुषंगाने आहे असे समजून मी उत्तर देत आहे .
या कलमाद्वारे ताबा सिद्ध होत नाही अथवा ताबा सिद्ध करण्याचे कलम नाही . या कलमाद्वारे एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची कुल /सौरिक्षीत कुल / कायम कुल आहे किंवा होती , हे ठरवण्याचा मामलतदार /तहसीलदार यांना अधिकार आहे .
या साठी आपण या कायद्याची कलम २(१८),२(५) ,२(६), ४ हे कलमे वाचा .
३. कलम ८४ क क प्रमाणे शर्थ भंग झाला म्हणून कारवाई सुरु करणे आवश्यक .
४.उपलब्ध पुराव्यावरून व्यक्ती मानीव कुल आहे कि नाही हे पाहण्याचे असते . स्थळपाहणी आवश्यक नाही .

नमस्कार सर

वर्ष १९२२ फेरफार क्रमांक ३४२ ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये कॉलम मध्ये होते , या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , या प्रकरणावर मला खालील दोन प्रश्नावर मार्गदर्शन करावे ही विनंती

१) जर ''अ '' या वेक्तीचे नाव सातबाराच्या भोगवटामध्ये आहे मग तो इतर हक्कामध्ये कसा गेले आणि या नंतर या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले , तर या वेक्तीचे नाव परत फेरफार क्रमांक ३४२ प्रमाणे १९५८ नंतर परत भोगवटाच्या कॉलम मध्ये कसे येऊ शकते .

२) ''अ '' या वेक्तीचे नाव १९५८ मध्ये इतर हक्कांमधून निघून गेले तर या वेक्तीचे नाव परत मालकी हक्का मध्ये येऊ शकते का .

आपण ७/१२ वर नमूद सर्व फेरफार पहा . त्यावरून आपणास कळून येईल

नमस्कार सर
एका व्यक्तीने 2010 साली जमीन विक्रीसाठी नोंदणीकृत साठेखत तयार करून दिले खरेदी घेणाऱ्याने त्यासोबत कुलमुखत्यार सुद्धा करून घेतले आणि २०१७ ला त्याने कुलमुखत्यार पत्र व साठेखतावरून खरेदीखत तयार केले आहे, ह्या प्रकरणात कायम खरेदीचा उल्लेख हा साठेखतात आहे , पण ज्याची जमीन आहे तो खरेदीखत साठी सह्या करायलाच गेला नाही, सध्या प्रकरणात केस चालू आहे ,कुलमुखत्यार पत्राद्वारे खरेदी देता येते का?
जमीनदाराळ त्याची जमीन परत मिळू शकते का? तो साठेखतात घेतलेली रक्कम परत करायला तयार आहे ,,मागील उत्तर बघितले कि साठेखताची मुदत फक्त ३ वर्ष असते ..मार्गदर्शन करावे ,,,

कुल मुखत्यार द्वारे , जमिनीची विक्री करता येते .
कुल मुखत्यार- पत्र म्हणजे , मालकाचे वतीने काम पार पाडण्यासाठी नेमलेली व्यक्ती .
जमीन परत मिल्ने अश्यक्य .
जर कुलमुखत्यार पत्र करताना फसवणूक झाली असेल तरच फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल करून खरेदी खत रद्द करणे आवश्यक

नमस्कार सर , मी पाच
वर्षे पूर्वी ग्रामपंचायत हद्दी मध्ध्ये रजिस्टर अग्रीमेंट करून प्लॉट विकत घेतला. हे अग्रीमेंट माझ्या एकट्याच्या नावानी केले आहे , त्यात बायकोचे नाव नव्हते.मग ग्रामपंचायती कडून रीतसर परवानगी घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले . ग्रामपंचायतीना माझी कुठलीही पूर्व परवानगी नसताना बायकोचे नाव आठ अ वर टाकले आणी टॅक्स पावती वर टाकले.मी तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणते की तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही , आठ अ हा फक्त महसूला पुरताच आहे , त्या मुले कुणाची मालकी सिध्ध होत नाही. तसा
शिक्का देखील आठ्या वर मारून
दिला आहे. त्यांनी हेही सांगितले कि
तुम्ही एकटे रजिस्टर अग्रीमेंट करून घर कुणालाही विकू शकता.
प्रश्न १ - हे बरोबर आहे का ?
प्रश्न २ - पुढे मी हे घर विकल्यास नवीन मालकाचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ध्ये चढवण्यास बायको आडकाठी आणू शकते का ?

