आदरणीय महोदय,
प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:
१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).
२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)
३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)
४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.
५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).
७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.
६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.
८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.
जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात
२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे