[Ctrl+G for Marathi/English]

सेतू सूविधा केंद्रामधून ऑफलाईन निर्गमित केलेल्या सर्व प्रकारच्या नस्ती अभिलेख कक्षात अ ब क ड वर्गवारी प्रमाणे जमा करणेचे असल्याने सदर दाखल्यांच्या नस्तींचा जतन करावयाचा कालावधी,वर्गीकरण क्रमांक,,फेरीस्ा्त नमूना इत्यादी माहिती अधिकृत परिपत्रक/शासन निर्णयासह एकत्रित मिळणेस विनंती आहे.

कोकरे साहेब ,
असे Retention Schedule कार्यालय प्रमुखांनी तयार करावयाचे असून डायरेक्टर , पुराभिलेख संचानालया ची मान्यता घेण्याची आहे . आपले कार्यालयासाठी अशी सूची तयार करा .
Maharashtra Public Records Act २००५ - कृपया वाचा

माझी गावी एकूण पावणे चार एकर जमीन होती .पण माझ्या वडील आणि काका यांनी मिळून त्यानीं त्यातील काही जमीन मुखतीयार पत्रावर विकून टाकली . आणि काही जमीन अजूनही शिल्लक आहे .माझे वडील आणि काका दोघेही आता जिवंत नाहीत . तर मला जमीन किती शिल्लक राहिली आहे ते सात बारा वर कसे समजेल .
सात बारा मी काढलं आहे परंतु मला त्यात काही समजत नाही .तर तुम्ही मला सांगा की मी माझे श्रेत्र कसं काढू .
आणि ह्या बाबतीत मी कोणच सल्ला घेऊ .

७/१२ वाचा आपणास , क्षेत्र किती आहे ते कळेल . ७/१२ चा डावी बाजू पहा .

सर,,, नवीन अविभाज्य शर्त, भोगवटदार वर्ग २ जमिनी चा बक्शिस पत्र करणेची परवानगी विषयी माहिती द्यावी़

आपणास जिल्हाधिकरी / आयुक्त यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल
जमीन शेती प्रयोजसाठी दिली असेल तर , विक्री किंमतीच्या ५० % व जमीन बिबशेती प्रयोजनासाठी दिली असेल तर विक्री किंमतीच्या ७५% रक्कम अनार्जित उत्पन्न म्हणून शासनाकडे जमा करावे लागेल

माझ्या आजोबांनी त्यांच्या नावे असलेली जमीन ०.८१ आर जमीन मला स्वता च्या मरजीने २००रू च्या Bond वर मला वाटणीपत्रक करून दिले तर मी माझ्या नावावर शेती कशी करू शकतो. कृपया मला मार्गदर्शन करा.

आपण जे म्हणताय ते वाटप नसून , आजोबा आपणास बक्षीस म्हणून जमीन देत आहेत . मात्र सदर जमीन आजोबांची स्वकष्टार्जित आहे का ? असेल तरच ते आपल्याला बक्षीस पत्राने देऊ शकतील . मी,मात्र बक्षीस पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक .

सर एखादा कर्मचारी 7 ते 8 वर्षांपासून कार्यालयीन कामे खूपच हळूवारपणे करत आहे म्हणजे 1 पत्र टाईप करायला सांगितले तर 3 तास लावतो एवढ हळुवारपणे काम करतो मग सदर कर्मचारी यांच्यावर कामामध्ये वारंवार हलगर्जीपणा करीत आहे म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकता येते का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

त्याला टपाल स्वीकारायला बसवा .
काम सुधारणेची संधी द्या . सुरवातीस करणे दाखवा नोटीस काढा

महोदय श्री किरण पाणबुडे सर
१)आमच्या ताब्यात १९४६ पासून असलेली जमीन एक ७/१२ वर नाव असलेल्या व्यक्तीने विकली, विकत घेणार्यांचे नाव पण ७/१२ सादरी दाखल झाले ह्याबाबत कोणतीही नोटीस अली नाही ,
२)त्या इसमाने कधीच जमीन कसली नाही फेरफार मध्ये असा उल्लेख आहे कि ३२ग ने नावावर झाली, हा ३२ ग त्याच्या वडिलांनी केला होता आणि फेरफार वर खाडाखोड पण आहे दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांनी स्वतःचे नाव लिहिले. आणि हा इसम कधी जमीन कसत नव्हता १९४६ पासून आमचाच ताबा आहे चतुर्सिमा असलेले जमीन मालक आमच्या बाजून साक्ष देण्यास तयार आहेत.
३) त्याने असेच २००७ साली काही जमीन विकली आणि आता परत उरलेली जमीन विकली आणि २ वेग-वेगळया बिल्डरांच्या नवी दोन्ही जमिनी झाल्या.
४) आमच्या कडे जमिनीचा ताबा कायदेशीर रित्या विकत घेतल्याचा पुरावा आहे व जमीन नावे झाल्याचा फेरफार सुद्धा आहे, पण त्याने कोणाच्या तरी मदतीने ७/१२ सादरी असलेले आमचे फेरफार गायब केले पण एक ७/१२ वर तो फेरफार दाखवतो आहे .
५) आमच्याकडे त्याच्या वडिलांनी स्टॅम्प पेपर वर लिहून दिले होते कि हि जमीन तुम्हीच कसत आहेत, हा पुरावा आहे हक्काच्या पत्रकावर ते सर्वे नंबर पण आहेत.
6) सामनेवाले ह्यांनी विकलेली जमीन लगेच बिनशेती पण करून घेतली आहे तरी आम्हाला जमीन परत मिळणेसाठी काय करावे लगेच कोर्टात केस दाखल करणार आहोत
शक्य असेल तर मला आपणास पेपर दाखवावे असे वाटते , आपण आम्हाला कायदेशीर सल्ला द्यावा ,,हि जमीन माझ्या पंजोबांपासून आम्हीच कसतो खूप वाईट वाटले आहे सगळ्या घरच्यांना, आपण मार्गदर्शन करावे अशी आपणास नम्र विनंती,,.