जर आपण खरेदी खतात पत्नीचे नाव टाकले असल्यास , पतींचेही नाव अससेसमेंट रजिस्टरला येणार . मात्र जर पत्नीचे नाव खरेदी खतात नसेल तर पत्नीचे नाव अससेसमेंट रजिस्टरला येण्याचा प्रश्न येत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा

धर्मादाय प्र्योजनासठि कोण कोणत्या जमिनी शासनाकडुन देण्यात येतात

धर्मदाय प्रयोजनासाठी जमीन देण्यात येत नाही .
पूर्वी देवस्थान चे पूजे अर्चा , दिवाबत्ती या साठी जमीन देण्याची प्रथा होती . आता या कारणासाठी जमीन दिली जात नाही

Dear Sir,
My father died in year 1999. while searching old records of kharedi khat of year 1985 , we found that his name is baban instead of bhagwan. can we as his legal heir take objection in this regard of sale deed carried in the year 1985. At present I have found 2 plots sold in this manner.
Thanks
Regards
Hemant

It is almost 32 years since the sale deed has been executed . You will have to challenge the sale deed in civil court . But explaining 32 years delay is difficult task . Beside your father is dead , it is difficult to prove about the real name .

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मला माझ्या मुलीच्या शिक्षनकामी तहसील कार्यालयाकडून अल्पभूधारक चा दाखला हवा आहे परंतु तहसीलदार मला यासंबंधी शासन निर्णय नाही असे कळवितात तरी कृपया मला आपल्याकडून सदरील विषयी मार्गदर्शन व शासन निर्णय असल्यास सांगा.

तहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे . आपला गाव नमुना ८ अ व शपथ पत्र दाखल करा

अ ब क ड यादी चौथी आवृत्‍ती याबाबत थोडक्‍यात मार्गदर्शन करावे व सदर पुस्‍तक PDF स्‍वरुपात उपलब्‍ध असल्‍यास कृपया माझे इ-मेल आयडीवर पाठविण्‍याची कृपा करावी.

सर माझे आजोबा यांचे मूळ गावी त्यांची वडिलोपार्जीत जमीन व घर होते.परंतु आजोबा २ ते ३ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील मयत झाल्याने आजोबाचे पालन त्यांचे आत्याने केले.परंतु आजोबाचे नावावर त्यांचे नावावर कोणतीही मिळकत झाली नाही.त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.कालावधी (१९५०-१९६०)

कोणतीही गोष्ट विहित वेळेत होणे / करणे आवश्यक असते . कायद्यात law ऑफ limitation ला महतव आहे . ५० वर्षाहून अधिक विलंबाबत कोणते कारण आपण देणार .

नमस्कार सर,

आचारसंहिता लागू असताना ग्रामपंचायतची मासिक मिटींग घेणे आचारसंहितेचा भंग होतो काय ?

मतदारावर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय मासिक बैठकीत घेता येत नाहीत .
बैठक न घेणे हितावह

सर
Maza garala lagun shezaril garcha darwaja ha javalpas 2 foot amacha haddit yeto tyamole amhi amche bandhkam kartani 3foot he atikramnit manjech sarkari jagevar kele ahe pan ata roj vad hotat tya karnastav kortamede case taklyas tyacha fayada hoile ka sir those margdarshan kara

आपापसात चर्चेने प्रश्न सुटतो का पहा ?
न्यायालय कालावधी खूप जाईल . आर्थिक / मानसिक त्रास आहेच .
या अपरोक्ष न्यायायालयत गेल्यास , आपला प्रश्न कायमचाही सुटू शकतो.

नमस्कार सर
प्रश्न असा आहे की, XXX ह्या व्यक्तीचे ६ मुले होती
A,B,C,D,E,F त्याप्रमाणे ‘’A’’ ह्या मोठ्या मुलाचे नाव (ए.कु.मॅ.) म्हणून लागले असेल जुना फेरफार नाही बघितला,
त्यावरून १९५३ साली A हा मयत झाला, परत फेरफार वर ‘’P’’ ए कु पू म्हणून त्याच्या मुलाचे नाव दाखल झाले,फेरफार बघितला,
त्यांनातर असाच त्याच्या ३ मुलांची नाव दाखल झाले आता ह्या प्रकरणात बाकी C ह्या मुलास कुठेच हिस्सा मिळाला नाही , फक्त एका ६ गुंठे जमिनीवर B,C,D,E,F च्या वारसांची नावे आहेत . पण P चे नाव नाही त्या जमिनीवर, P चे वारस म्हणतात की तुमचं काहीही हिस्सा नाही जमिनीत आणि C हा लवकर मयत झाला होता म्हणून वारसा हक्क डावलला गेला, सगळ्या जमिनीवर P च्या वरसांची नावे आहेत तर अत्ता C च्या व अन्य वारसाना त्यांचा हक्क मिळू शकतो का? कोणता पुरावा लागेल वारसा सिद्ध करण्यासाठी? कृपया

