[Ctrl+G for Marathi/English]

सर माझा प्रश्न असा आहे की, नवीन प्लॉट वर घराचे बांधकाम करावयाचे असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.

सर नमस्कार,
सर जर एखाद्या शेत NAP 34 नुसार मंजूर (अभिण्यासानुसार)लेआऊटअकृषक झालेले असेल व त्यातील प्लॉट विक्री झालेले असतील अश्या परिस्तिथीत 5 आर,जमीनीचा 45 वर्षे आधीचा रजिस्टर्ड मोबदला लेख दाखवून तहसीलदार यांचे आदेशाने सदर अभिण्यासाप्रमाणे मंजूर झालेले लेआऊट रद्द करून दावा दाखल केलेल्या व्यक्ती च्या नावावर 5 आर जमिनीचा 7/12तयार होऊ शकतो काय?
आमचे संस्थेने 2008 मध्ये रजिस्टर्ड खताने सर्व्हे नं9/4 मधील लेआऊट मधील अकृषक झालेला प्लॉट विकत घेतलेला आहे. त्यावेळच्या परिस्थिती नुसार आमच्या प्लॉट समोरील भागात लेआऊट मधील12 मीटर रुंदीचा रास्ता होता व त्या रस्त्याला अप्रोच सर्व्हे नंबर 9/5 चा12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड होता.
परंतु क्ष व्यक्तीने 1968 सालचा मोबदला लेख मा तहसीलदार यांचे कडे 2010 मध्ये दाखल करून सदर सर्व्हे नंबर9/5 वरील 5 आर जमिनीवर आपला हक्क दाखविला तत्कालीन मा.तहसीलदार यांनी सदर सर्व्हे नंबर 9/5 वरील मंजूर अभिण्यासाप्रमाणे झालेले लेआऊट रद्द करून पुन्हा सर्व्हे नंबर 9/5 चा कृषक 7/12 तय्यार केला व त्या सर्व्हे नंबर मधील 5आर जमिनीचा वेगळा करून क्ष व्यक्तीचा नावावर केला आहे आमचे संस्थेने मा विभागीय अधिकारी यांचे कडे सदर प्रकरणाची माहिती घेतल्यावर त्यांनी आम्हास सदर 5 आर जमिनीचा वेगळा 7/12 असल्यामुळे आमची अपील फेटाळून लावली आहे.
आमचे संस्थेने 2008 मध्ये घेतलेला प्लॉट हा सदर 12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रास्ता पाहूनच घातलेला आहे परंतु आता त्या 5 आर जमिनीची सदर क्ष व्यक्तीच्या वारसांनी विक्री केली व विकत घेणारे लोक तिथे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सदर 5 आर क्षेत्रावर अवैध बांधकाम सुरू केलेले आहे.
सदर बांधकामाची तक्रार नगरपालिका, तहसील येथे करून सुद्धा 5 आर जमीन खरेदी करणारे लोक बांधकाम सुरूच ठेवलेले आहे.
आम्हास कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.

नमस्कार सर
माझे आजोबांचे नावे देवस्थान इनामअसलेली जमीन आजोबांचे मृत्यू नंतर ती जमिनीवर वडील आणि आत्या यांचे वारस नावे नोंद झाली व त्याची नावे नोंद झाली. पूढे मा. दिवाणी न्यायालयात 2008 साली वडीलांच्या विरोधात दावा दाखल करून सरस निरस मनाने 2008 साली ती जमिनीवर माझे नाव नोंद झाले 7/12 ला पण माझी नोंद झाली.
पण 2018 रोजी मा. उपविभागीय अधिकारी यांनी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्. डी. ई.व्ही.2010/प्. क्र. 9/ल.-4 दि.30/07/2010 च्या देवस्थान ईनाम अध्यादेश नुसार माझे नाव कमी करण्याची स.न 06/2016 रोजी नोटीस काढली. व म्हणणे मांडण्याची नोटीस काढली पण माझे कडे योग्य ती कागदपत्रे नसल्याने मी माझे म्हणणे मांडू शकलो नाही .त्यामूळे मा उपविभागीय अधिकारी यांनी 12/2016 रोजी नोटीस काढून माझे 7/12 वरील नाव कमी केले.व फक्त विठ्ठलदेव वहीवाटदार यांचे नाव कायम ठेवले.
काही दिवसांनी परत नाव नोंद होईल म्हणून थांबलो. नंतर मग 08/2018 रोजी मा.तहसीलदार यांना नाव परत नोंद व्हावे असा विनंती अजॅ केला. त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी म्हणणे मांडण्याची नोटीस काढली परंतु पुन्हा दूदैवाने ती नोटीस माझेपयॅत उशिरा पोचली आणि मी माझे म्हणणे मांडू शकलो नाही.
सर आजोबांचे नावे असणारी जमीन माझे रक्ताच्या नातेसंबंधात आहे.त्यामूळे देवस्थान नियम लागू होत नाही.
सर मी पूढे काय करू याबाबत मार्ग दर्शन व्हावे ही विनंती तसेच मी पुन्हा मा तहसीलदार कार्यालयात फेरविचार करण्याचा विनंती अजॅ करू शकतो का यासंदर्भात योग्य मार्ग दर्शन व्हावे ही विनंती
आपला विश्वासू
दिपक धोंडीराम यादव.

आदरणीय किरण सर , मी आपणास खलील प्रश्न विचारला होता.
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.

त्याचे आपण दिलेले उत्तर -
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता.

त्याला अनुसरून च एक प्रश्न -
आपल्या माहिती नुसार मी काही वकीलाशी बोललो ,त्याचे मते limitation act नुसार आपली दावा करण्याची मुदत संपली आहे तर खरच limitation act नुसार आमचा दावा करण्याची मुदत संपली आहे.??? मार्गदर्शन करावे.

वडिलोपाजीत जमिनीवार सह हिस्से दार म्हणून अर्ज केला आहे पन हिंतसंबताने हरकत घेतली आहे पन 4 महिने झाले मंडळधिकारी सुनावणी चालु आहे पन पन अजु निकाल लावला नाहि आहे काय कराव लागेला ok

आम्ही 50 वर्षापासून एका खाजगी मालकीच्या जागेत जवळपास 3 कुटुंबे कुडा ची घरे बांधून राहत आहोत. आमच्यात आणि जागा मालका मधे कोणतीही जागेसंदर्भात लिखापटि झालेली नाही. पूर्वीच्या काळी बहुतांश लोक करार करित नव्हती तोंडी राहण्यास परवानगी देत असत ही वस्तूस्थिति आपणास देखील माहित आहे. संबंधित राहत असलेले सर्व पुरावे आमच्याकडे आहेत जसे की स्वतःच्या नावाची लाईट बिल, रेशन कार्ड ,आधार कार्ड ग्रामपंचायतीने निर्गमित केलेले रहिवासी दाखले, जातीचे दाखले,जात पडताळणी दाखले,इलेक्शन कार्ड व इतर असे अनेक पुरावे आमच्याकडे रहिवासी असल्याबद्दलचे आहेत. त्याचप्रमाणे आमच्यापैकी 1 कुटुंबाला घरकुल देखील त्या जागेत आलेले आहे. आमच्या घरपट्टया सन 2003 मध्ये ग्रामपंचायत ने लावल्या होत्या आणि त्या जागा मालकाच्या हरकती मुळे सन 2009 मध्ये रद्द करण्यात आल्या होत्या तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सदरच्या घरपट्टी पूर्ववत करणे बाबत पाठपुरावा ग्रामपंचायतीकडे करीत आहोत. तसेच जागा मालकाने ग्रामपंचायत ला पत्र देऊन असे सांगितले आहे की आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे व सदरची घरे निष्कासीत करावी. दरम्यान ग्रामपंचयत ने शासन परिपत्रक क्रमांकः पंरास 2016/प्र.क्र.17/पंरा-4, 18 जुलै, 2016 मात्र अन्वये मासिक सभा दि.30.6.18 मध्ये आमच्या अनधिकृत घर पट्टी अकारनी केली. मात्र ग्रामपंचायत, ग्रामसेवक व जागामालक यांनी एकत्रित मिळून आमच्या विरोधात जाणूनबूजून कटकारस्तान करून कायद्याचे उल्लंघन करून आमच्या घरपट्ट्या पूर्ववत करण्याऐवजी त्या जागा मालकाच्या नावे नविन ठराव दि.30.9.18 करुन आमचे घरांची मोजणी न करता घराची खोटी क्षेत्रफळे असेसमेट उतारावार लावुन मालकाचे नावे अनधिकृत घर पट्टी लावण्यात आली आहे. यासंदर्भात आम्ही गटविकास अधिकारी,पंचायत समिती,वसई यांचेकडे सातत्याने पाठपुरावा देखील केलेला आहे. बिडिओ ने ग्रामपंचायत ला सदर प्रकरणी 4 स्मरण पत्रे देऊन खुलासा मागितला आहे. परंतू ग्रामपंचायत खुलासा सादर करीत नाही व आम्ही देखील ग्रामपंचायतीकडे तुम्ही का असे केलेले आहे आम्ही तिथे राहत असताना इतके वर्षे या अगोदर आमची नावे घरपट्टी असताना तुम्ही मालकाच्या नावे कोणत्या अधिकारात घरपट्टी आकारणी केली आहे याचा जाब विचारले असता ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.तसेच सीईओ याना देखील पत्रव्यवहार केला आहे पण अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान 2017 च्या अधिसूचनेनूसार घर व त्या खालील जमीन आमचे नावे होवू शकेल का? कारण आम्ही शेतमजुर व कारगिर नाही आहोत. कारण आमचा ड्रायव्हींग चा व्यवसाय आहे. नविन अधिसूचने नुसार घर व त्या खालील जमीन आमचे नावे होवू शकेल का? यासंबधीत मार्गदर्शन मिळावे.वासळई ग्रामस्थ
वसई पश्चिम, तालुका- वसई
जि. पालघर

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत नोटरी मार्फत त्यांचे मुखत्यार /कब्जे पावती /साठेगत केलेले आहेत. सर्व व्यवहार चेक ने केलेले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत नोटरी मार्फत त्यांचे मुखत्यार /कब्जे पावती /साठेगत केलेले आहेत. सर्व व्यवहार चेक ने केलेले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???

साहेब नमस्कार

१ )साहेब ग्रामपंच्यात शासकीय नियमानुसार घरपट्टी ना आकारात जादा डबल घरपट्टी वसूल करू घेत आहे ,शासकीय घरपट्टीची नियमावली कुठे मिळेल
२ ) सामाईक गावठाण घर मिळकत मध्ये ३ हिसषेदार १ नं मयत आहे ,त्याला मुलबाळ नाही ,बाकी वारसाची नावे नोंद चढली आहे ,परंतु मयताच्या नावे घरपट्टी,पाणीपट्टी ,आरोग्य कर देत आहेत काय करावे लगेल कृपया मार्गदर्शन करावे

नमस्कार सर , 7/12 वरती इतर हक्कात सक्षमप्राधिकरणाच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरणस बंधी -इनाम व वतन जमिनी

*नविन अविभाज्य शर्थ*
नविन अविभाज्य व तब्दील न करनेचे शर्तिवर (1) असा शेरा आहे.

तरी आम्हाला घरातच खते वाटप करायच आहे काय करव लागेल.

नमस्कार, मी संजय बाबुराव मोहिते . आमचे वडील कै बाबुराव मोहिते यांचे निधन 19.06.1997 साली झाले आहे. त्यांच्या नावावर 195R क्षेत्र होते. त्यांच्या निधनानंतर आम्ही 3 भाऊ, 2 बहिणी आणि आमची आई , असे 5 नावे 7/12 वर आहेत. आमच्या बहिणी समसमान हिस्सा मागत आहेत. मला अशी माहिती हवी आहे की, बहिणींना कायद्याने समान हिस्सा देणे बंधनकारक आहे का? कारण वडिल 1997 साली निधन झाल्याने कायद्यात काय तरतुद आहे

आम्ही जागा खरेदी केली पण 7/12 मध्ये आमचं नाव इतर हक्क तुकडेबंदी विरुद्ध व्यवहारात नोंद झाली आहे. आमची जागा 2 गुंठे इतकी आहे. कायदेशीर रित्या 7/12 मध्ये मालकी हक्कात नोंद होण्यासाठी काय करावे लागेल ?

प्रश्न - माझ्या आजोबांनी सन 1948 साली एकूण 94 गुंठे क्षेत्र असलेल्या गटापैकी उत्तरेकडील 47 गुंठे जमीन एका सखाराम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती.उर्वरीत दक्षिणेकडील 47 गुंठे ही सखाराम नावे च होती. सन 1968 साली सखाराम मयत झाले आणि त्याच्या मुलगा माधव यांचे नाव सातबाराच्या मुळ कब्जेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात वारस नोंदीने लागले.पण इतर हक्कात नोंद करताना तलाठी यांनी मुलीचा हक्क हा दक्षिणेकडील 47 गुंठे मध्ये आहे असा केला नाही. सन 1992 रोजी माझ्या काकांनी उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे माधव कडून एकत्र कुटुंब असताना खरेदी केली म्हणजे आत्ता सर्वं 94 गुंठे चा गट काकांच्या च्या नावे झाला मात्र त्या मुलीचा सही किंवा हक्क सोड न केल्याने त्याचे नावे आजही सातबारा इतर हक्कात आहे. सन 2015 रोजी माझे काका व आम्हीं विभक्त झालो तेंव्हा ह्या गटात माझ्या वडिलांच्या हिस्सास उत्तरेकडील 47 गुंठे जमीनिवर आला आहे पण काकांना ते माहीत नाही आहे तर 1.आम्ही तहसीलदार यांना मजमस 1966 , कलम 155 ने दुरूस्ती अर्ज करू शकतो का? 2.आम्ही जर सातबारा स्वतंत्र करून मुलींचे नावे कमी करू शकतो का?

क्रुपया खालिल जुने शासन निर्णय व परीपत्रकांच्या प्रति उप्लब्ध व्हाव्यात ही नम्र विनंति.

१.महसुल व वनविभाग निर्णय क्र. १०८९ प्र.क्र.९४ र -१ दि.१७-७-१९९१.

२.परिपत्रक क्र. आर.पी.ए.-१०९७/२७१७/सीआर-३१०/र- दि.९-१-१९९२.

३. शासन आदेश क्र. आर पीए-१०९०/सीआर-१६९०/आरआय दि. ८/६/१९९०.

आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???

नमस्कार,
गावठाणामध्ये घराच्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले,त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज केला , सदर प्रकरण मा. गट विकास अधिकारी यांच्याकडे गेले , साहेबानी स्थळ भेट घेऊन तसेच ग्रामपंचायत, अतिक्रमण करणारे व आम्हाला कागदपत्रे घेऊन बोलावले व त्यावर सात दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले ग्रामपंचायतीने त्या आदेशानुसार संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले परंतु संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमण काढले नाही यावर आम्ही पुन्हा गट विकास अधिकारी यांना अर्ज केला त्यावर त्यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला अतिक्रमण करण्याबाबतचे आदेश दिले परंतु ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले समोरचा व्यक्ती अतिक्रमण काढत नाही त्यावर आम्ही काही करू शकत नाही जर ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले आदेश याची अंमलबजावणी करत नसेल तर यावरती कोणत्या ॲक्शन घेण्यात यावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे

सर पतसंस्थेला कर्ज घेण्यासाठी तारण म्हणुन जागा गहाणखत करुण दिली तरी कर्जाची रक्कम न देऊन फसवणूक केलेली आहे व पतसंस्थेने कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे कलम 101 च्या तरतुदीसाठी केलेला दावा मा.सहाय्यक निबंधक यांनी नाकारला आहे. तर गहाणखत रद्द करण्याच्या तरतुदीसाठी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद

219 हा सर्व्हे नंबर होता पुढे फाळणी होऊन 219/1 219/2 , असे सर्व्हे नंबर पडले 219/1 चे पुढे हिस्से होऊन 219/ 1अ , 219/1ब, 219/ 1क असे हिस्से पडले.
219/1ब चे पुन्हा 219/1ब/1 आणि 219/1ब/2 असे हिस्से पडले.
पुढे 1950 साळी 219/1 आणि 219/ 2 तलाठ्यांनी फेरफराने एकत्रित केले व 219/1+2 असा सर्व्हे नंबर पडला. त्यातील 219/1ब/2 + 219/1क आणि 219/2 अशा 6 एकर या जमिनीस माझे आजोबा कूळ होते व 219/1अ+219/1ब/1 अशा 3 एकर जमीन आमचा शेजारी कूळ होता. या सर्व जमिनी कुलकर्णी वतनाच्या जमिनी होत्या. 1955 साळी वतन दारणी कब्जे हक्काची रक्कम न भरल्याने सरकार अकरी पड अशी नोंद झाली. आमची कुल म्हणून नोंद तशीच होती पण 1966 अतिरिक्त मामलेदार यांनी फेरफराने सदर जमीन सरकार अकारी पड असल्या कारणाने 32 ग लागू नाही सबब इतर हक्कातील कुळाची नावे कमी केली. फेरफार हा संपूर्ण गावातील वतन जमिनी वरील सर्व्हे नंबर ला पडला होता.
त्यानंतर एकूण आकाराच्या 1.5 पट खंड भरून या जमिनी कसल्या जात होत्या.
1972 साळी सरकारच्या ठरावाला अनुसरून कलेक्टर यांनी संबंधित जमिनी वहिवाट दारांच्या नावे regrant करण्यास आदेशाने सांगितले. कब्जेहकाची रक्कम साऱ्यच्या 24 पट ठरली होती त्याची सर्व संबंधित कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. रक्कम भरेपर्यंत वहिवाट दरांचे नाव इतर हक्कात नोंद घ्यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
1975 साळी आमच्या shejaryane त्याच्या नावे असलेली रक्कम भरली व माझ्या आजोबांनी ती रक्कम 1978 साळी भरली.
शेजाऱ्यांची इतर ही वतन जमीन होती त्यामुळे त्यांनी सर्व रक्कम एकाच चलन द्वारे भरली.
त्यांच्या फेरफरचा अमल घेताना 219/1 अ + 219/1ब/1 या 3 एकराला तर दिलाच सोबत आमच्या वाहीवातीवर असलेल्या 219/1ब/2 + 219/1क या 4 एकर जमिनी ला पण दिला.
1945 पासून ते आत्ता पर्यंत ती जमीन आम्हीच कसत आहोत .1945 ते 1975 पर्यंत 7/12 ला तशा नोंदी आहेत. परंतु 1979 साळी शेजाऱ्यांच्या जमिनी जो फेरफार झाला त्यात त्यांचे आमच्या जमिनी ला नाव लागले. आजोबा अज्ञानी असल्याकारणाने regrant ची रक्कम भरून पण पुढील पाठपुरावा न केल्यामुळे जमिनीस आमचे नाव लागले नाही.
याचा गैरफायदा घेऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्त्यांचे हिस्से आमच्या जमिनीत कागदोपत्री काढून दिले व त्या नंतर दोघांनी मिळून एका त्रयस्थ वक्तीस त्यातील 70 गुंठे क्षेत्र विक्री केले केवळ चुकीच्या पद्धतीने आमच्या क्षेत्रास नाव लागले असल्याच्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन. आता सदर शेजारी आम्हाला आमचा ताबा असल्यामुळे धमकावत आहेत तुमचा या जमिनीशी संबंध नाही सरकारने आमच्या नावे जमीन केली आहे. त्यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार केली आहे की आम्हीच घुसखोरी करून त्याची जमीन हडप करू पाहतोय वास्तविक परिस्थिती नेमकी या उलट आहे. आम्हाला तेहसिल दार आमच्या ओळखीचे आहेत सर्कल तलाठी सगळे आमच्या मर्जीतले आहे असं सांगून सतत धमकावल जातंय.
वास्तविक जी जमीन आमच्या कुल वहीवातीस होती तिला त्यांचं नाव लागण्याचा सबंध नव्हता.
मी त्यांचे regrant चे चलन पाहिले आहे 364Rs एवढी कब्जा हक्कची रक्कम भरली आहे.फेरफार नुसार ज्या जमिनी त्यांच्या नावे झाल्या त्याची 24 पट शेतसार्याची रक्कम 525 Rs होते.
आमच्या आजोबांनी भरलेली रक्कम ही 310Rs आहे व आमच्या वहीवतीस असलेल्या जमिनीच्या शेत्साऱ्याची 24 पट रक्कम पण 310Rs होत आहे.
आमच्या जमिनीचे पैसे भरण्याचा त्यांचा संबंध नव्हता व त्यांनी ते भरलेले देखील नाहीत.
आज शेजाऱ्यांच्या नावे त्याची 3 एकर तर आहेच सोबत आमच्या 4 एकर ल पण नाव आहे.
तरी मी शेजाऱ्यांनी त्रयस्थ व्यक्तीस विक्री केलेले फेरफार आव्हणीत केले आहेत.
त्यांनी आमच्या नावे पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेली तक्रार तेहसील दरांकडे गेली आहे त्यांनी स्थळ पाहणी ची नोटीस बजावली आहे.
आमचे लगत चे सर्व खातेदार ती जमीन पूर्वी पासून आम्हीच कसत आहोत हे खरं सांगण्यास तयार आहेत.
याचा काही उपयोग होईल का?
शेजारीच नाव कसे कमी करता येईल आणि इतर संबधित मार्गदर्शन करावे.
प्रश्न खूप लांब झाला या बद्दल क्षमस्व.

आम्ही चार गटनंबरमधील तोंडी वाटपाप्रमाणे एका ठिकाणी असणारी 25.70 आर शेतजमीन सन 2019 मध्ये खरेदी घेतली आहे. सदर जमीन ज्या व्यक्तिकडून खरेदी घेतली त्यांच्या बाजूने कब्जेपटटीबाबत मा कोर्टाचे निकाल आहेत. (सन-2010 व 2016) मात्र सदर जमीन आम्ही खरेदी केल्यापासून लगतच्या एका सहहिस्सेदाराने त्याच्यावर कब्जा केला आहे. व तो कब्जा सोडणेस तयार नाही. त्याचे म्हणणे आहे की, या ठिकाणी 8 गुंठे जमीन तुमची आहे. राहिलेली जमीन इतर गटनंबरमध्ये आहे. येईल् तेथे घ्या. प्रत्यक्षात तो सहहिस्सेदार स्वत: मात्र त्यांचे मालकीच्या हिस्सेपेक्षा जास्त हिस्सा (आमच्यासहीत) एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहे. सदर चार गटनंबर मध्ये एकूण 9 हिस्सेदार आहेत. प्रत्येक हिस्सेदार स्वत:चा चार गटनंबरमधील हिस्सा एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहेत. मात्र आम्हास फक्त 8 गुंठेच शेतजमीन प्रत्यक्षात कसण्यास दिली आहे. पोलिस प्रशासन दिवाणी बाब म्हणून दुर्लक्ष केले आहे. कोर्टामध्ये पैसा व वेळ जाणार आहे. तरी लवकरात लवकर कब्जा मिळविण्यासाठी कृपया जवळचा मार्ग सांगावा.