जमीन १९४६ पासून तुमचे ताब्यात होती . त्याचवेळी अथवा नंतर, ती व्यक्ती कुल नसून आपण कुल आहेत व आपला कुल हक्क जाहीर करून मिल्ने बाबत मामलतदार यांचेकडे दावा दाखल करणे आवश्यक होते .
त्याचे वडिलांचे नावावर ३२ ग किंमत निश्चित झाल्यावर , आपण त्या विरुद्ध अपील हि दाखल करू शकला असता .
तुमचे नाव ७/१२ वरून कमी झाल्यावर , संबंधित फेरफार आपण आव्हानित करणे आवश्यक होते .
त्याने स्टॅम्प पेपर वर लिहून दिले कि ताबा तुमचा आहे मात्र त्यास काही उद्धार नाही . ३२ ग किंमत निश्चित होण्यापूर्वी अथवा त्या यानंतर आपण अपील दाखल करणे आवश्यक होते .
तो इसम कुल नाही हे जाहीर करून मिळण्यासाठी आपण दावा केला असता , तर त्या शपथ पत्राचा काही उपयोग झाला असता .
सध्या आपण , दिवाणी न्यायालयात , adverse possession ने मालक म्हणून जाहीर करून मिल्ने साठी दावा दाखल करणे संयुक्तिक . मी,यात्रा आपण म्हणता जमीन दोन बिल्डरला विकली आहे व त्यांचे नावे झाली आहे . मग जमीन तुमच्या ताब्यात कशी आहे ?

महोदय मी एक जमिन खरेदी केलेली अाहे नुकतीच खरेदी प्रक्रीया पुर्ण झालेली असुन तो दस्त नोंदणी साठी तलाठी कार्यालयाकडे दिला आहे परंतु जी जमिन खरेदी केली त्या जमिनीच्या७/१२ च्या् इतर हककात साधे कुळ ३(१) अशी नोंद आहे त्या मुळे भविष्यात अडचण येऊ शकते का कारण मी खरेदी जमिन मालका कडुन केलेली आहे कृपया मार्गदर्शन करा

जमीनखरेदीसाठी कुळाची सम्मती होती का ?
नसेल तर , पुढे अडचण होईल . कारण कुळाचे नवे ३२ ग किंमत निश्चित झाली कि , कुल मालक होणार . व आपले नाव ७/१२ वरून कमी होणार .

नमस्कार साहेब , आम्हाला आमच्या जमिनीचे तिघांमध्ये खातेफोडे करणे आहे तरीपण यासाठी शासकीय निमानुसार काय काय करावे लागेन व खातेफोडे करण्यास अंदाजे किती खर्च येईन .

आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ प्रमाणे वाटप दावा , तहसीलदार यांचे कडे दाखल करा .
या वाटपासाठी कोणतीही फी नाही . अर्ज समवेत जो कोर्ट फी स्टँमप लावावा लागेल तेवढाच खर्च अपेक्षित

आदरणीय सर , मृत्यूपत्रानुसार ग्रामसेवक घर नावावर करण्यास गेल्या आठ महिन्या पासून टाळाटाळ करीत आहे . तसेच काही उत्तर देखील देत नाही . त्याच प्रकारे मंडळ अधिकारी व तलाठी देखील जमीन नावावर करीत नाही. मृत्यूपत्र दिल्यानंतर घर व जमीन वर नांवे लावण्यास काय अडचण आहे याचे कारण सुद्धा सांगत नाही या बाबत कोणाकडे तक्रार करावी मार्गदर्शन करावे हि विनंती.

तलाठी / मंडळ अधिकारी यांचे बाबतीत , संबंधित तहसीलदार यांचेकडे तक्रार करू शकता
ग्रामसेवक बाबत आपण , गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करू शकता

बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.

ताबा रद्द होत नाही . ताबा काढून घेतला जातो . ताबा योग्य कायद्याची प्रक्रिया राबवूनच काढून घेतला जातो . ( by following due process of law )
आपण म्हणत आहेत त्या प्रमाणे मा आयुक्त यांचे आदेश , तहसीलदार मानणार नाहीत असे होणार नाही . आयुक्त यांचे आदेश काय आहेत हे नीट वाचून पहा . कायदेशीर सल्ला घ्या

गुंठेवारी कायद्यानुसार प्लॉटिंग करण्यात आलेल्या क्षेत्रात ओपन स्पेसची तरतूद आहे का? अशा प्लॉटिंगमध्ये ओपनस्पेस (सर्व प्लॉटधारकांच्या सोईसाठी खुला प्लॉट) ठेवली असेल आणि प्लॉटधारकांच्या खरेदी दस्तातील चतुःसीमेच्या वर्णनात खुला प्लॉट असा उल्लेख असेल तर असा ओपन स्पेस मूळ जागा मालकाला अन्य प्लॉटधारकांच्या परवानगीशिवाय विकता येईल का? गुंठेवारी प्लॉटिंगनुसार ठेवलेला ओपन स्पेस नगरपालिकेला हस्तांतरीत करणं अनिवार्य आहे का?