ज्या फेरफाराने केवळ A च्या वारसांची नवे लागली तो फेरफार व नंतरचे फेरफार उपविभागीय अधिकारी यांचेकडे आव्हानात करा . अन्य पुराव्याची गरज नाही . फेरफारवरून चित्र स्पष्ट होत आहे हि कि मिळकत XXX ची होती . पर्यायावे त्यांचे सर्व वारसांची नवे लागणे आवश्यक आहे .

सर मी जानेवारी २०१६ मध्ये नांदेड शहराला लागून असलेल्या वाडी बु.ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट घेतला आहे .मला आता बांधकाम करावायचे आहे पण जानेवारी २०१६ पासून ग्रामपंचायतचे बांधकाम परवानगी अधिकार बंद झालेत आहेत .ते नगररचना ला गेले आहेत असे समजले पण नगररचना म्हणत आहे कि तुमचे ले आउट ग्रामपंचायतचे असल्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही .आतावर्ग २ ग्रामपंचायतिचे परवानगीचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आहे आहेत असे समजले . म्हणून आता प्रस्ताव तहसील कार्यालय येथे जमा केला आहे .पण अद्याप कार्यवाही काहीही झालेली नाही .सर मला परवानगी कधी व कशी मिळेल एवढे सांगा.

ज्या क्षेत्रासाठी प्रादेशिक योजना अस्तित्वात आहे किव्वा अस्तित्वात आली आहे , त्या क्षेत्राचे नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत . म्हणजे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व्यांना आहेत . जिल्हाधिकारी त्य्नाचे अधिकार तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी यांना प्रदान करू शकतात . त्या प्रमाणे नांदेड येथे , तहसीलदार यांचेकडे विकास परवानगी अधिकारी देण्यात आलेले असतील . तहसीलदार यांचेकडून परवानगी देण्यास विलंब झालेला असेल तर त्यांना हि बाब निदर्शनास आणून द्या , अन्यथा जल्हाधिकारी यांचेकडे विचारणा करा

महोदय माझा प्रश्‍न असा आहे महाराष्‍ट्र जमीन महसूल नियमपुस्‍तीका खंड - ३ मध्‍ये विहीत केलेले नोंदहवीचे नमुने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीकाशी मिळतेजुळते आहेत पण त्‍यामध्‍ये प्रकरणाचा प्रकरण क्रमांक व परीच्‍छेद क्रमांक वेगळा दिलेला आहे. मग कार्यालयीन कामे करतांना वापरण्‍यात येणारी नोंदवही MLRC खंड - ३ प्रमाणे ठेवावी क‍ि जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीका मध्‍ये विहित केलेल्‍या नमुन्‍यानुसार ठेवावी. याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे.

आपणास ज्या कार्यालयाचे नमुने ठेवायचे आहेत त्या कार्यालयाचे नमुने खंड ३ प्रमाणे ठेवणे आवश्यक

सर, मी व माझी पत्नी दोघेही शासकीय सेवेत आहोत. आम्ही शासकीय निवासस्थानात राहतो. नियमानुसार आमचा दोघांचाही घरभाडे भत्ता कापला जातो. निवासस्थान माझ्या नावावर असल्यानं माझ्या वेतनातून सेवा व अनुज्ञप्ती शुल्क कापले जाते. आता माझी बदली झाल्याने ते निवासस्थान माझ्या पत्नीच्या नावे व्हावे यासाठी मी साप्रवी कडे अर्ज केला. साप्रविने 6 महिन्यानंतर सादर निवासस्थान पत्नीच्या नावे केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दंड भरणाबाबत सांगतात. कृपया मार्गदर्शन करावे.