मा. किरण पाणबुडे सर

सर मला महाऑनलाईनचे सेतू सुविधा केंद्र हवे आहे त्यासाठी मी मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठपुरावा केलेला आहे परंतु मला असे सांगण्यात येते की, महाऑनलाईन चे सेतू मिळत नाहीत.
तरी मला सेतू मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी. ही विनंती.

नमस्कार,
विषय:-कुळ कायदा
महोद्य,
आमचे आजोबा सन १९४५ आधीपासुन जमिन कसत होते जुण्या (१९४५ )पासुनच्या सातबार्यात 'कुळ व खंड' या सदरात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो
त्यानंतर सन १९६० साली MRT(Maharashtra revinue tribunal)न आमच्या आजोबांना कुळ म्हणून घोषीत केल
त्याच प्रमाणे Bombay highcourt न सुध्दा आमचे आजोबा कुळ आहेत अस सांगीतल
परंतु अनावधानान ईतर हक्क सदरात कुळाची नोंद घ्यावयाची राहून गेली पिक पहानी सदरात सन २०१५ पर्यत आमच्या वडिलांच्या नावाची नोंद होती परंतु डिजीटल सातबार्यात 'पिक पहानी' हा रकानाच नसल्याने ति नोंद आता सापडत नाहि
तरी१) ईतर हक्क सदरात आम्हास कुळाची नोंद घेता येईल का?
२)महत्वाचे, सन १९४५ आधीपासुन कसत असल्याकारणाण आम्हि 'संरक्षीत कुळात ' समावीष्ट होतो काय?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती....।

मा. सर
माझ्या आजीने बक्षीस पत्राद्वारे सर्वे नं. ९ ची शेतजमीन माझ्या वडिलांच्या नावे केली माझ्या आजीच्या नावे सर्वे नं. ६,७ आणि ९ हे एकत्र शेत होते त्यापैकी सर्वे नं. ६ मध्ये विहीर आहे बक्षीस पत्र करताना चुकीने सर्वे नं. ७ मधून पाणी ओलविण्याचा बक्षीस पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता या झालेल्या चुकीची तलाठ्याला माहिती देऊनही तलाठ्याने ७/१२ वर सर्वे नं. ६ मधून पाणी ओलविण्याच्या अधिकाराची नोंद केलेली नाही वा ७/१२ वर दिसत नाही. यासाठी बक्षीस पत्रामध्ये दुरुस्ती करून फेरफार घ्यावं लागेल कि तलाठी करून देईल यासाठी काय तरतूद आहे

सर आमच्या दोन चुलत्यांच्या नावे परभणी येथे 2 हेक्टर 78 आर शेतजमीन आहे,दोन चुलत्यांपैकी एक मयत आहे. तर माझ्या नावाने एकूण शेतजमीन पैकी 0.60 आर शेतजमीन नावे करून घेण्यासाठी काय करावे लागेल, जर दोन्ही चुलते आणि त्यांचे वारस ती शेतजमीन माझ्या नावे 0.60 आर कोरडवाहू शेतजमीन बक्षिसपत्र करून द्यायला तयार असतील तर बक्षिसपत्र द्वारे शेतजमीन माझ्या नावे करता येईल का? आणि करता येत असेल तर काय खर्च येईल ते सांगावे

प्लॉट च्या हद्दिवरून शेजाऱ्यांसोबत कोर्टात केस चालू आहे.
भूमापन कार्यालयाकडून कोर्ट आदेशानुसार मोजणी अर्जा केला. प्लॉट च्य मोजणी साठी एक गट( साधारण २० प्लॉट) चे पैसे भरले. मोजणी झाली परंतु हद्दी करून दिल्या नाहीत.
कोर्टाकडून वारंवार नोटीस देऊन सुद्धा काम होत नाही. 8 वर्ष कोर्ट केस चालू आहे. जसे उपभोक्ता हक्कासाठी स्पेशल कोर्ट आहेत तसा भूमापन कार्यालयात अर्ज आणि पैसे दिल्यावर योग्य पद्धतीने काम ना झाल्यास दाद मागण्यास कुठे वाव आहे का?
सरकारी अधिकारी जबाबदार होतील अशी काही तरतूद आहे का?

नमस्कार , माझ्या आईच्या वडिलांची राहते घर आणि साधारण २ एकर जमीन ( बागायत ) मालमत्ता होती . आजोबा बेस्ट मध्ये सर्विस ला होते आणि त्यांना दोन मुली आहेत . माझी आई आणि मावशी . मामा नाही . लग्नानंतर आई आणि मावशीचे गावी जाणे कमी झाले . या दरम्यान आजोबांच्या चुलत चुलत भावाने त्याला कुल वहिवाट लावून घेतली . सात बारा काढला असता व फेरफार तपासाला असता बोली व्यवहाराने कुल लावले . असे नात्यामध्ये कुल लागते का ? ज्या व्यक्तीला दोन मुली आहेत आणि तो स्वतः सरकारी नोकरीत आहे तो कुल कसा लावून देईल .
साहेब आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही अपील करू शकतो का . माझी आई अर्ज करू शकते का आणि याची दाद कोणत्या ठिकाणी MAGAYCHI

शेत जमीन मिलकत साठेखत करार आकटोबर 2006 ला केला आहे. खरेदी खत आज परयंतं केलेले नाही परंतू वकिल आणि कोरटं यांनी आमचे कडून हूकूम नामा लिहून घेतला आहे. ङिकरी करून घेतली आहे . सदरचा करार रद्द करता येतो का?