होय
गुंठेवारी कायद्यानुसार open space ठेवणे आवश्यक
अशी ओपन space विकता येत नाही
ओपन space नगर पालिकेस हस्तांतरित करणे आवश्यक

माझे वडील मयत झाले असून मी तलाठी साहेबांकडे ७/१२ वर नाव लागण्यासाठी वारस अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिले आहे वारस अर्ज व प्रतिज्ञापत्रात सहा नावे दिली आहेत मात्र तलाठी साहेबानी नोटीस सात नावाची काढली आहे आजोबांच्या मुत्यु नंतर यापूर्वीच काकांचे नाव लागले आहे .नोटीस मध्ये सातव्या नंबरला काकांचे नाव लिहिले आहे . तरीही नोटीस कायदेशीर आहे का बेकाययदेशीर ते सांगण्यात यावे .किंवा नोटीस दुरुस्त करून घ्यावी का ? तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करण्यात यावे ?

नोटीस कायदेशीर आहे
काकांचा आपली नावे वारस म्हणून नाव दाखल करण्यास हरकत आहे का ? हे तपासण्यासाठी नोटीस दिलेली आहे . आपणास त्याबाबत काही हरकत असण्याचे कारण नाही

सर मी 16 एकर जमिनीवरील खातेदार आहे. माझी शेतजमीन निरा-देवघर भोर प्रकल्प मध्ये संपादन झाली आहे. तरी मी पुनर्वसनासाठी पाञ आहे का

भू संपादन होताना , १९९९ चा पुनर्वसन कायदा जर लागू केला असेल तर , आपण पुनर्वसनासाठी पात्र आहेत .

महोदय कालवा भुसंपादनासाठी एका एकञित आणेवारीत असणार्या् गटापैकी २ एकर जमिन भुसंपादीत झाली आहे परंतु त्या् गटाच्या जमिन मालकाबरोबरच ईतर हककात संरक्षित कुळ असणारयानाही ४(१)नोटीस आहे तर आता भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळत असताना मोबदल्यासाठी मालकाबराबर कुळही पाञ आहे कींवा नाही याबाबत मार्गदर्शन करा या भुसंपादनाबाबत मालक एकापेक्षा भरपुर आहेत तेव्हा् मोबदलयावरून मतभेद होण्याची शक्यता आहे तसेच सर्व मालकांच्या मतभेदात कुळ वारसांना कशाप्रकारे न्याय मिळतो कींवा तसांचा या मोबदल्यावर कोनताही अधिकार आहे कींवा नाही याचे मार्गदर्शन करावे ही विनंती

अभिजितदादा
आपली शंका रास्त आहे
कुळांना भू संपादन मोबदल्यात हक्क आहे . उलटपक्षी कुळांचा हक्क स्वरूप यावरून नुकसान भरपाई दिली जाते
कुल कायद्या नुसार , ज्या मिळकतीस कुल असतो , तो कुल जर १.४.५७ रोजी अथवा त्यापूर्वी कुलअसेल तर , अशी व्यक्ती मिळकतीची मानीव कुल मानली जाते . केवळ ३२ ग किंमत निश्चित झाली नाही म्हणून , कुळाचे नाव भोगवटादार सादरी लावे जात नाही . अश्या वेळी , अश्या कुलास ८० % नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे .
तथापि नवीन भू संपादन नियमामध्ये , कुल मालक ६०: ४० प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश आहेत
मालक कुल वाटपाबाबत वाद असल्यास , रक्कम दिवाणू न्यायालयात जमा केली जाते व न्यायालय वाटपाबाबत निर्णय घेते

माननीय सर मला महाडचे घर मला माझ्या नावाने मिळाले आणि आता मला ते माझ्या व माझ्या पत्नीच्या नावे घ्यायचे आहे अजून म्हाडा कडून वाटप पत्र मिळाले नाही त्या साठी मला काय करावे लागेल .

आंतरजिल्‍हा बदलीने कर्मचारी रुजु झालेले आहेत त्‍यांनी दुय्यमसेवा व महसूल अर्हता परीक्षा बदली होण्‍याच्‍या आधी म्‍हणजे प्रथम नियुक्‍ती झालेल्‍या जिल्‍हामध्‍ये उत्‍तीर्ण केलेली होती, त्‍यांना पदोन्‍नती द्यावयाची असल्‍यास बदली झालेल्‍या जिल्‍हामध्‍ये किती वर्षाची सेवा पुर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना पदोन्‍नती देता येईल.

आदरणीय सर ,
माझ्या आजोबाने हयातीत असताना आपली स्वमिळकतीची जमीन आम्हा दोन नातवंडा ना अनोंदणीकृत मृत्युपत्र १०० रु.च्या स्टँम्प पेपरवर साक्षीदारा समोर मृत्युपत्र करून ठेवले आहे. मागील महिन्यात माझ्या आजोबाचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यामुळे सदर मृत्युपत्र घेऊन तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी साहेबांनी सदर मृत्युपत्र नोंदणीकृत नाही त्यामुळे फेरफार घेता येत नाही व सातबारा संगणीकरण झाल्यामुळे online e ferfar प्रणालीतून अनोंदणीकृत मृत्युपत्राचा फेरफार घेता येत नाही म्हणून सदर मृत्युपत्र अवैध आहे असे सांगून परत केला .
आदरणीय सर आपणास विनंती करतो कि वरील समस्येवर मार्गदर्शन करावे हि विनंती ....
आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्या !