आपण घरभाडे दोंघांचे कट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आपण वेळीच हि बाब आपले कार्याचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
आपली बदली ते पतिणीचे नवे घर होई पर्यंत आपण अनधिकृतपणे घरात राहत होता असा निष्कर्ष आपले विभागाने काढला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे निदर्शनास हि बाब आणून द्या . घरभाडे भारत असले बाबाबत त्यांना पुरावा द्या . कदाचित ते दंड माफ करतीलही

सर गावातील वाहून जाण्याऱ्या सांडपाण्यान्यावरून खातेदाराने शेती ओलीत करण्या करीत परवानगी मागितली आहे तशी परवानगी देता येते का, कोणत्या कलमाखाली देता येईल

शासनाचे मालकीच्या स्रोतावरून पाणी घेण्याचे असल्यास कलम ७० व जमीन महसूल नियम अंतर्गत परवानगी देता येते . गावातील सांडपाणी , हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहे . त्यामुळे त्याची परवानगी देण्याचे अधिकारी ना. तहसीलदार यांना नाहीत

सर ,
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर दिनांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय
१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .
२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .
३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .
४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का ?
५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .
६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का ?
सर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.
.
आपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .
१. एकूण क्षेत्र किती होते ?
उत्तर :- २२ गुंठे
२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले ?
उत्तर :- १९६२ साली पाटील इनाम खालसा कायदाय मुळे
३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले ? पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही ?
उत्तर :- भोगवटा दार सादरी माझ्य वडिलांचे नाव आहे . माणिक पांडुरंग पाटील .आ.प .का अनुबाई प. पाटील (आज्जी ) जी मयत आहे . व इतर अधिकारात साधे कुल आनंद पाटील हे पण मयत आहेत .वारस नोंद झालेली नाही . फक्त पिकपाहणी ला वारस ची नवे आहेत .
४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का?
उत्तर :- हो आहे .

उपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून
पाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .
जमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .

सध्या स्थित जमीन सरकारचे नावे आहे का ?
सरकारचे नाव असल्यास ती या पूर्वी उत्तर दिल्याप्रमाणे , आता आपणास मिल्ने अशक्य आहे .
इनाम जमीन पूर्वी , कब्जेदारना नजरांना भरून घेऊन शासनाने पुनर्प्रदान केल्या आहेत . आता तो हक्क आपलेकडे उरला नाही .

मात्र जर सध्या ७/१२ सदरी , आपले वडिलांचे नाव असेल व इतर अधिकारात कुळांचे वर्षांची असतील , तर कुल हे सौरक्षित कुल असल्याने कृषक दिनी मालक झाले आहे . केवळ ३२ ग अन्वये किंमत होणे हि तांत्रिक बाब झालेली नाही .

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
एका जमिनीवर साधे कुल लागले आहे आता त्या जमिनीवर पुन्हा कुल होता येईल का?,,होत असेल तर संरक्षित कुल होण्यासाठी कायदेशीर काय करावे लागेल, कुठे अर्ज करावा लागेल कुल होण्यासाठी?
२) पूर्वीपासून कसत असलेल्या जमिनीला सावकाराचे नाव असल्यामुळे आता कुल होता येईल का?
जर लागलेल्या कुळाकडे खंडाच्या पावत्या नसतील व कधी तोंडी करार सुद्धा झाला नसेल, व कधी कुल लागल्याची नोटीस सुद्धा आली नाही तर ते कायदेशीर कुल मानण्यात येईल का?
३)आपला जमिनीवरचा ताबा सिद्ध करण्यासाठी पिकपाहणी हा पुरावा कोर्टात मान्य होईल का?
पिकपाहणी ला कायदेशीर महत्व आहे कि नाही ?
४) कुळाकडून जमीन मालकाला ३२ ग ची किमात निश्चित झाल्यावर
जमीन विकत किंवा अन्य मार्गाने घेता येईल का?
कृपया आपण मार्गदर्शन करावे जेणे करून कोणाला तरी त्याचा हक्क मिळावा सर आपणास नम्रविनंती,,,

१. सध्या ज्या कुळाचे नाव लागले आहे तो जमीन कोण कसत आहे का ? जर या कुळाचे नाव १९५७ नंतर दाखल असेल तर , १ वर्षाचे आत कुळाचे नवे किंमत ठरणे बंधनकारक आहे . जर किंमत ठरली नसेल व कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालक अश्या कुळाचे नाव कमी करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतो .
२.जर कुल जमीनकास्ट असेल तर , नव्याने कुळवहिवाट निर्माण होऊ शकत नाही .
३.होय . बऱ्याच प्रकरणात , जर पिकपाहणीस कायदेशीर प्रक्रिया पार पडून नाव लागले असेल ( म.ज.म.अधिकार अभिलेख तयार करणे नियम ३१ ) तर , पिकपाहणी नोंदीचा आधार ताब्यासाठी घेतलेला आहे .
४.कुळाचे नवे किंमत ठरल्यावर , कुळाकडून कलम ४३ खाली परवानगीने खरेदी करता येईल .