सर
आमच्या चुलत काकांची जमीन चुकीने माझ्या वडिलांच्या व एका काकांच्या नावे झाली होती.ही जमीन 2000 दरम्यान त्यांना आजोबांनी विकली होती,माझ्या वडिलांना दोन भाऊ असून ती फक्त माझे वडील व मधल्या काकांच्या नावावर होती,ती जमीन आम्ही परत त्यांच्या नावावर रजिस्ट्री करून दिली आहे,नावावर करते वेळेस वडील व मधल्या काकांनी सह्या केल्या परंतु लाहण्या काकांनी फेरफार वर आक्षेप घेतला आहे ह्या संबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती.

60 ते 70 वर्षा पासून कुळ हक्कात किव्हा इतर हक्कात असलेली जमीन आहे त्या जमिनीला माझे आजोबा वारस म्हणून आहेत व ती जमीन गेल्या 60 वर्षांपासून आम्हीच करत आहे, असे 5 गट न आहेत तिथे कुळ म्हणून नोंद आहे व सातबर्याला दुसया मालकाचे नाव आहे तर आत्ता त्या जमिनीवर कुळ हकातून नाव काडून मालकाच्या ठिकाणी आपले नाव कसे लावता येईल, त्या जमिनीच्या मालकाचा काही ठाव ठिकाण नाही व वरसाचा पण नाही

नमस्कार सर

माझ्या वडिलांच्या नावे 7/12 वर 1 हे 30 आर जमीन आहे परंतु माझ्या वडिल व वडिलांचे 4 चुलते यानी एकत्र कुटुंब असतानी 6 हे 30 आर जमिन 1961 साली खरेदी घेतली नंतर त्यानी आपसात एकत्र कुटुंबात पारंपरिक पधतिने वाट्प केली नंतर त्याना व्यवारिक आड्चनी येउ नये म्हनुन त्यानी सर्वानी एकत्र 1992 साली तसीलदार यांच्या कड़े वाट्प करुण मिळावे यासाठि अर्ज़ केला व त्या प्रमाने तसीलदार यानी कग्दोपत्रि प्रतेकास समान ( 1 हे 30 आर ) वाट्प केलें व तसा फेरफार पण ज़ाला आहे व सरकारी मोजनी करुन घ्यावी असा आदेश केला व त्या प्रमाने सर्वानी सरकारी मोजनिसाठि अर्ज़ केला, सरकारी मोजनी 1994 साली आली पन मोजनी करतेवेळि काही वाद निर्मान ज़ाले त्या मुळे सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं. नंतर तेव्हपासुन आज पर्यंत सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं व आता सर्वजण सरकारी मोजनी साठी तयार होत नाहीत,
तर आता मि आमची कमी आसलेली 38 आर जमीन मिळवीण्यासाठी कुठे दाद मागावी.

सर, अज्ञान मुलांच्या नावाने जमीन फेर झालेला आहे व परत 8-9 वर्षानी त्या सदर फेर रद्द करण्याबाबत विभागिय अधिकारी साहेब यांच्याकडे प्रकरण गेले तेंव्हापासून आजपर्यंत मुले अज्ञानच आहेत तर सदरील फेरफार रद्द करता येतो का?

माझ्या आजोबाचा जमिनीचा गट ०.०१ आर इतक्या क्षेत्राचा आहे.ते क्षेत्र आजोबांनी विक्री केले आहे हा व्यवहार तुकडेजोड व तुकडे बंदी कायद्याविरुद्ध आहे का ? किंवा विक्री केलेल्या व्यवहारास आव्हान देता येईल का?

सर नमस्कार ,

आमच्या आजोबांच्या नावे रत्नागिरी जिल्ह्या मध्ये जमीन आहे. त्या पैकी काही जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर भोगवटा सदरी जमीन मालकाचे नावे आहेत व आजोबांचे नाव इतर हक्कात "साधे कुळ" असे आहे. सदर जमिनीत वहिवाट आमचीच आहे. इतर हक्कात "साधे कुळ" असणाऱ्या जमिनी मध्ये आम्ही भात शेती करतो, त्या ऐवजी माझे भाऊ सदर जमिनीत नारळाची झाडे लावण्याचा विचार करीत आहेत.

सर, आम्ही त्या जमिनी मध्ये नारळाची झाडे लावल्यास भविष्यात काही अडचण येऊ शकते का?
आणि सदर सात बारा सदरी आम्ही आमची वारस नोंद करू शकतो का ?

कृपया सुचवावे,

धन्यवाद

नमस्ते. सर.
1) भुसंपादन चे पैसे मे.दिवानी वरिष्ठ न्यायालयात आलेले आहे.तर हा निधी जॉईंट अकाउट वर घेण्याचा कायदा आहे का.
2)सिंगल अकौंउटं वर देण्यासाठी रितसर अर्ज दिलाय .तो अर्ज रिजेक्ट केला.त्याच जिल्ह्यातील दुसर्या तालुक्यातील मे.दिवानी न्यायालय सिंगल अकौंउट वर देतात. या साठी माझा
मावेजा सिंगल अकौंउट वर घेण्यासाठी काय करावे.
आपण उपाय सांगावा ही नम्र विनंती.

माझा प्रश्न असा आहे की
माझी जमीन अधिग्रहण केली होती पण 3हे 96आर कँनोल बांधणीसाठी ते काम संपवून खुप वरष झाली आहेत आता मला ती परत माझ्या नावावर करून घ्यायची असेल तर मी काय करावे

आदरनिय साहेब
मि वर्ग ३ चा शासकिय कर्मचारी आहे तरि नॉनक्रीमिलेयर प्रमाणपत्रासाठिचा अर्ज भरताना नोकरि ऐवजी व्यवसाय- शिक्षण असे झाले आहे व सदर अर्ज भरुन १ महिना झाले आहे कृपया मार्गदर्शन मिळावे

प्रश्न : नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1953 वा त्या अगोदर एक जमीन शेतसारा भरून मिळवली होती. त्यावेळी त्यांना मूल नसल्याने त्यांनी 7/12 ला वारस म्हणून चुळत्याच्या मुलाचे नाव लावले होते पण 1957 ला चुलता वारल्याने त्यांच्या बायकोने व मुलाने गाव कायमस्वरूपी सोडलं. त्या नंतर आजोबांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य झाली. आमच्या आजोबांचा मृत्यू 2011 साळी झाला त्यानंतर वारस हक्काने 7/12 ला आजी, बाबा आणि आत्या चे नाव लागले आहे तसेच 7/12 ला आजोबांच्या चुलत भावाचे नाव शुध्दा आहे. 1957 ते 2019 पर्यंत आजोबांचा चुलत भाऊ कधी गावाकडे आलाच नाही पण आज घडीला आजोबांच्या चुलत्याच्या मुलाचे वारस येवून आमच्या जमिनीतून अर्धा वाटा मागत आहेत. जी जमीन गेले 50-52 वर्ष आमचे आजोबा व बाबा कसत आले आहेत त्यांनी त्याचे पूर्ण आयुष्य या जमिनीमध्ये घालवले आहे. आज त्या जमिनीचा हिस्सा मागताहेत. 1) कायदेशीर रित्या हे योग्य आहे का? 2) जर कायदेशीर योग्य असेल तर आम्हाला त्याच्या विरोधात काही कारवाई करता येवू शकते का? 3) आणि जर योग्य नसेल तर त्यांचे नाव 7/12 वरून कमी करू शकतो का? कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे.

नमस्कार सर, माझा प्रश्न महार वतन जमिनीशी संबंधित आहे. भोगवटादार वर्ग २
आमच्या जमिनीचे ३/९/१९७६ ३७४ रु एका हफ्त्यात भरायचे होते ते मराठा समाजातील एका व्यक्तीने भरले व ३२ ओ प्रमाणे आपल्या बायकोचे नाव कब्जेदार म्हणून ७/१२ वर लावले व हफ्ते फिटे पर्यंत मूळ मालकाचे नाव इतर हक्कात दाखल केले .
१/२/१९७६ ला जमिनीची खरेदी किंमत संपूर्ण भरली व ३२ एम प्रमाणे मूळ मालकाचे नाव कमी केले.
५/९/१९७६ ला बँक ऑफ महाराष्ट्र व १७ /१/१९७७ भूविकास बँक कडून कर्ज घेतले. ताबे गहाण सोडवणार अशी नोंद ७/१२ वर आहे (मुदत १० वर्ष ). त्यांनी कर्ज घेऊन बोजा दाखल करून ठेवला आहे. २००४ साला पासून ७/१२ व ८ अ हा दि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह लॅन्ड डेव्हलोपमेंट बँक च्या नावावर झाला आहे.सध्या स्तिथीत चौकशी केल्यावर कळले भूविकास बँक बंद झाली आहे .जमीन पडीक आहे.आमच्या कडे जमीन विकल्याचा कोणताही पुरावा नाही. माझे वडील त्यावेळी लहान असल्याने त्यांना पुरेशी माहिती नाही.मी सर्व जुने फेरफार व ७/१२ काढले आहेत(१९४७ ते १९७३ पर्यंत आजोबांचे नाव आहे).
मला जमीन परत मिळू शकेल का ?
मला कुठे दाद मागावी लागेल ?
कोणता मार्ग आहे ?
आपण मार्गदर्शन करावे

नमस्कार सर माझे पणजोबांना दोन मुले होते.त्यातील 2 नंबरचे हे माझे आजोबा आहेत तर माझे आजोबा हे 1952 मध्ये कामासाठी मधप्रदेश मध्ये सरकारी(ministry of defence) नोकरीत रुजू झाले व 1984 ला तेथेेच रिटायर्ड झाले. व माझे आजोबा डिफेन्स मध्ये नोकरी वर असताना.1952 साली आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या) आणि आजोबां चा चुलत भाऊ यांच्यात satara court त वाटपाचा स्पे.अ. न. ने दावा होऊन court ने माझे आजोबाना 4आने व आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या )4आनेआणि चुलतभाऊ याना 8आणे प्रमाणे वाटप केली.पुढे जाऊन त्या वडिलोपार्जित मिळकतीत कुळा ने 32 ग करून आजोबांचे मोठे बंधू व चुलतभाऊ यांना नोटीस देऊन कुळाने खरेदी केल्या. त्या वेळी माझे आजोबा मध्यप्रदेश येथे डिफेन्स मध्ये रुजू होते .आणि कुळा ने माझे आजोबा व त्यांचे वारसास32ग करताना आज पर्यंत कुठल्याही नोटीस नाहीत .पण वाटपाने 1952 लाच कोर्टात आम्ही 4आणे प्रमाणे आम्ही मालक असताना कुळाने आमचा पण हिस्सा 32ग ने घेतला आहे. नंतर माझे वडील सुद्धा 1982 (ministry of defence)मध्ये रुजू झाले व 2007 ला रिटायर्ड झाले त्या मुळे आमच्या दोन पिढ्या ह्या सरकार च्या सेवेत गेले. गावाकडे आमची वडिलोपार्जित जमीन कुळाला गेल्याने. आज ही आमच्या 3 पिढया भूमिहीन आहोत व आम्हाला उदर निर्वाह चे कोणतेही साधन नाही.आज आम्ही मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहोत .तर आम्हाला सरकार कडून पुनर्वसन होहिलं का व आम्हाला आमची वडिलोपार्जित शेत जमीन मिळेल का
टीप:-1)जेव्हा 32 ग झाले तेव्हा आम्हाला कोणतीही नोटीस बजावली नाही.
2) कोर्टात वाटपाने जो हिस्सा आम्हाला धीला पण पुढे 7/12सदरी आजोबा चे मोठे बंधू व चुलतभाऊ यांच्याच नावाची नोंद केली आमचे आजोबा चे नावाची कोठेही नोंद नाही .