तलाठी यांनी चुकीची माहिती दिली आहे
कायद्याने मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही
त्यामुळे e ferfar प्रणालीमध्ये नोंदणीकृत , मृत्यपत्राची आवश्यकता नाही

माझ्या वडिलांनी शाळा बांधकाम साठी 5आर जमिन बक्षिस करून दिली आहे.व शाळेचे पुर्ण बांधकाम 8आर जमिनीवर आहे.व शाळेच्या समोरून राज्य महामार्ग गेला असुन बक्षिसपत्रामधे किती अंतर सोडायचे हे लिहुन दिले नाही.व PWDचे कोनतेही नियम व अंतरेचा उल्लेख केलेला नाही.व शाळेचे बांधकाम रस्त्याच्या 30 फुट अंतर सोडुन आहे.व ते पुर्ण झाले आहे.तरी शाळेची 5आर जमिन कशी मोजुन द्यावी.व उर्वरित जागेवरिल अतिक्रमन कसे काडता येइल.व कोनाकडे दाद मागता येइल....कृपया मार्गदर्शन करावे.........माझा संर्पक yedagesagar@gmail.com मो.9561264162

शाळेने ८ गुंठ्यांवर बांधकाम पूर्ण केले आहे . त्यामुळे आता , कुठे अतिक्रमण काढत बसता
राज्य महामार्गापासून ठराविक अंतराच्या आत बांधकाम करता येत नाही. त्यास नियंत्रण रेषा असे संबोदतात
५ गुठ्यांपेक्षा जादा क्षेत्रावर असलेले बांधकाम काढायचे असल्यास आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल

सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .

१९६२ च्या कमी जास्त पत्रकाने क्षेत्र कमी दाखवले आहे . त्यामुळे आपल्या क्षेत्रात तफावत येत आहे
आपण कमी जास्त पत्रक तयार झाले त्यावेळी अपील दाखल करणे आवश्यक होते .
आता आपण कमी जास्त पत्रक आव्हानात करा ( अधीक्षक भूमी अभिलेख ) . मात्र विलंब खूप झाला असल्याने , मुदतीच्या कायद्याच्या बाधा येऊ शकते

सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .

नमस्कार सर , माझी १ विनंती आहे मला योगय मार्ग सांगाल . माझा व २ बहिणीने दिवाणी नायालयात जमिनीतील सर्व हक माझा नावे सोडून दिला आहे त्याची रक्कम मी कोर्टातच भरली आहे व हुकूमनामा झाला आहे 2 बहिणीनेही सर्व हक्क माझा नावे सोडून दिला आहे दिवाणी नायालयातच. पण ७/१२ वर नोंद करून घायचे राहहून गेले.फुडें मी तो हुकूमनामा मुद्रांक शुल्क (दंड ) भरून तहसिलकर्यलातून आदेश वरून ७/१२ माझे नावे झाला .पण त्या आधी २ बहिणींनी ती जमीन गावातील एका ला विकून दस्त नोंदींसंधीसाठी तलाठी यांच्याकडे आला पण तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तो अर्ज फेटाळ ला त्यावर त्यांनी प्रांत यांच्याकडे अपील करून माझे नाव कमी करून दस्त वर आलेला व्क्तीचे नवा ७/१२ ला लावा असा आदेश दिला व माझे नवा ७/१२ वरून कमी करण्यात आले आहे तर मी त्या विरोधात मी दिवाणी न्यालयात दावा दाखल केला आहे. तो दस्त मला मान्य नाही व तो दस्त कॅन्सल करावा .मला तो दस्त चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल
? माझे नावे ती जमीन पुन्हा होईल का ?कृपया मार्गदर्शन करा ?

दिवाणी न्यायालयात तुमची तडजोड होऊन तुमच्या बहिणींनी मिळकतीतील त्यांचा हक्क सोडला आहे . त्या प्रमाणे तुम्ही जमिनीचा मोबदला हि न्यायालयात जमा केला आहे . हे सर्व अभिलेखाच तुमचा पुरावा आहे तो तुम्ही बहिणींनी जमीन विकली तो दस्त रद्द करण्यासाठी पुरेसा आहे .

साहेब नमस्कार
माघील प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे
साहेब माझा दुसरा प्रश्न आहे की
एका अशिक्षित ७२ वर्ष्याच्या स्त्री ला निराधार योजनेची पेन्शन चालू करतो म्हणून मृतुपत्र फसवणूक करून रजिस्टर करून केले आहे, आणि मृतुपत्राला मेडिकल फिजिकल फिट दाखला नाही ,आणि साक्षीदार म्हणून २ व्यक्ती आहेत,परंतु मृतुपत्रावर ज्या साक्षीदारांचा पत्ता व नाव आहे त्या गावा मध्ये आम्ही सरपंच व गावातील लोक यांच्याकडे चौकशी केली असता ते साक्षीदार आमाच्या गावामध्ये रहिवाशी नाहीत असे सांगण्यात आले, व मृतुपत्राला साक्षीदार यांची ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत,जमीन आम्हीच वहिवाट करीत आहे,परंतु ज्याने मृतुपत्र करुन घेतले आहे ,तो व्यक्ती ७/१२ व नाव लावण्यासाठी धडपड करत आहे ,आम्हाला काय करावे लागेल ,कृपया माहिती द्यावी हि विनंती

त्या अशिक्षित महिलेने जर तिची फसवणूक झाली आहे असे तिला वाटत असेल तर तिने त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे

नमस्कार सर,
सन 2000 मध्ये शासकीय गुरचरण जमिनीची मागणी माझे वैयक्तिक वापरासाठी जिल्हाधिकारी साहेबाकडे केलेली होती. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे (7/12 ,फेरफार,गटबुक नकाशा ,ग्रामपंचयत ना हरकत दाखला, इत्यदी )जमा केलेली आहेत.आजरोजीपर्यंत या संदर्भातील माझ्या मागणीला उत्तर देण्यात आले नाही. तसेच सदरील जमिनीची ग्रामपंचयत माध्यमातून “विस्तारित गावठाण योजना” होण्यासाठी मागणी केली होती. तरी
प्रश्न 1) शासकीय गुरचरण जमिनीची मागणी केली असता प्रकरण किती दिवसामध्ये निकाली निघणे अपेक्षीत आहे ?
प्रश्न 2) या प्रकरणामध्ये मला आज रोजी ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
यासंदर्भातील माहिती मिळावी ही विनंती.