आदरणीय सर
आमच्या गावाने १९८२ पासून नगरपालिका वर बहिष्कार टाकला होता व आजही बहिष्कार आहे ,सध्या निवडणूक झाल्या पण आमच्या एकजुटीने बहिष्कार आहे ,आम्हाला नगरपालिका नको आहे, कायमस्वरूपी ग्रामपंचायत हवी आहे सगळ्या लोकांचे हेच मत आहे , तर पुन्हा
ग्रामपंचायत राहण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे विनंती ...

१. आपले ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . कायदेशीर प्रक्रिया पार पडून ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . त्यामुळे आता आपले ग्राम पंचायतीने नागरपालिकेतून स्वतंर होणे अवगढ आहे .
२. ज्या अधिसूचनेद्वारे आपली ग्राम पंचायत नगरपालिकेत समाविष्ट केली आहे , ती अधिसूचना बदल करावी लागेल .

कुल कायदा काय असतो
कुळाचे किती प्रकार असतात
कोणत्या कुळाच्या आधारे त्या शेतीवर त्यांच्या वर्सानंच अधिकार असतो
कुल नावाने लागायला साधारणतः किती वर्ष वहिती करावी लागत hoti

१.कुल व जमीन मालक यांचे संबंध , त्यांच्यातील वाद , कुळाने द्यावयाचा खंड , कुळाचे अधिकार , शेतजमिनीचा किफायतशीर वापर व इतर उद्देश या कायद्याचे preamble मध्ये आहेत .
२. सौरक्षित कुल
कायम कुल
कृषक दीना नंतरचा कुल
३.कलम ४० अन्वये कुळवहिवाट हक्क वंश परंपरागत आहे
४. कुल व मालक यांच्यातील कुळवहिवाट हक्क निर्माण होणे आवश्यक . त्यासाठी वहिवाटीची कालमर्यादा नाही .

श्री किरण पाणबुडे सर
१९४६ ला पंजोबांनी जमीन विकत घेतली आहे कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली आहे तरी ती अजून पर्यंत नावे झाली नाही फेरफार मध्ये त्या जमिनीचा सर्वे नंबर आहे पण त्या ७/१२ वर फेरफार दाखवत नाही,दाखल झाला नाही जुना ७/१२ हि तहसीलदार मध्ये उपलब्ध नाही, आज रोजी त्या ७/१२ वर सावकाराचे नाव आहे व इतर हक्कात साधे कुल लागले आहे, जमीन हि आमच्याच लागवड करत असलेल्या शेता जवळ आहे ,, कायदेशीर दस्त म्हणून खरेदी केल्याचा १९४६ चा पुरावा आहे , जमीन कायदेशीर रित्या मिळण्यासाठी काय करावे लागेल,,, सर आपण मार्गदर्शन करावे ,,

न्यायालयीन आदेशास ७१ वर्षे झाले आहे . विलंब खूप झाला आहे . विलंबाबाबत सबळ कारण दिल्यास , नाव दाखल होऊ शकते

महोदय सर
अर्जावरून नोंद करणे हे अवैध चुकीचे आहे तर एखाद्या व्यक्तीने तलाठी यांस कुल होण्यासाठी कायदेशीर दस्त सादर न करता अर्ज केला असता तो मान्य करणे चुकीचे असेल कि योग्य ?
आणि ह्याच अर्जदाराला अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्वे नंबर पैकी काही जमीन च जर तो कसत असेल तर, तसेच बाकी सर्वे नंबर ची जमीन कुठे आहे हेही त्याला माहित नसेल तर, त्याने कुल होण्यासाठी केलेला अर्ज बेकायदेशीर ठरेल का? ह्याच प्रकरणात जमीन मालकाला कधीच नोटीस अली नाही जर अली असती तर तेव्हाच अडचण सुटली असती. तुम्ही माहिती द्यावी विनंती...