सर मी निलेश गावित आहे माझा प्रश्न असा आहे की .
माझ्या पणजोबा चे आजोबांचे नाव मोजाजी होते .त्यांना 6 मुले होते .पणजोबा चे वडील क्रमांक 3 चे वरील 6 पैकी 5 मुलांचा वाट्याला जमीन वाटली गेली पण . क्रमांक 3 चा मुलाचा जमीन दिली नाही ..मी क्रमांक 3 चा पिढीत जन्माला आलो .पणजोबा ,आजोबा यांनी पाठपुरावा केला असता .वरील वारसदारांनी मारझोड करून पळवून लावले .ते बजुचाचा गावात जाऊन वास्तव्य करू लागले . पण आता ,पणजोबा चे आजोबा, पणजोबा., आजोबा हे सर्व आता मयत आहे ,माझ्या पापा नीही प्रयत्न केला असता आजोबा वरले तेव्हा ते 10 वी ला होते .म्हणून राहून गेले प्रयत्न करायचे .पण आता मी मागील 50 वर्षाचे फेरफार काढले असता .क्रमांक 3 चा मुलाचे नाव कुठेच दिसून आले नाही.पुरावा म्हणून आता काय करता येईल .की मग मी या पिढीत जन्म घेतला नाग. म्हणून शांत बसू .. मला मार्गदर्शन करावे सर

सर माझी जवळा शिवारात शेत जमीन असून मला दुधना नदी पत्रातून पाणी घेण्यासाठी वीहिर किंवा खडा घेण्यासाठी
दुसरा शेतकरी अडवणूक करत आहे नदी मध्ये माझी जमीन आहे किंवा ताबा सांगतो तर मी काय करायला पाहिजे?

महोदय मी स्वतंत्र प्लाट खरेदी केला आहे मला अगोदर स्वतंत्र नावाचा 7/12 उतारा मिळत होता आता ई-उतारा तो पण आता 8 लोकांचा सामाईक उतारा मिळतो तहसीलदार साहेब यांना दोन वेळेस अर्ज दिला तरी न्याय मिळाला नाही

महोदय ,
Power of Attorney Act , 1882 नुसार 100 रु.पेक्षा जास्त मालमत्ताचे कुलमुखतीयार पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे पण त्रयस्थ व्यक्तीने जमीन हि जर नॉटरी कुलमुखतीयर खोट्या साह्य करून व नंतर त्याच नॉटरी कुलमुखतीयरच्या आधारे रजिस्टर खरेदी खत्ताने परस्पर विकली असेल तर Specific relief act खाली दावा टाकून खरेदी Null and Void करून मिळेल का?
किंवा आम्ही आमचा जमीन मोबदला व्याजा सकट मिळवू शकतो का?

आदरणीय मोहदय,

सरकारने जाहीर केलेली कर्ज माफी हि गाव स्तरीय पत संस्था व विकास सोसायटी यांच्या मार्फत घेतलेले कर्ज हे माफ होण्यास लागू होते काय?

कर्जाची रक्कम व त्या बरोबर असणारे पत संस्थेचे प्रतिनिधी यांचे नाव ७/१२ (इत्तर अधिकार) वरून कमी होईल का?

७/१२ वरील इत्तर अधिकारातील पत संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.

आपला कृपाभिलाषि,
रोहिदास काळे


महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित जमीन आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. आजोबांचा मृत्यू झाल्यानंर वारस तपासात माझ्या मोठया चुलत्याने ज्या जमिनी फक्त आजोबांच्या नावे होत्या त्यांच खाते वेगळे करून ते स्वतःच्या नावे केले आहे, आणि इतर सामायिक जमिनी आहेत त्याच्या सातबाऱ्यात सगळ्या भावंडांची नावे लावली आहेत, परंतु त्यांच्या नावे ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा सगळ्याच्याच आहेत तर या वर कायदेशीर काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.

महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित घर आहे, आजोबांचा मृत्यू झाला आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. त्याचप्रमाणे मोठा मुलगा म्हणून माझ्या मोठ्या चुलत्याचा नावावर ते घर झाले आहे, म्हणून आम्हाला ते माझ्या वडिलांच्याहि नावे करायचे आहे, म्हणजेच घरपट्टी मध्ये अ आणि ब करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संमती पत्र मागितले आहे, परंतु चुलता ते द्यायला तयार होत नाही आहे ( सही करायला येत नाही आहे ). तर यावर कायदेशीर काही उपाय करता येईल का, याचे मला मार्गदर्श्न करावे हि विनंती.
माझ्या आत्याला घरात हिस्सा नको आहे तसेच सदर जमीन हि तिघांच्या नावर आहे.

नमस्कार सर माझे आजोबाचे ८ मुले होती व त्यांना दोन ठिकाणी जागा होत्या त्यांतील एक राहते घर व दुसरी संपूर्ण मोकळी जागा होती मोकळ्या जागेपैकी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाच्या नांवावर ग्रामपंचायत कार्यालयात त्यातील काही जागा नमुना न ८ ला करून दिली व त्यानुसार माझ्या वडिलांनी रीतसर बांधकाम परवाना काढून 30 वर्षापूर्वी घर बांधले आहे व आम्ही त्याची घर पट्टी भरत असून आमची मालकी आहे अडचण अशी आहे कि आता आजोबा नाहीत आणि pr कार्ड काढले असता त्यावर अजून आजोबांचे नाव आहे तर मी माझे तेवढे क्षेत्रापुरते pr कार्ड ला कश्या प्रकारे लावू शकतो आणि आता बाकीच्या काकांनी विरोध केला तर मी कोर्टात adverse possesion चा दावा कसा दाखल करू शकतो किंवा आणखी काही मार्ग असल्यास सुचवणे