गुरुचरण जागा , वैक्तिक कारणासाठी शासनाकडून दिली जात नाही

माननिय मोहदय,

माझी ३७ गुंठे सध्या "जिरायत" शेत जमीन आहे. पुढे मला त्या जमिनी मध्ये कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करून विविध प्रकारची फळ झाडे व फुल शेती करायची आहे. तर माझे असे प्रश्न आहेत :

१) शेत जमिनीचे ''जिरायत " असलेले क्षेत्र हे ''बागायत" मध्ये बदलता येते का?

२) तसे करण्यासाठी अधिकार कोणाला आहेत व त्याची काय कार्य पद्धत आहे.? व

३) पुढे ती शेती कायम स्वरूपी "बागायत" म्हणूनच राहील का?

रोहिदास हरिभाऊ काळे

७/१२ च्या , नमुना १२ मध्ये , घेण्यात आलेल्या पिंकाचा तपशील नमूद असतो . घेण्यात आलेल्या पिकाप्रमाणे व सिंचन तपशिलाप्रमाणे जमीन जिरायत आहे कि बागायत आहे हे निश्चित करण्यात येते
जिरायत जागेस १२ महिने शाश्वत पाणी पुरवठा असेल व ऊस , फळ पिके घेतली तर ती जमीन , बागायत समजण्यात येते
असे रूपांतर करणेसाठी कोणाची परवानगी लागत नाही
आपण जर कायम पाणी पुरवठा ठेवला व फुल शेती केली तर ती जमीन , बागायतच राहील मात्र आपण पाणी पुरवठा खंडित केला तर निश्चितच , फुल शेती येणार नाही . आपणाला पीक दुसरे , म्हणजे कमी पाण्यावर येणारे घ्यावे लागेल .
जमिनीचा प्रकार म्हणजे , बागायत , जिरायत , हि कश्या प्रकारे ठेवायची हे आपल्यावर अवलंबून आहे

मा. किरण पाणबुडे सर

माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1922 मध्ये झाला आहे.
माझे पणजोबा यांचे मित्र बापु खामगळ यांना मुले बाळे नसल्यामुळे माझ्या आजोबांना माझ्या पणजोबांनी त्यांना दिले व त्यांनी त्यांचे नाव संभु असे ठेवले.
त्यांच्यात दत्तक पत्र वगैरे काही झाले नाही.
पुढे बापु खामगळ हे मयत झाल्याने त्यांच्या नावावरील ५ एकर जमीन ही संभु बापु खामगळ यांचे नावे म्हणजे माझ्या आजोबांच्या नावे लागली गेली.
नंतर पुन्हा माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांच्या घरी आणले व पुढे ते शिवराम तात्या शिर्के याच नावाने आजपर्यंत आहेत.
आज माझ्या आजोबांचे वय 95 च्या दरम्यान आहे आणि त्यांनी मला ही सर्व माहिती दिली आहे.
मी सन 1900 पासूनचे सर्व अभिलेख तहसील कार्यालयात स्वतः RTI खाली तपासले आहेत.
त्यामध्ये मला असे आढळून आले की, माझ्या आजोबांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही.
आजोबांचे दत्तक वडील बापु खामगळ यांची मृत्यूची नोंद उपलब्ध नाही.
फक्त सन 1930 पासून संभु बापु खामगळ यांचे नावाचा ७-१२ उतारा आजपर्यंतचा निघत आहे. त्यावरती जमीन कसणाराचे नाव संभु असेच आजपर्यंत निघत आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र माझ्या आजोबांनी ती जमीन कधीच वहिवाटली नाही.
ती जमीन अनेक वर्षांपासून पडीत जमीन आहे.
माझे वडील आणि चुलते यांना आजोबांनी कधीच माहिती दिलेली नव्हती, आणि आज त्यांनी मला हे सर्व सांगितले आहे.

तरी मला आपणाकडून अशी माहिती हवी आहे की,
वरील दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल.
ती जमीन माझे आजोबांचे नावे होण्यासाठी मला काय करावे लागेल.

आपण मला सल्ला द्यावा अशी विनंती मी आपणाकडे करत आहे.

सिद्ध करण्याची काय गरज आहे . आपण ज्या जमिनीचा उल्लेख करत आहेत , ती जमीन सध्या कोणाच्या ताब्यात आहे ?
ती जमिनीस सध्या कोणाचे नाव आहे ?
जर त्या जमिनीस आता दुसऱ्याचे नाव असेल व त्रयस्त व्यक्ती जमीन कस्त असेल तर , आता काही करता येणार नाही , म्हणजे आपण जरी हे सिद्ध केले कि शंभू शिर्के व संभू खंगत ह्या एकाच व्यक्ती आहेत तरी सुद्धा , आपणास जमीन परत मिलणार नाही .

अंतरविभागिय बदली झालेल्या ना पुर्वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्यास पून्हा परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नसल्याबाबतीत चे पत्र अथवा GR असेल तर क्रुपया पोस्ट करावा

Madhav ipper talathi pauni dist. bhandara

नमस्कार सर, माझ्या वडिलांच्या नावे वारसाहक्काची १ एकर शेतजमीन होती ती शेतजमीन २००१ साली गावातीलच एका व्यक्तीने माझ्या वडिलांची फसवणूक करून विकत घेतली आहे. मी OBC कुटुंबातला आहे जमीन विकताना मी व माझी भावंडे लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काहीही समज नव्हती, हि शेतजमीन माझ्या वडिलांनी विकल्यामुळे आम्ही भूमिहीन झालो आहोत. अशा प्रकारे कुणाला भूमिहीन करता येते का व या बाबत मी कुठे न्याय मागू शकतो का. कृपया माहिती मिळावी हि विनंती

वडिलांनी जमीन विकली २००१ मध्ये . या घटनेला १७ वर्षे झाले त्यामुळे फसवणूक करून जमीन खरेदी केली आहे , या कारणासाठी फौजदारी तक्रार न्यायायलायात दाखल करून , विक्री दस्त रद्द करून मागा

१) ग्रामपंचायत मिळकतीच्या चतु:सीमेच्या एका दिशेस गावकोस आहे व त्या मिळकतीवर जर बांधकाम करावयाचे असेल तर गावकोसापासून किती अंतर सोडून बांधकाम करणे कायद्याने बंधनकारक आहे, गावकोस पाडण्याचा किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करण्याचा अधिकार संबंधीत व्यक्तीला आहे का ?,गावकोस पाडून किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करणे जर बेकायदेशीर असेल व संबंधीत व्यक्ती जर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम करत असेल तर असे अनधिकृत/बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ,त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते. अशा प्रकारे झालेल्या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी होते का
२) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रम केलेले असेल व त्या अतिक्रमणामुळे जर इतर मिळकतीस जाणे-येणेचा रस्ता पुर्ण पणे बंद होत असेल तर ते अतिक्रम काढण्याचे/हटविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ? जर संबंधीत व्यक्ती केलेले अतिक्रम काढत नसेल व त्या जागेवर ती व्यक्ती स्वतःचा अधिकार दाखवत असेल तर त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते.
३) ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव ग्रामसेवकाने किती दिवसाच्या आत Proceedings Register ला नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव क्रमांक बदलण्याचे अधिकार ग्रामसेवकाला / सरपंचाला असतात का. जर असे बदल करणे, Proceedings Register वेळेवर न नोंदविणे चुकीचे असेल तर त्या वर कोणती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
४) ग्रामपंचायत मिळकती संदर्भात मिळकतीच्या मालकाने तालुका न्यायालयात दावा दाखल केला होता व निर्णय मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला , नंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल केला होता त्या व्यक्तीने जिल्हा न्यालयात दावा दाखल केला होता, जिल्हा न्यायालयाचा निर्णय हि मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला आहे तर ग्रामपंचायतीत ठराव नोंदविताना कोणत्या न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला जातो व ग्रामपंचायत ठरावामध्ये कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानुसार व निर्णय क्रमांक नुसार नोंद करणे अपेक्षित आहे .
५) ग्रामपंचायत गावठाणातील बखळजागा एका व्यक्तीने खरेदी केली आहे व ती जागा खरेदी करताना खरेदीखतात मोज मापाची जी नोंद आहे ती खरेदीखतानुसार ग्रामपंचायत दप्तरी नोंदविली आहे परंतु ग्रामपंचायतीचे जुने सर्व रेकॉर्ड तपासले असता त्यात मोजमापाची कुठलीही नोंद आढळून येत नाही. त्या चुकीच्या मोजमापामुळे इतर मिळकतीस जाण्या-येण्याचा वहिवाटी रस्ता बंद होत आहे. या बाबत कोणती व कोणाकडून कार्यवाही करता येईल .
वरील गोष्टींची माहिती मिळावी हि नम्र विनंती .

नमस्कार सर माझ्या आजी ने आपल्या जमा केलेल्या पैशातून माझ्या नावे 10 एकर जमीन खरेदी केली.आजी च्या अशिक्षितपणामुळे तिला माझे योग्य वय ठाउक नव्हते व वयाला 18 वर्ष पूर्ण होण्यास १वर्ष ८ महिने बाकी असताना सदर जमिन खरेदी खत व रजिस्टर्ड दस्तवेजाने माझ्या नावावर झाली.या गोष्टीला २५ वर्ष झाली. आता माझ्या लगतच्या जमिन मालकाशी जमिनीच्या क्षेत्रावरुन कोर्ट केस चालू आहे तरी सज्ञान नसताना जमिन खरेदी केली या गोष्टीचा कोर्ट केसच्या निकालावर काही परिणाम होईल का?

ज्यावेळी मिळकत आपले नाव मिळकतीस दाखल झाले त्यावेळी आजीचे नाव नाव अज्ञान पालन करता ( अ.पा.क) म्हणून दाखल करण्यात आले होते का ?
भारतीय करार कायद्यानुसार , अज्ञान हा करार करण्यास सक्षम नाही . त्यामुळे असा करार अवैध आहे . खरेदी खात हे विक्रेता व खरेदी घेणार यांचे मधील करार आहे .
खरेदी खतावर आजीचे नावाचा उलेख आहे ? आजीने तिची विक्री रक्कम त्यावेळीस दिली होती, असा काही पुरावा आहे का ? आजीने धनादेशाद्वारे रक्कम दिली असल्यास अडचण येण्याचे काही कारण नाही . तसेच रोखीने रक्कम दिली असल्यास , पावती असेल तरीही अडचण येण्याचे काही कारण नाही . न्यायायलायत सिद्ध करावे लागेल , जमिनीस जरी तुमचे नाव लागले असले तरी , रक्कम आजीने दिली आहे आजीने अज्ञान नातवाकरता जमीन घेतली आहे .
या घटनेस २५ वर्षे झाली आहेत , मुदतीच्या कायद्याच्या हि उपयोग करून घेता येईल

श्री. किरण पानबुडे साहेब,

साहेब आपणास वयक्तिक भेटून सदर संपादित जमिनी बाबत सर्व फेरफार, कागद, उतारे, नकाशा व अहवाल पाहून आपण मार्गदर्शन करण्यास वेळ देऊ शकत असल्यास कृपया कळवावे.

आपण आपल्या कामाच्या व्यापातून हि सेवा करत आहात त्याबद्दल आपले नम्र आभार.

रोहिदास काळे
+९१-७६६६६८४६८५

होय
आपण भेटू शकता

सर ,

सध्या online ७/१२ उतारा मिळतो (काही app) आहे . माझा प्रश्न आसा होता कि जेव्हा मी या app मध्ये माझ्या आजोबांचे नाव सर्च करतो तर ते शिवा सहादु यादव . असे येते कि मुळात सातबारावर शिवराम सहादु असे नाव आहे तर हे असे असल्यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही का . आणि जर ऑनलाईन ७/१२ ची दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते.


धन्यवाद ,

संदीप यादव

हे नाव दुरुस्त करता येईल . आपले तलाठी यांचेकडे संपर्क साधा .
ज्या गावात जमीन आहे , ते गावाचे ३ नम्बरचे declaration झाले नसेल तर , re edit या utilitychya माध्यमातून दुरुस्ती करता येते .

जर मूळ जागा मालकाने एका व्यक्तीशी रजिस्टर साठेखत सम्पूर्ण जागेचा(५५ गुंठे ) करार केला आहे .आणि त्या साठेखत कराराच्या आधारे त्याने दुसऱ्यास नोटरी करारच्या आधारे त्यातील काही जागा (२ गुंठे ) विकली आहे परंतु साठेखत धारक मालकाने त्याचे साठेखत रद्द करून संपूर्ण जागा (५५ गुंठे ) मूळ मालक व तिसरा यांच्यात व्यवहार घडवून नोटरी करार धारकाची २ गुंठे जागा कब्जा करून फसवणूक केली आहे तर नोटरी धारकास जागेचा ताबा मिळू शकतो का ?

साठे खताचे आधारे , मालकी प्राप्त होत नाही अथवा मालकी हस्तांतरण होत नाही .त्यामुळे वरील प्रश्नातील , २ गुंठे जागा खरेदी करणाऱ्यास , कोणतीही मालकी प्राप्त झालेली नाही .
साठे खत जर नोंदणीकृत असेल तर , ते नोंदणीकृत दस्ताद्वारेच व दोघांचे संमतीनेच रद्द करता येऊ शकते . एकतर्फी साठेखत रद्द करता येत नाही .
नोटरीधारक ज्याच्याकडून त्याने जमीन घेतली आहे त्या विरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो मात्र त्यातून त्यास २ गुंठे जाडा मिळणार नाही मात्र खरेदी पोटी दिलेली रक्कम मिळू शकते

शेतजमीन मोजणी करत असताना लगतचे शेतकरी अडथळा आणत असतील तर मोजणी कशी पूर्ण करता येईल?अतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईल? मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

शेतकरी मोजणीस अडथळा आणत असतील तर , आपले मागणीप्रमाणे , पोलीस सौरक्षण मिळू शकेल . अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाल्यास आपण , The Speccific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता

महोदय,
माझ्या गावामधे पाटबंधारे विभागाच्या् कालव्याच्या भुसंंपादनाचं काम २००८ साली पुर्ण होऊन कालवा खुदाईचं काम २०१२ ला पुर्ण झाले व प्रत्यक्ष कालव्यात पाणी २०१४ साली आले.दरवर्षी पाणी आवर्तनावेळी मा.जिल्हाधिकारी कालवा परीसरात कलम १४४ लागु करतात याचा अर्थ कालव्याचा मालकी शासनाकडे आहे हे सिद्ध होते.माञ काही तांञिक अडचणींमुळे भुसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत झाले असल्यामुळे नुकसान भरपाई प्रलंबित आहे.परंतु आता मा.जिल्हाधिकारी यांनी नवीन भुसंपादन कायद्यान्वये वैयक्तिक वाटाघाटीतुन भुसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार कलम ११ ची अधिसुचना नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.त्यामुळे भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सदरच्या रकमेवर पुर्वलक्षी प्रभावाने भुमी संपादन २०१३ कलम ८०नुसार सण २०१२ ते २०१८ पर्यंत सदर मोबदला व्याजासहित मागु शकतो का किंवा मी त्यास पाञ आहे का? याबाबत संविस्तर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती....

कलम ८० खाली जाहीर निवाडा रकमेचेया प्रथम वर्षासाठी ९ % तर पुढी वर्षासाठी १५ % दराने व्याज देण्याची तरतूद आहे . वरील प्रश्नात , निवाडा व्यपगत झालेला आहे . व कलम २४(२) अन्वये राज्य शासनाने , नव्याने भू संपादनाची प्रक्रिया सुरु केलेली आहे . त्यामुळे कलम ८० खाली व्याज मिळणार नाही .
कलम ८१ खाली तात्पूत्या कालावधीसाठी जमीन ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला अधिकार आहे . मात्र सदर जमीन केवळ ३ वर्ष कालावधीसाठी घेता येते . कलम ८१ खाली या प्रकरणाचा विचार केला जाऊ शकतो किंवा सानुग्रह अनुदान देणे हा एक पर्याय असू शकतो .

नमस्कार सर
मि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर
सर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर
तारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार
मध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय
तहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्याएकनाथजी
१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.
२. जर फेरफारही मिळत नसेल
अ. जमीन सध्या कोण कसत आहे ?
ब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का
३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .

आदरणीय,
श्री. किरण पानबुडे साहेब,

कृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.

रोहिदास हरिभाऊ काळे

नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी


होय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,
ग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,
पण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे
ग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,
मी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,

सर प्लीज मदत,मार्गदर्शन करा

थोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .
या बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही
जमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .

आदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व मी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.

सर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी

या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
त्यात पुढील बाब समाविष्ट करत आहे
१. ८ अ ला केव्हापासून नाव लागले आहे ?
२. १२ वर्षाहून अधिक काळ नाव लागले असेल त्या बहिणीनं विरद्ध , adverse possession चा दावा दाखल करू शकता
३. जेवढे क्षेत्र विकणाराचे हिस्स्यात येईल , तेवढ्या क्षेत्रास , मिळकत पॅट्रिक्स आपले नाव दाखल होऊ शकते

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी

आपण जो ८ अ चा उतारा म्हणत आहे तो कोणता ? ग्रामपंचायती चा घर पट्टी उतारा आपल्याला म्हणायचे आहे का ?
गावठाणाचा सर्वे झाला असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक .
मात्र घर पट्टी रजिस्टरला ला आपले वडिलांचे नाव कसे लागले कारण आपले म्हणण्यानुसार जागा , विकत देणाऱ्याच्या वडिलांची आहे .

सर नमस्कार ,
१) आमची वर्ग २ ची जमीन आहे आम्हाला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे ,परंतु भूमी लेखा ऑफिस मध्ये फाळणी उपलब्ध होत नाही,
२) फाळणी नसताना आमचे शेत्र बरोबर निघेल का ?
3) व मोजणी कश्या प्रकारे करतील ?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती

नोंदणीकृत साठे कराराची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेता येते का?
जर घेता येत असेल तर कोणत्या कायद्याने किंवा शासन निर्णयानुसार घेता येते.

नोंद घेता येत नाही

आदरणीय मोहदय,

गावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन
आम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.

सध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.

माझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.

माझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.

कृपया पर्याय सांगावे हि विनंती.

बक्षीस पत्र करा अथवा वाटप पत्र करा

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.

जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.

१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात

२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे

आदरणीय सर,
एखाद्या व्यक्तीस धरणग्रस्त/प्रकल्पग्रस्त असल्याने पुनर्वसनात जमीन मिळाली असल्यास तिची विक्री करणेकामी शासकीय परवानगीची आवश्यकता असते का?किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..

आपली संपादित झालेली जमीन वर्ग २ ची असल्यास , आपणास शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीचा धारणा प्रकार हा वर्ग २ असतो व पर्यायाने आपणास विक्री परवानगी आवश्यक असते . मात्र जर आपली संपादित जमीन वर्ग २ ची नसल्यास , परवानगीची गरज नाही .( पुनर्वसन कायदा १९९९)
मात्र काही प्रकरणात जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत जमीन प्रदान करण्यात आलेली आहे ( ज्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता - कोयना प्रकल्प ग्रस्त अथवा पुनर्वसन कायदा लागू केला नाही ) त्या अंतर्गत , जमीन वाटप झाल्यापासून १० वर्षापर्यंत , हस्तांतरण न करणे बाबत अट आहे . १० वर्षानंतर , जमिनीचा धारणाधिकार वर्ग २ जाऊन , जमीन वर्ग १ होते

नमस्कार सर
माझ्या वडिलांचा लांबचा चुलत भाउ यांनी त्यांचा लाबचा नात्यातील व्यक्तींकडून जमीन विकत घेतली होती १९९० साली परंतु शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे
तसेच मग त्यांचाकडून माझ्या वडिलांनी तीचापैकी काही भाग विकत घेतला १९९२ साली तो पण शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे
आणि वरील दोघेही अडाणी आहेत व जमीन ही नवीन शर्तीची आहे व त्या वेळेस वर्दी वरून नोंदी व्हायचा तर जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांचा वर्दीवर सह्या देखील आहेत
आता २०११ पासून मूळ मालक यांनी जमिनीची नोंद चुकीची आहे ती रद्द व्हावी म्हणून खटला चालवलेला आहे त्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी मूळ मालक यांचा बाजूने निकाल दिलेला आहे
सदर बाबतीत आता उच्च न्यायालय येथे खटला चालू आहे सदर बाबतीत आम्ही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे
मूळ मालका कडून ज्यांनी जमीन घेतली ते आता मयत आहेत व त्यांचा कडून माझ्या वडिलांनी घेतली होती
जर का नोंद बोगस होती तर मूळ मालक यांनी 20 वर्ष का नोंद रद्द करणेस सांगितले नाही

धन्यवाद

अडाणी पण हे कारण होऊ शकत नाही .जमीनखर्डेची करून किती दिवस झाले आहेत ?