एखाद्या जमिनीस कुल म्हणून नाव दाखल करण्यासाठी मामलतदार म्हणजे तहसीलदार यांचेकडे कलम ७० ब अन्वये अर्ज करावा लागतो . तलाठी यांना अधिकार नाही

महोदय सर
कुळकायद्यानुसार जेव्हा कुल १९७२ साली जमीन मालकाच्या नावे ३२ग ची किंमत २५७ रुपये निश्चित करतो आणि ७/१२ च्या इतर हक्कात ठेवतो, तेव्हा त्याने काही दिवसांची मुदत घेतलेली असते ती मुदत संपली असता त्याने कोणतीही कायदेशीर गोष्ट नाही केली तर काही वर्षानंतर तो मरण पावला असता,इतर हक्कात असलेल्या बोजा ची रक्कम भरण्याचा अधिकार त्याच्या वारसांना असतो का? १९७२ साली जमीन मालक हा एकच व्यक्ती आहे तसेच त्याला कुल व अन्य ह्या संदर्भातील काहीच गोष्टी माहित नव्हत्या, जमीन मालक हा ज्याचा
कुल लागला त्याचा ओळखीचाच होता,कधीच त्याने जमीन मालकाला खंड दिला नाही ह्याबद्दल जर कल्पना असती तर प्रॉब्लेम तेव्हाच सॉल्व झाला, असता, २५७ रुपये हि किंमत १९७२ साली दहा ठिकाणी असलेल्या जमिनींना सगळे सर्वे नंबर एकूण १० आहेत योग्य आहे का?

३२ ग किंमत रक्कम जरी निश्चित करून दिलेल्या हाओट्यात भरलेली नसली , तरी कुळांना अथवा त्याचे वारसांना किंमत भरण्याचा हक्क आहे . ३२ ग किंमत मात्र व्याजासह कुळास भरावी लागते .
एखदा ३२ ग किंमत ठरलीकी , कुलाछा हक्क डावलता येत नाही

नवीन अति शर्तीची जमीन असेल आणि अशा जमिनीची पॉट हिस्सा मोजणी करायची असेल तर शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे का?

पोटहिस्सा जर मूळ प्रदात्याच्या मृत्यूमुळे त्याचे वारसांचे नावावर मिळकटीमुळे निर्माण झाला असेल तर , मोजणीसाठी परवानगीची आवश्यकता नाही

महोदय माझा फक्‍त एकच प्रश्‍न आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा लिपीक संवर्ग ही परीक्षा सुट मीळालेल्‍या विषयाचा लाभ घेवून (दुसरी संधी) जर परीक्षा दिली तर ज्‍या ज्‍या विषयाची परीक्षा दिली त्‍या त्‍या विषयामध्‍ये ६० टक्‍के च्‍या वरच गुण घ्‍यावे लागतील म्‍हणजे सुटच घ्‍यावी लागेल तरच संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण करता येते का सर. योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे.

नमस्कार सर माझ्यया आजोबानी १९५९ साली खरेदीने जमीन घेतली होती त्यान्चाय मृत्यूनंतर वारस दोन मुले व पाचमुली होतया परंतु ७/१२ वर एका मुलाचे नाव ए कु मेनेजर होते आजोबा १९६४ साली मयत झाले ए कु मे चाय फेरफार नुसार सगळ्या वारसांची नावे ७/१२ सदरी लावली
दोन मुलांपैकी एक माझे वडील १९९३ साली मयत झाले आम्ही तीन भाऊ व एक भहीन अशी नोंद झाली आम्ही तिघांपैकी दोघांनी तया पाच मुली कडून म्हणजे आमचया आत्याचे सामान हिश्याय प्रमाणी तयाचे हिशय खरेदीखताने घेतले असून माझ्हाय एका भावाने कोर्टात वाटणी पत्राचा दावा दाखल केला असून हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार तया पाचमुली म्हणजे आमचया आत्या याना सामान हिस्सा येत नाही तर आम्ही केलेले खरेदीखत बाद होईल कि आत्या चाय हिशयपूर्ती नोंद ग्राहय धरली जाईल कृपया मार्गदर्शन करावे

हिंदू वारसा कायदा अन्वये मुलींनाही वडिलांचे मिळकतीत हक्क आहे . २००५ पूर्वी मुलींना copracenary मिळकतीत वाटप करून मिळण्याचा हक्क नव्हता . आपल्या तिन्ही अत्याचा मिळकतीत हक्क होता. त्यामुळे खरेदी खत रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही

महोदय
किरण पाणबुडे सर
१) सर एका व्यक्तीचे गवत उगवणाऱ्या पडीक जागेला टेनन्सी ऍक्ट प्रमाणे कुल दाखल झाले आहे, पण तो व्यक्ती कोणाचा तरी पूर्वज असेल जमीन मालकाने १९४६ ला कोर्टातून जाहीर लिलावाने हि जमीन विकत घेतली आहे, त्याचा पुरावा देखील आहे व फेरफार पण आहे , पण त्या ७/१२ वर अजून सावकाराचा नाव आहे व ७/१२ वर फेरफार नोंद झाली नाही विकत घेतल्याची, ज्याकडून कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली त्याचेच अजून ७/१२ वर नाव आहे . पण कुल जुन्या काळात लागला आहे, लागल्यामुळे जमीन मालकाला जमीन मिळण्यासाठी काय करावा लागेल,,
2) सर कुल लागण्यासाठी कोणता पुरावा असतो, नि कुल तो कुल आहे असा कोणत्या प्रकारे सिद्ध करू शकतो ,,कधी खंड नाही दिला, तोंडी करार सुद्धा नाही झाला,, कुळकायद्याचा गैरवापर करून जमीन मिळवली आहे अशा प्रसंगात काय करावं,,ह्या परकरणात शेतकरी असलेला व्यक्ती अडाणी आहे त्याला सगळ्या लोकांनी सगळ्या बाजूंनी फसवलं आहे त्याची जागा बेकायदेशीर त्यांच्या नावी केली आहे ,,पंजोबांनी विकत घेतलेल्या २७ सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्याला १च सर्व्हे नंबर ची जमीन त्याच्याकडे कसण्यासाठी शिल्लक आहे,
३) १९७५ नंतर कुळकायदा लागू होतो का ,,
४) २०१० पर्यंत जमीन मालकाचे ७/१२ वर नाव होते जमीन कसणाऱ्या ने डायरेक्ट ३२ग ने त्याच्या नावी केली अत्ता बेकायदेशीर पाने केली असावी अशावेळेस कोणत्या मार्गाने जमीन मिळवता येईल?
४) कुळाकडून जमीन मालकाला जमीन विकत घेता येईल का ?

शंकरजी ,
मिळकतीस लागलेल्या कुळाचे नवे ३२ ग किंमत ठरलेली आहे . त्यामुळे आता त्याचा हितसंबंध दूर करता येणारनाही .

माननीय सर,
कुल कायदा काय असतो कुळाचे किती प्रकार असतात.
कोणत्या कुळाच्या आधारे त्याचे वारसांना अधिकार केव्हाही मिळू शकते.
आणि ३८ ई प्रमाणे जमीन डेकलेअर म्हणजे काय. शेवटचा प्रश्न ७ १२ वर चढलेले नाव कमी करता येते काय, व कोणत्या आधारे हा ऑनला अधिकार असतो.कृपया मार्गदर्शन करावे..

नमस्कार साहेब!
आमची एकत्रित कुटूंबाची मौजे लाखलगाव ,ता.जी.नाशिक येथे जमीन असून ७/१२ च्या इतर हक्कात साधे कुल म्हणून माझ्या चुलत भावाचे नवे चुलता मयत झाल्याने वरसाने लागले आहेत.पन सादर जमीन ची मागील ३० वर्ष पासून आमचीच आहेत तरीही ती नाावे कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे.धन्यवाद!

सख्खा भाऊ हा कुटुंब या व्याख्येत येत नाही . जर मिळकत हि एकत्रित कुटूंबाची नसेल तर भावाचे कुल म्हणून नाव दाखल होऊ शकते .
कुळवहिवाट हा वंशपरंपरागत हक्क आहे . प्रश्न आहे कि आपल्या चुलत्यांचे कुल म्हणून केव्ह्न नाव दाखल झाले आहे . जर नाव कृषक दिनानंतर झाले असेल तर कुळाचे नावे खरेदी , कुळहक्क निर्माण झाल्यापासून १ वर्षाचे आत , होणे आवश्यक आहे .
खरेदी किंमत निश्चित झाली नसल्यास , आपण कुळवहिवाट नष्ट करणेची नोटीस कलम १४ खाली द्या .

नमस्कार साहेब!
मौजे लाखलगाव ,ता.जी.नाशिक माझ्या चुलत भावाच्या एकर शेतीत ७/१२ इतर हक्कात साधे कुल म्हणून माझ्या आजोबा चे नाव आहे.आजोबा १९५०रोजी मयत झाले तसेच माझे वडील १९९४ ला मयत झाले.माझ्या कडे वडील व आजोबा चे मृत्यपत्र आहेत.तरीही आज रोजी वरस म्हणून माझे व माझ्या भावाचे नाावे इतर हक्कात लागतील का?मार्गदर्शन करावे.ध्यन्यवाद!

आजोबा मयत झाल्यावर वडिलांचे व वडील मयत झाल्यावर आपले नाव ७/१२ सादरी लावण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ?
आजोबा मयत होऊन ६७ वर्षे झाले आहेत . एवढा विलंब माफ कसा होईल ?
कुल म्हणून नाव वारस लावता येणार नाहीत

Sir me 0.86 R madhun 0.57R borwelsaha sheti kharedi kili tukadebandhi hote kaya mandal adhikari leval la maza fer parlambit ahe tynchya nusar tukadebandhi hot mantatt pls kaya karave mahnje fer hoil guide me

तुकडेबंदी कायदयाचा भंग होतो

तुकडीबंदी कायद्याचा भंग होत नाही
फेरफार प्रलंबित ठेवला आहे . आपण त्याबाबत तहसीलदार यांचेकडे दाद मागा

नमस्कार सर , माझ्या आजोबांना चार मुलं होती त्यांनी त्यांची जमीन त्यांचा चार मुलांना २००५ पूर्वी वाटून दिली.त्यातील एक माझे बाबा होते मी त्यांच्या मुलीचा मुलगा आहे तर त्या जमिनीवर माझा अधिकार आहे का ?

चार मुलांपैकी एक तुमचे बाबा म्हणजे वडील होते कि आजोबा ?
प्रश्न समजून येत नाही

सर नमस्कार
माझ्या शेजाऱ्याने 6इंच जागा सोडून बांधकाम केले
आहे. भिंतीवरून टॉयलेट आउटलेट ,विंडो माझ्या बाजूने सोडले आहे. त्यामुळे माझ्या प्लॉटची पूर्ण लांबी त्यामुळे कव्हर होते. मला कायदेशीर मदत घेता येईल का?

नाही
त्यामुळे तुमचा कोणता हक्क बाधित होत आहे

मु.पो .पळशी, ता.खंडाळा, जि.सातारा या गावामध्ये एक गट नं मध्ये विहीर अस्तित्वात नसताना ही विहीरीची नोंद ही साताबारा वर केलेली आहे. तशी तक्रार ही तहसिलदार कार्यालयामध्ये केली होती. पण त्यानी कोणतीच दखल घेतली नाही. तरी पुढील तक्रार कशी करावी.

उ वि अधिकारी / जिल्हाधिकारी कडे takrar karavi

नमस्कार आदरणीय सर
ग्रामपंचायत असेसमेंट ला आजोबांनी नातवाच्या नावावर घर केले पण पण भूमिअभिलेख च्या प्रॉपर्टी कार्ड ला आजोबाचेच नाव आहे आजोबा ला पाच मुलं आहेत ज्या नातवाच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे त्याचे आई वडील त्याच्या लहानपणी वारले आहेत. जर आता काकांनी काही आक्षेप घेतला तर त्याचे नावे घर होईल का ? आजोबा मयत आहेत आता आणि काका गैरफायदा घेऊ शकतात
तेव्हा ग्रामपंचायत चा ठराव घेऊन घर आजोबाने नातवाच्या नावावर केले आहे आणि आता प्रॉपर्टी कार्ड ला नाव लावण्यासाठी काय कराव लागेल ?

ग्राम पंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीत ठरावाद्वारे नातवाचे नाव लावण्यात आले आहे . ( घर आजोबांचे स्वकष्टार्जित असते ) आजोबांनी बक्षीस पत्र अथवा मृत्य पत्राद्वारे नातवाचे नावे घर केले असते , तर मिळकत पत्रिकेला ( भूमी अभिलेख खाते ) नाव लागले असते .
केवळ नातवाचे नाव लागणार नाही . नातवाचे इतर ४ चुलत्यासह नाव लागेल

सामाइकतील जमिनीचे खातेफोड करण्यासाठी सहहिसेदार तयार नसतील तर काय करावे?

दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ५४ प्रमाणे जमिनीतील आपला हिस्सा निश्चित करून , जमिनीचे हिस्स्याप्रमाणे वाटणी करून मिळणेसाठी दिवाणी दावा दाखल करा

नमस्कार साहेब, आमची जमीन कुल कायद्याची असून आम्ही तलाठी सजा आवलवटे भिवंडी येथे ३२एम दाखला फेरफार साठी दिला व तो प्रमाणित झाला तरी सुद्धा आता आमची नावे एका सात बारा व आठ अ वरून कमी केलेली आढळली व मूळ मालकाच्या वारसांची नावे सात बारा व आठ अ वर लावली आहेत. तर पुढे काय कार्यवाही करावी. आमच्याकडे पूर्वीचे ७/१२ असून त्यावर आमची नावे दाखल आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.

आपण प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा